वाचन वेड📚 Profile picture
वाचा आणि शिकवा । 🤓 व्यसन : पुस्तके । पी एल प्रेमी | व पु भक्त | चित्रपट | क्रीडा
Mar 31 4 tweets 1 min read
मला एक कळत नाही स्त्री ही पण एक मानव आहे हे आपण का विसरतो

तूम्ही ही अपेक्षा का करता की त्यांनी एका लग्ना च्या एका दिवसा नंतर स्त्री ही माहेर ची ओढ तोडले

तिने तेचे आयुष्य, बालपण ज्या लोकांत घालवले ते एका दिवसात बदलावे

आणि मुळात तिने बदल तरी का करायचा

राहिला प्रश्न सासर चा तर तर ते घर तिला परकच वाटणार ते तीच घर नसत तुम्ही स्वतः ला तिच्या जागी ठेवून पाहावं आणि प्रामाणिक विचार करावा आपण दुसऱ्या व्यक्तींना आपल्या आई वडिलांच्या जागी ठेवू शकतो का?

स्त्रीने नवीन घर आपलंसं करावं ही पूर्ण पाने जबाबदारी ही त्या स्त्री ची नसून सासर च्या लोकांची आहे
Sep 17, 2022 7 tweets 6 min read
राजकारण शेअर मार्केट आहे!!

इथे बीजेपी चा शेअर सद्या मल्टी बॅगर झालाय MRF सारखा
वाढतोय वाढतोय पण काय स्प्लिट होत नाही

राष्ट्रवादी सद्या चॅनल मध्ये अडकलीय फ्लॅग अँड पोल बनवतेय वाटतं शिवसेना हा असा शेअर आहे जो बीजेपी सारखा खूप वाढला आणि नंतर कंपनीच स्प्लिट झाली दोन शेअर झाले
आता प्रश्न पडतो की कुठे इन्व्हेस्ट करायचं म्हणून इन्व्हेस्टर सद्या wait and watch करतायत

काँग्रेस ची अवस्था सद्या लोवर सर्किट लागल्या सारखी झालीय!!
Jun 3, 2022 19 tweets 9 min read
शेहेनशा
लेखक : ना स इनामदार

शेहेनशा ही कादंबरी मराठे शाही च्या इतिहासातील सर्वात मोठ्या शत्रूचे चित्रण करणारी कादंबरी आहे. अर्थात ऐतिहासिक असलेली ही कादंबरी असल्याने काही ऐतिहासिक सत्याला बगल देऊन मोठ्या रंजक रित्या पुढे जाते. पण बऱ्याच पैकी ज्ञात सत्य आपल्या समोर ठेवते.
औरंगजेब हा असा माणूस होता की ज्याने ज्या धर्माला मानलं त्या धर्माच्या गोष्टींवर पूर्ण विश्वास ठेवून त्याने आयुष्य भर आपले जीवन काढले.
त्या एकच उद्देशाने तो पुढे जात राहिला.
Apr 8, 2022 23 tweets 7 min read
प्रविन तम्बे वर वॉट्सअप वर आलेला एक लेख आवडला म्हनून् नावा सहित शेअर करतोय.
*प्रत्येक विद्यार्थ्याने आणि पालकाने पहावा असा चित्रपट: प्रविण तांबे कोण?*

आज बर्‍याच दिवसांनी चेन्नईतल्या घरी आल्यामुळे थोडासा आराम होता, म्हटलं किती दिवस नुसते ओटीटी वाल्यांना फुकट पैसे द्यायचे? म्हणून सहज हॉटस्टार उघडलं आणि प्रविण तांबे कौन? हा चित्रपट लावून बसलो..
तसा ट्रेलर पाहिल्यावरच चित्रपट पाहणार हे ठरवून टाकलं होतं, कारण त्याआधी भारताचा माजी कसोटी कर्णधार, राहुल द्रविड याचे प्रविण तांबें विषयी केलेले भाषण ऐकले होते.
Apr 6, 2022 4 tweets 5 min read
तो एकेरी अर्थ मुद्दामून आहे,
त्यात खूप मोठा अर्थ आहे

तो एकेरी अर्थ सांगतो की शिवाजी हे तुमच्या आमच्या सारखे सामान्य व्यक्ती होते,
हाडा मासाचे.
कोणी दैवी व्यक्ती नव्हते पण तरी त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने स्वराज उभे केले प्रतिकूल परिस्थितीतून उभे राहिले, परिस्थिती ला शरण गेले नाही.
तो एकेरी उल्लेख आपल्याला सांगतो की तू पण महाराजांचे गुण अंगीकरून महाराजांच्या पदचिन्हा वर चालू शकतो.

नाही तर महाराज महान होते बोलुन्, ते देव म्हणून त्यांना देव्हाऱ्यात बसवायचे
आणी
"ते काय बाबा अवतारी पुरुष , देवाचे अंश" बोलून त्यांची पूजा करायची.
Mar 6, 2022 23 tweets 8 min read
नागराज चा झुंड व मराठीत आलेला लांजेकरांचा पावनखिंड ह्यात नेटकऱ्या मध्ये चांगलीच जुंपली आहे.
त्या निमित्ताने काही गोष्टी लक्षात येतायत. म्हणताय की लांजेकर यांनी 15 वर्ष अभ्यास केला आज 28 दिवसात चित्रपट बनवला!! असेल बाबा!
पण मला मुळात दिगपाल लांजेकर साहेब स्वतः गोधळलेले वाटतात. म्हणतात की मी शिव अष्टक करतोय आणि
चित्रपट चा क्रम जीवन क्रमाशी सुसंगत ठेवत नाही.???

शेरशिवराज हा अफजल खान स्वारी च्या प्रकरणाचा चित्रपट त्यांनी फर्जंद, लाल महाल आक्रमण, पावनखिंड ह्या घटना क्रमा नंतर घेतलाय.

जर आधीच प्लॅन केलेला तर मग क्रमाने सांगायला काय प्रॉब्लेम आहे?
Dec 23, 2020 18 tweets 4 min read
काल पर्वा च्या मार्केट फॉल मध्ये बरेच नवोदित लोकांना खूप काही शिकायला मिळाले असेल , कारण मी मागील चार वर्षे मार्केट मध्ये असून ही मला ही थोडा झटका बसलाच की,
#मराठी_शेरमार्केट @Share_Bajaar @iamShantanu_D @MarathiRojgar @marathistock @MarathiRT
@jimodiji खास करून जे लोक हर्षद मेहता स्कम बघून मार्केट मध्ये नशीब अजमवायला उतरले त्यांना मार्केट नी एक रिऍलिटी शॉक दिला.
पण एक चांगल दिसलं की मराठी माणसा मध्ये गेल्या लॉकडाऊन च्या काळात ह्या शेर मार्केट च्या क्षेत्रात बरीच जागरूकता तयार झाली.