स्त्रियांची गुलामगिरी नष्ट करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
पिता रक्षति कौमार्य, पति रक्षति योवने, पुत्र रक्षति वार्धक्य, न स्त्री स्वातंत्र्यम अहरती. या मनू वचनाला स्त्रीने कधीच मागे टाकले आहे. स्त्रियांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा कोणीच विचार करत नव्हते. सर्वप्रथम राष्ट्रपिता
महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विचार केला. त्यांना शिक्षण देऊन सक्षम बनवण्यास हातभार लावला. विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना गुरु मानतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हाच धागा पुढे नेला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा
स्त्रियांच्या संघटनेवर खूप विश्वास होता. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, स्त्रियांच्या संघटनेवर फार मोठा विश्वास ठेवणारा मी माणूस आहे. त्यांना जर विश्वासात घेतले तर समाजाची सुधारणा करण्यासाठी त्या काय काय करू शकतात हे मी जाणतो. सामाजिक दोष नाहीसे करण्याची त्यांनी फार मोठी सेवा
केलेली आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सिद्ध करून देईन. एवढा प्रचंड विश्वास स्त्रियांच्या कर्तृत्वावर त्यांना होता. म्हणूनच त्यांनी संविधान आणि हिंदू कोड बिल याद्वारे स्त्रियांचे सशक्तीकरण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्त्रियांबद्दल किती आदर होता त्यांच्याप्रती सन्मान
होता. त्यांनी संविधान सभेच्या अखेरच्या भाषणात पुढील वाक्य म्हटले होते. "No man can be greatful at the cost of his honour, no woman can be greatful at the cost of her chastity and no nation can be greatful at the cost of its liberty". यावरून आपल्या लक्षात येईल की, राष्ट्राची
राष्ट्राची प्रगती स्त्रियांच्या प्रगतीवर अवलंबून असते. स्त्रियांबद्दल आत्यंतिक आदर त्यांच्या मनात होता. एवढेच नाही तर आपल्या पत्नी रमाबाई बद्दल त्यांना अत्यंत प्रेम व आदर होता. त्यांनी आपला ग्रंथ, पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया हा ग्रंथ १९४० साली प्रकाशित झाला होता. आपला हा
ग्रंथ त्यांनी रमाबाईंना समर्पित केला. आपल्या पत्नी बद्दल एवढी कृतज्ञता कोणी दाखवत असेल का? जेवढी बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवली. आपल्या अनुयायांना त्यांनी ताकीद केली होती की, कोणत्याही सभेला येताना, प्रत्येकाने आपल्या पत्नीला सोबत घेऊन यावे. म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांचे अनुयायी
आपल्या पत्नीला सोबत घेऊन सभेला जात असत. एकदा त्यांच्या सभेला पन्नास हजार पुरुष होते. तर स्त्रियांची संख्या २५ हजार होती. स्त्रिया पुरुषांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देतात असा विश्वास बाबासाहेबांनी स्त्रियांवर दाखवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी काम करण्याअगोदर
स्त्रियांची स्थिती धर्मशास्त्र आणि मनुस्मृतीने कमी दर्जाची लेखली होती. ब्राम्हणी धर्माने तर स्त्रियांना दुय्यम नाहीतर अगदी खालचा दर्जा दिला आहे. शूद्र व स्त्रिया एकसारख्याच आहेत. स्त्रियांना अवर्ण ठरवण्यात आले आहे. ब्राम्हणी धर्मातील वेदाने खरा भेद केला आहे. अथर्ववेद, ऋग्वेद या
वेदात पुत्रप्राप्तीसाठी वेगवेगळे विधी सांगितले आहेत. सर्व विधी पुत्रप्राप्तीसाठी आहेत. 'अष्टपुत्र सौभाग्यवती भव' हा आशीर्वाद म्हणजे तुला दहा दहा पुत्र व्हावेत. पण एकही मुलगी व्हावी असा आशीर्वाद दिलेला नाही, यज्ञवाल्यकल्य स्मृतिमध्ये म्हटले आहे. स्त्रिया पुत्रप्राप्तीसाठी उपभोग्य
आहे. कन्येला पुत्र झाला नाही तर तिच्या घरी भोजन करू नये, असे निर्णयसिंधु सांगते. मुलगी ही कष्टकारक असते तर मुलगा हा सर्वोच्च स्वर्गातील प्रकाश होय. (ऐतरेयब्राम्हण) वरील उदाहरण यासाठी दिले आहे. ब्राम्हणी धर्मामध्ये स्त्रियांचा दर्जा दुय्यम स्वरूपाचा आहे. स्त्रिया गुलामीत जीवन जगत
आहेत. स्त्रियांनी गुलामगिरी झुगारून द्यावी, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना पुढील उपदेश केला होता. नागपूर येथील २० जुलै १९४२ च्या सभेत बाबासाहेब स्त्रियांना सांगतात की, स्त्रियांनी जबाबदारीने वागावे. आपल्या मुलींना सर्व सुविधा द्याव्यात. मुलामुलींना खूप शिकवा त्यांना
महत्वाकांक्षी बनवा, योग्य वयात त्यांची लग्न करा. लग्नाची घाई करू नका. लग्न एक जोखीम आहे. लग्नानंतर मुलींचे आपल्या पतीबरोबर मैत्रिणी प्रमाणे वागावे. लग्न करणार्यांनी जास्त मुलं जन्माला घालू नये. कुटुंब नियोजनाविषयी बाबासाहेब विचार मांडतात.त्यांच्या विचाराचे तंतोतंत पालन झाले असते
तर लोकसंख्येचा विस्फोट झाला नसता. लग्न झालेल्या स्त्रियांनी आपल्या पतीच्या कार्यात मदत करावी. सहकार्य करावे. परंतु पती जर गुलामासारखी वागणूक देत असेल तर, पतीची गुलामगिरी झुगारून द्यावी, सन्मानाने जीवन जगावे. आपल्याला कमीपणा येईल असा पोशाख करू नका वेळा, तोडे, फुल्या, मासोळ्या,
जोडवी हे चांदीचे अवजड व बोजड दागिने घालू नका. नाकाला भोक पाडून नाकात भली मोठी नथ अडकविणे हे बरे दिसत नाही. एवढ्या छान व सौम्य शब्दात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांशी संवाद साधतात. वेश्या व्यवसाय करणार्या स्त्रियांना बाबासाहेब उपदेश करतात. हा मानवजातीला बट्टा लावणारा व्यवसाय करु
नये. समाजाला बट्टा लावणार्या धंद्यापासून मुक्त व्हा त्यांना नाईलाजाने करावा लागणार्या या व्यवसायाचा धिक्कार करून बाबासाहेब त्यांना स्वाभिमानाने जगण्याचे आवाहन करतात. बाबासाहेबांचा हा उपदेश सर्व स्त्रिया ऐकत. त्यादृष्टीने स्वतःमध्ये बदल करून घेतात. त्या काळामध्ये मनुस्मृतीने
स्त्रियांना पशु पेक्षा हिन दर्जाची वागणूक दिली. महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात,
मांग महार निंदा ठावी नाही व्यथा!!
जाळा मनू ग्रंथा अग्नीमध्ये!!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना गुरु मानत. २५ डिसेंबर १९२७ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले.१९२७ साल महात्मा फुले
यांचे जन्मशताब्दी वर्ष होय. मनुस्मृतीचे दहन ही एक क्रांतिकारक घटना आहे. मनुस्मृतीच्या दहना बरोबर स्त्रियांचे दुय्यमत्व जळाले. मनुस्मृती जाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केले. संविधानात वेगवेगळे कायदे करून खर्या अर्थाने बाबासाहेबांनी स्त्रियांना सशक्त केले. स्त्री
कोणत्याही धर्माची असो बाबासाहेब आंबेडकर तिच्याकडे मानवी दृष्टिकोनातून पाहतात. ज्या ठिकाणी स्त्रियांना कमी लेखले गेले. त्या त्या ठिकाणी त्यांनी स्त्रियांना कायदे करून प्रतिष्ठा मिळवून दिली. आपल्या भाषणातून स्त्रियांना संघर्ष करण्यास प्रेरित करतात.
संविधानाद्वारे डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी कलम-१२ पासून कलम-१९ पर्यंत स्त्रियांना पुरुषाबरोबर सर्व अधिकार बहाल केले. कलम-१३ मनुस्मृतीला अवैध ठरविले. ज्या मनुस्मृतीने स्त्रियांना जनावरांप्रमाणे वागणूक दिली होती. त्या चालीरीती परंपरा अवैध ठरविण्यात आल्या. कलम-१३ नुसार आज जर स्त्रियांना एखाद्या मंदिरात प्रवेश
नाकारला जात असेल तर स्त्रियांनी त्याविरुद्ध बंड केला पाहिजे. विषमता नाकारणारे हे कलम आहे. ज्या ज्या ठिकाणी पुरुषांना प्रवेश आहे. त्या सर्व ठिकाणी स्त्रियांनाही प्रवेश असलाच पाहिजे. हा समानतेचा लढा आहे. याची स्त्रियांना जाणीव करून दिली. कलम-१४ सर्व स्त्री-पुरुष समान आहेत. लिंगभेद
नाकारण्यात आला. खूप पूर्वीपासून जे अधिकार पुरुषांनाच होते, स्त्रियांना नव्हते हे सर्व अधिकार देण्यात आले. कलम-१४ अन्वये स्त्री-पुरुष समान आहेत. एक प्रकारे पुरुषाच्या पुरुषसत्ताकतेला लगाम बसवण्याचे कार्य त्यांनी केले. कलम-१५ भेदभाव नष्ट करण्यात आला. जात, वंश, धर्म, स्त्री-पुरुष
विषमता निर्माण करणारे सर्व भेदभाव नष्ट करण्यात आले. कायद्यासमोर सर्व समान आहेत. कलम-१६ नोकरीत आरक्षण देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना सक्षम बनवले. आज वेगवेगळ्या खात्यात खाजगीकरण सुरू आहे. खाजगीकरण झाल्यावर स्त्रियांची काय परिस्थिती होईल याची कल्पना न केलेली बरी.
कलम-१९ भाषण स्वातंत्र्य स्त्री असो वा पुरूष असो भाषण करण्याचे स्वातंत्र्य दिले. आपले विचार अभिव्यक्त करण्यासाठी लिखाणाचे स्वातंत्र्यही आपल्याला दिलेले आहे. यालाच आपण अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणतो. कलम-२५ धर्मस्वातंत्र्य भारतात राहणार्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनाप्रमाणे धर्म
उपासना करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. स्त्री असो वा पुरूष असो त्याला जो धर्म स्वीकारायचा असेल तो धर्म स्वीकारू शकतो. अशाप्रकारे संविधानामध्ये वेगवेगळ्या कलमान्वये स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी आंबेडकरांनी हातभार लावला. स्वातंत्र्यानंतर प्रौढ मताधिकार देण्यात आला. स्त्रियांनाही
मताचा अधिकार बहाल केला. अमेरिकेसारख्या विकसित देशात महिलांना दोनशे वर्षे लढा देऊन मताचा अधिकार मिळाला. तो अधिकार कसलाही लढा न देता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना दिला. एवढेच नाही तर राजकारणामध्ये आरक्षण देण्यात आले. आज प्रधानमंत्री, राष्ट्रपती स्त्रिया होताहेत, याचं श्रेय
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते. खर्या अर्थाने स्त्रियांना सामाजिक,आर्थिक,राजकीय अधिकार देऊन त्यंना सक्षम बनवण्यासाठी हिंदू कोड बिल संसदेत २४ फेब्रुवारी १९४९ रोजी मांडले. हिंदू कोड बिलासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ४ वर्ष, ६ महिने, २६ दिवस काम केले. हिंदू कोड बिल ९ भागात १३९ कलम
आणि ७ परिशिष्टात विभागलेले होते. त्यात प्रामुख्याने मुलाप्रमाणे मुलीला संपत्तीत समान वाटा, पोटगीचा अधिकार,घटस्फोटाचा अधिकार,दत्तक विधान सुधारणा इत्यादी कायदे होते. मूळ हिंदू कोड बिलामध्ये स्त्रियांसाठी २० कायदे होते.परंतु संपूर्ण हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे त्यातील फक्त चारच
कायदे झाले. उच्चवर्णीय ब्राम्हणांनी हिंदू कोड बिलाला विरोध केला. हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा त्यांनी लिहिले होते. हिंदू कोड बिलाचा खून करण्यात आला. तसेच हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे मला आज एवढे दुःख
होत आहे की, जेवढे दुःख कोण मेल्यावर होत नाही. तेवढे दुःख हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे होत आहे. मी एक पुरुष असूनही ज्या स्त्रियांसाठी मी लढलो त्या स्त्रियांनी या बिलाला पाठिंबा तर दिलाच नाही. परंतु पुरुषांचे ऐकून हिंदू कोड बिल मागे घेण्यास सांगितले. स्त्रियांनी थोडी ताकत दाखवली
असती तर स्त्रियांचे जीवन आज आहे त्यापेक्षा अजून सशक्त झाले असते. स्त्रियांना नोकरीत आरक्षण देऊन आत्मनिर्भर बनवणारे, स्त्री-पुरुष विषमता नष्ट करणारे, समान काम समान वेतन हा कायदा करणारे, स्त्रियांना भरपगारी प्रसूती रजा देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरच आहेत.
स्त्रियांवर डोंगराएवढे उपकार आंबेडकरांनी केले आहेत.
फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र पुरोगामी आहे का??
आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, शहरामध्ये किंवा राज्यामध्ये आपण रोजच जातीवर आधारीत किंवा जातीमुळे झालेला गोर-गरिबांवर अन्याय पहात असतो. ह्या सगळ्याला जबाबदार आहे तो फक्त आणी फक्त सवर्ण समाज जो वर्ण व्यवस्थेला मानणारा आहे.
या निमित्ताने होत असलेल्या वादातून राज्यात ब्राह्मण विरुद्ध बहुजन किंवा इतर अशी विभागणी पुन्हा केली जाऊ लागली आहे. ब्राह्मणविरोधक म्हणजे पुरोगामी असा विचार रुजतो आहे. फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांना हे पुरोगामित्व अपेक्षित होते का?या महापुरुषांची नावे घेणाऱ्या आजच्या
पुरोगाम्यांचा वर्तनव्यवहार, त्यांचे विचार-आचार खरोखरच पुरोगामी या संज्ञेस पात्र आहेत काय?
महाराष्ट्राला पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असा वैचारिक वाद नवा नाही. जे सनातनी विचारांचे आहेत, ते प्रतिगामी आणि जे प्रगत विचारांचे आहेत ते पुरोगामी अशी या वादाची किंवा संघर्षांची सरळ वैचारिक
डॉ बाबासाहेब आंबेडकर - सामाजिक क्रांती, परिवर्तनाची नांदी.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचे चक्र भारतात गतिमान केले. त्यानिमित्त तीन प्रमुख संज्ञांचा विचार करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे. 'समाज', 'क्रांती' आणि 'परिवर्तन'....
समाज ही संज्ञा लॅटिन भाषेतील 'सोशियस' म्हणजे
सहचर, सवंगडी यामधून घेतलेली आहे. समाज हा शब्द उच्चारला तरी त्याचा अर्थबोध होतो. स म्हणजे सर्व; संपूर्ण, मा म्हणजे मानव; माणूस, ज म्हणजे जमात; जाती आणि म्हणून 'समाज' म्हणजे सर्व मानव जमात होय. वेगळ्य़ा शब्दांत संपूर्ण मानव जातिसमूहाचे रूप 'समाज'. 'व्हॉइस ऑफ अमेरिका' या केंद्रावर
भाषण देताना डॉ. आंबेडकर म्हणाले होते, समाज म्हणजे परस्परपूरक अशा मानवाचा संघ होय. ते सर्व परस्परांच्या उपयोगी पडणे, हे कर्तव्य मानतात व त्याचप्रमाणो वागतात, अशा एकात्म लोकांचा संघ म्हणजे समाज. क्रांती म्हणजे आमूलाग्र बदल, परिवर्तन, चक्राकार फिरणे होय. क्रांतिकारक बदल म्हणजेच
१४ एप्रिल या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. देशातील कोट्यवधी दीनदुबळ्यांसाठी तसेच देशासाठी हा दिवस फार आनंददायी आहे. या दिवशी दिवसभर मोठ्या उत्साहाने खेड्यापाड्यांपासून ते दिल्लीपर्यंत, अगदी
जगभर म्हणलं तरी चालेल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. डॉ. आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी म्हणजे एम.ए. पदवीसाठी २५ जुलै १९१३ रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश केला. प्रो. सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनाखाली जून १९१५ मध्ये एम.ए.ची पदवी संपादन केली.
ऑक्टोबर १९१६ मध्ये इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे एम.एस.सी. इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश केला. प्रो. कॅनन आणि सेडनी वेब यांच्या मार्गदर्शनाखाली १९२० मध्ये पदवी संपादन केली. पुढे १९२२-२३ मध्ये युनिव्हर्सिटी इन बॉन जर्मनीमध्ये डी.एस.सी. पदवीचा अभ्यास
मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसुन तो गुणाने श्रेष्ठ ठरतो. ईश्वर एक असुन तो सर्वव्यापी निर्विकार, निर्गुण व सत्यरूप आहे. सर्व मनुष्य व मनुष्येत्तर प्राणी त्याची लेकरे आहेत. हा वास्तव विचार सन १८व्या शतकात निर्भीडपणे मांडून सामाजिक,
शैक्षणिक, सांस्कृतिक गुलामगिरीतुन समस्त मानवाला बाहेर काढण्याचं काम करणारे आणि सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. महात्मा ज्योतीराव फुले यांचा जन्म शेतकरी, भाजीपाला व फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव आणि चिमणाबाई यांच्या पोटी ता.
११ एप्रिल १८२७ रोजी झाला. त्या दिवशी जोतिबाची यात्रा होती म्हणून गोविंदराव आणि चिमणाबाई यांनी तेजस्वी आणि ओजस्वी असलेल्या पुत्राचे नाव जोतिबा असे ठेवले. काही लोकांच्या जीवनात जन्मापासूनच अडचणी आणि संकटे दार ठोठावतच असतात. जोतिबांच्या बाबतीतही असेच काही घडले होते. त्यांच्या आई
स्त्रीयांची गुलामगिरी नष्ट करणारे महात्मा ज्योतिबा फुले.
महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ समाज सुधारकच नव्हते तर ते खऱ्या अर्थाने नवसमाज निर्मितीचे सांस्कृतिक पुरुष होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थावादी समाजव्यवस्था नाकारलीच नाही तर नवसमाज निर्मितीसाठी
आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी नवीन समतामूलक समाजव्यवस्था निर्माण करण्याचे प्रारूप भारतीय समाज व्यवस्थेसमोर मांडले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी या परिवर्तनवादी लढाईमध्ये स्त्रियांना केवळ सामावून घेतले नाही
तर त्यांना या लढ्याचे शिलेदार बनविले. त्यामुळे आज भारताच्या सर्व क्षेत्रात महीला आघाडीवर दिसत आहेत. यामागे महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्त्री विषयक कार्य, तत्वज्ञान, प्रेरणा आहे. सदर लेखात ज्योतिबा फुले यांनी स्रियांसंबंधी केलेल्या कार्याचा व भूमिकेचा थोडक्यात आढावा घेण्याचा मानस
भारतातील परंपरागत समाज संस्थेच्या विरुद्ध बंड करणारे पहिले बंडखोर, भारतीय स्त्री-शिक्षणाचे जनक, स्त्री-स्वातंत्र्याचे आणि हक्काचे उद्गाते, शेतकरी-कामकऱ्यांची चळवळ उभारणारे पहिले पुढारी म्हणून ज्योतिराव गोविंदराव फुले हे ख्यातीप्राप्त
आहेत. महात्मा फुले हे गौतम बुद्ध, संत कबीर, संत तुकाराम आणि लोकराजा शिवाजी यांची परंपरा जोपासणारे विवेकवादी होते. समाजसुधारणा, स्त्रीदास्य विमोचन, सर्वांना शिक्षणाचा हक्क याविषयी ते आग्रही होते. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, हे त्यांनी 'तृतीय रत्न' या नाटकातून दाखवून दिले आहे
शिक्षणानेच मनुष्य विवेकशील व संवेदनशील बनतो. शिक्षणाअभावी माणूस मानवी हक्क, प्रतिष्ठा, दर्जा ह्यांना पारखा होतो. समाजसुधारणेचा परीघ व्यापक होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, याची त्यांना जाणीव होती. अशिक्षितपणामुळे शेतकरी, कामकरी यांचे जीवन शोचनीय झाले आहे. अज्ञान, अंधश्रद्धा,