हे आहेत भारतातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, आनंद देशपांडे. नुकताच त्यांनी बिलियन डॉलर संपत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत प्रवेश केलाय . Persistent या मल्टीनॅटशनल सॉफ्टवेअर कंपनीचे ते संस्थापक आहेत. तब्बल १८ देशांत ५३ ऑफिस असणाऱ्या या कंपनीने आणखी एका ठिकाणी नवीन
ऑफिसमध्ये 'गृह' प्रवेश केला.
सॉफ्टवेअर कंपनी म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे 'वेस्टर्न कल्चर'. पण Persistent त्याला अपवाद. सोबतचा हा फोटो पहा. भारतीय (हिंदू) पद्धतीने सत्यनारायणाची पूजा करून त्यांनी या नवीन ठिकाणी प्रवेश केला. या कंपनीत केवळ भारतीय म्हणजे हिंदू
त्यातही मराठीच सणांना सुट्टी दिली जाते.म्हणजे नूतनवर्ष १ जानेवारी नाही, तर 'गुढीपाडव्याला' सुट्टी नक्की असते. ख्रिसमसला नाही पण गणेशमूर्ती स्थापना आणि विसर्जन या दोनही दिवशी सुट्टी असते.पुण्यातील हिंजवडीमध्ये ऑफिसचे ४ टॉवर आहेत त्यांना ऋग्वेद,सामवेद,यजुर्वेद आणि अथर्ववेद अशी नावं
नळ स्टॉप जवळील ऑफिसच्या २ टॉवरला प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ पिंगल आणि आर्यभट यांची नावं आहेत. सेनापती बापट रोड च्या ऑफिस इमारतीला भगीरथ. तसेच इमारतीमध्ये आतल्या बाजूने ठिकठिकाणी वेदातील संदर्भ भिंतीवर दर्शविलेले आहेत.
केवळ हिंदू संस्कृती किती श्रेष्ठ असं बोलून काही होत नाही. त्याचं श्रेष्ठत्व टिकवायला कृतीतून संदेश द्यावा लागतो आणि या कंपनीने तो वेळोवेळी दिलाय.आयटी कंपनी असूनही इथल्या महिला सदस्य अगदी 'हळदी कुंकू' सारखा संस्कार सणही इथे मोठ्या आनंदाने साजरा करतात.
सत्यनारायणाची पूजाही रीतसर घातली जाते. हे सगळं करूनही Persistent ही आयटी क्षेत्रात एका वेगळ्याच शिखरावर विराजमान आहे. गेल्या तिमाहीत तब्बल १४९१ करोड रुपयांचा रेव्हेन्यू आहे.
इथे काम करणारा हा 'कामगार' नाही तर Persistent परिवाराचा 'सदस्य' असतो.
जगभर तब्बल १५ हजारहुन सदस्य असणाऱ्या या कंपनीची उलाढाल शेकडो कोटींमध्ये आहे. साधी रहाणी- उच्च विचारसरणी म्हणून रतन टाटा यांना आपण ओळखतो मात्र मराठमोळे आनंद देशपांडे सर हे तितकंच भावलेलं व्यक्तिमत्व.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
नमस्कार
मी स्वप्नील मेहेंदळे! मी स्वतः कर्णबधिर आहे.. कर्वे नगर पुणे येथे राहतो. मी आर्टिस्ट असून मातीच्या साधे कुंड्या घरी आणून त्यावर चित्र काढून विकतो..
तसेही पावसाळ्यात झाडे व फुले छान आणि लवकर वाढतात आणि कुंड्यावर असे वेगवेगळे चित्र काढले की आणखी छान आणि उठून दिसते..
●कुंड्याची Size:-
Height - 8 inch
Big size 10 inch
●किंमत:-
8 इंच 250/-
10 इंच 300/-
लवकरच ऑर्डर द्या
कुंड्या घरपोच देण्यात येईल..
त्यासाठी अंतरानुसार चार्जेस घेतले जाईल..
जास्त हवी असल्यास तुम्ही येऊन घेऊन जाणे..
मी काढलेले 3री आणि 4थी वॉल पैंटिंग
वारली बरोबर फुले झाडे, कार्टून, इमोजीस तसेच entrance, किंवा बाल्कनी, हॉल वर पेंट काढायचे असल्यास मला ऑर्डर देऊ शकता..
साधारण 9-10 बाय 4-5 फूट पर्यंत भरून काढायचे असल्यास 3/4 दिवस लागतील..
किंमत:- 4 ते 10 हजार