तू प्रथम क्रमांकाचा भक्त दिसतोय.काय मनोरंजक कथा रंगवली,तू इथं ट्विटरवर काय करतोस ? बॉलिवूड मध्ये जा..तिथं जाऊन मोठा कथालेखक होशील..
अरे बंद करा हे लोकांना भडकवायचे रिकामे धंदे ,जीवनमरणाचा प्रश्न आहे इथं लोकांना महागाई मुळे जीव मेटाकुटीला आला आहे,
आणि तुझ्या फालटू स्टोरीमुळे.🤣😬
या महाप्रचंड हुशाराने,कथेची सुरवात थेट दंगलमय केली, जाळीदार टोपी आणि टिळा.
आणि मुख्य म्हणजे संघी-भटाळ लोकांच्या लेखी, यांचा खलनायक हा जाळीदार टोपी वाला असणार हे त्रिकालबाधित सत्य असल्याने,या कुकथेला बुद्धीहीन भक्ताड टोळीमध्ये जाणूनबुजून कौतुकास पात्र बनवून प्रसिध्दी देण्यात आली.
याची बनवाबनवी इथेच पकडली गेली की आमच्या हिंदू तरुणी ह्या टिळा लावल्याने समोरच्या व्यक्तीच्या प्रेमात ठार वेड्या होतात,
इथे असंख्य हिंदू तरुण टिळा लावतात,आणि असंख्य तरुण टिळे लावत नाही, मग अनेकांना प्रश्न पडला आहे की टिळे लावल्याने तरूण मुली आपल्यावर मोहित होतात का ?
त्यापुढे की याच्यासमोर ऍक्टिव्हा पार्क करुन हिंदू होऊन तो मुलगा बसस्थानकावर गेला, म्हणजे या कडूभाऊने त्या मुलाचा जेम्सबॉण्ड गत पाठलाग केला, आणि तो मुद्दाम सहा आसनी असलेल्या रिक्षात बसला, त्या रिक्षात सहापैकी किती मुली,पुरुष, महिला,मुलं होती हे त्यालाच ठाऊक.
मग इथे कथेला शेवटच वजन प्राप्त करून देण्यासाठी ह्यां कडु साहेबानी आपल्या असलेल्या-नसलेल्या अचाट बुद्धीमत्तेचा उद्धार केला तो म्हणजे ही मुख्य पात्रे आई-महालक्ष्मीचे मंदिराजवळ आणली, म्हणजे त्याच्या भक्तकंपुला दाखवायला की बघा नारीशक्ती च्या देवळासमोर ही असली हिणकस थेर चालत आहेत.
त्याचे एवढे सरळसूर आडाखे,आमच्या लक्षात न येतील एवढे आम्ही त्याच्याइतके बिलंदर मूर्ख नाही,मग त्याने कायदेशीर कारवाई वैगरे लोकशाही दरबाराचे शब्द वापरले मग लोकांना कथा, कल्पनामय-अशा सुमार चित्रपटाला साजेशी वाटेल आणि सर्व अंधभक्तगणात ती प्रचलित होऊन मुसलमानासाठी द्वेष निर्माण होईल,
आणि शेवटी लव्ह जिहाद हॅशटॅग टाकून आणखी एक मूर्खपणाचा बाँबगोळा फेकला,
अरे तो तर त्या रिक्षात बसला ,आणि अनंत ब्रम्हांडाचा स्वामी असल्यागत त्या कथेचा भविष्यकाळ ही सांगून टाकला, जस काय त्रिकाळ याच्या तालावर झिम्मा फुगडी खेळतात. फक्त आणि फक्त धार्मीक सलोख्याला बाधा येईल अस केलं
आणि कडूभाऊचा आणि त्यांच्या अचाट बुद्धिमानपणाचा यथोचित सन्मान ठेवून आम्ही त्यांच्या कथेला 100 पैकी शून्य गुण देत आहोत. आणि अशा कथेचा चित्रपट जरी आला तर शहाणी माणसं तो चित्रपट फुकट आणि चाकूच्या भीतीने सुद्धा बघणार नाही याची आम्हा समस्त सत्यशोधकी मंडळींना खात्री आहे.
कडूभाऊंच्या या कथेचे एवढं विश्लेषण ( पोस्टमार्टम म्हटल तरी हरकत नाही )पुरेस आहे. आणि हिंदुस्थानात धार्मिक एकता कायम राहो अशी मायभवानी चरणी प्रार्थना करून हा विषय इथेच थांबवत आहे..
सर्व वाचल्याबद्दल आपले आभारी..🙏 @BrotherToGod@Chav0_@DrVidyaDeshmukh@JainDenesh@Am_here_DURGA
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#अवतार
हिंदुस्थानात ईश्वर-अवतारा विषयी एवढा गाढव-गोंधळ आहे की नुसती कल्पना केलेली बरी. तस पाहिले तर महान चरित्र आपल्याकडे अनेक वर्षांनी जन्म घेतात, आणि त्यातली सर्वोच्च व्यक्तिमत्व असलेल्या महान विभुतींना आपण मनाच्या देव्हाऱ्यात बसवुन त्यांच्यावर अमर्याद प्रेमाचा वर्षाव करतो.
एखादा थोर सदाचारी पुरुष दिसला की, लगेच त्याला कंठ कोरडाठाक पडेपर्यंत धजन्या-भजन्यात धन्यता मानली जाते. नंतर अतिशयोक्तीचा मिष्टक्रुर कहर करून त्याना आपल्या 'प्राणप्रिय त्रिदेवा पैकी कोणत्याही देवाच्या समतुल्य मानून, हे मत सरळसोटपणे ठोकून दिले जातं. हा बलिशपणा इथवर थांबत नाही.
पुढे मग त्या महाविभुतीला त्याच्या मोक्षकार्या नंतर ग्रांथिक स्वरूपात प्रस्तुत केलं जातं,आणि मग इथुन सुरू होते अवताराची विचका वाटणारी शिमगा-धुळवड, मग अवताराला आलय दिलं जातं, सध्या त्याला देवालय म्हणतो आपण. चिकित्सक वृत्तीचा संन्यास हा नैतिकरित्या मनुष्याला खिळखिळा करतो.