प्रविन तम्बे वर वॉट्सअप वर आलेला एक लेख आवडला म्हनून् नावा सहित शेअर करतोय.
*प्रत्येक विद्यार्थ्याने आणि पालकाने पहावा असा चित्रपट: प्रविण तांबे कोण?*
आज बर्याच दिवसांनी चेन्नईतल्या घरी आल्यामुळे थोडासा आराम होता, म्हटलं किती दिवस नुसते ओटीटी वाल्यांना फुकट पैसे द्यायचे?
म्हणून सहज हॉटस्टार उघडलं आणि प्रविण तांबे कौन? हा चित्रपट लावून बसलो..
तसा ट्रेलर पाहिल्यावरच चित्रपट पाहणार हे ठरवून टाकलं होतं, कारण त्याआधी भारताचा माजी कसोटी कर्णधार, राहुल द्रविड याचे प्रविण तांबें विषयी केलेले भाषण ऐकले होते.
त्यावरूनच हा माणूस कोण तरी असाधारण इच्छाशक्तीचा आहे हे कळले होते, पण त्याचा प्रवास हा इतका खडतर, तितकाच प्रेरणादायी असेल असे मात्र वाटले नव्हते.
प्रविण तांबे कोण?
म्हटलं तर एक क्रिकेटर, जो आयपीएलच्या
राजस्थान रॉयल्स संघाकडून बहुतांशी करियर खेळला, करिअरच्या उत्तरार्धामध्ये रणजीमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले आणि सध्या कोलकत्ता नाइट रायडर्स मध्ये सपोर्ट स्टाफ म्हणून कार्यरत असणारा.. बघितलं तर अगदी साधी कारकीर्द वाटते, म्हणजे अगदी सचिन
सारख्या जगज्जेता फलंदाजा एवढ्या धावा, किंवा कुंबळे सारख्या सहाशे विकेट वगैरे याच्या नावावर काही नाही, पण तरीही आज यांची चर्चा का?
प्रविण तांबे ची सुरुवात, इतर मुंबईच्या क्रिकेटर प्रमाणे टेनिस क्रिकेटनेच झाली. बरेच वर्षे टेनिस क्रिकेट मध्ये रगडला गेल्यानंतर,
मध्यम गती गोलंदाज म्हणून क्लब लेव्हलला लेदर क्रिकेट मध्ये सुरुवात केली. तिथून पुढे एक नाही दोन नाही तब्बल 20 वर्षे मुंबईतल्या छोट्या-मोठ्या मैदानांवर लोकल टूर्नामेंट खेळत राहिला, आणि दरवर्षी रणजीसाठी खेळणार या जिद्दीने निवड समितीसमोर जात राहिला.
लग्न व्हायच्या आधी भाऊ इंजिनिअर असल्याने खेळण्यासाठी सपोर्ट करत होता, पण लग्न झाल्यानंतर मात्र काहीतरी नोकरी करणे भाग होते. म्हणून तडजोड करून क्रिकेट खेळायला मिळेल अशा अटीवर बऱ्याच नोकऱ्या केल्या. सुरुवातीला शिपिंग कंपनी मध्ये, नंतर हिऱ्याच्या एका व्यावसायिकाकडे,
अगदी बार मध्ये वेटर म्हणून देखील रात्रपाळी केली जेणेकरून सकाळी प्रॅक्टिस आणि दिवसा मॅचेस खेळता येतील. शिपिंग कंपनी मध्ये क्रिकेट खेळत असताना त्याची भेट एका कोचशी झाली आणि नाही नाही म्हणत तांबेचा मिडीयम फास्ट बॉलर चा एक लेग स्पिनर झाला.
मिडीयम फास्ट बॉलर ची तेव्हा मुंबई क्रिकेटला नसलेली गरज, वाढते वय, प्रविण तांबे चा झालेला अपघात, या सगळ्यांचा परिणाम म्हणून शेवटी प्रविण ने ज्या वयात क्रिकेट सोडले जाते त्या वयामध्ये लेगस्पिनर म्हणून क्रिकेट नव्याने सुरुवात करायचे ठरवले. वय होते साधारण 36 वर्षे.
बारमधील नोकरी कंटाळून शेवटी त्याने सोडली आणि दिवस दिवसभर पुन्हा लोकल टूर्नामेंट खेळण्यावर भर दिला. दरम्यान त्याचा शिपिंग कंपनीतील जुन्या मित्रांमुळे त्याला एका नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कंस्ट्रक्शन सुपरवायझर म्हणून नोकरी मिळाली आणि
खेळण्यासाठी परवानगी देखील. त्या संधीचे प्रविणने सोने केले. त्या वर्षीच्या आणि पुढच्या वर्षी त्या सर्व मानाचे कार्पोरेट क्रिकेटमधील चषक नवीन कंपनीला प्रविणने जिंकून दिले. पण वय चाळीसिकडे येत असल्यामुळे रणजी निवड कमिटी साठी मात्र तो जवळपास कालबाह्य झाला होता.
शेवटी चार वर्षे कंपनीमध्ये क्रिकेट खेळल्या नंतर कंपनीने देखील, त्याला यापुढे क्रिकेट स्वतः न खेळता युवा टीमला कोचिंग करण्याचा रोल दिला. काही झाले तरी मी रणजी खेळणार हे स्वप्न उराशी बाळगून सातत्याने वीस-बावीस वर्षे झगडत असणाऱ्या प्रविणला ते पचवणे अवघड होते,
पण चरितार्थ आणि संसार याची समस्या सोडवण्यासाठी नोकरी करावीच लागणार होते. शेवटी त्याने नोकरी सुरू ठेवली.काही दिवसांनी अचानक त्याच्या बॉसला आयपीएल निवड समितीकडून फोन आला, आणि मागच्या तीन वर्षांचा क्लब लेवल मधील परफॉर्मन्स पाहून, तत्कालिन राजस्थान रॉयल चा कर्णधार राहुल
द्रविड याने त्याची आयपीएल संघामध्ये निवड केली.
वय होते 41 वर्षे.
संधी मोठी जरी असली तरी अवघड होती, राजस्थान रॉयल्स मधील शेन वॉर्न ची जागा प्रविण तांबे ला भरून काढायची होती. लोकंल एक्सपिरीयन्स भरपूर असला तरी या दर्जावर मॅच खेळण्याचा अनुभव मात्र बिलकुल नव्हता..
पण त्याचे कोच म्हणायचे त्याप्रमाणे *"प्रवीण क्रिकेट हो या जिंदगी एक वर काफी है बदलने के लिए "*.. खरंच प्रविण ने ती एक ओव्हर टाकली. आयपीएल मध्ये त्याला खेळवल्या गेलेल्या पहिल्या सामन्यांमध्ये कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध चक्का हॅट्रिक पटकावले.
कालपर्यंत मुंबईतल्या काही क्रिकेटर ना सोडुन माहीत नसलेला प्रवीण तांबे त्या दिवशी जगाला माहित झाला.. खरंच एक ओव्हर काफी होती है जिंदगी बदलने के लिए, ते पठ्याने सिद्ध करून दाखवले होते.
वयाच्या 41 व्या वर्षी प्रविण तांबे यांनी आयपीएल क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यानंतर, पुढच्याच वर्षी त्यांना मुंबई रणजी संघात कडून बोलावणे आले. आयपीएल च्या पुढील सीझनमध्ये प्रवीण तांबे यांनी सर्वात
जास्त विकेट काढल्याबद्दल मानाची *पर्पल कॅप* देखील मिळवली. चॅंपियन्स लीग टी-20, अबुधाबी t10 लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग, अशा बऱ्याच स्पर्धा त्या दरम्यान प्रविण तांबेने गाजवल्या. तिथून पुढे पाच वर्षे आयपीएल खेळल्यानंतर आज प्रविण तांबे कलकत्ता
नाईट रायडर्स चे सपोर्ट स्टाफ मध्ये कार्यरत आहेत. शिवाय ते स्वतःची क्रिकेट अकॅडमी देखील चालवतात.
प्रश्न आहे प्रवीण तांबे यांच्या अद्वितिय प्रवासानंतर आपण काय शिकलो?
✅️तुम्ही एका क्षणात यशस्वी होऊ शकता, पण तो क्षण तुमच्या आयुष्यात येण्यासाठी कित्येक दिवस आणि रात्रीचे परिश्रम गरजेचे असतात.
✅️ध्येयाकडे वाटचाल करत असताना वारंवार अपयशी होत असाल, तर कधीतरी आपल्यात काय बदल केला पाहिजे यासाठी मार्गदर्शन आवश्यक असते.
✅️स्वप्न पाहण्यासाठी मोठं घर किंवा मोठं नाव असाव लागत नाही, तर मोठी जिद्द असावी लागते.
✅️ जो माणूस स्वतःहून कधीच हार मानत नाही, त्याला हरवणं अशक्यप्राय गोष्ट आहे.
✅️ आयुष्यात एक संधी हुकली म्हणून रडून प्रयत्न सोडणारे कधीच यशस्वी होत नाहीत..
तो एकेरी अर्थ मुद्दामून आहे,
त्यात खूप मोठा अर्थ आहे
तो एकेरी अर्थ सांगतो की शिवाजी हे तुमच्या आमच्या सारखे सामान्य व्यक्ती होते,
हाडा मासाचे.
कोणी दैवी व्यक्ती नव्हते पण तरी त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने स्वराज उभे केले प्रतिकूल परिस्थितीतून उभे राहिले,
नागराज चा झुंड व मराठीत आलेला लांजेकरांचा पावनखिंड ह्यात नेटकऱ्या मध्ये चांगलीच जुंपली आहे.
त्या निमित्ताने काही गोष्टी लक्षात येतायत. म्हणताय की लांजेकर यांनी 15 वर्ष अभ्यास केला आज 28 दिवसात चित्रपट बनवला!! असेल बाबा!
पण मला मुळात दिगपाल लांजेकर साहेब स्वतः गोधळलेले वाटतात.
म्हणतात की मी शिव अष्टक करतोय आणि
चित्रपट चा क्रम जीवन क्रमाशी सुसंगत ठेवत नाही.???
शेरशिवराज हा अफजल खान स्वारी च्या प्रकरणाचा चित्रपट त्यांनी फर्जंद, लाल महाल आक्रमण, पावनखिंड ह्या घटना क्रमा नंतर घेतलाय.
जर आधीच प्लॅन केलेला तर मग क्रमाने सांगायला काय प्रॉब्लेम आहे?
मला वाटते इथे क्रम असा असावा पाहिले फर्जंद त्यांनी चित्रपट बनवला नंतर तो यशस्वी झाला त्या नंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केली , ते प्रकरण खूप गाजले त्यातून प्रेरणा घेऊन इतिहासातील पहिली सर्जिकल स्ट्राईक असे मार्केटिंग बिरुद लावून फतेशीकस्त आला
कारण वातावरण तस होत!
खास करून जे लोक हर्षद मेहता स्कम बघून मार्केट मध्ये नशीब अजमवायला उतरले त्यांना मार्केट नी एक रिऍलिटी शॉक दिला.
पण एक चांगल दिसलं की मराठी माणसा मध्ये गेल्या लॉकडाऊन च्या काळात ह्या शेर मार्केट च्या क्षेत्रात बरीच जागरूकता तयार झाली.
त्यातील बरेच लोक मार्केट ला सट्टा न समजता एक अभ्यासाचा भाग म्हणून घ्यायला लागले.
त्यामुळे ह्या ऑनलाइन क्लास घेणाऱ्यांचे फावले ते सोडा पण, या तुन जर कोणी मराठी राकेश झुंझुंवला किंवा रामकृष्ण दमनी तयार झाले तर चांगलाच आहे.