पांडव लेणी :
नाशिकच्या पांडव लेणीही प्रसिध्द आहेत. नाशिक नवीन बसस्थानकापासुन ५ व महामार्ग बसस्थानकापासुन ४ कि.मी. अंतरावर एका मोठ्या टेकडीवर या लेण्या आहेत. ही लेणी मात्र प्राचीन आहेत. सुमारे २५०० वर्षापूर्वींची. येथे जो पाली भाषेतील शिलालेख आहे त्यावरुन ही लेणी २०००
वर्षांपूर्वीचीच असल्याचे निश्चित समजले जाते. एकूण २४ लेणी आहेत. काही लेण्या व त्यातील मूर्त्या चांगल्या स्वरुपात तर काही खंडीत स्वरुपात शिल्लक आहेत. बुध्दस्तुप, भिक्षूंची निवासस्थाने, बुध्दबोधिसविता, जैन तीर्थकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या मूर्त्या,
पाच पांडवसदृशमूर्त्या, भीमाची गदा,कौरव मूर्त्या, इंद्रसभा, देवादिकांच्या मूर्त्या या सर्व लेण्यात आहेत. मूर्त्यांची शिल्पकता वाखाणण्यासारखी आहे.
रामकुंड :
रामकुंड हे नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात असून मध्यवर्ती बसस्थानकापासून दोन कि.मी. अंतरावर आहे.
वनवासादरम्यान या ठिकाणी प्रभुराम स्नान करीत होते अशी मान्यता असल्याने यास पवित्र समजले जाते. या कुंडा जवळच ‘’अस्थिविलय तीर्थ ‘’ आहे. रामकुंडाचे बांधकाम सातारा जिल्हयातील खटावचे जमिनदार श्री. चित्रराव खटाव यांनी 1696 मध्ये केले. श्री श्रीमंत माधवराव पेशवे (चौथे पेशवे) यांच्या
मातोश्री श्रीमती गोपिकाबाई यांनी नंतरच्या काळात रामकुंडाची दुरुस्ती केली.भाविक आपल्या मृत नातेवाइकांच्या अस्थि, अस्थिविलयकुंडात विसर्जित करतात.महात्मा गांधी,पंडीत नेहरु,इंदिरा गांधी,यशवंतराव चव्हाण यांचेसह अनेक महान नेत्यांच्या अस्थि रामकुंड येथे विसर्जित करण्यात आल्या आहेत.
श्री सप्तश्रृंगी गड :
श्री सप्तश्रृंगी गड नाशिक पासुन 60 कि.मी अंतरावर कळवण तालुक्यात स्थित आहे.देवीचे मंदिर 7 शिखरांनी वेढलेले असुन समुद्रसपाटीपासुन 4659 फुट उंचीवर आहे.
यास महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी ‘’अर्ध शक्तीपीठ’’ मानले जाते.देवीची आठ फुट उंचीची मुर्ती
पाषाणात कोरलेली असुन दोन्ही बाजुस 9 असे एकुण 18 हात व त्यात विविध आयुधे असलेली आहे.या ठिकाणी माता भगवती निवास करते. ‘’सप्तश्रृंग’’ हया शब्दाचा अर्थ ‘’सातशिखरे’’ असा आहे.गडाच्या पायथ्याशी नांदुरी गाव आहे. गडाच्या शिखरावर विविध औषधी वनस्पती आढळतात. गडावर कालीकुंड, सुर्यकुंड,
दत्तात्राय कुंड अशी कुंड आहेत.गडाच्या पुर्वीस खोल दरीने विभागला गेलेला ‘’मार्कंडेय डोंगर’’ आहे.हया ठिकाणी ऋषी मार्कंडेय यांचे वास्तव्य होते, असे मानले जाते.या ठिकाणी त्यांनी दुर्गासप्तशतीची रचना केली चैत्र व अश्विन नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
एके काळी एका लाकूडतोड्याने एका लाकूड व्यापाऱ्याकडे नोकरी मागितली आणि त्याला ती मिळाली. पगार चांगला होता आणि कामाची स्थितीही चांगली होती. त्या कारणास्तव, लाकूडतोड्याने आपले सर्वोत्तम कार्य करण्याचा निर्धार केला.
मालकाने ने त्याला त्याची काम करायची जागा दाखवली.
पहिल्या दिवशी लाकूडतोड्याने 18 झाडे आणली. मालकाने त्याचं कौतुक केलं. मालकाच्या बोलण्याने प्रेरित होऊन, लाकूडतोड्याने दुसऱ्या दिवशी खूप प्रयत्न केले, पण तो फक्त 15 झाडे आणू शकला. तिसऱ्या दिवशी त्याने अजून खूप प्रयत्न केले, पण
त्याला फक्त 10 झाडे आणता आली दिवसेंदिवस तो कमी कमी झाडे आणत होता.
लाकूडतोड्या ने विचार केला मी माझी शक्ती गमावत आहे, तो मालकाकडे गेला माफी मागितली आणि म्हणाला हे असं का होतं आहे मी समजू शकत नाही.
मालकाने त्याला विचारले तुम्ही तुमची कुऱ्हाडी शेवटच्या वेळी कधी धारदार केली होती?
वपुंचं पार्टनर पुस्तक....वपुंचं लिखाण जखमेवर फुंकर मारणारे शब्दांचं औषध.
व. पु. काळे लिखित पार्टनर पुस्तक म्हणजे अनुभवांची खाण. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक पार्टनर असतो हि गोष्ट त्या प्रत्येक पार्टनरची आहे. जो पार्टनर नेहेमी आपल्या सोबत असतो, आपल्याला घडवतो, शिकवतो,
जगायला लावतो, ज्या जगण्याला जो अर्थ देतो तो पार्टनर.
पुस्तकाचं नाव बघून आपल्या मनात जो पार्टनर चा अर्थ आलाय तो हा नाही, हा वेगळा आहे. इतरांपेक्षा वेगळा पण जास्त जवळचा. हा पार्टनर स्त्री- पुरुषमध्ये गुंतत नाही हा त्या पलीकडे पोहोचतो पुस्तकात एक कथा गुंपली.म्हणावी तर साधी सोपी.
ही कथा कथाकथनकारांच्या रूपानं आपल्या समोर येते.
नरक म्हणजे काय, तर आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणुस न जाणे म्हणजे नरक. अशी सुरुवात पहिल्या पानापासून ते वडिलांच्या एका पाहण्याने तू घर का सोडलं ते आता समजलं शेवटच्या पानापर्यंत आपल्याला गुंतवून ठेवते.
प्रफुल्ल सरांनी लिखित पुस्तक "गोष्ट पैशापाण्याची" वाचली अतिशय छान पुस्तक, सरांनी खूप साध्या सोप्या व सरळ भाषेत हे पुस्तक लिहिले आहे. सम्पूर्ण पुस्तक शिकण्यासारखं आहे.
श्रीमंतीच्या दिखाऊपणा पेक्षा साधेपणाने राहून वेळोवेळी केलेली योग्य आर्थिक गुंतवणूक कधीही चांगली.
आपल्या मुलांचं भविष्य घडवायचे असेल तर त्यांना योग्य संस्कार व शिक्षण हवेच वेळ निघून जाण्या अगोदरच त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक बचत आतापासूनच करायला हवी.. माणसाची किंमत त्याच्या कामाने असते ना की उंची, रंग रूपाने. म्हणून आपले कर्तव्य पहिलं नंतर सगळ्या गोष्टी.
पैसा आज आहे तर उद्या नाही पण चांगली संगत व ज्ञान नेहमी आपल्याला प्रगतीवर नेते क्षणिक सुखापेक्षा अनंत काळ टिकणारे ज्ञान कधीही श्रेष्ठ. जेव्हा आपल्या आपल्याकडे पैसा येतो तेव्हा तो जातो कुठं याचं भान नसलं की अधोगती निश्चित समजायची पैसा येण्यापूर्वीच त्याची योग्य योजना आखायला हवी.
१० रुपयांत पुस्तकं देऊन, उदरनिर्वाह चालवणाऱ्या 'वाचनवेड्याची' वाचा कहानी....
“वाचन हे आपल्या मेंदूला आवश्यक असणारं खाद्य आहे” असं विज्ञानात सांगितलं आहे. वाचनात इतकं सामर्थ्य आहे की, त्यामुळे तुमची अशांत वृत्ती ही क्षणात शांत होत असते.
राकेश जो की, कोणतंही पुस्तक फक्त १० रुपयांत भाड्याने देतो आणि लोक ते पुन्हा आणू देतील असा त्यांच्यावर विश्वास सुद्धा ठेवतो.
नाव, नंबर लिहून घेण्यासाठी कोणतंही रजिस्टर नाही, कोणतं कम्प्युटर नाही, सॉफ्टवेअर नाही.
राकेशने हा व्यवसाय सुरू
करण्याचं आणि कोरोनाच्या कठीण परिस्थितीत सुद्धा तू सुरू ठेवण्याचं एकमेव कारण म्हणजे त्याला स्वतःला वाचनाचं असलेलं प्रचंड वेड.
.
कोणत्याही नवीन व्यक्तीला पुस्तक देतांना तो एकच कळकळीची विनंती करतो की, “तुमचं पुस्तक वाचणं झाल्यावर कृपया करून ते पुस्तक वापस आणून द्या.”
वाचनाचे 5 मार्ग तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आणि वाचनाची रोजची सवय कशी करावी.
वाचन केल्याने मेंदूतील संबंध मजबूत होतात, स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते आणि तुम्हाला दीर्घायुष्यात मदतही होऊ शकते.
वाचन तणाव पातळी देखील कमी करू शकते आणि वय-संबंधित संज्ञानात्मक घट टाळू शकते.
अधिक वाचण्यासाठी, दररोज एखादे पुस्तक उचलण्यासाठी वेळ बाजूला ठेवा,मग ते तुमच्या प्रवासादरम्यान असो किंवा झोपण्यापूर्वी.
1. वाचनामुळे तुमच्या मेंदूतील संबंध मजबूत होतात : वाचनामुळे मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नवीन कनेक्शन सुलभ होते.2013 च्या एका लहानशा अभ्यासात असे आढळून आले
आहे की कादंबरी वाचल्याने मेंदूच्या त्या भागांमध्ये संवाद वाढला जो भाषा प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतो. याने द्विपक्षीय सोमाटोसेन्सरी कॉर्टेक्स, मेंदूचा भाग जो संवेदी माहितीवर प्रक्रिया करतो त्यामध्ये दीर्घकालीन बदल देखील घडवले.
20 व्या शतकातील एक प्रमुख कवी, माडगूळकर यांनी चित्रपट आणि रेडिओ माध्यमांमध्ये मोठे योगदान दिले, ज्याचे उदाहरण म्हणजे लोकप्रिय संगीत कार्यक्रम गीत रामायण.
गजानन दिगंबर माडगूळकर, त्यांच्या उत्कृष्ट रचना गीतरामायणासाठी ‘आधुनिक काळातील वाल्मिकी’ म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांच्या वाचक
आणि प्रशंसकांमध्ये ‘गदिमा’ म्हणून ओळखले जात होते.त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटेफळ या गावी १ ऑक्टोबर १९१९ रोजी झाला आणि तेथेच त्यांचे शिक्षण झाले. आटपाडी हे १६ व्या शतकात विजापूरच्या आदिल शाही
राज्याचा (१४८९ ते १६८६) भाग होते आणि काहीवेळा आटपाडी-महाल म्हणून ओळखले जात असे. आज हे शहर त्याच्याशी संबंधित असलेल्या तीन साहित्यिकांसाठी ओळखले जाते: माडगूळकर, त्यांचे धाकटे बंधू व्यंकटेश आणि आंबेडकरवादी लेखक शंकरराव खरात मोठे झाल्यावर, माडगूळकरांवर त्यांच्या आईच्या संगीतावरील