स्त्रीयांची गुलामगिरी नष्ट करणारे महात्मा ज्योतिबा फुले.
महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ समाज सुधारकच नव्हते तर ते खऱ्या अर्थाने नवसमाज निर्मितीचे सांस्कृतिक पुरुष होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थावादी समाजव्यवस्था नाकारलीच नाही तर नवसमाज निर्मितीसाठी
आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी नवीन समतामूलक समाजव्यवस्था निर्माण करण्याचे प्रारूप भारतीय समाज व्यवस्थेसमोर मांडले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी या परिवर्तनवादी लढाईमध्ये स्त्रियांना केवळ सामावून घेतले नाही
तर त्यांना या लढ्याचे शिलेदार बनविले. त्यामुळे आज भारताच्या सर्व क्षेत्रात महीला आघाडीवर दिसत आहेत. यामागे महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्त्री विषयक कार्य, तत्वज्ञान, प्रेरणा आहे. सदर लेखात ज्योतिबा फुले यांनी स्रियांसंबंधी केलेल्या कार्याचा व भूमिकेचा थोडक्यात आढावा घेण्याचा मानस
आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म १९२७ मध्ये पुण्यामध्ये झाला. इ.स.१८१८ मध्ये पुण्यातील पेशवाईचा नुकताच अंत झाला. इंग्रजांचे राज्य हे कायद्याचे राज्य आहे ही धारणा महात्मा ज्योतिबा फुले यांची होती. त्यामुळे कायद्याच्या आधारावर भारतीय समाज व्यवस्थेतील उपेक्षित समाजाला समानतेची
संधी किंवा संधीची समानता प्राप्त करून देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी इंग्रजी शिक्षणाची गरज ओळखुन त्यांनी शाळा काढल्यात. प्रस्थापित समाजव्यवस्थेने स्त्रियांना गुलाम करण्यासाठी आपल्या सोयीचे साहित्य निर्माण केले व त्याला धार्मिक दर्जा दिला होता. या धार्मिक ग्रंथांच्या
माध्यमातून श्रमिक वर्ग गुलाम बनविला होता. ही मानसिक गुलामी नष्ट करायची असेल तर प्रस्थापित धर्म ग्रंथांची विवेकशीलतेने चिकित्सा केली पाहिजे हे ओळखुन त्यांनी प्रस्थापित ग्रंथांचा चिकित्सक आढावा घेतला. यात सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड या
ग्रंथांचा विशेष उल्लेख करावा लागेल. या ग्रंथांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांच्या शोषणासाठी प्रस्थापित समाजव्यवस्था कशी कार्य करते याचे विवेचन केले आहे. उदाहरणार्थ 'शेतकऱ्यांचा आसूड' या ग्रंथात शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या घरची स्थिती ही देवधर्माच्या
भीतीपोटी कशी जाळली जाते किंवा तिचे कसे शोषण होते. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात त्यांनी मनुष्य केंद्रीभूत असणारा विश्व मानवाच्या कल्याणार्थ व्यापक विचार व्यक्त केला. गुलामगिरी या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी व अस्पृश्य वर्गांच्या गुलामगिरी साठी प्रस्थापित धर्मग्रंथ हे
किती जबाबदार आहेत याचे विवेचन केले आहे.
● महात्मा ज्योतिबा फुले आणि स्त्रीशिक्षण
महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात मुलींची शाळा सुरू करण्यापूर्वी ख्रिश्चन मिशनरींनी मुलींना शिकवण्यासाठी काही प्रयत्न केले होते पण ते अपयशी झाले. मिसेस विल्सन यांनी इ.स.१८२९ साली मुंबईत
मुलींसाठी शाळा काढल्याची नोंद आहे. त्यांनी १९३० मध्ये पुण्यात शनिवार वाड्यात महिलांसाठी शाळा काढल्याचा पुरावा मिळतो. या शाळेत फक्त आठ मुली अत्यंत घाबरत, लपून छपून येत असत. शाळेतून बाहेर पडताच गुप्त वाटेने निघून जात. ही शाळा मिसेस विल्सन यांनी १८२९ ते १८३२ पर्यंत कशीबशी चालली. इ स
१८४४ मध्ये चर्च ऑफ स्कॉटलंड मिशनरींनी मंगळवार पेठेत एक मुलींची शाळा काढली तीही १८४७ मध्ये बंद पडली. स्त्रियांसाठी शाळा काढण्याचा प्रयत्न असफल झाला. त्यामुळे ख्रिश्चन मिशनरींनी स्त्री शिक्षणाचा प्रयत्न सोडून दिला. जेथे सत्ताधीश इंग्रजांना महिलांना शिक्षण देणे शक्य झाले नाही.
यावरून त्या काळातील सनातनी वर्गाचा समाजावर किती प्रभाव व भीती होती हे स्पष्ट होते. मात्र महात्मा ज्योतिबा फुले यांनी या सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेत भिडे वाड्यात
मुलींची पहिली शाळा सुरू केली. यासाठी त्यांनी शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना स्वतः शिक्षित केले व त्यांच्या माध्यमातून स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली केली. या शाळेत कशाबशा सहा मुली प्रवेशीत झाल्या होत्या. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनेक शाळा सुरू केल्यात
त्यापैकी काही बंद पडल्यात. त्यांनी आपल्या जीवनात एकूण १६ शाळा पुण्यात सुरू केल्या होत्या. महत्त्वाचा मुद्दा महात्मा ज्योतिबा फुले यांनी किती शाळा सुरू केल्यात? किती वर्ष कार्यरत होत्या? हे फार महत्वाचे नाही. मुख्य मुद्दा हा आहे की यामागे महात्मा ज्योतिराव फुले यांची काय भूमिका
होती. गेल्या अनेक शतकापासून भारतातील ब्राह्मणी व्यवस्थेने स्त्रियांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेऊन स्त्रियांच्या प्रगतीला खंडित केले होते. स्त्री ही अपवित्र, कुलटा समजल्या जात होती. स्त्री ही चूल आणि मूल याच चौकटीत बंदिस्त केली होती. तीला कोणतेही शिक्षण घेण्यास मज्जाव केला
होता. भारतात अनेक सत्तांतरे झालीत तरी स्त्रियांच्या स्थितीत फारसा बदल झाला नव्हता. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी काही प्रमाणात प्रयत्न केला मात्र त्यांनाही फारसे यश आले नाही. इंग्रजांची भारतावर एक हाती सत्ता असतानाही त्यांना स्त्रियांना शिक्षण देणे शक्य झाले नाही कारण भारतीय समाजव्यवस्थेत
धर्माला अनन्य महत्त्व आहे. धर्म व्यवस्थेने स्त्रियांना शिक्षणास बंदी केल्यामुळे स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रश्न अत्यंत कठीण झाला होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी शतकानुशतके स्त्रियांसंबंधी असलेली धार्मिक व सामाजिक बंधने तोडून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामागे एक महत्वाचे
सूत्र होते ते म्हणजे कोणतीही संस्कृती टिकवायची असेल तर ती स्त्रीयांच्या माध्यमातून! स्त्रियांना ही व्यवस्थेला मान्य करण्यास बाध्य केले जाते. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणी व्यवस्थेला नकार देताना स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर घेऊन त्यासाठी शाळा सुरू केली आणि
स्त्रियांमध्ये व समाजातील धुरिणांमध्ये स्त्री शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले.
महात्मा फुले यांच्या काळात भारतात सती प्रथा, बालविवाह पद्धती, केशवपन पद्धती या क्रुर प्रथा / परंपरा रूढ होत्या. महात्मा ज्योतिबा फुले यांनी या प्रथेविरुद्ध बंड पुकारले. महाराष्ट्रामध्ये
महाराष्ट्रामध्ये केशवापण पद्धती मोठ्या प्रमाणात प्रचलित होती. एखाद्या स्त्रीचा नवरा मृत्यू पावल्यास तीला तिचे केस कापून तिच्या अंगावर जाडेभरडे कपडे दिले जात होते. तिला सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यास मज्जाव केला जात असे. विधवा स्त्री म्हणजे अपशकुन समजले जात असे. त्यामुळे ती
जिवंत असूनही घरातील कोणत्याच उत्सवात ती सहभागी होऊ शकत नसे. असे एकाकी निरस जीवन तिला जगावे लागत असे. महात्मा फुले यांनी या परंपरे विरुद्ध न्हावी समाजाचा संप घडवून आणला. २० मार्च ते २३ मार्च १८९० रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी डोंगरी येथे ५०० न्हावीकांची सभा घेऊन न्हावी यापुढे
केशवपन करणार नाही, असा ठराव पारित करून घेतला. अशा प्रकारे केशवपण पद्धती बंद करण्याचा प्रयत्न केला.
देवदासी प्रथा ही अत्यंत प्राचीन क्रूर प्रथा होय. या प्रथेप्रमाणे समाजातील काही स्त्रियांचे लग्न देवा सोबत लावून दिले जात असे. देवा सोबत लग्न लावून दिल्यानंतर त्या स्त्रीला आजन्म
आजूबाजूला राहून देवाची/ देवळाची स्वच्छता ठेवत असत. त्यांना जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी देवळाशी संबंधित असणारे धनिक वर्ग पुरवीत असत. यातूनच हा धनी वर्ग देवदासींचे शारीरिक व मानसिक शोषण करीत असत. महात्मा फुले मुंबईला माधवराव रोकडे यांच्याकडे गेले असता त्यांना मुंबईत येता एका
देवदासीची वरात दिसली. या वरातीत एका स्त्रीला सजून-धजून यल्लमा देवीचा उदो उदो करत तिला देवाशी लग्न लावण्यासाठी नेले जात होते. मंदिरात किंवा धार्मिक स्थळी राहून देवाची सेवा करावी लागत असे. या प्रथेप्रमाणे स्त्री ही देवदास स्त्री देवाची दासी असल्यामुळे तिला वैयक्तिक संपत्ती किंवा
कुटुंब निर्माण करता येत नाही असा समज होता. देवळाच्या हा प्रकार बघून महात्मा ज्योतिबा फुले अत्यंत दुःखी झाले व त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला जाऊन ही मिरवणुक रोखण्यासाठी तक्रार केली. मात्र गिरगावच्या पोलीस अधिकाऱ्याने महात्मा फुले यांचं ऐकले नाही त्यामुळे ते मुंबई पोलीस उच्च
अधिकारी साहेबांना भेटायला गेले. त्यांना ही प्रथा हे लग्न रोखण्यास विनंती केली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विनंतीवरून देवदासीची ही मिरवणूक व हे लग्न रोखले गेले. त्यामुळे मुंबई प्रांतात मोठी खळबळ निर्माण झाली. इंग्रज आमच्या धर्मात हस्तक्षेप करीत आहेत असा आरोप तत्कालीन रूढी-
परंपरा वाल्यांनी केला मात्र महात्मा ज्योतिबा फुले त्यांना बदलले नाहीत.
महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ बोलघेवडे समाजसुधारक नव्हते. तर त्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी प्रस्थापित व्यवस्था नाकारत नवी समताधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण केली. शिक्षणाशिवाय सामाजिक परिवर्तन होऊच शकत
नाही हे ओळखुन त्यांनी स्त्री शिक्षणाची दारे खुली केली. त्यासाठी त्यांना आपल्या पत्नीला शिक्षिका बनवावे लागले. समाज, आप्त नातेवाईक यांचा राग, द्वेश सहन करावा लागला. एवढेच नाही तर त्यांना आपल्या वडिलांचे राहते घर सोडून बाहेर पडावे लागले. त्यांच्या या स्त्री शिक्षणामुळेच फातिमा शेख,
मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे सारख्या कर्तबगार स्रिया पुढे आल्यात. महात्मा फुले यांनी आपल्या सहकाऱ्यांमध्येही स्रियांकडे आदर व सन्मानाने बघण्याची शिस्त लावली होती. ताराबाई शिंदे यांच्या 'स्त्री पुरुष तुलना' या पुस्तकावर त्यांच्या चळवळीतील एका सहकार्याने वाईट प्रतिक्रिया लिहिली होती
तेव्हा ज्योतीबांनी त्यांना जाहीरपणे सडेतोड उत्तर देऊन ताराबाई शिंदे यांची बाजू कशी योग्य आहे हे सांगितले. जोतिबांनी स्त्रियांच्या गुलामीची भलावण करणाऱ्या धर्म ग्रंथांचाही समाचार घेत आपले साहित्य निर्माण केले. ज्योतीबा बालहत्या प्रतिबंध गृह निर्माण करून थांबले नाही तर त्यांनी अशाच
नडलेल्या स्त्रीचे मुल दत्तक घेऊन त्याला आपले नाव दिले. पुढे तोच मुलगा यशवंत जोतिबांचा वारसदार झाला. अशा प्रकारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या सन्मानासाठी व त्यांच्या अस्तित्वासाठी सातत्याने लढा दिला. त्यामुळेच महात्मा ज्योतिबा फुले यांना स्त्री
उद्धाराचे जनक म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
संदर्भ ग्रंथ :
• महात्मा फुले गौरव ग्रंथ, खंड पहिला, सं.हरी नरके व य. दि. फळकें.
• महात्मा फुलेंची स्त्रीमुक्ती चळवळ, ले. प्रा. कुसुमेंद्र सोनटक्के
• सत्यशोधकी स्त्रीवाद, ले. प्रा. नूतन माळवी
फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र पुरोगामी आहे का??
आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, शहरामध्ये किंवा राज्यामध्ये आपण रोजच जातीवर आधारीत किंवा जातीमुळे झालेला गोर-गरिबांवर अन्याय पहात असतो. ह्या सगळ्याला जबाबदार आहे तो फक्त आणी फक्त सवर्ण समाज जो वर्ण व्यवस्थेला मानणारा आहे.
या निमित्ताने होत असलेल्या वादातून राज्यात ब्राह्मण विरुद्ध बहुजन किंवा इतर अशी विभागणी पुन्हा केली जाऊ लागली आहे. ब्राह्मणविरोधक म्हणजे पुरोगामी असा विचार रुजतो आहे. फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांना हे पुरोगामित्व अपेक्षित होते का?या महापुरुषांची नावे घेणाऱ्या आजच्या
पुरोगाम्यांचा वर्तनव्यवहार, त्यांचे विचार-आचार खरोखरच पुरोगामी या संज्ञेस पात्र आहेत काय?
महाराष्ट्राला पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असा वैचारिक वाद नवा नाही. जे सनातनी विचारांचे आहेत, ते प्रतिगामी आणि जे प्रगत विचारांचे आहेत ते पुरोगामी अशी या वादाची किंवा संघर्षांची सरळ वैचारिक
डॉ बाबासाहेब आंबेडकर - सामाजिक क्रांती, परिवर्तनाची नांदी.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचे चक्र भारतात गतिमान केले. त्यानिमित्त तीन प्रमुख संज्ञांचा विचार करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे. 'समाज', 'क्रांती' आणि 'परिवर्तन'....
समाज ही संज्ञा लॅटिन भाषेतील 'सोशियस' म्हणजे
सहचर, सवंगडी यामधून घेतलेली आहे. समाज हा शब्द उच्चारला तरी त्याचा अर्थबोध होतो. स म्हणजे सर्व; संपूर्ण, मा म्हणजे मानव; माणूस, ज म्हणजे जमात; जाती आणि म्हणून 'समाज' म्हणजे सर्व मानव जमात होय. वेगळ्य़ा शब्दांत संपूर्ण मानव जातिसमूहाचे रूप 'समाज'. 'व्हॉइस ऑफ अमेरिका' या केंद्रावर
भाषण देताना डॉ. आंबेडकर म्हणाले होते, समाज म्हणजे परस्परपूरक अशा मानवाचा संघ होय. ते सर्व परस्परांच्या उपयोगी पडणे, हे कर्तव्य मानतात व त्याचप्रमाणो वागतात, अशा एकात्म लोकांचा संघ म्हणजे समाज. क्रांती म्हणजे आमूलाग्र बदल, परिवर्तन, चक्राकार फिरणे होय. क्रांतिकारक बदल म्हणजेच
१४ एप्रिल या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. देशातील कोट्यवधी दीनदुबळ्यांसाठी तसेच देशासाठी हा दिवस फार आनंददायी आहे. या दिवशी दिवसभर मोठ्या उत्साहाने खेड्यापाड्यांपासून ते दिल्लीपर्यंत, अगदी
जगभर म्हणलं तरी चालेल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. डॉ. आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी म्हणजे एम.ए. पदवीसाठी २५ जुलै १९१३ रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश केला. प्रो. सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनाखाली जून १९१५ मध्ये एम.ए.ची पदवी संपादन केली.
ऑक्टोबर १९१६ मध्ये इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे एम.एस.सी. इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश केला. प्रो. कॅनन आणि सेडनी वेब यांच्या मार्गदर्शनाखाली १९२० मध्ये पदवी संपादन केली. पुढे १९२२-२३ मध्ये युनिव्हर्सिटी इन बॉन जर्मनीमध्ये डी.एस.सी. पदवीचा अभ्यास
मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसुन तो गुणाने श्रेष्ठ ठरतो. ईश्वर एक असुन तो सर्वव्यापी निर्विकार, निर्गुण व सत्यरूप आहे. सर्व मनुष्य व मनुष्येत्तर प्राणी त्याची लेकरे आहेत. हा वास्तव विचार सन १८व्या शतकात निर्भीडपणे मांडून सामाजिक,
शैक्षणिक, सांस्कृतिक गुलामगिरीतुन समस्त मानवाला बाहेर काढण्याचं काम करणारे आणि सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. महात्मा ज्योतीराव फुले यांचा जन्म शेतकरी, भाजीपाला व फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव आणि चिमणाबाई यांच्या पोटी ता.
११ एप्रिल १८२७ रोजी झाला. त्या दिवशी जोतिबाची यात्रा होती म्हणून गोविंदराव आणि चिमणाबाई यांनी तेजस्वी आणि ओजस्वी असलेल्या पुत्राचे नाव जोतिबा असे ठेवले. काही लोकांच्या जीवनात जन्मापासूनच अडचणी आणि संकटे दार ठोठावतच असतात. जोतिबांच्या बाबतीतही असेच काही घडले होते. त्यांच्या आई
स्त्रियांची गुलामगिरी नष्ट करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
पिता रक्षति कौमार्य, पति रक्षति योवने, पुत्र रक्षति वार्धक्य, न स्त्री स्वातंत्र्यम अहरती. या मनू वचनाला स्त्रीने कधीच मागे टाकले आहे. स्त्रियांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा कोणीच विचार करत नव्हते. सर्वप्रथम राष्ट्रपिता
महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विचार केला. त्यांना शिक्षण देऊन सक्षम बनवण्यास हातभार लावला. विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना गुरु मानतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हाच धागा पुढे नेला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा
स्त्रियांच्या संघटनेवर खूप विश्वास होता. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, स्त्रियांच्या संघटनेवर फार मोठा विश्वास ठेवणारा मी माणूस आहे. त्यांना जर विश्वासात घेतले तर समाजाची सुधारणा करण्यासाठी त्या काय काय करू शकतात हे मी जाणतो. सामाजिक दोष नाहीसे करण्याची त्यांनी फार मोठी सेवा
भारतातील परंपरागत समाज संस्थेच्या विरुद्ध बंड करणारे पहिले बंडखोर, भारतीय स्त्री-शिक्षणाचे जनक, स्त्री-स्वातंत्र्याचे आणि हक्काचे उद्गाते, शेतकरी-कामकऱ्यांची चळवळ उभारणारे पहिले पुढारी म्हणून ज्योतिराव गोविंदराव फुले हे ख्यातीप्राप्त
आहेत. महात्मा फुले हे गौतम बुद्ध, संत कबीर, संत तुकाराम आणि लोकराजा शिवाजी यांची परंपरा जोपासणारे विवेकवादी होते. समाजसुधारणा, स्त्रीदास्य विमोचन, सर्वांना शिक्षणाचा हक्क याविषयी ते आग्रही होते. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, हे त्यांनी 'तृतीय रत्न' या नाटकातून दाखवून दिले आहे
शिक्षणानेच मनुष्य विवेकशील व संवेदनशील बनतो. शिक्षणाअभावी माणूस मानवी हक्क, प्रतिष्ठा, दर्जा ह्यांना पारखा होतो. समाजसुधारणेचा परीघ व्यापक होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, याची त्यांना जाणीव होती. अशिक्षितपणामुळे शेतकरी, कामकरी यांचे जीवन शोचनीय झाले आहे. अज्ञान, अंधश्रद्धा,