नुसतीच काथ्याकूट™ Profile picture
Apr 12, 2022 10 tweets 2 min read
#ThanksPhuleAmbedkar
फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काय बदल झाला पाहिजे आजच्या काळानुसार!
सर्वप्रथम चळवळ म्हणजे काय जर समजून घेतलं तर काय बदल करावे लागतील हे समजून जाईल. चळवळ म्हणजे लोकांच्या,समूहाच्या प्रश्नावर अनेक लोकांनी एकत्र येऊन केलेलं आंदोलन. कामगार चळवळ, शेतकरी चळवळ अशा अनेक चळवळी आपण ऐकतो पाहतो.यात सगळ्यात जर साम्य असेल तर लोकांचा सहभाग, लोक सहभाग हा महत्वाचा.फुले शाहू आंबेडकर चळवळीला परत गरज आहे ती शोषित वर्गाने एकत्र येण्याची.( provided त्या वर्गाला जाणीव हवी
Apr 9, 2022 5 tweets 2 min read
#ThanksPhuleAmbedkar
इथे कलाकार मंडळी हातात फ्लेक्स घेवून सिनेमा पाहायला सिनेमा गृहात या.. रस्त्यावर उतरून सांगत होते त्याच वेळी केसावर फुगे सारखं गाणं कोणतीही जाहिरात न करता कोणताच सेलेब्रिटी नाही त्या गाण्यात तरी लाखो करोडो views भेटले.
फिल्म इंडस्ट्री,कला क्षेत्रात ला जातीयवाद थांबला पाहिजे त्याशिवाय चांगला कंटेंट येणार नाही तोच तोच साचलेला रटाळ पणा येईल. इथ बहुजन वर्ग आहे त्याची लोककला, त्याचे प्रश्न तो दिसला तर काहीतरी नाविन्य येईल फिल्म मध्ये. आशा आहे नवीन प्रयोग होत राहतील.गायक शिंदे, वामनदादा कर्डक, कडूबाई खरात असे कलाकार छोट्या पडद्यावर
Apr 3, 2022 4 tweets 1 min read
#ThanksPhuleAmbedkar
आज देशातील परिस्थिती पाहता पुन्हा क्षत्रिय शूद्र कडे वाटचाल होताना, मनुवादी शिवाजी महाराजांचा व नवक्षत्रिय लोकांचा हिंदुराष्ट्र करण्यासाठी वापर करून घेत आहेत.इतिहासात मोडतोड करून किंवा फक्त एका धर्मा विरुद्ध शिवाजी महाराज लढले हिंदू साठी अस मांडण्यात येत. शिवजयंती वरून वाद निर्माण करणे, किंवा एखाद्या संमुहा बद्दल धार्मिक तेढ निर्माण करणे.याला इथले बहुजन बळी पडत आहेत. त्यांना शिवाजी महाराजांची समाधी शोधून जयंती साजरी करणारे फुले,शिवाजी महाराजांवर पवाडा करणारे अण्णा भाऊ साठे आणि जय भवानी ची घोषणा देणारेडॉ आंबेडकर यांच्या बद्दल
Apr 1, 2022 4 tweets 1 min read
#ThanksPhuleAmmedkar गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी येथील शूद्र अतिशूद्र यांना त्यांच्या गुलामीची जाणिव व्हावी व अज्ञान दूर करून त्यांनी गुलामगिरीतून बाहेर यावे या हेतूने लिहिले. शूद्र अतिशूद्र लोकांसाठी या पुस्तकाची किंमत त्यांनी अर्धी म्हणजे 6 आणे ठेवली होती. हे पुस्तक जर वाचलं तर लक्षात येईल फुले यांनी ब्रह्मा, सरस्वती ते भक्त प्रल्हाद, विरोचन, बळीराजा, होळी, वीर गळ काढणे, खंडोबा,म्हसोबा यावर भाष्य करून एक प्रकारे हजारो वर्षाचा इतिहास आणि कसं शूद्र लोकांना अज्ञानात ठेवून त्यांचावर गुलामगिरी लादली आहे हे स्पष्ट केलं.