स्वर्गाच्या महाद्वारा जवळ आज पहाटे साक्षात शिवप्रभू शिवराय स्वतः उभे होते!
सूर्योदय ही अजून झाला नव्हता, महाराज आज आनंदी होते आणि किंचित दु:खी ही!
त्यांचा अत्यंत आवडता मावळा, जिवा शिवाशी मीलन झाले असा जिवाचा जीवलग आज स्वर्गारोहण करीत होता
(१)
कुंकम रांगोळ्यांचे सडे त्यांच्या स्वागतासाठी घातले गेले होते. आयुष्यभर फक्त एकच नाम घेऊन जिवाचा शिव झालेला, महारांजाच्या नावाने उभ्या जगतामधे हलकल्लोळ करणारा वीर होता शिवशाहीर बाबासाहेब उपाख्य बळवंत मोरेश्वर पुरंदरे!
स्वर्गाच्या महाद्वारात तुतार्या वाजल्या
(२)
सनई चोघड्यांच्या मंगल स्वरात महाराजांनी स्वतः बाबासाहेबांचे स्वागत केले! बाबा! काय घाई मला भेटण्याची? तुमची गरज होती पृथ्वीतलावर! रहायचं की अजून काही दिवस!
महाराज, गेली ऐंशी वर्षे फक्त तुमचे गुणगान केले, तुमचाच ध्यास घेतला, इतके पोवाडे लिहिले
(३)
व्याख्याने दिली पण ते तुम्हाला ऐकवण्याची माझी शेवटची इच्छा राहिली होती की! त्यामुळे यावे लागले! महाराज हसले, मागे वळून म्हणाले, मोरोपंत , दरबार भरवा,
मासाहेबांना निरोप धाडा, म्हणावं बाबासाहेब आले आहेत, रामाचं चरित्र लव कुशांनी रामाला ऐकवले..
(४)
आज शिवचरित्र "बाबासाहेब" आपल्याला ऐकवणार आहेत, सत्वर या! जगदंब जगदंब!
बाबासाहेबांना विनम्र श्रद्धांजली व मानाचा मुजरा!
😢🙏🙏🌹🌹💐💐