मांजर डोळे मिटून दूध पिते
तिला काही दिसत नाही म्हणून तिला वाटतं इतरांना ही काही दिसत नाही. तिला दुधाची विचारणा केली असता, तिनी नाही पिलं असं खोटं बोलते.
जेव्हा दुसरी मांजर खरं सांगून तिचं पितळ उघडं पाडते तेव्हा पहिली मांजर त्याच मांजरीला दोषी ठरवते
वर अजून दुसऱ्या मांजरीला दोषी ठरवते आणि ज्ञान पाझळते की तुला जर भूक लागली होती तर तू दूध मागून घ्यायचं, असं चोरून का प्यायली? तुला माझ्याबद्दल काही समस्या होती तर माझ्याशी येऊन का नाही बोलली? असं सर्वांसमोर का?
पहिली मांजर सगळ्यां मधे मोठी आणि वर्चस्व गाजवणारी असल्याने इतर मांजरी ही तिला पाठिंबा देतात. तिच्या मोठेपणाचं कौतुक करतात. तर दुसऱ्या, खरं बोलणाऱ्या मांजरीला घालून पाडून बोलतात, तिचा अपमान करतात. इतर मंजरींना तिच्या बद्दल वाईट आणि खोटं सांगून तिला एकटं पडतात.
दुसऱ्या मांजरीला हे सगळं असहनिय होतं. ती शांत होऊन जाते.