#शिवजयंती
1.शिवाजी महाराजांच जितकं appropriation इथल्या ब्राह्मणवादाने केलंय तितक कुठल्याही महापूरुषाच केलं नाही।
आजवर इतिहासात, साहित्यात, अभ्यासक्रमात, चित्रपटात मुस्लिमांविरुद्ध लढून स्वराज्य उभारल इतकंच अधोरेखित केलंय, मुस्लिम शासकांविरुद्ध लढा हा सत्ता हस्तांतरणाचा राजकीय
2. लढा होता तो धर्म लढा कधीच नव्हता, ह्याच लढ्याबरोबर महाराज इथल्या ब्राम्हणवादा विरुद्ध एक समांतर लढा आयुष्यभर लढले ह्या वास्तवाला आपसूक बाजूला सारल जात।
सोळा वर्षाचा शिवा रायरीच्या मंदिरात अठरापगड जातींचे मावळे जमवून स्वराज्याची प्रतिज्ञा घेतो तो ब्राम्हवादाच्या मुळावर घातलेला
3. पहिला घाव, मनुस्मृती ने लादलेली राज्य करण्याची क्षत्रियांची मक्तेदारी तोडून इथला बहुजन हा शासक होऊ शकतो हे स्वप्न प्रत्येकाच्या डोळ्यात तरळायला लागलं होतं
ज्या काळात ब्राम्हणवादाने स्त्रियांना केवळ प्रतारणा आणि उपभोगाची वस्तू बनवून अतिशूद्रांच्या पंक्तीत बसवल होत त्यावेळेस
4. माँ जिजाऊ ला राज्यकारभारात सर्वोच्च स्थान दिलं प्रत्येक निर्णायक क्षणी माँ जिजाऊंचा सल्ला मोलाचा असायचा, ब्राम्हणवादी पितृसत्ताक सत्तेला हा मोठा हादरा होता।
स्वतःच्या मुलाला संभाजीराजेना संस्कृत शिकायला लावून शिक्षणातील ब्राम्हण मक्तेदारी महाराज नाकारतात
5.वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी माँ जिजाऊ ला सती जाऊ नाही दिलं, आयुष्यभर महाराज ब्राम्हणवादा विरोधात लढत राहिले,
अपार कष्टातून, त्यागातून, समर्पणातुन स्वराज्य जेव्हा निर्माण झालं तेव्हा इथला मनुवादी महाराजांना राजा मानायला तयार नव्हता, शास्त्रानुसार राजा होण्यास
6. राज्यभिषेक गरजेचा असतो आणि शूद्रांचा राज्यभिषेक होऊ शकत नाही म्हणून इथल्या मनुवादी लोकांनी प्रचंड विरोध केला, कुठलाही ब्राम्हण पंडित राज्याभिषेक करायला तयार नव्हता, गागाभट्टानेही नकार दिला होता शेवटी हजारो एकर जमीन आणि अमाप सोनं संपत्ती दिल्यावर तो तयार झाला ।
7.मुस्लिम राज्यकर्ते जेव्हढा महाराजांचा जळफळाट करायचे तितकंच महाराज मनुवाद्यांच्या ही डोळ्यात सलायचे हे कुणीच दाखवत नाही
सर्व जातीतील लोकांना त्यांनी सामावल होत त्याकाळी शूद्रांना वतनदारी आणि जमीनदारी त्यांनी दिली स्वतःच्या जातीचा पोकळ अभिमान त्यांनी कधीच बाळगला नाही
8.त्यामुळे महाराज एका समाजाची जातीची मक्तेदारी मुळीच नाही, ब्राम्हणवादाच्या छाताडावर वार करणारा हा राजा समस्त बहुजनांचा आहे।
फक्त दाढी वाढवून, रुद्राक्ष घालून, भगवा हातात घेऊन कुणी शिव अनुयायी होत नाही, बहूजन प्रतिपालक कुळवाडी भूषण ह्या पध्दतीने समजून घ्यावा लागतो
9.पेशव्यांच्या काळात महाराज खूप अंधारात ठेवले गेले त्यांची समाधी कुठेय हे ही कुणाला माहीत नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजा हे नाव काळाच्या पडद्याआड झालं होतं नमन त्या जोतिबांना ज्यांनी हा उत्सव चालू केला
खूप शुभेच्छा शिवजयंतीच्या
जयभीम जय शिवराय
- AmiDev #शिवजयंती2022
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh