#ThanksPhuleAmbedkar
फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काय बदल झाला पाहिजे आजच्या काळानुसार!
सर्वप्रथम चळवळ म्हणजे काय जर समजून घेतलं तर काय बदल करावे लागतील हे समजून जाईल. चळवळ म्हणजे लोकांच्या,समूहाच्या प्रश्नावर अनेक लोकांनी एकत्र येऊन केलेलं आंदोलन. कामगार चळवळ, शेतकरी चळवळ
अशा अनेक चळवळी आपण ऐकतो पाहतो.यात सगळ्यात जर साम्य असेल तर लोकांचा सहभाग, लोक सहभाग हा महत्वाचा.फुले शाहू आंबेडकर चळवळीला परत गरज आहे ती शोषित वर्गाने एकत्र येण्याची.( provided त्या वर्गाला जाणीव हवी
के ते शोषित आहेत).फुले शाहू आंबेडकर यांचा काळात त्यांना अनेक ब्राह्मण,ब्रह्मनेतर लोकांनी मदत व सहकार्य केलं होतं.त्यांनतर परत एकदा समाजात फाटाफूट पडलेली दिसते.तसेच अगोदर शेतकरी, कामगार जे बांधले गेले होते चळवळीशी ते एक एक बाहेर पडत गेले किंवा स्वतचं नवीन सुरू केली चळवळ.
समाज म्हणून ओबीसी वर्गाने मण्डल की कमंडल मध्ये कमंडलू ची निवड गेली आणि तो ही बाजूला गेला.राम मंदिर वरून आरएसएस ने अजून फूट पाडली. राहिले ते आंबेडकरी लोक या समूहाने चळवळ ही टिकवली पुढे आणली फुले शाहू आंबेडकर यांचे विचार कार्य जागे ठेवले. प्रश्न कोणाचाही असेल सर्वप्रथम आवाज
उठवणारे आंबेडकरी आहेत होते.अगदी ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंबेडकरी होते तर ओबीसी बांधावला मण्डल आयोग समजलाच नाही की काय त्यांनाच माहिती. यातून एक नेहमी सुर निघत राहिला आहे की आंबेडकरी लोकांनीच का आंदोलन करायचा त्यांना का मदत करायची ते काहीच करत नाही. तर या अनुषंगाने
आंबेडकरी चळवळ चालवणारे किंवा मानणारे यांनी असा विचार करणे प्रथम सोडून द्यावा. हा प्रश्न माझा आहे तो त्याचा आहे बोलूनच आपण फुले शाहू आंबेडकर चळवळ वेगल वळण देत आहोत. हेच जर या महापुरुषांनी केलं असतं तर? ते फक्त त्यांच्याच समाजासाठी लढले असते तर आजच चित्र वेगळं असत.आंबेडकरी वर्ग
जागा आहे जागृत आहे तर त्यांनी प्रबोधन करावं परिस्थीत समजावून सांगून लोकांना जाणीव करून द्यावी की तुमचं कसं शोषण होत आहे. हे कटू असल तरी सत्य आहे की जर जातीवरच बोलायचं झालं तर #माळी समाजातील लोकांना पण फुले कळले( माहिती आहेत?) नाहीत का हा प्रश्न पडतो?की देव धर्मात ते इतके बुडले
आहेत की अक्षरशः फुले यांच्यसारखा महामानवाला बाजूला सारलं आहे. शाहू महाराज यांच्यावर नको ते फालतू जोक वर हसणारे, चर्चा करणारे,पण वीर नसलेल्या लोकांना वीर म्हणून मिरवणारे बहुजन पोरांना आता तरी फुले शाहू आंबेडकर कळावेत.
आताची परिस्थिती पाहता फुले, शाहू आंबेडकरांचे विचार जास्त गरजेचे आहेत. नाहीतर राममंदिर, सण आले की मशिदी समोर dj लावणे, एका समूहाला टार्गेट करणे, नॉनव्हेज खता की वेज यावरून हिंसा होणे परत सुरू झालं आहे ते थांबलं पाहिजे.भीमा कोरेगाव मध्ये फायदा नेते लोकांचा झाला असला
तरी नुकसान सामन्य लोकांचं झालं आहे.उजव्या संघटने ने नेहमी फुले शाहू आंबेडकर यांचे विचार दाबले आहेत. ते परत सर्वांसमोर येणं गरजेचं आहे मग ते सोशल मीडिया असो की ग्राउंड वर पुढे आणले पाहिजेत. हा साधा बदल जरी केला आणि बहुजन पोरांना जरी आर्थिक, सामजिक बाबतीत जागृत केलं तरी चळवळ सफल!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#ThanksPhuleAmbedkar
इथे कलाकार मंडळी हातात फ्लेक्स घेवून सिनेमा पाहायला सिनेमा गृहात या.. रस्त्यावर उतरून सांगत होते त्याच वेळी केसावर फुगे सारखं गाणं कोणतीही जाहिरात न करता कोणताच सेलेब्रिटी नाही त्या गाण्यात तरी लाखो करोडो views भेटले.
फिल्म इंडस्ट्री,कला क्षेत्रात ला
जातीयवाद थांबला पाहिजे त्याशिवाय चांगला कंटेंट येणार नाही तोच तोच साचलेला रटाळ पणा येईल. इथ बहुजन वर्ग आहे त्याची लोककला, त्याचे प्रश्न तो दिसला तर काहीतरी नाविन्य येईल फिल्म मध्ये. आशा आहे नवीन प्रयोग होत राहतील.गायक शिंदे, वामनदादा कर्डक, कडूबाई खरात असे कलाकार छोट्या पडद्यावर
व्यापून जात आहेत.सोनी,झी सारखे चॅनल सुद्धा आता tv वर भीम जयंती चे कार्यक्रम भीम जलसा, बोला #जयभीम असे कार्यक्रम घेत आहे.ही स्पेस वाढली पाहिजे आणि हे शक्य आहे फक्त आणि फक्त बहुजन वर्ग जागृत झाला तरच. डिमांड वाढल की सप्लाय वाढतो.अगोदर हे कार्यक्रम होत नसत आता का होत आहेत
#ThanksPhuleAmbedkar
आज देशातील परिस्थिती पाहता पुन्हा क्षत्रिय शूद्र कडे वाटचाल होताना, मनुवादी शिवाजी महाराजांचा व नवक्षत्रिय लोकांचा हिंदुराष्ट्र करण्यासाठी वापर करून घेत आहेत.इतिहासात मोडतोड करून किंवा फक्त एका धर्मा विरुद्ध शिवाजी महाराज लढले हिंदू साठी अस मांडण्यात येत.
शिवजयंती वरून वाद निर्माण करणे, किंवा एखाद्या संमुहा बद्दल धार्मिक तेढ निर्माण करणे.याला इथले बहुजन बळी पडत आहेत. त्यांना शिवाजी महाराजांची समाधी शोधून जयंती साजरी करणारे फुले,शिवाजी महाराजांवर पवाडा करणारे अण्णा भाऊ साठे आणि जय भवानी ची घोषणा देणारेडॉ आंबेडकर यांच्या बद्दल
माहिती झाली पाहिजे. शिवाजी महाराजांची समाधी फुले यांनी शोधून काढली हे आता सर्वांना माहिती पण इतके दिवस समाधी दुर्लक्षित का राहिली याचा विचार का करत नाहीत आपण? ज्यांना शिकायचं वाचायचा अधिकार होता त्यांनी हे काम का नाही केलं ?त्यांच्याकडे साधन होती तर त्यांनी शिवाजी महाराजांना
#ThanksPhuleAmmedkar गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी येथील शूद्र अतिशूद्र यांना त्यांच्या गुलामीची जाणिव व्हावी व अज्ञान दूर करून त्यांनी गुलामगिरीतून बाहेर यावे या हेतूने लिहिले. शूद्र अतिशूद्र लोकांसाठी या पुस्तकाची किंमत त्यांनी अर्धी म्हणजे 6 आणे ठेवली होती.
हे पुस्तक जर वाचलं तर लक्षात येईल फुले यांनी ब्रह्मा, सरस्वती ते भक्त प्रल्हाद, विरोचन, बळीराजा, होळी, वीर गळ काढणे, खंडोबा,म्हसोबा यावर भाष्य करून एक प्रकारे हजारो वर्षाचा इतिहास आणि कसं शूद्र लोकांना अज्ञानात ठेवून त्यांचावर गुलामगिरी लादली आहे हे स्पष्ट केलं.
यात थेट त्यांनी परशुराम जर चिरंजीवी आहे तर यास हजर करावे असे आवाहन त्यांनी शिवाजी महाराज यांच्यावर लिहिल्या पोवाड्यात केले आहे. परशुरामाने हजर होऊन त्यांचसी 21 वेळा लढणारे हे महार मांग होते की नाही याची साक्ष करावी.