प्रस्तुत धागा कॉ. गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकातील एका प्रकरणाचा सारांश आहे..
🚩 #शिवजयंती अष्टावधानी जाणत्या राजेंची.. #LetsReadIndia @LetsReadIndia #धागा
(१/९)
👇
शिवराय रयतेबद्दल खुप जागरुक असत.. त्या काळी सारख्या लढाया होत.. पायदळ व घोडदळ हे सैन्य सारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे मोहिमेसाठी फिरत असे.. उभ्या पिकातून घोडदळ सुसाट जाई.. वर्षभर राबून रक्ताचा घाम करुन हातातोंडाशी आलेले पिक बघता बघता भुईसपाट होई..(२/९)
ज्याच्या राज्यात राहतो तेच सैन्य असे करीत असे, मग तक्रार कुणाकडे करणार? अन् दाद कुणाकडे माघणार?.. स्वतःच्या नशिबाला दोष देत घरातल्या घरात रडत बसण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता..असे बेगुमान वागण्याची मुभा होती त्या काळात..(३/९)
शिवरायांनी आपल्या सैन्याला आदेश दिले होते की, कोणत्याही मोहिमेवर कोणत्याही सैन्याच्या तुकडीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून जाता कामा नये.. पिकाची नासाडी होता कामा नये..(४/९)
उभ्या पिकातून बेदरकारपणे दौडत जाणारे आणि उभे पिक मातीमोल करणारे सैन्य वर्षानुवर्षे पाहण्याचा प्रसंग ज्यांच्यावर येत असेल, त्यांना जर पिकातून न घुसता रस्त्याने जाणारे आणि पिकाची जराही नुकसान होऊ नये अशी दक्षता घेणारे शिवरायांचे सैन्य पाहायला मिळाले तर त्यांना काय वाटत असेल?..(५/९)
रयतेच्या पिकाची काळजी करणारा राजा, त्यांच्या आज्ञेनुसार वागणारे सैन्य.. हा राजा, हे सैन्य आणि हे कार्य आपले आहे.. असे रयतेला का नाही वाटणार?..
इतरांकडून त्यावेळी नुस्ती पिकांची नासधुसच होत नसे, तर बळजबरीही होत असे.. सैन्याचा आणि सरदारांचा गावी मुक्काम पडला तर काय होई?..(६/९)
सैन्यातील घोड्यांची दाणा-वैरण गावातल्या रयतेकडून घेतली जाई.. सैन्याची सरबराई गावालाच करावी लागे अन् मग गावचा वतणदार पाटील किंवा कुलकर्णी, गावातील ज्यांच्याकडे जे असेल ते काढून घेऊन मुक्कामास आलेल्यांची बडदास्त ठेवी..(७/९)
सैन्य आणि सरदार असे वागायला ज्या काळी चटावले होते, दैवावर भरवसा ठेऊन अशा आपत्ती सहन करायची सवय ज्या काळी रयतेला झाली होती, त्या काळी हा एक सत्पुरुष येतो आणि सक्त आज्ञा करतो की,
"रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये."
(८/९)
सैन्यातील घोड्यांना दाणा-वैरण लागली तर रोख रक्कम देऊन खरेदी झाली पाहिजे...
सैन्याचा रयतेला त्रास होता कामा नये..
आणि नुसत्या आज्ञा दिल्या नाहीत तर त्याची सक्त अंमलबजावणी केली..
रयतेच्या कष्टाची ही अपूर्व कणव शिवरायांना रयतेच्या निष्ठा देऊन गेली.. #जयशिवराय
(९/९)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh