#नांव_एक_अस्मिता
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्राच्या वैभवात भर टाकणारे दोन प्रकल्प पूर्ण झाले.
मुंबई आणि पुणे यांना जोडणारा देशातला पहिला एक्सप्रेस वे आणि मुंबईच्या समुद्रात उभारलेला देशातला पहिला सागरी सेतु.
द्रुतगती महामार्ग पुर्ण झाला आणि +
त्याचं मोठ्या थाटामाटात नामकरण करण्यात आलं 'यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग' (नावात श्री.लिहिलं आहे कीं नाही मला माहीत नाही). श्री. पु.ल.देशपांडे यांचं नाव त्या महामार्गाला द्या म्हणून तेव्हा आंदोलन झाल्याचं लक्षात आहे.+
आज काय स्थिति आहे, हा महामार्ग 'मुंबई पुणे एक्सप्रेस वे' या नावानेच ओळखला जातो. 'यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग' म्हणणारा कोणीही या भूतलावर सापडणार नाही लिहून घ्या.
शिवसेना भाजपच्या काळात काम सुरू झालेला देशातला पहिला सागरी सेतु पूर्ण झाला +
तेव्हा महाराष्ट्रात सत्ता होती काँग्रेसची आणि गांधी परिवारासमोर नतमस्तक होवून चालण्याची परंपरा पाळणा-या राज्यकर्त्यांनी श्रीमती सोनिया गांधी यांना खुश करण्यासाठी या सागरी सेतुचं बारसं केलं 'राजीव गांधी सागरी सेतु' पण इतक्या वर्षांनंतर आजही टॅक्सीवाला भैय्या विचारतो +
'साहब बांद्रा वरली सी लिंक होकर जायेंगे क्या?'
एवढंच काय ज्यांनी हा सागरी सेतु बांधला त्या एमएसआरडीसीच्या वेबसाइटवर जाउन बघा, त्यांच्या ऑफिसचा पत्ता लिहिला आहे तो 'बांद्रा वरळी (राजीव गांधी)सी लिंक' असाच. (यात श्री. मात्र नक्कीच नाही). +
'मराठवाडा विद्यापीठ' नामांतर आंदोलनात हजारो लोकांचे प्राण गेल्यावर नामांतर न होता नामविस्तार झाला तो 'डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' पण एवढं संपूर्ण नाव कोणीही घेत नाही हो. आम्हाला कोणी कुठे शिकला असं विचारलं तर आमच्या तोंडातून आजही 'मराठवाडा विद्यापीठ' असंच येतं. +
कसं असतं प्रोजेक्ट सुरू करताना एक नाव ठरवलं जातं आणि नंतर प्रोजेक्ट पुर्ण झाल्यावर त्याचं नामकरण केलं जातं पण पहिलं नाव एवढं प्रचलित झालेलं असतं की सतत त्याच नावाचा उच्चार होत राहतो आणि महापुरुषांची नाव ही फक्त कागदोपत्री राहतात,त्या प्रोजेक्टची ओळख म्हणून ते कधीच पुढे येत नाहीत+
प्रकल्पांना मोठा गाजावाजा करून नावं दिली जातात पण आपण त्या नावांचा शाॅर्टफाॅर्म करून वापरण्यात माहिर आहोत.
आता बघा ब्रिटीशांनी बांधलेलं 'व्हिक्टोरिया टर्मिनस' अगदी अलिकडच्या काळापर्यंत 'व्हीटी' म्हणूनच ओळखलं जायचं, नंतर ते झालं 'छत्रपती शिवाजी टर्मिनस' पण प्रचलित काय झालं +
तर 'सीएसटी' आणि आज ते झालं आहे 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस' पण म्हंटलं जातं 'सीएसएमटी' असंच. 'सीएसटी' बरेच दिवस चाललं पण नुसतं 'शिवाजी' नाही तर 'शिवाजी महाराज' असायला पाहिजे हे लक्षात यायला एवढा वेळ जावा हे महाराष्ट्राचं दूर्दैवच.+
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' आज कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे तर 'बामू' आणि कोकणात स्थापन झालेलं 'डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ' प्रसिद्ध झाले आहे ते 'बाटू लोणेरे' याच नावाने.
असंच 'व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्नोलॉजीकल इन्स्टिट्यूट' म्हणजे प्रसिद्ध आहे ते +
'व्हिजेटीआय' या नावाने पण आज त्याचं खरं नांव 'वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजीकल इन्स्टिट्यूट' असं झालं आहे हे किती जणांना माहीत आहे शंकाच आहे.
मुंबई ते नागपूर असा महत्वाकांक्षी महामार्ग आता येवू घातला आहे. प्रकल्प घोषित झाला तेव्हा त्याचं नाव ठरवलं गेलं 'समृद्धी महामार्ग'. +
आज त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने लाखो पेपर्स, रिपोर्टस, प्रेझेंटेशन निर्माण झाले आहेत आणि सर्वत्र 'समृद्धी महामार्ग' असाच उल्लेख आहे.
भूमीपूजन व्हायच्या आधीच शिवसेनेने त्याला विरोध केला पण सत्तेत आले कीं ठरवलं कीं बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं .+
नाव द्यायला काहीच हरकत नसावी पण मी वर लिहिल्या प्रमाणे ते फक्त नविन कागदांवर छापलं जाईल पण प्रचलित झालेलं नांवच कायम उच्चारलं जाईल ते म्हणजे
'समृद्धी महामार्ग'.
✍️रंगा
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
"फेमस की पॅाप्युलर"
२००९ साली मी नागपुरला होतो, मिहान प्रकल्पात एका ऊड्डाणपुलाचं काम चालु होतं तेथे प्रकल्प व्यवस्थापक म्हणुन काम पहात होतो. सौ.अंजली आणि मुलगा सिद्धार्थ तळेगांव दाभाडेलाच होते म्हणुन मी एकटाच रहात होतो.+
३० मार्च २००९ ची रात्र, ११.३० वाजले असतील मी टीव्ही बंद करून नुकताच कॅाटवर पडलो होतो आणि अचानक फोन वाजला, माझा लहान भाऊ ऋषिकेशचा फोन होता, मी फोन ऊचलला आणि त्याने जोरात रडायला सुरूवात केली " दादा आपला पिन्या गेला रे ". क्षणभर मी सुन्न झालो, +
त्याच्या आणि माझ्या तोंडातुन शब्दच फुटत नव्हते. मग त्याने रडत रडत सांगितले कीं पुण्याहून सोलापुरला जात असताना मोहोळजवळ सावळेश्वर गांव आहे तिथे एका पुलाच्या कठड्याला धडकुन तो बसलेली कार खाली खड्यात पडली आणि त्याचा जागीच मृत्यु झाला.+
मंडळी सुप्रभात,
आमच्या लहानपणी एक गोष्ट सांगितली जायची. एका गावात एक माता आणि तिचा पुत्र राहायचे. मुलगा अतिशय वांड होता. नेहमी सगळ्यांशी भांडणं, मारामाऱ्या करायचा, छोट्या मोठ्या चोऱ्या करायचा. त्याची माता त्याकडे कानाडोळा करायची. उलटपक्षी त्याच्या चोऱ्यामाऱ्या मुळे आपलं घर चालतं+
यात तिला समाधान वाटत असे. पुढे पुढे तर हे प्रकरण इतकं वाढलं की तो मुलगा अट्टल दरोडेखोर बनला.त्याने बरेच खून पण केले.तरीही माता काही बोलत नव्हती. पोलिसांचा ससेमिरा त्याच्या मागे लागला. शेवटी तो पकडला गेला. त्याच्यावर कोर्टात खटला भरण्यात आला.सुनावणी होऊन त्याला फाशीची शिक्षा झाली+
फाशीचा दिवस उजाडला. त्याला त्याची अंतिम इच्छा विचारली तेव्हा त्याने सांगितलं की मला माझ्या आईच्या कानात काही सांगायचं आहे.त्याच्या आईला बोलावलं आणि त्याने तिच्या कानाचा कडकडून चावा घेतला.कान तुटून पडला तेव्हा तो म्हणाला की "मी पहिली चोरी केली तेव्हाच तु आईं म्हणून डोळे उघडे+
आम्ही वरसावे खाडीवर जो ब्रीज बांधत आहोत त्याचे आम्ही दोन भाग केलेले आहेत. पहिला भाग हा जमिनीवरचा आणि दुसरा भाग हा पाण्यातला. जमीनीवरच्या १२ फाऊंडेशनच्या १५०० मिमी व्यासाच्या ८० पाईल आहेत तर पाण्यातल्या ४ फाऊंडेशनच्या १८०० मिमी व्यासाच्या ६० पाईल आहेत. +
साधारणपणे एका पाईलची लांबी ३२ ते ३५ मीटर आहे.
१.आजकाल पाईलिंग करायला सर्वत्र वापरली जाते ती "हायड्रॉलिक पाईलिंग रीग(फोटो क्रं १). रणगाड्यासारखे चाकं असलेल्या एका ट्र्रक वर ती फिट केलेली असते. समोर जो लोखंडी शाफ्ट दिसतो त्याला पाईलच्या व्यासाचा ऑगर लावलेला असतो. +
सोप्या भाषेत सांगायचं तर आपण छिद्र पाडायला वापरतो तशी मोठ्या आकाराची ड्रील मशीन.या मशीनच्या साह्यानेच जमीनीत किंवा पाण्यात लायनर, लोखंडाची जाळी टाकली जाते.+
विषय तसा खोल आहे.
पाण्यामध्ये काँक्रिट कसं करतात हा तसा प्रत्येकाच्या कुतूहलाचा विषय आहे. लिहिलेले किती समजेल हे मी सांगू शकत नाही पण प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहिला तर ते जास्त चांगलं समजेल.
काँक्रिट म्हणजे काय असतं वाळू, खडी, सिमेंट आणि पाणी +
यांचं प्रमाणबद्ध मिश्रण.
काँक्रिटची शक्ती म्हणजे काॅम्प्रेसिव्ह स्ट्रेंग्थ ही सिमेंटच्या प्रमाणावर अवलंबून असते ती वाढवायची असेल तर त्याप्रमाणात सिमेंट वाढवावं लागतं पण त्यालाही मर्यादा असतात म्हणून त्यात तत्सम पदार्थ मिसळावे लागतात. +
ते म्हणजे मायक्रो सिलिका किंवा सिलिका फ्युमस इत्यादी.
सिमेंट हा असा पदार्थ आहे कीं वातावरणाशी किंवा पाण्याशी त्याचा संपर्क आला कीं पावडर स्वरूपात असलेलं सिमेंट घट्ट व्हायला सुरुवात होते. आपण बघतो कीं अतिशय बंदिस्त गोडाऊन मध्ये ठेवलेल्या सिमेंटच्या गोण्या पण +
#राहुलबजाज__एक_आठवण
नोकरी, व्यवसाय करताना त्या ठिकाणी तुमची जात, धर्म आणि राजकीय अभिनिवेश बाजुला ठेवावा लागतो. आजचं मोदी सरकारचं ब्रीद वाक्य "सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास" हे आचरणात आणावं लागतं.+
वर्ष भर एका छोट्या कंपनीत औरंगाबाद आणि गोवा ईथे पाइपलाइनचं काम करून १९८९ ला मी गॅनन डंकर्ली कंपनी मधे जॉईन झालो आणि माझा पहिला प्रोजेक्ट होता वाळूज औरंगाबाद इथल्या बजाज ऑटोचा कावासाकी प्लांट.+
राहुल बजाज हे बजाज ग्रूपचे सर्वेसर्वा. मी जरी संघ परिवारातून आलेला असलो तरी राहुल बजाज हे काँग्रेसी आहेत किंवा भाजप द्वेष्टे आहेत याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नव्हतं कारण मला नोकरी देणाऱ्या कंपनीसाठी ते एक क्लायंट होते.+
कोणत्याही ब्रिजचे ढोबळमानाने भाग करता येतात ते साॅलिड ऍप्रोचेस आणि व्हायाडक्ट.
व्हायाडक्ट मध्ये असतं फाऊंडेशन, सबस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर.
सुपरस्ट्रक्चर हे साधारणपणे दोन पियरमधल्या अंतरावर अवलंबून असतं. दोन पियर मध्ये अंतर कमी असेल तर तिथे शक्यतो +
प्रीकास्ट आय गर्डर किंवा कास्ट इन सिटू बाॅक्स गर्डर किंवा साॅलिड स्लॅब असतात. आय गर्डर हे जमीनीवर तयार करून नंतर क्रेनच्या सहाय्याने उचलून पियरवर ठेवले जातात.
पियर्स मधलं अंतर म्हणजे स्पॅन लेंग्थ जर जास्त असेल तर आय गर्डरचं वजन वाढतं आणि मग ते उचलून ठेवणं शक्य होत नाही.+
आमच्या वर्सोवा क्रिक ब्रिजमध्ये जमीनीवरचे जे स्पॅन आहेत त्यात जास्तीत जास्त स्पॅन लेंग्थ जवळपास ३८.५० मीटर आहे. यात गर्डरचं वजन १२५ टनापर्यंत आहे. आम्ही ३५० टनांच्या २ क्रेन वापरून या गर्डरचं लाॅंचिंग करत आहोत. +