#अवतार
हिंदुस्थानात ईश्वर-अवतारा विषयी एवढा गाढव-गोंधळ आहे की नुसती कल्पना केलेली बरी. तस पाहिले तर महान चरित्र आपल्याकडे अनेक वर्षांनी जन्म घेतात, आणि त्यातली सर्वोच्च व्यक्तिमत्व असलेल्या महान विभुतींना आपण मनाच्या देव्हाऱ्यात बसवुन त्यांच्यावर अमर्याद प्रेमाचा वर्षाव करतो.
एखादा थोर सदाचारी पुरुष दिसला की, लगेच त्याला कंठ कोरडाठाक पडेपर्यंत धजन्या-भजन्यात धन्यता मानली जाते. नंतर अतिशयोक्तीचा मिष्टक्रुर कहर करून त्याना आपल्या 'प्राणप्रिय त्रिदेवा पैकी कोणत्याही देवाच्या समतुल्य मानून, हे मत सरळसोटपणे ठोकून दिले जातं. हा बलिशपणा इथवर थांबत नाही.
पुढे मग त्या महाविभुतीला त्याच्या मोक्षकार्या नंतर ग्रांथिक स्वरूपात प्रस्तुत केलं जातं,आणि मग इथुन सुरू होते अवताराची विचका वाटणारी शिमगा-धुळवड, मग अवताराला आलय दिलं जातं, सध्या त्याला देवालय म्हणतो आपण. चिकित्सक वृत्तीचा संन्यास हा नैतिकरित्या मनुष्याला खिळखिळा करतो.
महान व्यक्तीला देवाच्या समतुल्य बसवून आपण , त्यांच्या विचारांचा त्याग करतोय , हे नकळत आपल्याला उमजून येत नाही. कुठल्याशा थोर-सद्गुणी माणसाला अवतार दाखवल्या शिवाय त्याला आपण मनाची मान्यता का देऊ शकत नाही ? याचा सर्वांग विचार होणे गरजेच वाटतं.
अवताराची हेळसांड जर कुणी केली असेल तर, प्राचीन कालच्या वैष्णवपंथीय-शैवपंथीय भिक्षुकशाहीच्या शाईने, ह्यांनी आपल्या पोटासाठी ,वर्चस्वासाठी अनेक अवतरांचे बोभाटा करत बारसे घातले. आणि ह्या प्रकारात उत्कृष्ट यश मिळाले, लोकांकडुन ज्ञानार्जन करण्याचा मार्ग नसल्याने सहज मान्य केलं गेलं.
त्यावेळी भिक्षुकशाई(ही)ला सत्य अहिंसा तत्ववादी बौध्दधर्म आपल्या मार्गातील भलामोठा धोंडा वाटला,पण त्यानी यालाही न जुमानता त्याच्या ठिकऱ्या-ठिकऱ्या उडवल्या,एवढ्यावर न थांबता बिनलाज्यागत महात्मा बुद्धाला आमच्या श्रीविष्णुचा अवतार असल्याचे जाहीर करून टाकले.
एकीकडे बौद्ध समूहाचे समूळ नष्ट केले आणि, नंतर ,त्यांचे अतुल्य विचार मुळापासून संपवता येईना, म्हणूनच धूर्त भिक्षुकशाहीने त्याना महान विष्णूचा अवतार असल्याचे सांगून टाकले. बौद्धांना अवतार दाखवण्याचे हेच कारण ढोबळमानाने आणि शुद्धतर्काने मला सत्य वाटते.
अवतारकल्पना ह्या लोकांच्या श्रद्धेसाठी नाही तर ठराविक भामट्या-भटाळ मंडळीच्या पोटाकरिता जाणूनबुजून उगम पाविण्यात आल्या आहेत..एवढे कळले तरी आपण सद्सद्विवेक बुद्धी जागृत असलेले मनुष्य आहोत हे आपोआपच कळून येते.आणि आपला जन्म सार्थकी लागल्याचे समाधान ही मिळते.
तूर्तास अवताराच्या भानगडीवर एवढे लिखाणाला थांबवुन यापुढच्या थ्रेड मध्ये बाकीचे मत मांडतो...👍
वरील लेखाबद्दल आपली शंका किंवा मत पटले नसेल तर ते इथे बिनबोभाट आम्हाला सभ्यभाषेत कळवावे. आम्ही त्याचा स्वीकार करून , आपल्याला प्रियआदरने आणखी उलगडुन सांगू...
समाप्त. 🙏 जय शिवराय..🚩
तू प्रथम क्रमांकाचा भक्त दिसतोय.काय मनोरंजक कथा रंगवली,तू इथं ट्विटरवर काय करतोस ? बॉलिवूड मध्ये जा..तिथं जाऊन मोठा कथालेखक होशील..
अरे बंद करा हे लोकांना भडकवायचे रिकामे धंदे ,जीवनमरणाचा प्रश्न आहे इथं लोकांना महागाई मुळे जीव मेटाकुटीला आला आहे,
आणि तुझ्या फालटू स्टोरीमुळे.🤣😬
या महाप्रचंड हुशाराने,कथेची सुरवात थेट दंगलमय केली, जाळीदार टोपी आणि टिळा.
आणि मुख्य म्हणजे संघी-भटाळ लोकांच्या लेखी, यांचा खलनायक हा जाळीदार टोपी वाला असणार हे त्रिकालबाधित सत्य असल्याने,या कुकथेला बुद्धीहीन भक्ताड टोळीमध्ये जाणूनबुजून कौतुकास पात्र बनवून प्रसिध्दी देण्यात आली.
याची बनवाबनवी इथेच पकडली गेली की आमच्या हिंदू तरुणी ह्या टिळा लावल्याने समोरच्या व्यक्तीच्या प्रेमात ठार वेड्या होतात,
इथे असंख्य हिंदू तरुण टिळा लावतात,आणि असंख्य तरुण टिळे लावत नाही, मग अनेकांना प्रश्न पडला आहे की टिळे लावल्याने तरूण मुली आपल्यावर मोहित होतात का ?