csarang Profile picture
Civil Engineer by profession with vast experience of Infrastructure Projects. RSS swayamsevak since childhood. ABVP activist in College days.
Nov 13, 2022 4 tweets 1 min read
🔥मंडळी,
संपुर्ण महाराष्ट्रात३-४ मेडिकल आणि ६-७ ईंजिनियरींग कॉलेजेस होते.विज्ञान शाखेतुन १२वीची परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी होते.प्रत्येकाचं स्वप्न होतं डॉक्टर,इंजीनियर व्हावं पण मोजक्याच मुलामुलींना ही संधी मिळत होती.बाजूच्या कर्नाटकात खासगी कॉलेजेसचं पीक होतं + आणि ज्यांना शक्य होतं ते पालक आपल्या पाल्यांना तिकडे पाठवून डॉक्टर इंजीनियर झालेलं बघण्याचं स्वप्न पुर्ण करून घेत होते.
१९८३ मध्ये, फक्त सातवी पास असलेल्या महाराष्ट्राच्या दृष्ट्या मुख्यमंत्र्यांना आपली मुलं दुसरीकडे जाऊन शिकतात तर हे थांबवलं पाहिजे याची जाणीव झाली आणि +
Nov 12, 2022 8 tweets 2 min read
🔥मंडळी,
🔸ईसवी सन २०१६ः अख्ख्या उत्तर प्रदेशात तात्कालिन कॉंग्रेस अध्यक्ष, युवा नेते (तेंव्हा थोडेफार युवा होते) श्रीजी राहुलजी गांधीजी यांची छबी असलेले "२७ साल युपी बेहाल" घोषणेचे पोस्टर्स,बॅनर्स,होर्डिंग्ज झळकत होते.भिंती पण याच घोषणांनी रंगवलेल्या होत्या.+ 🔸ईसवी सन २०१७ उजाडलं, विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आणि ते पोस्टर्स,बॅनर्स,होर्डिंग्ज उतरवायला चालू झालं,रंगवलेल्या भिंतींवर चुना मारावा लागला कारण अखिलेशजी यादवजी आणि कॉंग्रेसचे श्रीजी (वर नाव लिहिलंय) हे "दो लडके" एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले. +
Oct 31, 2022 15 tweets 4 min read
🔥मंडळी,
🔸आज ३१ ऑक्टोबर, स्वतंत्र भारताचे पहीले गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐💐
#Statue_of_Unity
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच असा पुतळा बांधायचं गुजरात सरकार ने ठरवलं तेव्हा आजचे पंतप्रधान + मा. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते.
🔸रितसर निविदा प्रक्रिया करून PPP model ने L&T या कंपनीला काम दिलं.
३१ ऑक्टोबर २०१४ ला भारताचे नवनिर्वाचित पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झालं आणि रितसर कामाला सुरुवात झाली.हजारो लोक त्यावर अहोरात्र काम करत होते. +
Oct 31, 2022 4 tweets 1 min read
🔥मंडळी,
🔸कोणतंही स्ट्रक्चर पुर्ण बांधून झाल्यावर त्याची डिझाईन लोडच्या १.२५ किंवा १.५० पट जास्त लोड ठेवून टेस्ट केली जाते. स्टॅटिक किंवा डायनॅमिक लोडींग ठेवून अशा टेस्ट करतात. जर टेस्टमध्ये पास झालं तर त्यावर वाहतूक सोडली जाते.+ 🔸काल गुजरातच्या मोरबीमध्ये मच्छू नदीवरचा केबल स्टेड ब्रिज कोसळून जी दुर्घटना झाली त्याबद्दल वाचण्यात आलं कीं १४० वर्ष जुना हा ब्रिज बरेच दिवस बंद होता. ओरेवा नावाच्या कंपनीने स्वखर्चाने त्याची डागडूजी केली आणि तो ब्रिज चालू केला. +
Mar 30, 2022 13 tweets 3 min read
#नांव_एक_अस्मिता
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्राच्या वैभवात भर टाकणारे दोन प्रकल्प पूर्ण झाले.
मुंबई आणि पुणे यांना जोडणारा देशातला पहिला एक्सप्रेस वे आणि मुंबईच्या समुद्रात उभारलेला देशातला पहिला सागरी सेतु.
द्रुतगती महामार्ग पुर्ण झाला आणि + त्याचं मोठ्या थाटामाटात नामकरण करण्यात आलं 'यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग' (नावात श्री.लिहिलं आहे कीं नाही मला माहीत नाही). श्री. पु.ल.देशपांडे यांचं नाव त्या महामार्गाला द्या म्हणून तेव्हा आंदोलन झाल्याचं लक्षात आहे.+
Mar 29, 2022 42 tweets 6 min read
"फेमस की पॅाप्युलर"
२००९ साली मी नागपुरला होतो, मिहान प्रकल्पात एका ऊड्डाणपुलाचं काम चालु होतं तेथे प्रकल्प व्यवस्थापक म्हणुन काम पहात होतो. सौ.अंजली आणि मुलगा सिद्धार्थ तळेगांव दाभाडेलाच होते म्हणुन मी एकटाच रहात होतो.+ ३० मार्च २००९ ची रात्र, ११.३० वाजले असतील मी टीव्ही बंद करून नुकताच कॅाटवर पडलो होतो आणि अचानक फोन वाजला, माझा लहान भाऊ ऋषिकेशचा फोन होता, मी फोन ऊचलला आणि त्याने जोरात रडायला सुरूवात केली " दादा आपला पिन्या गेला रे ". क्षणभर मी सुन्न झालो, +
Mar 29, 2022 4 tweets 1 min read
मंडळी सुप्रभात,
आमच्या लहानपणी एक गोष्ट सांगितली जायची. एका गावात एक माता आणि तिचा पुत्र राहायचे. मुलगा अतिशय वांड होता. नेहमी सगळ्यांशी भांडणं, मारामाऱ्या करायचा, छोट्या मोठ्या चोऱ्या करायचा. त्याची माता त्याकडे कानाडोळा करायची. उलटपक्षी त्याच्या चोऱ्यामाऱ्या मुळे आपलं घर चालतं+ यात तिला समाधान वाटत असे. पुढे पुढे तर हे प्रकरण इतकं वाढलं की तो मुलगा अट्टल दरोडेखोर बनला.त्याने बरेच खून पण केले.तरीही माता काही बोलत नव्हती. पोलिसांचा ससेमिरा त्याच्या मागे लागला. शेवटी तो पकडला गेला. त्याच्यावर कोर्टात खटला भरण्यात आला.सुनावणी होऊन त्याला फाशीची शिक्षा झाली+
Feb 15, 2022 6 tweets 2 min read
#पाईलिंग_मशिनरी

आम्ही वरसावे खाडीवर जो ब्रीज बांधत आहोत त्याचे आम्ही दोन भाग केलेले आहेत. पहिला भाग हा जमिनीवरचा आणि दुसरा भाग हा पाण्यातला. जमीनीवरच्या १२ फाऊंडेशनच्या १५०० मिमी व्यासाच्या ८० पाईल आहेत तर पाण्यातल्या ४ फाऊंडेशनच्या १८०० मिमी व्यासाच्या ६० पाईल आहेत. + साधारणपणे एका पाईलची लांबी ३२ ते ३५ मीटर आहे.

१.आजकाल पाईलिंग करायला सर्वत्र वापरली जाते ती "हायड्रॉलिक पाईलिंग रीग(फोटो क्रं १). रणगाड्यासारखे चाकं असलेल्या एका ट्र्रक वर ती फिट केलेली असते. समोर जो लोखंडी शाफ्ट दिसतो त्याला पाईलच्या व्यासाचा ऑगर लावलेला असतो. +
Feb 14, 2022 13 tweets 3 min read
#पाण्यातलं_काँक्रिट

विषय तसा खोल आहे.
पाण्यामध्ये काँक्रिट कसं करतात हा तसा प्रत्येकाच्या कुतूहलाचा विषय आहे. लिहिलेले किती समजेल हे मी सांगू शकत नाही पण प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहिला तर ते जास्त चांगलं समजेल.
काँक्रिट म्हणजे काय असतं वाळू, खडी, सिमेंट आणि पाणी + यांचं प्रमाणबद्ध मिश्रण.
काँक्रिटची शक्ती म्हणजे काॅम्प्रेसिव्ह स्ट्रेंग्थ ही सिमेंटच्या प्रमाणावर अवलंबून असते ती वाढवायची असेल तर त्याप्रमाणात सिमेंट वाढवावं लागतं पण त्यालाही मर्यादा असतात म्हणून त्यात तत्सम पदार्थ मिसळावे लागतात. +
Feb 13, 2022 6 tweets 2 min read
#राहुलबजाज__एक_आठवण
नोकरी, व्यवसाय करताना त्या ठिकाणी तुमची जात, धर्म आणि राजकीय अभिनिवेश बाजुला ठेवावा लागतो. आजचं मोदी सरकारचं ब्रीद वाक्य "सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास" हे आचरणात आणावं लागतं.+ Image वर्ष भर एका छोट्या कंपनीत औरंगाबाद आणि गोवा ईथे पाइपलाइनचं काम करून १९८९ ला मी गॅनन डंकर्ली कंपनी मधे जॉईन झालो आणि माझा पहिला प्रोजेक्ट होता वाळूज औरंगाबाद इथल्या बजाज ऑटोचा कावासाकी प्लांट.+
Jan 28, 2022 15 tweets 4 min read
#Balanced_Cantilever

कोणत्याही ब्रिजचे ढोबळमानाने भाग करता येतात ते साॅलिड ऍप्रोचेस आणि व्हायाडक्ट.
व्हायाडक्ट ​मध्ये असतं फाऊंडेशन, सबस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर.

सुपरस्ट्रक्चर हे साधारणपणे दोन पियरमधल्या अंतरावर अवलंबून असतं. दोन पियर मध्ये अंतर कमी असेल तर तिथे शक्यतो + प्रीकास्ट आय गर्डर किंवा कास्ट इन सिटू बाॅक्स गर्डर किंवा साॅलिड स्लॅब असतात. आय गर्डर हे जमीनीवर तयार करून नंतर क्रेनच्या सहाय्याने उचलून पियरवर ठेवले जातात.

पियर्स मधलं अंतर म्हणजे स्पॅन लेंग्थ जर जास्त असेल तर आय गर्डरचं वजन वाढतं आणि मग ते उचलून ठेवणं शक्य होत नाही.+
Oct 31, 2021 10 tweets 3 min read
#Statue_Of_Unity
७५००० क्युबिक मीटर काँक्रीट, १८००० मेट्रिक टन स्टील, ५७०० मेट्रिक टन स्ट्रक्चरल स्टील, क्लॅडिंगसाठी २२५०० ब्राँझ शीट्स एवढं मटेरियल वापरून २४० मीटर उंच बेस स्ट्रक्चर असलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा जगातला सर्वात उंच पुतळा गुजरातमधील नर्मदा नदीच्या तीरावर उभारण्यात आलाय आणि देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी त्याचं लोकार्पण करीत आहेत.
यातील चीनच्या एका कंपनी कडून घेतलेले ब्राँझ शीट्स सोडले तर बाकी सर्व मटेरियल हे आपल्या भारत देशातच उत्पादन करून वापरण्यात आलंय.