एका नोकरदार महिलेच्या घराचा एसी खराब झाला. तिने मेकॅनिकला बोलावले...
फोन वर त्याला सर्व सांगितले
"मी प्रणाली बोलतेय... नेहरू नगर पारिजात एक्स्टेंशन मधील प्र.क्र. HIG B/16.....माझा हॉल चा एसी खराब झालाय,काम करत नाहीये...
++
तुम्ही दुपारी मी ऑफिसला गेल्यावर या आणि ते ठीक करा. ...संपूर्ण घराला कुलूप असेल...फक्त हॉल उघडा राहील.
हॉलमध्येच एसी आहे. ..!
माझ्याकडे एक डॉबरमॅन कुत्रा आहे ज्याला बांधलेले नाही... पण घाबरू नका... तो एक प्रशिक्षित कुत्रा आहे... तो आदेश ऐकेपर्यंत काहीही करत नाही... !
++
पिंजऱ्यात पोपट आहे....खूप बोलतो..पण तू कामावर लक्ष द्यायचे आणि त्याच्याशी अजिबात बोलायचे नाही!"
दुपारी हॉल मध्ये मेकॅनिक आत आला आणि सोफ्याजवळ एक धोकादायक डॉबरमॅन कुत्रा पडला होता,त्याला पाहून तो घाबरला, पण कुत्र्याने काहीच केले नाही.
++
तो पुढे गेल्यावर पोपटाचे बोलणे सुरू झाले... "अबे चोर आहे काय... काय करतोय..."! आणि पूर्ण दोन तास, एसी नीट करेपर्यंत, संपूर्ण वेळ मेकॅनिक ला बोलून बोलून पोपटाने अक्षरशः वेड केलं...!
कधी तो त्याला चोर म्हणायचा..कधी त्याला 'जाड्या' म्हणायचा कधी रेडा' म्हणायचा....
++
कधी तो त्याला घाणेरडा शिव्या घालायचा...! एकदा तर मेकॅनिक चा संयम ढळला आणि त्याने पोपटाला स्क्रू ड्रायव्हरने मारायचे ठरवले.
पण मॅडमची सांगितलेलं असल्याने त्याने त्याचा विचार बदलला ..!
काम आटोपल्यावर मेकॅनिक सामान बांधून जायला निघाला तेव्हा पोपट पुन्हा चिडला...
++
अबे चोर..... जाड्या .... काय चोरी केलीस?
आता मेकॅनिकला सहन करणे कठीण झाले होते....! त्याला वाटलं की मॅडम ने उगीच धमकवले आहे….! पिंजऱ्यातला पोपट मला काय करणार?
स्क्रू ड्रायव्हर काढून तो पोपटाला मारायला निघाला...
तोच पिंजऱ्यातला पोपत म्हणाला
छू..टॉमी..छू
छू..टॉमी..छू