अण्णा चिंबोरी (मोदी का परिवार) 🇮🇳 Profile picture
Parody | #SBI_हॉटेल_संचालक_मंडळ - मुख्य आचारी.
Jun 8, 2023 4 tweets 1 min read
मराठी भाषेचे सौंदर्य…

👇🏻👇🏻

इलेक्ट्रिकच्या दुकानवाल्याने फलकावर लिहिलं होतं..
.
.
.
“तुमच्या बुध्दीचा प्रकाश पडो ना पडो, आमच्या बल्बचा नक्की पडणार”.. 🤣

.

इलेक्ट्रॉनिक दुकानावर लिहिलेलं वाचून माझं मन भरून आलं..
.
.
.
“आपला कुणी फॅन नसेल तर आमच्याकडून एक घेऊन जा” 😀

१/४ चहाच्या टपरीवर असाच फलक होता..
.
.
.
“मी साधा माणूस आहे पण चहा मात्र खास बनवतो”..🤣

.

एका उपाहारगृहाच्या फलकावर वेगळाच मजकूर होता..
.
.
.
“इथे घरच्यासारखं खाणं मिळत नाही, आपण बिनधास्त आत या”..🤪

२/४
Mar 21, 2023 6 tweets 1 min read
स्थळ : अर्थातच…

दुपारच्या कडक उन्हाच्या वेळी मी व्हरांड्यात बसलो होतो, तेवढ्यात माझ्या घराच्या कंपाउंडमध्ये एक थकल्या सारखा दिसणारा परंतु धष्टपुष्ट कुत्रा शिरला.

त्याच्या गळ्यातील पट्ट्याकडे आणि सुदृढ़ शरीराकडे पाहून वाटत होते की हा कुणा चांगल्या घरचा पाळीव कुत्रा असावा

१/६ मी त्याला जवळ बोलावून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
तो शेपूट हलवत तिथेच बसून राहिला.

मी उठून घरात निघालो, तसा तोही माझ्या मागोमाग हॅाल मध्ये आला आणि खिडकीशेजारील एका कोपऱ्यात शहाण्यासारखा पाय दुमडून, पुढील दोन पायात तोंड खुपसून बसला.

पहाता पहाता, झोपीही गेला.

२/६
Jan 24, 2023 4 tweets 1 min read
बायकोकडून (स्वतःच्या) बोलली जाणारी काही वक्तव्ये -

👇🏻👇🏻👇🏻

• भातात पाणी जास्त झाल्यास...
- तांदूळ नवीन होता.......

• चपात्या कडक झाल्यास...
- मेल्याने चांगले दळून दिले नाही.....

• चहा गोड झाल्यास...
- साखर जाड होती,

व तो पातळ झाल्यास…
- दुधात पाणी जास्त होतं...

१/४ • लग्नाला किंवा Function ला जाताना....
- कुठली साडी नेसू ? माझ्याकडे चांगली साडीच नाही!

• घरी लवकर आल्यास...
- आज लवकर कसे आलात?

• उशीर झाल्यास....
- इतका वेळ कुठे होतात ?

• स्वस्त भाजी आणल्यास.....
- तुम्हाला सगळे फसवतात....

२/४
Dec 21, 2022 4 tweets 1 min read
आळस हीच शोधाची जननी :

मी फक्त एक उदाहरण देणार आहे.कारण मोठी पोस्ट वाचण्याचा लोक आळस करतात.

मानवाला कच्चे अन्न खाण्याचा ( शक्तिनिशी तोडण्याचा आणि तासनतास चावण्याचा ) आळस आला म्हणून चुल आली.

चुल पेटवण्याचा आळस म्हणून त्याने स्टोव्ह आणला.

१/४ सतत रॉकेल भरण्याचा आळस म्हणून गॅस आणला.

सिलेंडर संपल्यावर नवीन आणा, जूना काढा, नवीन लावा. या कामाचा आळस आला म्हणून नळीने गॅस आणला.

गॅसवर पदार्थ गरम होईपर्यंत लक्ष ठेवण्याचा आळस येतो म्हणून ओव्हन आला.

आता सगळ्याच सोयी सुविधांचा वापर करण्याचा आळस आला म्हणून तो निघाला

२/२
Oct 18, 2022 4 tweets 2 min read
प्रती

मा. सदस्य

विषय - दिवाळी बोनस देणे संदर्भात आवश्यक कागदपत्रे जमा करणे बाबत.

मा.महोदय/ महोदया,

#SBI_हॅाटेल_संचालक_मंडळ तर्फे आपणांस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, सन २०२२ या आर्थिक वर्षाचा दिवाळीचा बोनस जाहीर करण्यात येत आहे.

++ बोनस चे स्वरूप-:

१. रु. १००१/- रोख (महागाई वाढल्याने. मागील वर्षी रु. ५०१ होता)

२. एक किलो मिठाई चा डबा (काजुकत्री)

३. ड्रेस साठी कापड (रेमंड चे)

४. १ महिन्याचे नेट पॅक (2GB/day)

५. मोती साबण (मोती गुलाब व चंदन)

६. फटाके( रू. १०००/- किमतीचे)

++
Jul 27, 2022 4 tweets 1 min read
Short Story

A lady and her 7-year-old son are eating in a restaurant.

In a moment of playfulness, the boy swallows a coin and chokes. The mother tries slapping his back, rubbing his neck, shaking him hard and everything she could think of, without success.

+ The boy begins to turn blue. The desperate mother starts screaming for help.

A man gets up from a nearby table, and with astonishing tranquillity, without saying a word, lowers the boy's pants and squeezes his testicles.

The boy yells and spits out the coin.

+
Jul 19, 2022 5 tweets 3 min read
नमस्कार आम्ही उत्तेजक न्यूज पोर्टल चालवत नाही, फक्त #SBI_हॅाटेल_संचालक_मंडळ चालवतो. त्यासाठी आम्ही विविध टूल्स वापरून मेहनत घेतो. या आमच्या हॅंडल्सना टार्गेट केलं जात आहे, कारण गेल्या ९ महिन्यात आमच्या या हँडल्सचे फॅालोअर्स मोठ्या संख्येने वाढले व जळफळाटातून टार्गेट करणे हे
१ ट्विटरला नवीन नाही. आम्हाला मोल-मजुरी करावी लागते आणि त्यावर आमचे घर चालते. त्याव्यतिरिक्त, आम्ही कोणाचा एक नवा पैसा घेतलेला नाही, आम्हाला गरज नाही. फॉलोवर्स वाढले की कोणालाही वाटेल असा आम्हालाही आनंद होतो आणि कमी झाले की आम्हालाही आपल्या लोकांनी साथ सोडलेल्याचे दुःख वाटते.
May 22, 2022 4 tweets 5 min read
एकदा पप्या, गण्या आणि निल्या जंगलात फिरायला जातात

जंगलात अचानक त्यांना आदिवासी पकडतात आदिवासींचा राजा त्याना म्हणतो “तिघांनी कुठलीतरी दहा फळे आणा”

पप्या पहिल्यांदा १० संत्री घेऊन येतो.....!!!

राजा म्हणतो “आता सगळी संत्री एकाच वेळी तोंडात घाल...!”

++ पाच सहा जातात नंतर जात नाही...! मग पप्याची मुंडी उडवून देतात..

मग येतो गण्या.. दहा अंजीर घेऊन...! परत राजा म्हणतो तुला सगळी अंजीर एकाच वेळी तोंडात घालावी लागतील...!

गाण्याचे नऊ जातात.... दहावे जाणार असते आणि अचानक गण्या हसतो आणि अंजीर खाली पडते ? मग त्याची पण मुंडी उडवली जाते.
Apr 13, 2022 8 tweets 6 min read
**एक चित्त थरारक गोष्ट**

नवीन लग्नाला आठवडा उलटला नाही तोच तिला त्याच्यात फरक जाणवू लागला...

आठ दिवसांत तिला नजरेच्या आड होऊ न देणारा तिचा नवरा आता दिवसातून अर्धा अर्धा तास बाहेर जायचा किंवा बाथरूम मध्ये कोंडून घ्यायचा.

++ तिला वाटलं की हा कोणासोबत मोबाईल वर बोलत असेल किंवा चॅटिंग करत असेल मात्र दोन- तीन वेळा तो बिना मोबाईल चा बाथरूम मध्ये गेला त्यामुळे तो गैरसमज दूर झाला.

तिने त्याला खूप वेळेस विचारलं मात्र त्याने नेहमी हसण्यावारी नेलं. घरी विचारलं तेव्हा

++
Apr 12, 2022 4 tweets 5 min read
काल डॉक्टरांशी माझ्या तब्येतीविषयी बोलत बसलो होतो. माझा जॉब , शिप्ट , रिपोर्टिंग , पगार , कामाचे स्वरूप इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक ऐकून घेतल्यानंतर त्यांनी मला पुढील सल्ले दिले :
.
.
.
१) भरपूर चाला.
२) कोल्ड्रिंक्स कमी करा.
३) दारू अजिबात नको .
४) भरपूर पाणी प्या.

++ ५) जवळ जायचे असेल तर रिक्षा करू नका .
६) बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद करा.
७) घरीसुध्दा तेलकट , तुपकट खाऊ नका .
८) मांस, मासे इत्यादी वर्ज्य करा.
९) एक दिवसाच्या सहली करा , त्यापेक्षा मोठ्या नकोत .
.
.
.
.
.
.
.मी होकार दिला व घाबरत-घाबरत विचारले :

++
Apr 11, 2022 7 tweets 5 min read
नवऱ्याची ढेरी वाढण्यात, बायकोचाच असतो हात
तीच म्हणते थोडाच उरलाय, घेऊन टाका भात😀

पिठलं उरो, पोळी उरो बायकोच आग्रह करते
पुरणाच्या पोळीवर तुपाची धार धरते😝

बोन्ड वाढते, भजे वाढते मस्त भाज्या करते
दोन्ही वेळेस यांचे पोट तडसावणी भरते😝

++ अन्न पूर्णब्रह्म म्हणून तो ही खात राहतो
बायकोचं मन मोडत नाही म्हणून जाड होतो😜

ज्याची बायको सुगरण असते त्यालाच ढेरी येते
लोकं उगीच नावं ठेवतात लक्ष द्यायचे नसते 😜

साधी फोडणी दिली तरी खमंग स्वयंपाक होतो
त्याच बाईच्या नशिबात ढेरीवाला असतो😛

++
Apr 10, 2022 5 tweets 6 min read
राम म्हणजे काय ?

उगीचच झोपतो त्याला,
‘आ राम’ म्हणतात.

घेतलेले माघारी देत नाही त्याला ‘ह राम’ म्हणतात.

झोपलेला परत कधी उठतच नाही त्याला ‘हे राम’ म्हणतात.

मित्रा सारखा वागतो म्हणून ‘सखाराम’ म्हणतात.

जो राजालाही आदर्श होऊन राहतो त्याला ‘राजाराम’ म्हणतात.

++ हृदयीचे जाणतो म्हणून त्याला ‘आत्माराम’ म्हणतात.

एक पत्नी व्रताप्रमाणे वागतो त्याला ‘सिताराम’ म्हणतात.

भगवंत ज्यांचे पाय पूजतो त्यांना ‘तुकाराम’ म्हणतात.

प्रसंगी हाती शस्त्र वा शास्त्र धरुन अन्यायाशी लढतो त्याला ‘परशुराम’ म्हणतात.

++
Apr 9, 2022 5 tweets 5 min read
आम्ही अजूनही शिकतोय

आधीच्या पिढीकडून पैसे वाचवायला शिकलो;
नंतरच्या पिढीकडून पैसा वापरायला शिकतोय.

आधीच्या पिढीकडून सहवासाने नाती जपायला शिकलो;
नंतरच्या पिढीकडून डिजिटली नवीन नाती जोडायला शिकतोय.

आधीच्या पिढीकडून मन मारून जगायला शिकलो;
नंतरच्या पिढीकडून मन भरून जगायला शिकतोय.
+ आधीच्या पिढीने, Use and use more मधली उपयुक्तता शिकवली;
नंतरच्या पिढीकडून Use and throw मधली नावीन्याची गंमत अनुभवायला शिकतोय.

आईकडून पिकनिकलाही घरच्या पोळीभाजीची लज्जत अनुभवायला शिकलो;
मुलांकडून घरात असतानाही पिकनिक एंजॉय करायला शिकलोय.
++
Mar 28, 2022 4 tweets 5 min read
जोशींना त्याचा बालपणीचा मित्र अनेक वर्षांनंतर भेटला.

.

वहीनींशी ओळख वगैरे झाल्यानंतर मित्राने विचारले, 🤔

“तुमचे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज ..?"

जोशी म्हणाले, “आमचे रिव्हेंज मॅरेज ..!!!”

.

मित्र: (आश्चर्याने)🤔 "रिव्हेंज मॅरेज ? हे काय नवीन?"

++ जोशी : "एकदा मी बसने जात होतो, ही माझ्याकडे येऊन म्हणाली,

"ओ मिस्टर उठा ! ही सीट स्त्रियांसाठी राखीव आहे."

मग मी म्हणालो “अहो मग काय झाले ? मी पण स्त्रियांसाठीच राखीव आहे ..!

मला ‘मिस्टर’ म्हणतेस आणि माझ्या वर अशी चिडतेस कशाला...!”

.

बस मध्ये एकच हशा पिकला!😂😂😂

++
Mar 17, 2022 5 tweets 4 min read
*होलिका पूजन*

दिनांक १७ मार्च (गुरुवार) होलिका पूजन आहे.

त्या दिवशी सबंध घरातून (टॉयलेट्स वगळता) एक नारळ हातात धरुन (शेंडी आपल्या शरीराच्या विरुद्ध दिशेने धरुन) फिरवून तसाच घराबाहेर नेऊन होळीच्या अग्नीत दहन करावा.

++ शुभवेळ संध्याकाळी ७.४८ ते रात्री ८.१८ (३० मिनिटे) या काळात हे काम करावे.

समजा तुमच्या परिसरात होळी उशीरा असेल तरी नारळ याच काळात फिरवून घराबाहेर नेऊन ठेवावा व नंतर होळीत टाकावा.

नारळ फिरवत असताना मनातल्या मनात ,

++
Mar 17, 2022 5 tweets 4 min read
Artist Turns Words Into Logos With Hidden Meanings , and the result is just amazing !

Artist - Ji Lee
Mar 7, 2022 7 tweets 5 min read
थ्रेड थोडा मोठा आहे पण एकदा वाचा..

🙏🏻🙏🏻

एका नोकरदार महिलेच्या घराचा एसी खराब झाला. तिने मेकॅनिकला बोलावले...
फोन वर त्याला सर्व सांगितले

"मी प्रणाली बोलतेय... नेहरू नगर पारिजात एक्स्टेंशन मधील प्र.क्र. HIG B/16.....माझा हॉल चा एसी खराब झालाय,काम करत नाहीये...

++ तुम्ही दुपारी मी ऑफिसला गेल्यावर या आणि ते ठीक करा. ...संपूर्ण घराला कुलूप असेल...फक्त हॉल उघडा राहील.
हॉलमध्येच एसी आहे. ..!

माझ्याकडे एक डॉबरमॅन कुत्रा आहे ज्याला बांधलेले नाही... पण घाबरू नका... तो एक प्रशिक्षित कुत्रा आहे... तो आदेश ऐकेपर्यंत काहीही करत नाही... !

++
Mar 5, 2022 6 tweets 5 min read
Believe it Or Not! 🤪

निरनिराळ्या लोकांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टी.....

१) जिवलग मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट- ती तुझ्याकडेच बघतेय

२) बस कंडक्टर ने सांगितलेली खोटी गोष्ट- मागची गाडी रिकामी आहे, त्यात बसा

++ ३) आईबाबांनी सांगितलेली खोटी गोष्ट- फक्त दहावीपर्यंत अभ्यास कर, नंतर मज्जाच मज्जा

४) सर्वांनीच सांगितलेली खोटी गोष्ट- घर, गाडी आपण एकदाच घेतो, त्यामुळे पैशाचा विचार करू नको

६) नव्याने नोकरीला लागलेल्या मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट- पगार कमी आहे, पण शिकायला खूप मिळतं

++