साहेब सोमवारी कल्याण दिशेकडे रवाना होणार आहेत.. त्या प्रवासाची त्यांच्या हितचिंतकांनी लिहिलेली एक छोटी गोष्ट शेअर करत आहे.
#BestCM

साहेब कल्याण कडे जाताना..
आज ची सकाळ जरा चिंताजनकच होती, हो म्हणजे कारणच तसे होते, खूपच लांबचा प्रवास करायचा होता आज साहेबांना..
त्यामुळे सकाळीच लवकरच उठवल गेलं त्यांना.. त्यांनीही घड्याळात पाहिलं, "अरे बाप रे.. १० वाजले.. आज फारच लवकर जाग आली.. असं होत हल्ली.. कुठे जायचं असेल तर लवकरच जाग येते.."
कल्याण म्हणजे तस फारच लांब,म्हणजे ठाणे आधी एवढ लांब त्यानंतर 3 खाडी वरचे पुल क्रॉस करून जायचं म्हणजे मोठ्ठाच प्रवास.पण तरी साहेब खंबीर..नाही बोलले नाही..सकाळी थोडा कंटाळा आला पण तो कोणाला नाही येत?किंबहुना आलाच पाहिजे,आणि आळस आपण सोडायचा ठरवला तरी आळसाने आपल्याला सोडला पाहिजे ना?
नाश्ता करून गाडी मध्ये साहेब बसले बरोबर आपण नक्की कशासाठी चाललोय हे समजावून घेणे साठी अजून एक दोन मंत्री बसवले आणि लांबचा प्रवास चालू केला..
ड्रायव्हिंग ची हौस असल्याने साहेबांचे आख्या महाराष्ट्राचे रस्ते एकदम पाठ. मुंबई ते पुणे, पुणे ते नाशिक, आणि नाशिक ते मुंबई. अख्खा महाराष्ट्र तोंड पाठ. एकदा साहेब परदेशी गेलेले कोकण दिशेला, म्हणजे तसे ते नेहमी जातात लोकसभा आणि विधासभेच्या निवडणुकीच्या वेळी, त्या ट्रीपला आम्ही..
झंझावात बोलतो.
मस्त मजा असते तेव्हा.. सकाळी नानू भाऊंच्या रिसॉर्ट वर जायचं दिवसभर मजा करायची.. संध्याकाळी दोन दिवस आधी जळगाव किंवा औरंगाबादला दिलेलं भाषण साहेब इथे परत देतात..
ते नाटक वाले कसे ज्या शहरात प्रयोग असतो त्या शहराचे नाव मध्ये मध्ये टाकतात, ती ओरिजनल आयडिया साहेबांची. साहेब असच जळगाव किंवा औरंगाबाद ला दिलेलं भाषण इथे दोन तीन नावं बदलून करतात.
प्रवास सुरू झाला, ठाणे येई पर्यंत सगळ्यांनी एक दोनदा कोमट पाणी प्यायलं. ठाणे सोडल्यावर मात्र साहेबांची उत्सुकता खूप वाढली.. किती वर्षांनी कल्याणचा रस्ता धरला होता ना.. साहेबांचे प्रश्न सुरू झाले आणि मंत्री साहेब आणि PA यांची उत्तरं..
साहेब -: कल्याणकर आज खुश असतील ना? एवढं मोठं काम केलं आपल्या सरकार ने.. नवीन पुल म्हणजे विकासाची चाहुलच..

PA - हो साहेब.. नुसता भगवा जल्लोष चालू आहे कल्याण मध्ये..
साहेब -: जरा मला माझे भूमिपूजन च्या वेळेचं भाषण दाखव म्हणजे मला जरा कळेल की तेव्हा अजून काय बोललो होतो..

PA शांत..

मंत्री - ते साहेब भूमिपूजन तर.. आधीच्या..

साहेब :- अच्छा.. कळलं कळलं.. म्हणजे आपण जोर देऊन काम वेळेच्या आधी करून घेतलं तर..
मंत्री - हो साहेब फक्त दोन वर्षचं उशीर झालाय.. तसा काहीच नाही.. मेट्रो समोर तर ..

साहेबांनी रागाने बघितल्यावर मंत्री चूप बसले..

साहेब :- ते समृध्दी कधी चालू करायचा?

PA - साहेब काम पूर्ण झालं की..

साहेब रागावून बघतात..
साहेब - आपली मदत नसती तर समृध्दी कधी झालाच नसता..

मंत्री - साहेब आपण actually विरोध केलेला त्या रस्त्याला..

साहेब - अरे हो.. पण नंतर आपणच पूर्ण केला ना..

मंत्री - सगळे टेंडर ॲक्च्युअली आधीच्या..
साहेब - ठीक आहे ठीक आहे.. नाव देऊन टाकला ना आपण.. लोकांना तेच लक्षात राहत.. त्या कल्याणच्या मेट्रोच काम कुठ पर्यंत आलंय?

PA- (हसत) साहेब आपल आणि मेट्रोच कुठे कधी जमलय..

साहेब चूप..
साहेब - एक तरी खांब बांधला का? तेवढंच जरा बोलता येईल भाषणात..

मंत्री - खांब काय साहेब एक खड्डा पण नाही खणला आपण.. आपलं आणि मेट्रोच..

गाडी कल्याण मध्ये आली..

साहेब - वा कल्याण किती बदललंय, खूप दिवस झाले इथे येऊन, लास्ट कधी आलेलो आठवत सुद्धा नाही..
PA- साहेब लास्ट इलेक्शन ला आलेलो.. आपली इलेक्शन to इलेक्शन फेरी ठरलेली असते.. त्यात नो compromise.

साहेब - वा.. सीसीटीव्ही लावलेत आपण.. रस्ते पण सुंदर दिसत आहेत.. जुनं कल्याण कोणाला आठवणार च नाही.. खूप जास्त काम केलंय आपण इथे..

मंत्री चूप..

साहेब - काय झालं? बोला ना..
मंत्री - साहेब सीसीटीव्ही स्मार्ट सिटी अंतर्गत लागलेत.. त्यात केंद्राने..

साहेब - चालायचंच आपण गती दाखवली म्हणून होऊ शकलं..

मंत्री - आपण १२० कोटी साईडला ठेवून दिलेले दोन वर्ष साहेब..

साहेब - रस्ते.. या इलेक्शन का कल्याणकर हे रस्ते पाहूनच मत देतील आपल्याला..
मंत्री - साहेब पाहिलं चौक क्रॉस केलं की रस्ते पुन्हा.. ..

आणि मंत्री साहेबांनी मान खाली घातली..

साहेब - अरे एवढा मोठं डम्पिंग ग्राऊंड चा विषय सोडवला आपण..

मंत्री - साहेब, ज्या जागेमुळे प्रॉब्लेम चालू होता.. आणि की लोकं नडत होती ते सगळे आपलेच होते.. actually आपणच..
साहेब - अरे एवढं निराश होऊन कसं चालेल.. काहीतरी नवीन वचन देतो ना आता आलोय तर.. बाकी थोड केंद्रावर ढकला तुम्ही तुमच्या भाषणात..

PA - साहेब तुम्ही कल्याणला बुलेट ट्रेन च स्टेशन देतो असा सांगून टाका सरळ..

साहेब - मस्त.. हेच करतो..
मंत्री - पण साहेब बुलेट ट्रेन ला तर आपला विरोध ना..

PA - मग एअरपोर्ट?

मंत्री - केंद्राने प्रयत्न केलेला पण आपण विरोध केला.. ( मंत्री विचार करून) साहेब एक घोषणा होऊ शकते..

साहेब - काय? सांगा पटकन..

मंत्री - ते कल्याण वाशी ट्रेन सेवा लवकर सुरू करू असं सांगून टाका..
साहेब - करू कशाला.. आज पासून करतो सांगतो ना.. किंबहुना करूनच टाकू ना..

मंत्री - साहेब त्या साठी आधी कळवा ऐरोली ट्रॅक टाकावा लागेल ते आपले दुसरे मंत्री ते काम होऊन देणार नाही.. आणि केलं तर.. सरकार..

साहेब - नाही नको.. उगाच वाद नको..
साहेब विचार करत करत गाडीतून उतरले.. भाषणासाठी स्टेज वर गेले.. आणि येत्या दिवसात कल्याणचा भगवा विकास करू अशी घोषणा केली.. काय टाळ्या पडल्या तुम्हाला सांगू.. सैनिक तर लई खुश..

साहेब म्हणजे साहेब खरचं.. दूरदृष्टी असावी ती अशी..

कथा समाप्त 🙏🏻

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Dhananjay Mane

Dhananjay Mane Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(