sankett Profile picture
WE ARE BECAUSE HE WAS #तु_लढला_नाहीस_तरी_चालेल_पन_विकला_जाऊ_नको
Aug 21, 2023 7 tweets 2 min read
नागपंचमीचा संबंध "नाग" या सरपटणा-या सापाशी नसून भारतात नाग हे "टोटेम" असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेलेत.

१) नागराजा अनंत (शेष)
२) नागराजा वासुकी
३) नागराजा तक्षक
४) नागराजा कर्कोटक
५) नागराजा ऐरावत

ह्या पाचही नाग वंशीय राजांचे स्वतंत्र राज्ये होती.
यामध्ये नागराजा Image अनंत हा सर्वात मोठा होता. जम्मू-काश्मीर मधील अनंतनाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते. त्यानंतर दुसरा नागराजा वासुकी हा कैलास मानसरोवर पासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा प्रमुख होता. तिसरा नागराजा तक्षक यानेच जगप्रसिद्ध तक्षशिला विश्वविद्यापीठ स्थापन केले. येथेच पुढे प्लुटो
May 4, 2023 7 tweets 2 min read
#दिनविशेष

आजच्याच दिवशी म्हणजे ४ मे १९५५ रोजी भारतात बौद्ध धम्माचा अधिकाधिक प्रसार करण्याच्या व भारत बौद्धमय करण्याच्या उद्देशाने परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी #द_बुद्धिस्ट_सोसायटी_ऑफ_इंडिया या संघटनेची स्थापणा केली. या संस्थेचे उद्देश पुढीलप्रमाणे होते.

१. भारतात बौद्ध Image धम्माच्या प्रसारासाठी चालना देणे, प्रोत्साहन देणे.
२. बौद्ध पुजापाठ करण्यासाठी विहारांची स्थापणा करणे.
३. धार्मिक (धम्मविषयक) व शास्त्रीय शिक्षण देण्यासाठी शाळा व महाविद्यालयाची स्थापणा करणे.
४. अनाथालये, दवाखाने व मदत केंद्रे स्थापण करणे.
५. धम्मप्रसाराच्या उद्देशाने
Apr 3, 2023 10 tweets 3 min read
आजचा दिनविशेष :- आज ३ एप्रिल
#बहिष्कृत_भारतचा_जन्म

३ एप्रिल १९२७ रोजी #बहिष्कृत_भारत चा प्रथम अंक प्रकाशित झाला. हेच एकमेव असे वर्तमानपत्र (पाक्षिक) होते, ज्याचे अखेरपर्यंत संपादक स्वतः डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राहिले, ज्यातील संपूर्ण अग्रलेख/लेख त्यांनी स्वतः लिहिले. दि.३ एप्रिल १९२७ रोजी “बहिष्कृत भारत” नावाचे नवे पाक्षिक सुरू करण्यात आले. काय समर्पक नाव उचललं बाबासाहेबानी बघा. बहिष्कृत, कोण तर आम्ही. अन कुठे तर भारतात. दोन वेगळे शब्द दोघांचे अर्थही वेगळे. या आधीचा पाक्षिक "मूकनायक". शब्दांची अशी अचुक निवड करायचे की सगळा सार त्यातुन ओझरत असे
Mar 23, 2023 6 tweets 4 min read
Celebration Started 🔥
BhimJayanti 💙 2023

first flex in Vishrantwadi Pune #BKMM

Few Days To Go...........⏱️ @sawsammer3 Second Flex in Vishrantwadi, Pune15

#NBTM
#BhimJayanti2023 Image
May 14, 2022 23 tweets 4 min read
महान साहित्यिक : छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराजांचा युद्धभूमीवरिल पराक्रम इथल्या पुरोहितशाहीने दडवून ठेवला तसच त्यांचे साहित्याच्या क्षेत्रातील योगदान सुद्धा दडवून ठेवण्याचे काम यांनी केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी युद्धभूमीवर जशी तलवार चालवली तसंच साहित्याच्या क्षेत्रात सुद्धा वयाच्या १४व्या वर्षा पासून लेखणी चालविण्याचे काम केले आहे. संभाजी राजेंना पणजोबा मालोजीराजें पासून जसा तलवारीच्या पराक्रमाचा वारसा प्राप्त झाला तसाच भोसले कुळातून लेखणीचा वारसा प्राप्त झाला होता. शंभूराजेच्या साहित्याच्या क्षेत्रातील कार्याचा उल्लेख संत तुकाराम
Apr 7, 2022 28 tweets 5 min read
फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र पुरोगामी आहे का??

आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, शहरामध्ये किंवा राज्यामध्ये आपण रोजच जातीवर आधारीत किंवा जातीमुळे झालेला गोर-गरिबांवर अन्याय पहात असतो. ह्या सगळ्याला जबाबदार आहे तो फक्त आणी फक्त सवर्ण समाज जो वर्ण व्यवस्थेला मानणारा आहे. या निमित्ताने होत असलेल्या वादातून राज्यात ब्राह्मण विरुद्ध बहुजन किंवा इतर अशी विभागणी पुन्हा केली जाऊ लागली आहे. ब्राह्मणविरोधक म्हणजे पुरोगामी असा विचार रुजतो आहे. फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांना हे पुरोगामित्व अपेक्षित होते का?या महापुरुषांची नावे घेणाऱ्या आजच्या
Apr 6, 2022 13 tweets 3 min read
डॉ बाबासाहेब आंबेडकर - सामाजिक क्रांती, परिवर्तनाची नांदी.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचे चक्र भारतात गतिमान केले. त्यानिमित्त तीन प्रमुख संज्ञांचा विचार करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे. 'समाज', 'क्रांती' आणि 'परिवर्तन'....
समाज ही संज्ञा लॅटिन भाषेतील 'सोशियस' म्हणजे सहचर, सवंगडी यामधून घेतलेली आहे. समाज हा शब्द उच्चारला तरी त्याचा अर्थबोध होतो. स म्हणजे सर्व; संपूर्ण, मा म्हणजे मानव; माणूस, ज म्हणजे जमात; जाती आणि म्हणून 'समाज' म्हणजे सर्व मानव जमात होय. वेगळ्य़ा शब्दांत संपूर्ण मानव जातिसमूहाचे रूप 'समाज'. 'व्हॉइस ऑफ अमेरिका' या केंद्रावर
Apr 6, 2022 11 tweets 3 min read
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक योगदान.

१४ एप्रिल या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. देशातील कोट्यवधी दीनदुबळ्यांसाठी तसेच देशासाठी हा दिवस फार आनंददायी आहे. या दिवशी दिवसभर मोठ्या उत्साहाने खेड्यापाड्यांपासून ते दिल्लीपर्यंत, अगदी जगभर म्हणलं तरी चालेल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. डॉ. आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी म्हणजे एम.ए. पदवीसाठी २५ जुलै १९१३ रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश केला. प्रो. सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनाखाली जून १९१५ मध्ये एम.ए.ची पदवी संपादन केली.
Apr 6, 2022 25 tweets 5 min read
सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतिबा फुले.

मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसुन तो गुणाने श्रेष्ठ ठरतो. ईश्वर एक असुन तो सर्वव्यापी निर्विकार, निर्गुण व सत्यरूप आहे. सर्व मनुष्य व मनुष्येत्तर प्राणी त्याची लेकरे आहेत. हा वास्तव विचार सन १८व्या शतकात निर्भीडपणे मांडून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गुलामगिरीतुन समस्त मानवाला बाहेर काढण्याचं काम करणारे आणि सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. महात्मा ज्योतीराव फुले यांचा जन्म शेतकरी, भाजीपाला व फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव आणि चिमणाबाई यांच्या पोटी ता.
Apr 5, 2022 32 tweets 6 min read
स्त्रियांची गुलामगिरी नष्ट करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

पिता रक्षति कौमार्य, पति रक्षति योवने, पुत्र रक्षति वार्धक्य, न स्त्री स्वातंत्र्यम अहरती. या मनू वचनाला स्त्रीने कधीच मागे टाकले आहे. स्त्रियांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा कोणीच विचार करत नव्हते. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विचार केला. त्यांना शिक्षण देऊन सक्षम बनवण्यास हातभार लावला. विश्‍वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना गुरु मानतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हाच धागा पुढे नेला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा
Apr 5, 2022 33 tweets 6 min read
स्त्रीयांची गुलामगिरी नष्ट करणारे महात्मा ज्योतिबा फुले.

महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ समाज सुधारकच नव्हते तर ते खऱ्या अर्थाने नवसमाज निर्मितीचे सांस्कृतिक पुरुष होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थावादी समाजव्यवस्था नाकारलीच नाही तर नवसमाज निर्मितीसाठी Image आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी नवीन समतामूलक समाजव्यवस्था निर्माण करण्याचे प्रारूप भारतीय समाज व्यवस्थेसमोर मांडले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी या परिवर्तनवादी लढाईमध्ये स्त्रियांना केवळ सामावून घेतले नाही
Apr 4, 2022 13 tweets 3 min read
शेतकऱ्याचा असूड - महात्मा ज्योतिराव फुले

भारतातील परंपरागत समाज संस्थेच्या विरुद्ध बंड करणारे पहिले बंडखोर, भारतीय स्त्री-शिक्षणाचे जनक, स्त्री-स्वातंत्र्याचे आणि हक्काचे उद्गाते, शेतकरी-कामकऱ्यांची चळवळ उभारणारे पहिले पुढारी म्हणून ज्योतिराव गोविंदराव फुले हे ख्यातीप्राप्त Image आहेत. महात्मा फुले हे गौतम बुद्ध, संत कबीर, संत तुकाराम आणि लोकराजा शिवाजी यांची परंपरा जोपासणारे विवेकवादी होते. समाजसुधारणा, स्त्रीदास्य विमोचन, सर्वांना शिक्षणाचा हक्क याविषयी ते आग्रही होते. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, हे त्यांनी 'तृतीय रत्न' या नाटकातून दाखवून दिले आहे
Apr 1, 2022 19 tweets 4 min read
गुलामगिरी ⛓

१८७३ साली म. फुले यांनी 'गुलामगिरी' हे जहाल व ब्राह्मणी व्यवस्थेला नेस्तनाबूत करणारे पुस्तक लिहिले. ब्राह्मणी गुलामिच्या विध्वंसनाला प्रारंभ झाला. बहुजनांच्या स्वातंत्र्य
लढ्यातील एक महान ग्रंथ म्हणजे 'गुलामगिरी' होय. अत्यंत पुराव्यानिशी व चिकित्सक पद्धतीने फुल्यांनी या देशातील बहुजनांचा इतिहास मांडला आहे. वैदिक ब्राह्मणी ग्रंथातून मांडलेली त्यांची संस्कृती नाकारत असताना आपला इतिहास शोधण्याचा प्रयत्न सर्व प्रथम यात झालेला आहे. पुराणे म्हणजे भाकड कथा हे जरी खरे असले तरी त्यात बहुजनांचा इतिहास दडलेला आहे. तो मांडण्यासाठी
Mar 31, 2022 9 tweets 2 min read
➡️ महात्मा फुले आणि "हंटर कमिशन"

स्त्री-शोषित-पीडित-अस्पृश्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी महात्मा फुले यांनी हंटर कमिशनसमोर साक्ष नोंदवली होती. याबद्दल थोडक्यात जाणून घेवुया हंटर कमिशनचा इतिहास...

▪️काय होते हंटर कमिशन ?

भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने लॉर्ड रिपन यांच्या कारकीर्दीत १८८२ साली सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला यालाच हंटर आयोग असे म्हणतात.

▪️बहुजनांच्या शिक्षणाला सनातन्यांचा विरोध : सर हंटर महाराष्ट्रात आले तेंव्हा पुणे येथील एम्.एम्.कुंटे यांनी बहुजनांना शिक्षणाची गरज नाही असे
Mar 31, 2022 4 tweets 1 min read
संविधान निर्मितीतील महत्वपूर्ण योगदान भारतीय स्वातंत्र्य लढ्याला यश येण्याची चिन्ह दिसत असताना भारतीय संविधान समितीची स्थापणा करण्यात आली. संविधान समितीवर भारताची राज्यघटना तयार करण्याची जबाबदारी सोपविलेली होती. संविधान सभेने त्यासाठी मसूदा समिती स्थापण केली होती.या मसूदा समितीचे अध्यक्ष डाॅ.बाबासाहेब आंबेडकर होते. मसूदा समितीत त्यांच्याशिवाय इतर सहा सदस्य होते मात्र या ना त्या कारणामुळे ते मसूदा समितीच्या बैठकांना उपस्थित राहिले नाहीत व घटनेचा मसूदा तयार करून त्याला अंतिम स्वरूप देण्याची संपूर्ण जबाबदारी डाॅ. आंबेडकरावर येऊन पडली. त्यांनी स्वतःच्या
Mar 29, 2022 11 tweets 3 min read
करोडपती असलेले महात्मा फुले हे १८९० साली मरण पावतात. तेव्हा त्यांचे पार्थिव स्मशानभूमीत घेऊन जातात पण त्यांच्या चितेला अग्नी कोणीच देत नाही. याचे कारण म्हणजे या महात्मा फुले यांना जो मुलगा असतो तो दत्तक घेतलेला असतो त्यामुळे समाजातील काही कर्मठ ब्राम्हण लोक अग्नी देवू देत नव्हते. मुलगा यशवंत अग्नी देण्यास पुढे जायचा पण पुरोहित व जातभाई लोक यशवंताला मागे ढकलून देत; हा खेळ बराच वेळा चालला. महात्मा फुले यांचा पार्थिव देह पडून आहे, तर त्याला शेवटच्या क्षणी देखील धर्मग्रंथ आडवा आला. शेवटी सावित्रीबाई फुले यांनी पुढाकार घेऊन प्रेताला अग्नी दिला.

विचार करा
Mar 28, 2022 14 tweets 4 min read
☆ आंबेडकरी चळवळीतील हिरा....मडकेबुवा

#मडकेबुवा_स्मृतीदिन

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे एकनिष्ठ, विश्वासू सेवक ज्यांनी अहोरात्र बाबासाहेबांच्या सुरक्षिततेची काळजी वाहिली असे गणपत महादेव जाधव उर्फ मडकेबुवा यांचे २८ मार्च १९४८ रोजी निधन झाले. त्यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या प्रेतयात्रेला साठ हजार जनसमुदाय उपस्थित होता. यावरून त्यांचे दलित समाजातील स्थान किती मोठे होते हे लक्षात येते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना ही दुःखद बातमी फोन द्वारे दिल्लीला कळविण्यात आली. या प्रसंगी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोकसंदेश पाठवला तो असा,
"बुवाच्या निधनाची वार्ता ऐकून
Mar 20, 2022 11 tweets 3 min read
Lake of Liberation, Mahad Satyagraha

Ninety Three years ago, on March 20, 1927, Dr. Babasaheb Ambedkar led the Mahad satyagraha for drinking water from the Cavdar tank at Mahad. This was the "foundational struggle" of the dalit movement, a movement for water - and for caste annihilation. In his statement at the time, Dr. Ambedkar put the movement in the broadest possible context. Why do we fight, he asked. It is not simply for drinking water; drinking the water will not give us very much. It is not even a matter of only of our human rights, though
Mar 20, 2022 9 tweets 4 min read
२० मार्च १९२७ हा दिवस म्हणजे महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा दिवस. माणुसकीचा आणि समतेचा संदेश देणारा हा अतिशय महत्वाचा दिवस. आपल्या ध्येयावर आढळ श्रद्धा बाळगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीन-दलित व वंचित वर्गात निष्ठा निर्माण करत होते, स्वभिमान जागृत करत होते. ज्या तलावात Dr Babasaheb Ambedkar at Chavdar Lake Mahad Raigad पशु-पक्षी जनावर आपली तहान भागवत असत त्याच ठिकाणी मात्र अस्पृश्य वर्गाला आपली तहान भागवण्यास मज्जाव होता. या वर्गाला सार्वजनिक स्थळे देवळे एवढेच नव्हे तर आपली सावली सुद्धा रस्त्यावर पडता कामा नये याची दक्षता म्हणून गळ्यात मडकं हातात झाडू व कमरेला फांदी अशी अवस्था या समाजाची होती.
Mar 18, 2022 14 tweets 4 min read
होळीच्या सणाला "फाल्गुनोत्सव" असे म्हणतात. बोधिप्राप्तीनंतर तथागत बुद्ध पहिल्यांदा कपिलवास्तुला त्यांच्या घरी गेले. त्यांचे स्वागत करण्यासाठी लोकांनी घरे आणि रस्ते स्वच्छ केले आणि बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या आनंदात उत्सव साजरा केला जो नंतर "फाल्गुनोत्सव" झाला. आनंदात, Image कपिलवस्तुच्या शाक्यांनी एकत्र भात शिजवला आणि चावल बाटीला सर्व लोक 'होलका' म्हणत, म्हणून बुद्धाच्या या स्वागताला नंतर "होलोत्सव" असे म्हटले गेले. आजही थायलंडमधील लोक हा सण साजरा करतात. बुद्धमूर्तीची रॅली (रथयात्रा) काढल्यानंतर लोक एकमेकांवर पाणी, फुले आणि रंग फेकतात. पाटलीपुत्र
Mar 17, 2022 9 tweets 3 min read
फाल्गुन पौर्णिमेचे बौद्ध धम्मातील महत्त्व - "तथागतपुत्र राहुल याची धम्मदीक्षा."

वारसा बुद्धत्वाचा.....!!

"अजिंठा येथील लेणी क्र.१७ च्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर, खालच्या बाजूला असलेले हे शिल्प म्हणजे अजिंठ्याच्या सर्व शिल्पांमध्ये मनाला भावलेले असे हे शिल्प आहे. Ajanta Caves Cave No 17 कुणा एका अनामिक शिल्पकाराने मोठ्या श्रद्धेने बुद्धाप्रति समर्पित होऊन आपले भाव व भावना या शिल्पापध्ये मोठ्या प्राणपणाने ओतूनच हे भावस्पर्शी शिल्प येथे कोरलेले आहे.

या शिल्पातील प्रसंग व आशय असा आहे....

बुध्दत्व प्राप्त केल्यानंतर तथागत प्रथमच कपिलवस्तू येथे पिता शुद्धोधन राजा