डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे एकनिष्ठ, विश्वासू सेवक ज्यांनी अहोरात्र बाबासाहेबांच्या सुरक्षिततेची काळजी वाहिली असे गणपत महादेव जाधव उर्फ मडकेबुवा यांचे २८ मार्च १९४८ रोजी निधन झाले. त्यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या
प्रेतयात्रेला साठ हजार जनसमुदाय उपस्थित होता. यावरून त्यांचे दलित समाजातील स्थान किती मोठे होते हे लक्षात येते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना ही दुःखद बातमी फोन द्वारे दिल्लीला कळविण्यात आली. या प्रसंगी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोकसंदेश पाठवला तो असा,
"बुवाच्या निधनाची वार्ता ऐकून
धक्काच बसला. अस्पृश्यांचा एक मोठा कार्यकर्ता, कामगारांचा एक मोठा ट्रेड युनियनिस्ट आणि शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा एक प्रभावी संघटक, नाहीसा झाला आहे. मी अशी इच्छा व्यक्त करतो की, हा संदेश प्रेतयात्रेच्या लोक-समुहात वाचून दाखविण्यात यावा. बुवाच्या निधनाने ओढविलेल्या आपत्तीत मी सहभागी
असल्याचे त्यांच्या पत्नीस कळवा."
~ डाॅ. भीमराव रामजी आंबेडकर
सन १९२४ पासून ते तहत मृत्यूपर्यंत मडकेबुवा बाबासाहेबांचे एकनिष्ठ अनुयायी होते. १९२४ साली बाबासाहेब बॅरिस्टर होऊन परत आल्यानंतर मडकेबुवानी बाबासाहेबांच्या अभिनंदनाची सभा घेतली होती. महाड सत्याग्रह, नाशिक सत्याग्रह व
महाड परिषद यामध्ये त्यानी केलेली कामगिरी महत्वपूर्ण अशीच होती. महाड येथील सत्याग्रहाच्या वेळचा एक प्रसंग मडकेबुवाच्या आठवणीच्या दृष्टीने फारच संस्मरणीय असा आहे. महाड येथे हिंदूचा दुष्ट ग्रंथ मनुस्मृती जाहीरपणे जाळण्याचा संकल्प बाबासाहेबांनी जाहीर केला होता. तो मनुस्मृती दहनाचा
विधीही शास्त्रोक्त करावयाचा होता. बाबासाहेबांचे निष्ठावंत अनुयायी आत्मियतेने व जागरुकपणे हा मंगल विधी पाहाण्यास व त्याचे परिणाम भोगण्यास सिद्ध होते. ज्याप्रमाणे एखाद्या देवीपुढे बकरे बळी द्यावयाचे असले म्हणजे त्यास शेंदूर लावला जातो, लिंब गळ्यात बांधला जातो नि मग वाजत गाजत त्याचे
बलिदान करायचे असते. त्या प्रमाणे सर्वकाही संस्कार मनुस्मृतीस अग्नीमध्ये बळी देताना करावयाचे होते. या अभूतपूर्व कार्यासाठी बाबासाहेबांनी मडकेबुवाची नेमणूक केली होती. या बुवानी अग्निदेवतेस जागृत करण्यासाठी श्लोक म्हणावयाचे; नि नंतर विधिपूर्वक मनुस्मृतीचे दहन करावयाचे होते. ज्या
अस्पृश्य साधूंच्या हस्ते मनुस्मृती जाळण्यात आली मडकेबुवा त्यांच्यापैकी एक होते, नव्हे तेच त्यांचे म्होरके होते. त्यांनी श्लोक म्हटले नि त्या ग्रंथाची पाने फाडून अग्निकुंडात हवन केले. बाबासाहेबांच्या सुरक्षितते बद्दल त्याना फार चिंता असे. डाॅ. बाबासाहेबांच्या जीवावर जे काही बाकी
प्रसंग गुजरले, त्या त्या वेळी मडकेबुवानी स्वतःचे प्राण धोक्यात गेले तरी बेहत्तर या भावनेने ते बाबासाहेबांचे सेवक म्हणून राहिले. असे दोन प्रसंग नमूद करण्यासारखे आहेत. पहिला प्रसंग रायगडावरील आहे. डाॅ.आंबेडकर महासचिव सभा आटोपून रायगडी चालले होते. शौर्याने सवर्ण हिंदुस चित्र
करण्याचा तो काळ होता. सवर्ण हिंदु ही घाव घालण्यास व डाव साधण्यास टपून बसले होते. रायगडावर बाबासाहेबांवर सवर्ण हिंदूनी हल्ला चढविण्याचा बेत रचला होता. त्याप्रसंगी बाबासाहेबांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी ज्यांनी पहारा देऊन काळजी घेतली त्यापैकी एक मडकेबुवा होते. दुसराही एक असाच
प्रसंग आहे. महाड नजीक काळ्या सुकवली खिंडीत बाबासाहेबांची मोटार पाण्याच्या लोंढ्यात सापडली होती. पाऊस व चिखल असल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यावेळी मडकेबुवानी शर्थीचे प्रयत्न करून मोटारीस व बाबासाहेबाना सुरक्षितपणे बाहेर काढले.
एकदा बी.सी. कांबळे यांना काही कामानिमीत्त
बाबासाहेबांनी भेटायला बोलावले होते. त्यावेळी मडके बुवा हे शेकाफेचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष होते आणि ते अशिक्षित होते. तेव्हा बी. सी. कांबळे बाबासाहेबांना म्हणाले, की आपल्याजवळ इतके उच्चशिक्षीत कार्यकर्ते असताना तुम्ही एका अशिक्षित माणसाला मुंबईचा अध्यक्ष केला. तेव्हा बी.सी. कांबळे
ना डाॅ. बाबासाहेब बोलले होते, की मडकेबुवा अशिक्षित जरी असले तरी निष्ठावान,प्रामाणिक, आणि स्वाभिमानी आहे. तुम्ही सुशिक्षित लोक म्हणजे ताज्या घोड्यावरच्या गोमाश्या आहात!आज इथे तर उद्या तिथे! पण माझा मडकेबुवा हा #चळवळीतला_हिरा आहे.
यावरुन आपण समजू शकतो की बाबासाहेबांना चळवळीतला
माणुस कसा अपेक्षित होता. डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या या व्याख्येत आजचे किती नेते, पुढारी बसतात बरे?
बाबासाहेबांच्या या एकनिष्ठ सेवकास मी विनम्रपणे अभिवादन करतो.
करोडपती असलेले महात्मा फुले हे १८९० साली मरण पावतात. तेव्हा त्यांचे पार्थिव स्मशानभूमीत घेऊन जातात पण त्यांच्या चितेला अग्नी कोणीच देत नाही. याचे कारण म्हणजे या महात्मा फुले यांना जो मुलगा असतो तो दत्तक घेतलेला असतो त्यामुळे समाजातील काही कर्मठ ब्राम्हण लोक अग्नी देवू देत नव्हते.
मुलगा यशवंत अग्नी देण्यास पुढे जायचा पण पुरोहित व जातभाई लोक यशवंताला मागे ढकलून देत; हा खेळ बराच वेळा चालला. महात्मा फुले यांचा पार्थिव देह पडून आहे, तर त्याला शेवटच्या क्षणी देखील धर्मग्रंथ आडवा आला. शेवटी सावित्रीबाई फुले यांनी पुढाकार घेऊन प्रेताला अग्नी दिला.
विचार करा
जीवंतपणी फुल्यांच्या शरीराची विटंबना-अपमान बामनांनी केला पण मेल्यावरही जातीतील लोकं देखील ब्राह्मणी विचारधारेच्या प्रभावाने विटंबना करतात.
यावर फुले अनुयायी विचार करतील काय?
दुसरी एक घटना अशी कि महात्मा फुले यांची सून म्हणजे यशवंताची पत्नी पुण्यात राहत होती; अतिशय गरीब अवस्थेत
Ninety Three years ago, on March 20, 1927, Dr. Babasaheb Ambedkar led the Mahad satyagraha for drinking water from the Cavdar tank at Mahad. This was the "foundational struggle" of the dalit movement, a movement for water - and for caste
annihilation. In his statement at the time, Dr. Ambedkar put the movement in the broadest possible context. Why do we fight, he asked. It is not simply for drinking water; drinking the water will not give us very much. It is not even a matter of only of our human rights, though
we fight to establish the right to drink water, but our goal is no less
than that of the French Revolution. This was fought for the reconstruction of society,for the eradication of the old society based on feudal inequality and the establishment of a new society based on liberty,
२० मार्च १९२७ हा दिवस म्हणजे महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा दिवस. माणुसकीचा आणि समतेचा संदेश देणारा हा अतिशय महत्वाचा दिवस. आपल्या ध्येयावर आढळ श्रद्धा बाळगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीन-दलित व वंचित वर्गात निष्ठा निर्माण करत होते, स्वभिमान जागृत करत होते. ज्या तलावात
पशु-पक्षी जनावर आपली तहान भागवत असत त्याच ठिकाणी मात्र अस्पृश्य वर्गाला आपली तहान भागवण्यास मज्जाव होता. या वर्गाला सार्वजनिक स्थळे देवळे एवढेच नव्हे तर आपली सावली सुद्धा रस्त्यावर पडता कामा नये याची दक्षता म्हणून गळ्यात मडकं हातात झाडू व कमरेला फांदी अशी अवस्था या समाजाची होती.
हिंदू धर्मातील हिंदू धर्ममार्तंड यांचा ढोंगीपणा हा महापुरुष जगाच्या वेशीवर सांगत होता. चवदार तळ्यातील पाणी पशुपक्षी पीत असत परंतु युगानयुगे राम कृष्ण विठोबा हिंदूंच्या देवाला आपले देव म्हणून मानणाऱ्या अस्पृश्य हिंदुना सारे सार्वजनिक पाणवठे विहिरी, तलाव बंद होती, यांना स्पर्श केला
होळीच्या सणाला "फाल्गुनोत्सव" असे म्हणतात. बोधिप्राप्तीनंतर तथागत बुद्ध पहिल्यांदा कपिलवास्तुला त्यांच्या घरी गेले. त्यांचे स्वागत करण्यासाठी लोकांनी घरे आणि रस्ते स्वच्छ केले आणि बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या आनंदात उत्सव साजरा केला जो नंतर "फाल्गुनोत्सव" झाला. आनंदात,
कपिलवस्तुच्या शाक्यांनी एकत्र भात शिजवला आणि चावल बाटीला सर्व लोक 'होलका' म्हणत, म्हणून बुद्धाच्या या स्वागताला नंतर "होलोत्सव" असे म्हटले गेले. आजही थायलंडमधील लोक हा सण साजरा करतात. बुद्धमूर्तीची रॅली (रथयात्रा) काढल्यानंतर लोक एकमेकांवर पाणी, फुले आणि रंग फेकतात. पाटलीपुत्र
येथील अशाच रथयात्रेचे वर्णन चिनी प्रवासी फाह्यांन आणि ह्युएन्त्सांग यांनी केले आहे. दक्षिण भारतातील अशाच एका सणाचे वर्णन 'विरूपक्षवसंतोत्सव' या पुस्तकात आहे. पण, तिथल्या रथयात्रेत (रॅली) शिवाला बुद्धाच्या ठिकाणी बसवले जाते, कारण पाली साहित्यात बुद्धाला शिव(सिव) असेही म्हटले जाते.
फाल्गुन पौर्णिमेचे बौद्ध धम्मातील महत्त्व - "तथागतपुत्र राहुल याची धम्मदीक्षा."
वारसा बुद्धत्वाचा.....!!
"अजिंठा येथील लेणी क्र.१७ च्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर, खालच्या बाजूला असलेले हे शिल्प म्हणजे अजिंठ्याच्या सर्व शिल्पांमध्ये मनाला भावलेले असे हे शिल्प आहे.
कुणा एका अनामिक शिल्पकाराने मोठ्या श्रद्धेने बुद्धाप्रति समर्पित होऊन आपले भाव व भावना या शिल्पापध्ये मोठ्या प्राणपणाने ओतूनच हे भावस्पर्शी शिल्प येथे कोरलेले आहे.
या शिल्पातील प्रसंग व आशय असा आहे....
बुध्दत्व प्राप्त केल्यानंतर तथागत प्रथमच कपिलवस्तू येथे पिता शुद्धोधन राजा
यांच्या विनंतीवरून आलेले आहेत. त्या दिवशी असलेल्या फाल्गुन पौर्णिमेचे औचित्य साधून. या दिवशी तथागतांच्या धम्मदेसनेचा लाभ आपल्या प्रजाजनांना व्हावा म्हणून शुद्धोधनाने केलेल्या विनंतीवरुन प्रजाजनांना धम्माचा उपदेशही त्यांनी प्रजेला केलेला आहे. तथापि, शुद्धोधनाची त्यांना आणखी एक
तुमच्या घरात येणारी घरकामवाली स्त्री, जीने एक सुट्टी घेतली तर तुम्ही ५० रुपये पगारातून कापून घेता, ती बाई ८-१० हजारात शहरात स्वतःचे कुटुंब कसे चालवत असेल? आपल्या घरी तर ती बाथरूम वापरत नाही, मग ७-८ तास ती स्वतःची लघवी, मासिक पाळीचा स्त्राव धरून ठेवत काम
कशी करत असेल? भल्या पहाटे थंडी-पावसात तुमच्या घरी दूध, पेपर टाकणारी पोरे महिन्याला ३-४ हजार रुपये कमावून स्वतःच्या घरावर कोणता सोन्याचा कळस चढवत असतील? २००-३०० रुपयांच्या पार्लरच्या कामासाठी भली मोठी बॅग सोबत घेवून तुमच्या घरी येणारे अर्बन कंपनीचे ब्युटिशिअन दिवसात किती कॉल करत
असतील आणि किती कमावत असतील?अमेझॉन, स्विगी, डंझो वगैरेसाठी मोठाल्या बॅग पाठीला लावून दिवसाला २००-३०० रुपयांसाठी उसासे टाकत जिने चढणारे डिलीव्हरी बॉय कुठल्या करीयर ग्रोथची स्वप्ने पाहत असतील? ओला, सुका कचरा गोळा करणारे आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन उकिरड्यावर, डंपिंग ग्राउंडवर कचरा