डॉ बाबासाहेब आंबेडकर - सामाजिक क्रांती, परिवर्तनाची नांदी.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचे चक्र भारतात गतिमान केले. त्यानिमित्त तीन प्रमुख संज्ञांचा विचार करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे. 'समाज', 'क्रांती' आणि 'परिवर्तन'....
समाज ही संज्ञा लॅटिन भाषेतील 'सोशियस' म्हणजे
सहचर, सवंगडी यामधून घेतलेली आहे. समाज हा शब्द उच्चारला तरी त्याचा अर्थबोध होतो. स म्हणजे सर्व; संपूर्ण, मा म्हणजे मानव; माणूस, ज म्हणजे जमात; जाती आणि म्हणून 'समाज' म्हणजे सर्व मानव जमात होय. वेगळ्य़ा शब्दांत संपूर्ण मानव जातिसमूहाचे रूप 'समाज'. 'व्हॉइस ऑफ अमेरिका' या केंद्रावर
भाषण देताना डॉ. आंबेडकर म्हणाले होते, समाज म्हणजे परस्परपूरक अशा मानवाचा संघ होय. ते सर्व परस्परांच्या उपयोगी पडणे, हे कर्तव्य मानतात व त्याचप्रमाणो वागतात, अशा एकात्म लोकांचा संघ म्हणजे समाज. क्रांती म्हणजे आमूलाग्र बदल, परिवर्तन, चक्राकार फिरणे होय. क्रांतिकारक बदल म्हणजेच
परितर्वन. विषमता हे क्रांतीचे मूळ आहे. विषमतेने आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, बौद्धिक यातील विषम वाटणीच्या स्वरूपातून निर्माण झालेली अन्यायाची भावना क्रांतीबद्दलची मुख्य प्रेरणा असते, असे ॲरिस्टॉटल मानतो, तसेच जुलमी व शोषक वर्गापासून मुक्तता मिळविणे ही सुद्धा
परिवर्तनामागची प्रेरणा असते. क्रांती यशस्वी होण्याकरिता शिस्तबद्ध व निष्ठावंत क्रांतीच्या अग्रभागी असणे गरजेचे आहे, असे लेनीन मानीत होता. माणूस समप्रवृत्त असून, त्याच्याकडून सौजन्य अपेक्षित आहे. या तत्त्वज्ञानानुसार संपूर्ण क्रांती ही माणसाच्या मन परिवर्तनाने साध्य होऊन ती नवीन
समाज निर्माण करेल. भारतीय समाजात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रात असलेल्या विषमतेत आमूलाग्र बदल घडून प्रत्येक नागरिक स्वतंत्र असेल. अशा क्रांतीला, जयप्रकाश नारायण 'लोकक्रांती' म्हणत असत. परिवर्तन हे समाजाशी संबंधित आहे. परिवर्तन अचानक होत नाही किंवा तत्काळ दिसून येत
नाही, तर एकाकी घडून येते ती क्रांती. समाजाने कधीही विचार केलेला नव्हता, असे बदल क्रांतीमुळे घडून येतात. भारतातसुद्धा फार मोठी क्रांती घडून आली ती म्हणजे बुद्ध धम्म क्रांती. ही क्रांती सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्रांती. ही रक्तविहीन क्रांती होती. बुद्धाने
प्रस्थापित वैदिक व्यवस्था नाकारली आणि समतावादी व्यवस्था मांडली. विचाराने क्रांती घडवून आणली. समतेचा विचार, न्यायाचा विचार, बंधुतेचा विचार, स्वातंत्र्याचा विचार दिला. भगवान बुद्ध स्वत: म्हणतात, 'जगातील गोष्टी अनित्य आहेत.' समाजजीवनात सतत परिवर्तन होत असते. मात्र, फक्त बाह्यांगात
होणारे परिवर्तनच यात अभिप्रेत नाही, तर व्यक्तीच्या मनात, विचारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातील प्रस्थापित, विषमतेवर आधारित हिंदू समाजव्यवस्थेच्या संरचनेत परिवर्तन हवे होते. म्हणून यासंदर्भात ते म्हणतात, 'आपली समाजरचना बदलल्याशिवाय प्रगतीच्या मार्गावर तुम्हाला फारसा लाभ होऊ
शकणार नाही. भारतात प्रचलित असलेल्या विषमतेवर आधारित समाजव्यवस्थेशी टक्कर घेऊन सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय सुधारणा केल्यावाचून कोणतीही क्रांती किंवा परिवर्तन या देशात संभवत नाही.'
डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रांतीविषयी बोलताना म्हणतात, 'जगातील कोणतीही गोष्ट अपरिवर्तनशील नाही.
कोणतीही वस्तू सनातन नाही. सर्व वस्तूत घडून येणारा बदल म्हणजे व्यक्तीच्या तसेच समाजाच्या जीवनाला मर्यादित करणारा निसर्गाचा नियम आहे. बदलत्या समाजामध्ये जुन्या व कुजलेल्या जीवनमूल्यांत सतत क्रांती घडून यावयास हवी.' प्रस्थापित व्यवस्था बदलून दुसऱ्या व्यवस्था ज्या विचाराने निर्माण
होतात, तो विचार क्रांतिकारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन म्हणजे, 'नवीन जीवन सुरू होण्यापूर्वी व हृदयाचे ठोके सुरू होण्यापूर्वी जुन्याचा अंमल संपायलाच हवा' असा आहे. त्यांनी भारतीय समाजात शतकानुशतकांच्या जातीच्या उतरंडीवर पिचून सगळ्यात शेवटी उभ्या असलेल्या दलित
समुदायामध्ये पेटवलेली चेतना आणि एकहाती घडवून आणलेली क्रांती त्यांना 'महामानव' पदापर्यंत घेऊन जाते. त्यांचं व्यक्तिमत्व सर्वव्यापी आहे.
फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र पुरोगामी आहे का??
आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, शहरामध्ये किंवा राज्यामध्ये आपण रोजच जातीवर आधारीत किंवा जातीमुळे झालेला गोर-गरिबांवर अन्याय पहात असतो. ह्या सगळ्याला जबाबदार आहे तो फक्त आणी फक्त सवर्ण समाज जो वर्ण व्यवस्थेला मानणारा आहे.
या निमित्ताने होत असलेल्या वादातून राज्यात ब्राह्मण विरुद्ध बहुजन किंवा इतर अशी विभागणी पुन्हा केली जाऊ लागली आहे. ब्राह्मणविरोधक म्हणजे पुरोगामी असा विचार रुजतो आहे. फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांना हे पुरोगामित्व अपेक्षित होते का?या महापुरुषांची नावे घेणाऱ्या आजच्या
पुरोगाम्यांचा वर्तनव्यवहार, त्यांचे विचार-आचार खरोखरच पुरोगामी या संज्ञेस पात्र आहेत काय?
महाराष्ट्राला पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असा वैचारिक वाद नवा नाही. जे सनातनी विचारांचे आहेत, ते प्रतिगामी आणि जे प्रगत विचारांचे आहेत ते पुरोगामी अशी या वादाची किंवा संघर्षांची सरळ वैचारिक
१४ एप्रिल या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. देशातील कोट्यवधी दीनदुबळ्यांसाठी तसेच देशासाठी हा दिवस फार आनंददायी आहे. या दिवशी दिवसभर मोठ्या उत्साहाने खेड्यापाड्यांपासून ते दिल्लीपर्यंत, अगदी
जगभर म्हणलं तरी चालेल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. डॉ. आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी म्हणजे एम.ए. पदवीसाठी २५ जुलै १९१३ रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश केला. प्रो. सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनाखाली जून १९१५ मध्ये एम.ए.ची पदवी संपादन केली.
ऑक्टोबर १९१६ मध्ये इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे एम.एस.सी. इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश केला. प्रो. कॅनन आणि सेडनी वेब यांच्या मार्गदर्शनाखाली १९२० मध्ये पदवी संपादन केली. पुढे १९२२-२३ मध्ये युनिव्हर्सिटी इन बॉन जर्मनीमध्ये डी.एस.सी. पदवीचा अभ्यास
मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसुन तो गुणाने श्रेष्ठ ठरतो. ईश्वर एक असुन तो सर्वव्यापी निर्विकार, निर्गुण व सत्यरूप आहे. सर्व मनुष्य व मनुष्येत्तर प्राणी त्याची लेकरे आहेत. हा वास्तव विचार सन १८व्या शतकात निर्भीडपणे मांडून सामाजिक,
शैक्षणिक, सांस्कृतिक गुलामगिरीतुन समस्त मानवाला बाहेर काढण्याचं काम करणारे आणि सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. महात्मा ज्योतीराव फुले यांचा जन्म शेतकरी, भाजीपाला व फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव आणि चिमणाबाई यांच्या पोटी ता.
११ एप्रिल १८२७ रोजी झाला. त्या दिवशी जोतिबाची यात्रा होती म्हणून गोविंदराव आणि चिमणाबाई यांनी तेजस्वी आणि ओजस्वी असलेल्या पुत्राचे नाव जोतिबा असे ठेवले. काही लोकांच्या जीवनात जन्मापासूनच अडचणी आणि संकटे दार ठोठावतच असतात. जोतिबांच्या बाबतीतही असेच काही घडले होते. त्यांच्या आई
स्त्रियांची गुलामगिरी नष्ट करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
पिता रक्षति कौमार्य, पति रक्षति योवने, पुत्र रक्षति वार्धक्य, न स्त्री स्वातंत्र्यम अहरती. या मनू वचनाला स्त्रीने कधीच मागे टाकले आहे. स्त्रियांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा कोणीच विचार करत नव्हते. सर्वप्रथम राष्ट्रपिता
महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विचार केला. त्यांना शिक्षण देऊन सक्षम बनवण्यास हातभार लावला. विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना गुरु मानतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हाच धागा पुढे नेला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा
स्त्रियांच्या संघटनेवर खूप विश्वास होता. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, स्त्रियांच्या संघटनेवर फार मोठा विश्वास ठेवणारा मी माणूस आहे. त्यांना जर विश्वासात घेतले तर समाजाची सुधारणा करण्यासाठी त्या काय काय करू शकतात हे मी जाणतो. सामाजिक दोष नाहीसे करण्याची त्यांनी फार मोठी सेवा
स्त्रीयांची गुलामगिरी नष्ट करणारे महात्मा ज्योतिबा फुले.
महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ समाज सुधारकच नव्हते तर ते खऱ्या अर्थाने नवसमाज निर्मितीचे सांस्कृतिक पुरुष होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थावादी समाजव्यवस्था नाकारलीच नाही तर नवसमाज निर्मितीसाठी
आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी नवीन समतामूलक समाजव्यवस्था निर्माण करण्याचे प्रारूप भारतीय समाज व्यवस्थेसमोर मांडले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी या परिवर्तनवादी लढाईमध्ये स्त्रियांना केवळ सामावून घेतले नाही
तर त्यांना या लढ्याचे शिलेदार बनविले. त्यामुळे आज भारताच्या सर्व क्षेत्रात महीला आघाडीवर दिसत आहेत. यामागे महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्त्री विषयक कार्य, तत्वज्ञान, प्रेरणा आहे. सदर लेखात ज्योतिबा फुले यांनी स्रियांसंबंधी केलेल्या कार्याचा व भूमिकेचा थोडक्यात आढावा घेण्याचा मानस
भारतातील परंपरागत समाज संस्थेच्या विरुद्ध बंड करणारे पहिले बंडखोर, भारतीय स्त्री-शिक्षणाचे जनक, स्त्री-स्वातंत्र्याचे आणि हक्काचे उद्गाते, शेतकरी-कामकऱ्यांची चळवळ उभारणारे पहिले पुढारी म्हणून ज्योतिराव गोविंदराव फुले हे ख्यातीप्राप्त
आहेत. महात्मा फुले हे गौतम बुद्ध, संत कबीर, संत तुकाराम आणि लोकराजा शिवाजी यांची परंपरा जोपासणारे विवेकवादी होते. समाजसुधारणा, स्त्रीदास्य विमोचन, सर्वांना शिक्षणाचा हक्क याविषयी ते आग्रही होते. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, हे त्यांनी 'तृतीय रत्न' या नाटकातून दाखवून दिले आहे
शिक्षणानेच मनुष्य विवेकशील व संवेदनशील बनतो. शिक्षणाअभावी माणूस मानवी हक्क, प्रतिष्ठा, दर्जा ह्यांना पारखा होतो. समाजसुधारणेचा परीघ व्यापक होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, याची त्यांना जाणीव होती. अशिक्षितपणामुळे शेतकरी, कामकरी यांचे जीवन शोचनीय झाले आहे. अज्ञान, अंधश्रद्धा,