Preeti Thakur 🇮🇳 Profile picture
Mar 21, 2022 5 tweets 1 min read Read on X
लिफ्ट.!
कार मधे तिला लिफ्ट देऊन मध्यरात्री त्याने तिला जंगलात मदत केली म्हणून तिच्या हातावर हात ठेवत त्याने विचारले,"अर्ध्यारात्री कुणा पुरुषाबरोबर एकटे गाडीत बसायला भीती नाही वाटत?"
त्याचा इशारा तिला समजला होता! वासना त्याच्या डोळ्यात दिसत होती.
तिने हळूच त्याच्या हाताला घट्ट पकडुन म्हटले,"नाहीरे, इथे येणारे लोक सज्जन असतात, गेल्या दोनशे वर्षापासून तरी कोणीच मला काहीच केले नाही".... आणि तिने हात अजून घट्ट केला! त्याला तिच्या डोळ्यातला खट्याळपणा आणि दोनशे वर्षाचा अनुभव घट्ट होणाऱ्या हातात जाणवत होता!
हळूच तिला जरा बाथरूमला जाऊन येतो, असं म्हणून तो खाली उतरला आणि तिथून सुसाट पळत सुटला!
दहा मिनिटांनी ती कारच्या बाहेर आली आणि तिने एक शिट्टी मारली! चार मुली अजून झाडी झुडपातून बाहेर आल्या! आता पाचही जणी कार मधे बसल्या आणि कार शहराकडे धावू लागली!
ती म्हणाली, "भित्रे असतात ग हे पुरुष, फक्त आपल्याला त्या भीतीची जाणीव करून द्यावी लागते! शक्ती जरी त्यांच्या कडे असली तरी आपल्याकडे निसर्गाने मेंदू दिलाय आपले संरक्षण करायला."
थोडे पुढे गेल्यावर तो पळताना दिसला! त्याच्या जवळ गाडी नेऊन तिने विचारले,"बसतोस का गाडीत?"
त्याने त्या दिशेने पाहता आता त्याला एकीच्या जागी पांच .... हडळ एकत्र दिसताच त्याला घाम फुटला आणि तो जागीच बेशुद्ध होऊन पडला!
😁😁😁
मुळ लेखक माहीत नाही.!😋

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Preeti Thakur 🇮🇳

Preeti Thakur 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PreetiSK1103

Jun 19, 2023
एक लव्ह जिहाद चा किस्सा.
एका कंपनीच्या मालकाची मुलगी एका छपरी मुस्लीम मुलाच्या प्रेमात पडली. आकंठ बुडाली आणि आई बापांचे ऐकेचना.
दोघे हतबल झाले. मग एका मित्राला विचारले. मित्राचे कुटुंब आणि हे कुटुंब एकत्र सहलीला गेले.
सहलीत मित्राने स्पष्ट भूमिका घेतली की मी मुलीच्या बाजूने आहे.
आता मुलगी यामुळे मित्राकडे आधार म्हणून पाहू लागली...
त्या पोराचे अधून मधून फोन चालूच....
मित्राने त्या मुलीला साईड ला घेऊन एक मराठी अनुवादित पुस्तक दिले... मुस्लीम मुलाशी लग्न करणार आहेस ना.. मग त्यांची संस्कृती माहिती पाहिजे...
पुस्तकाचे नाव
not without my daughter मराठी अनुवाद.
मुलीने पुस्तक वाचायला घेतले रात्री ११.३० वाजता तिने मित्राच्या खोलीचे दार वाजवले... डोळे पाण्याने भरलेले. हे खूप भयानक आहे, मी त्याच्याशी लग्न करणार नाही...
मित्राने अजूनही त्याची भूमिका बदलली नाही.... त्याने तिला समजावले.. धर्म जरी असा असला तरी तुमचे एकमेकांवर प्रेम आहे ना...
Read 9 tweets
Jun 19, 2023
आषाढ शुद्ध प्रतिपदेला कालिदास यांचा जन्म झाल्याची मान्यता आहे. हा दिवस 'महाकवी कालिदास दिन' म्हणून साजरा केला जाते.कालिदास हे संस्कृत कवी,रचनाकार,नाटककार होते. 'उपमा'  या अलंकाराचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून कालिदासांनी मानवआणि निसर्ग यांच्या संबंधांवर अनेक अजरामर रचना केल्या आहेत Image
कालिदासांच्या रघुवंश, मेघदूत, कुमारसंभव, अभिज्ञानशाकुंतलम्‌, ऋतुसंहार या रचना विशेष गाजल्या.
एका समृद्ध संस्कृतीचे, अभिजात कलाविलासाचे आणि उन्नत सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब कालिदासांच्या साहित्यातून उमटलेले दिसते.
कवी कालिदास यांची प्रामुख्याने ओळख त्यांच्या 7 साहित्यांमुळे होते. यामध्ये 3 नाटकं, 2 खंडकाव्य आणि 2 महाकाव्य अशी आहेत. ऋतुसंहार, कुमारसंभवम्, रघुवंशम्, मेघदूत या काव्य रचना, तसेच मलाविकाग्नीमित्र, विक्रमोवंशीय, अभिज्ञान शाकुंतलम् या संस्कृतमधील नाटक-वजा-महाकाव्य रचनांमुळे
Read 6 tweets
Apr 14, 2023
*सत्य घटना*
मी आज हड़पसर हुन हिंजेवडी कड़े, जाण्यासाठी रात्री 8-15 च्या सुमारास घरी जात असताना, रेसकोर्स च्या जवळपास उजवीकडे वळायला लागलो तेव्हा एका पोलिसाने मला कार थांबवण्याचा इशारा केला.
मी कार थांबवताच त्याने मला गाडीची डिकी उघडण्यास सांगितले.
मी डिकी आतून उघडली आणि खाली उतरायला लागलो पण पोलिस म्हणाले, “ठीक आहे, तू जाऊ शकतोस.” नंतर मी माझी कार सुरु केली आणि ड्राईव्हिंग करण्यास सुरवात केली, पण माझ्या मनात काहीतरी गडगडले.
माझ्या मागील दृश्यातल्या आरशातून मी पोलिसां पैकी एकाला ताबडतोब फोनवर बोलताना पाहिले.
नंतर मी सर्व्हिस रोडने कार जरा पुढे घेऊन गेलो आणि एक चांगली स्ट्रीट लाइट पाहून माझी कार बाजूला थांबवली.
इंजिन बंद करून मी मागे गेलो आणि माझी कारची डिकी हाताने उघडली. आतमध्ये पांढरे स्फटिक असलेल्या दोन लहान झिप-लॉक पाउच पाहून मला क्षणभर धक्का बसला.
मी सुन्न झालो
Read 7 tweets
Mar 28, 2023
*स्वा. सावरकरांची दहशत ! कोणाला व किती वाटायची....*
दिल्लीचे पालम विमानतळ!
विमानप्रवास फार दुर्लभ वाटावा असा तो काळ!
विमानतळावर एक केंद्र सरकारचा टपाल खात्याचा मोठा अधिकारी आपल्या विमानाची वाट बघत होता.
भोपाळ येथील टपाल विभागाचा तो मुख्य अधिकारी होता.
त्याच्या शेजारीच एक माणूस येऊन बसला. हे वयोवृद्ध गृहस्थ होते. हा माणूस फार फार मोठा होता. इंग्लंडमधून रँग्लर ही पदवी त्याने गणितात मिळवली होती.
पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे ते प्राचार्य होते, *भारताचे ऑस्ट्रेलियामधील आयुक्त* होते.
स्त्रियांच्या शिक्षणासाठी ज्यांनी आयुष्य खर्चले त्या *महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांचे भाऊ* होते. त्यांची मुलगी ही कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात त्या काळी काम करत होती.
ह्या माणसाने त्या अधिकाऱ्याला पाहीले आणि मराठीतून विचारले...
"तुम्ही श्री ***** ना ?"
Read 10 tweets
Mar 21, 2023
शिक्षणासाठी अंगावरला डाग मोडायला दिला, आई म्हणाली तू हायेस तर डाग आहे...
“संतोषच्या शिक्षणासाठी अंगावरला डाग मोडायला दिला मी. झुंबर आणि कानातली फुलं दिली. त्यानं मला म्हटलं की, अक्का मला शाळाच शिकायची नाही. म्हटलं, का रं बाळा? तर तो म्हटला, तू अंगावरला डाग मोडायलीस. अरं म्हटलं,
अरं म्हटलं, तू हायेस तर डाग आहे. मला बाकी काही नको.”
एवढं बोलल्यानंतर सरुबाईंच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. सरुबाई या त्या महिलांचं प्रतिनिधित्व करतात, ज्या शेतशिवारात, घरादारात अखंड राबत आमच्यासारख्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:च्या आवडीनिवडींना तिलांजली देतात.
का तर आपण जे भोगलं, ते पोरांच्या नशीबी येऊ नये म्हणून. याचं त्यांना कुणीही, कुठेही क्रेडिट देत नाही. पण, त्यांचा संघर्ष कायम सुरू असतो.
एमपीएससीनं नुकत्याच जाहीर केलेल्या निकालात सरुबाई आणि अजिनाथ खाडे या ऊसतोड मजुरांचा मुलगा संतोष खाडे राज्यातून सर्वसाधारण यादीत 16 व्या,
Read 11 tweets
Feb 24, 2023
पुणेरी बापाचे मुलास खरमरीत समज देणारे पत्र !!.🧐
हे पत्र वाचून पुणेकरांच्या प्रेमात पडणारंच.
असे लेखन फक्त आणि फक्त पुणेकरणाच येते.
प्रिय राजूस,( प्रिय हे मायना लिहायची पद्धत आहे आणि आम्ही ती पाळतो )
चिरंजीव आज गेले कित्येक दिवस आपणास पर्वती वर पहात आहे,
ते सुद्धा आपल्याच मागल्या गल्लीतील कन्येबरोबर....!!!
हि असली थेरे करायच्या आधी आपण दिडक्या कमवण्यासाठी काही केलेत तर बरे होईल...!!
हल्ली आपण खोकत असता, खोकला थंड पेयाचा दिसत नाही, आपले शिक्षण आता पुरे झाले, कारण ते करण्याच्या नावाखाली आपण वैशाली किंवा रुपाली येथे उभे राहुन
फाप्या मारता असे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे!!
हल्ली खाण्याच्या पण कुरबुरी असतात,जेवण जात नाही, त्यावरून आपल्याला इराणी रोग जडलाय कि काय अशी दाट शंका येऊ लागली आहे.
गणपती उत्सवात आपण ढोल बडवताना आढळलात, पण ढोल बडवून पोटाची खळगी भरत नाहीत तेच केल्यास जीवनाची हलगी वाजेल...!!
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(