भारतातील परंपरागत समाज संस्थेच्या विरुद्ध बंड करणारे पहिले बंडखोर, भारतीय स्त्री-शिक्षणाचे जनक, स्त्री-स्वातंत्र्याचे आणि हक्काचे उद्गाते, शेतकरी-कामकऱ्यांची चळवळ उभारणारे पहिले पुढारी म्हणून ज्योतिराव गोविंदराव फुले हे ख्यातीप्राप्त
आहेत. महात्मा फुले हे गौतम बुद्ध, संत कबीर, संत तुकाराम आणि लोकराजा शिवाजी यांची परंपरा जोपासणारे विवेकवादी होते. समाजसुधारणा, स्त्रीदास्य विमोचन, सर्वांना शिक्षणाचा हक्क याविषयी ते आग्रही होते. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, हे त्यांनी 'तृतीय रत्न' या नाटकातून दाखवून दिले आहे
शिक्षणानेच मनुष्य विवेकशील व संवेदनशील बनतो. शिक्षणाअभावी माणूस मानवी हक्क, प्रतिष्ठा, दर्जा ह्यांना पारखा होतो. समाजसुधारणेचा परीघ व्यापक होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, याची त्यांना जाणीव होती. अशिक्षितपणामुळे शेतकरी, कामकरी यांचे जीवन शोचनीय झाले आहे. अज्ञान, अंधश्रद्धा,
कुप्रथा यांमुळेच मानवी समुदाय दुःखाच्या छायेत लोटला आहे. 'शेतकऱ्याचा असूड' मधून त्यांनी शेतकऱ्यांच्या अवनतीचे समर्पक चित्र रेखाटले आहे.
शेतकरी समृद्ध होण्यासाठी कृषिक्रांतीचे विचार
मांडणारे जोतिराव फुले या देशातील एक प्रखर
समाजसुधारक होते. त्यांनी लिहिलेला 'शेतकऱ्यांचा असूड'
भारतीय शेतकऱ्यांची दयनीय अवस्था समाजापुढे आणणारा पहिलाच ग्रंथ आहे. तो आजही प्रस्तुत ठरावा, हे खरे म्हणजे शेतीपुढचे प्रश्न सोडविण्यातील आपल्या अपयशाचा परिपाक म्हणावा लागेल. सव्वाशे वर्षे उलटली तरीही शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. कधी अवकाळी, तर कधी दुष्काळी अशा अस्मानी संकटात
संघर्ष करणारा शेतकरी अनास्थेमुळे पुरता भुईसपाट झाला आहे. फुले यांनी 'शेतकऱ्याचा असूड' मधून शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांचे विदारक चित्र समाजापुढे आणले. तत्कालीन परकी राजवटीवर आणि प्रस्थापित व्यवस्थेवर ओरबाडे ओढले. जागतिकीकरणाच्या काळात औद्योगिक उत्पादन करणाऱ्या कारखानदाराला जसा
आपल्या वस्तूंचे भाव ठरविण्याचा अधिकार आहे, तसा तो शेतकऱ्याला आजही नाही. शेतकऱ्याला 'जैसे थे' ठेवण्यात येथील व्यवस्था कमालीची यशस्वी झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्था कृषिप्रधान समजली जाते, मात्र शेती अथवा शेतकरी केंद्रबिंदू मानून कधी नियोजन झाले नाही. कर्जाच्या खोल गर्तेत शेतकरी
अडकला आहे. निसर्गाचा असमतोल झाल्याने व त्यामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे हैराण होणाऱ्या, उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्यांजवळ काहीच पर्याय राहत नसल्याने त्यांना आत्महत्या कराव्या लागणे हे खरेच दुखद आहे. फुले यांनी शेती व शेतकऱ्यांच्या दुरवस्थेची कारणे व
ते सोडविण्याचे उपाय याबाबत चिकित्सा
केली आहे. अडाणी शेतकऱ्यांच्या दृष्टीने 'उच्चवर्णीय सांगतील तो धर्म व इंग्रज सांगतील ते कायदे' होते. कितीही अन्याय व जुलूम झाला तरी तो आपल्या नशिबाचा भाग आहे म्हणून शेतकरी सहन करतात. शेतसारा द्यायला पैसा नाहीत. नवीन मोट, नाडा घ्यायला पैसा नाही. उसाचे बाळगे मोडून हुंडीची ही अवस्था
झाली आहे. मका ही खुरपण्याविना वाया गेली आहे. भूस सरून बरेच दिवस झाले, सरबड गवत, कडब्याच्या गंजी संपत आल्या आहेत. जनावरांना पोटभर चारा मिळत नाही', असे
वर्णन जोतिरावांनी केले आहे.
शेतीचे आधुनिकीकरण करावे, वृक्षतोड बंद करावी, पावसावर अवलंबून न राहता नव्या उपकरणांचा वापर करावा, धरणे
व कालवे बांधावेत, दुष्काळात कर्जे द्यावीत. शेतीसाठी लागणारे आवश्यक पाणी देण्याची व्यवस्था सरकारने करावी. शेतीला पाणी देताना ते नळाद्वारे देण्यात यावे, असे उपाय ते सुचवितात. वन्यप्राण्यांमुळे व रानडुकरांमुळे नुकसान झाल्यास पोलिस अधिकारी किंवा अंमलदाराच्या पगारातून किंवा
सरकारी
खजिन्यातून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, असेही ते सुचवितात. महात्मा फुले यांनी ज्ञानाधारित शिक्षणासोबत कौशल्यपूर्ण मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज असल्या प्रतिपादित केले होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या शाळेत औद्योगिक शिक्षण सक्तीचे केले होते. महात्मा फुलेंचे शिक्षण, समाजसुधारणा व
शेतीविषयक विचार आजही प्रासंगिक आहेत आणि हे विचार आज अमलात आणले तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.
फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र पुरोगामी आहे का??
आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, शहरामध्ये किंवा राज्यामध्ये आपण रोजच जातीवर आधारीत किंवा जातीमुळे झालेला गोर-गरिबांवर अन्याय पहात असतो. ह्या सगळ्याला जबाबदार आहे तो फक्त आणी फक्त सवर्ण समाज जो वर्ण व्यवस्थेला मानणारा आहे.
या निमित्ताने होत असलेल्या वादातून राज्यात ब्राह्मण विरुद्ध बहुजन किंवा इतर अशी विभागणी पुन्हा केली जाऊ लागली आहे. ब्राह्मणविरोधक म्हणजे पुरोगामी असा विचार रुजतो आहे. फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांना हे पुरोगामित्व अपेक्षित होते का?या महापुरुषांची नावे घेणाऱ्या आजच्या
पुरोगाम्यांचा वर्तनव्यवहार, त्यांचे विचार-आचार खरोखरच पुरोगामी या संज्ञेस पात्र आहेत काय?
महाराष्ट्राला पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असा वैचारिक वाद नवा नाही. जे सनातनी विचारांचे आहेत, ते प्रतिगामी आणि जे प्रगत विचारांचे आहेत ते पुरोगामी अशी या वादाची किंवा संघर्षांची सरळ वैचारिक
डॉ बाबासाहेब आंबेडकर - सामाजिक क्रांती, परिवर्तनाची नांदी.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचे चक्र भारतात गतिमान केले. त्यानिमित्त तीन प्रमुख संज्ञांचा विचार करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे. 'समाज', 'क्रांती' आणि 'परिवर्तन'....
समाज ही संज्ञा लॅटिन भाषेतील 'सोशियस' म्हणजे
सहचर, सवंगडी यामधून घेतलेली आहे. समाज हा शब्द उच्चारला तरी त्याचा अर्थबोध होतो. स म्हणजे सर्व; संपूर्ण, मा म्हणजे मानव; माणूस, ज म्हणजे जमात; जाती आणि म्हणून 'समाज' म्हणजे सर्व मानव जमात होय. वेगळ्य़ा शब्दांत संपूर्ण मानव जातिसमूहाचे रूप 'समाज'. 'व्हॉइस ऑफ अमेरिका' या केंद्रावर
भाषण देताना डॉ. आंबेडकर म्हणाले होते, समाज म्हणजे परस्परपूरक अशा मानवाचा संघ होय. ते सर्व परस्परांच्या उपयोगी पडणे, हे कर्तव्य मानतात व त्याचप्रमाणो वागतात, अशा एकात्म लोकांचा संघ म्हणजे समाज. क्रांती म्हणजे आमूलाग्र बदल, परिवर्तन, चक्राकार फिरणे होय. क्रांतिकारक बदल म्हणजेच
१४ एप्रिल या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. देशातील कोट्यवधी दीनदुबळ्यांसाठी तसेच देशासाठी हा दिवस फार आनंददायी आहे. या दिवशी दिवसभर मोठ्या उत्साहाने खेड्यापाड्यांपासून ते दिल्लीपर्यंत, अगदी
जगभर म्हणलं तरी चालेल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. डॉ. आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी म्हणजे एम.ए. पदवीसाठी २५ जुलै १९१३ रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश केला. प्रो. सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनाखाली जून १९१५ मध्ये एम.ए.ची पदवी संपादन केली.
ऑक्टोबर १९१६ मध्ये इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे एम.एस.सी. इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश केला. प्रो. कॅनन आणि सेडनी वेब यांच्या मार्गदर्शनाखाली १९२० मध्ये पदवी संपादन केली. पुढे १९२२-२३ मध्ये युनिव्हर्सिटी इन बॉन जर्मनीमध्ये डी.एस.सी. पदवीचा अभ्यास
मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसुन तो गुणाने श्रेष्ठ ठरतो. ईश्वर एक असुन तो सर्वव्यापी निर्विकार, निर्गुण व सत्यरूप आहे. सर्व मनुष्य व मनुष्येत्तर प्राणी त्याची लेकरे आहेत. हा वास्तव विचार सन १८व्या शतकात निर्भीडपणे मांडून सामाजिक,
शैक्षणिक, सांस्कृतिक गुलामगिरीतुन समस्त मानवाला बाहेर काढण्याचं काम करणारे आणि सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. महात्मा ज्योतीराव फुले यांचा जन्म शेतकरी, भाजीपाला व फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव आणि चिमणाबाई यांच्या पोटी ता.
११ एप्रिल १८२७ रोजी झाला. त्या दिवशी जोतिबाची यात्रा होती म्हणून गोविंदराव आणि चिमणाबाई यांनी तेजस्वी आणि ओजस्वी असलेल्या पुत्राचे नाव जोतिबा असे ठेवले. काही लोकांच्या जीवनात जन्मापासूनच अडचणी आणि संकटे दार ठोठावतच असतात. जोतिबांच्या बाबतीतही असेच काही घडले होते. त्यांच्या आई
स्त्रियांची गुलामगिरी नष्ट करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
पिता रक्षति कौमार्य, पति रक्षति योवने, पुत्र रक्षति वार्धक्य, न स्त्री स्वातंत्र्यम अहरती. या मनू वचनाला स्त्रीने कधीच मागे टाकले आहे. स्त्रियांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा कोणीच विचार करत नव्हते. सर्वप्रथम राष्ट्रपिता
महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विचार केला. त्यांना शिक्षण देऊन सक्षम बनवण्यास हातभार लावला. विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना गुरु मानतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हाच धागा पुढे नेला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा
स्त्रियांच्या संघटनेवर खूप विश्वास होता. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, स्त्रियांच्या संघटनेवर फार मोठा विश्वास ठेवणारा मी माणूस आहे. त्यांना जर विश्वासात घेतले तर समाजाची सुधारणा करण्यासाठी त्या काय काय करू शकतात हे मी जाणतो. सामाजिक दोष नाहीसे करण्याची त्यांनी फार मोठी सेवा
स्त्रीयांची गुलामगिरी नष्ट करणारे महात्मा ज्योतिबा फुले.
महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ समाज सुधारकच नव्हते तर ते खऱ्या अर्थाने नवसमाज निर्मितीचे सांस्कृतिक पुरुष होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थावादी समाजव्यवस्था नाकारलीच नाही तर नवसमाज निर्मितीसाठी
आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी नवीन समतामूलक समाजव्यवस्था निर्माण करण्याचे प्रारूप भारतीय समाज व्यवस्थेसमोर मांडले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी या परिवर्तनवादी लढाईमध्ये स्त्रियांना केवळ सामावून घेतले नाही
तर त्यांना या लढ्याचे शिलेदार बनविले. त्यामुळे आज भारताच्या सर्व क्षेत्रात महीला आघाडीवर दिसत आहेत. यामागे महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्त्री विषयक कार्य, तत्वज्ञान, प्रेरणा आहे. सदर लेखात ज्योतिबा फुले यांनी स्रियांसंबंधी केलेल्या कार्याचा व भूमिकेचा थोडक्यात आढावा घेण्याचा मानस