ब्राम्हण आणि मराठा समाजा विरोधात झुंड चित्रपटात एक ही गोष्ट नसताना ही तो चित्रपट न पाहता तिरस्कार करणे हे म्हणजे काम ना दाम उघड्या अंगाला घाम असे आहे. ब्राम्हण समाजाचे मी एक वेळ समजू शकतो. पण मराठा समाजाची अवस्था इतर समजापेक्षा काय वेगळी नसते.
मराठा समाज देखील झोपडट्टीत राहतो, त्यांची मुले देखील ह्या अशा झुंडीत असतात, त्यांची मुले ही व्यसने करतात, शिवजयंती देखील भिम जयंती प्रमाणे करतात. त्यांना ही झोपडपट्टीत इतर लोकांप्रमाणे सगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
मग झुंड मधील कथेला तो स्वतःशी जोडू का पाहत नाही. आणि जर तो ब्राम्हण समाजा इतका पुढारलेला आहे तर मग आरक्षणासाठी स्वतःला मागासवर्गीय म्हणून घेण्यासाठी का धडपडत आहे. झुंड मध्ये झोपड्यात राहण्याऱ्या मुलांना इथल्या व्यवस्थेना आजवर कसे नाकारले आहे हे दाखवले आहे.
आणि झोपडपट्यामध्ये काय फक्त एकच समाजाची लोक राहत नाही. उगाच एका समजविषयी द्वेष बाळगून त्यांच्या विषयी गरळ ओकायची.कारण नसताना पावनखिंड चित्रपटाशी त्याची तुलना करायची.पावनखिंडत ही झुंडीचं दाखवल्या आहेत लढताना.
शिवराय ही एकटे लढले नव्हते त्यांनी ही अठरा पगड जातीच्या झुंडीच तयार केल्या होत्या. आणि मग स्वराज्य आणले. झुंड मे सुवर आते हे शेर अकेला आता हे हे केवळ डायलॉगबाजीसाठी चांगले आहे. याची प्रत्यक्षिके केलती ना तर झुंडीना पाहून एकट्याची नाही इथभर फाटली ना तर बघा.
झुंड चित्रपटात भिम जयंतीत जय भिम बोलण्याआधी जय शिवाजी बोलताना दाखवले आहे. #feeling - हम बोलेगा तो बोलेगा बोलता है
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh