आणि मी महाराष्ट्रात हिंदी बोलणे थांबवले ..

६-७ महिन्यांपूर्वीची गोष्ट .. वरळीला ऑफिसला चाललो होतो, औषध घ्यायचे म्हणून मध्ये दादरला गाडी थांबवून उतरलो. औषधाच्या दुकानातील रांगेत उभा होतो पुढे ३-४ व्यक्ती होत्या हातभर अतंर ठेवुन. पहील्या क्रमांकावरील आजोबा औषध न घेता बाजूला झाले..
आणि बाजूलाच फुटपाथवर बसलेल्या आजींकडे गेले. गावाकडची मंडळी वाटत होती. आजींची तब्येत ठीक दिसत नव्हती व रस्त्यावरच्या लोखंडी ग्रिलचा आसरा घेतला होता त्यांनी ..

माझा नंबर आला .. 'भाई ये लिस्टवाली दवाईया देना प्लीज' .. औषधे घेतली .. तोपर्यंत वाहतूक कोंडीमुळे आमचे सारथी गाडी ..
.. घेऊन पुढे गेले होते व त्यांनी फोन करून सांगितले की युटर्न मारून येतो. थोडावेळ होता माझ्याकडे .. म्हणून थोडी माणूसकी मनात डोकावली व त्या आजी-आजोबांकडे गेलो ..

मी :"आजोबा .. काय हवय का? आजींची तब्येत बरी वाटत नाही"
आजोबा : "बाळा .. हिच्या गोळ्या संपल्यात आणि तिथल्या मनुष्याला
..मला माझे म्हणणे सांगते येत नाही. हीचं दुखण वाढलय म्हणून हिला इथे एकटे सोडून दुसरे औषधाचे दुकान शोधायला ही जाता येत नाही.
मी : "मनुष्याला सांगता आले नाही म्हणजे ?"
आजोबा : "मी त्याला मराठीत बोललो पण बाप्या बोलतो हिंदीत बोला #मराठी येत नाही, आणि मला हिंदी येत नाही .. मग काय कराव"
मला काही कळलच नाही काय बोलू ..
आजोबा : "मुंबईच सर्वच वेगळ. #मराठी बी बोलता येत नाही इथ .. ही आपल्या महाराष्ट्राची राजधानी ना बाबा?"
मी : ".. हो पण असे कोण बोलत नाही इथे .. काहीतरी गैरसमज झाला असेल .. चला आपण जाऊ"

आम्ही दोघे पुन्हा तिथे गेलो. आजोबांना माझ्या सोबत बघून औषधाच्या ..
दुकानातील ती व्यक्ती हसली
दुकानदार : "चाचा हे ठीक कीया की इन भाईसाब को लाये. अब बोलो क्या चाहीए?"
मी : "भाई आपने इन को हिंदी नही आती इसलिए दवाई नही दी?"
दुकानदार : "बिल्कूल. हिंदी राष्ट्रभाषा है सबको आनी चाहीए. घर मे मराठी-वराठी ठीक है पर बाहर गावठी नही बननेगा. हिंदी आनी चाहीए"
एक तीव्र सनक डोक्यात गेली .. व मान खाली. आजोबा माझ्याकडे तर कधी आजींकडे बघत होते. मी स्तब्धच होतो.

मी (दुकानदारास) : "भाऊ तुमचे शिक्षण कीती ?
दुकानदार : "क्यायाया ?"
मी : शिक्षण कीती झाले?"
दुकानदार : "अरे तुम क्यो गावठी बन रहे हो अब? तुमको तो हिंदी आती है ना? हिंदुस्थानी हो ना?
मी : "Okay if you don't know #Marathi & i don't want to talk in Hindi then it's best we use English .. isn't it ? So what is your education ?"
दुकानदार : "ओ भाई .. अब क्या अग्रेंजोकी अग्रेंजी झाड रहे हो? हिंदी बोलो .. हिंदी-हिंदू-हिंदूस्थान .. हिंदू ही हो ना?
मी : "#मराठी आहे मी"
दुकानदार : "वो क्या होता है?"
मी : "समजावतो पण तुम्ही तुमच्या मालकांना बोलवा .. तुम्ही इथले मालक नाही हे पक्के .. कारण ज्या अडाणी महाराष्ट्राला मुंबई राहून #मराठी कोण माहीती नाही त्या व्यक्तीची बुद्धीची व आर्थिक क्षमता कळली मला"
दुकानदार : "ऐ .. ठीक से बात करो .. अडानी मत बोलो"
मी :"अरे वा .. आता बरी कळली #मराठी .. अडाणी म्हणजे काय हे पण कळले. छान .. आता बोलवा मालकांना नाहीतर मी पोलिसांना बोलावतो"
दुकानदार : "पुलिस क्या करेगी .. घंटा"
मी : "अरे अक्कलशून्य माणसा .. नीट ऐक .. भारताला राष्ट्रभाषा नाही व महाराष्ट्राची राज्यभाषा #मराठी, इथे जर आम्हाला #मराठी
बोलायला विरोध केला तर आम्ही पोलिसात तक्रार करू शकतो आणि मग ते घंटाच काय चंद्र-तारे-आकाश सर्व दाखवतील"

आवाज वाढतच गेला म्हणून आतून पुजा करत करत मालक बाहेर आहे. कपाळावरील पांढर्‍या टिळ्यामुळे जैनधर्मीय वाटले ..

मालक : "क्या हुआ भाईसाहब?"
मी : "तुमच्या या माणसाला आवरा हा ..
.. लोकांना #मराठी नका हिंदीच बोला असे सांगून औषध नाकारतोय तो या आजोबांना. इथे बसून प्रवचन करतोय 'हिंदी-हिंदू-हिंदूस्थान' .. म्हटल मी #मराठी .. तर बोलतो ते काय असत"
मालक : "काय .. भाऊ मी माफी मागतो याच्यावतीने. एक महीनाच झाला याला. अहो मी पण मराठीच .. नागपूरचा. आजोबांकडे मी बघतो"
त्या दुकानातील कामगाराचा चेहरा पार पडला .. मान खाली गेली.

दुकानाच्या मालकानी जातीने आजोबांकडे लक्ष दिले व आपुलकीने चौकशी केली. आजोबा व मी औषधे घेऊन आजीकडे आलो. आजीने गोळ्या घेतल्या व आजोबांनी टॅक्सी थांबवली. जाता जाता ..

आजोबा : "आभारी आहे बाळा .. मदत झाली आज तुझी"
मी : "बघा आजोबा .. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि त्यात #मराठी .. आहे का नाही? ते मालक तुमच्याशी मराठीतच बोलले की नाही.
आजोबा : "ते आहे बाळा .. पण मालक #मराठी, ग्राहक #मराठी, शहर #मराठी, राज्य #मराठी पण एका बाहेरून आलेल्या कामगारांसाठी तुम्ही सर्व त्याच्याशी हिंदीत बोलता .. मग
ते #मराठी कशी आणि का शिकतील? मग आज जे माझ्याबरोबर झाले ते होणारच. आज तु निभावल, पण पुढे होणारच नाही असे नाही ना ? त्या एकट्याचा दोष नाही यात, तुम्हा सर्वांचा पण आहे."

हे बोलून आजोबा निघून गेले.

मी पुन्हा निशब्द झालो ..

आणि मी महाराष्ट्रात हिंदी बोलणे थांबवले.

#मराठीव्टिटर

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे

The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(