#लातूर
काल परवाच मुंबईच्या एका मित्राशी बोलताना लातूर या विषयावर चर्चा झाली होती. आज दिवसभर TL वर लातूर संबंधित ट्विट बघितले अन हे ट्विटावं वाटलं.
∆
तुम्ही कुठल्याही शहरात जा, तिथे आवर्जून पाहण्यासारखं आणि अनुभवण्यासारखं बरंच काही असेल. त्या त्या शहरांची एक विशिष्ट ओळख असेल.
😱
जशी शनिवार वाडा वगैरे पुण्याची ओळख. कोल्हापूरला रंकाळा आहे. तशी लातूरची विशिष्ट अशी काही ओळख नाही. काहीजण ठिकाणांची यादी देतील. पण ती लातूरपासून तशी दूर आहेत. शहरात म्हंटलं तर गोलाईच्या पलीकडे खास असं काही नाही. गोलाई सुद्धा तासाभरात पाहून होते.
.
कोणी पाहुणे आले की त्यांना फिरायला कुठे घेऊन जावं हा प्रश्न असतो. लातूरची विशिष्ट अशी खाद्यसंस्कृती नाही जशी कोल्हापूर मध्ये तांबडा रस्सा किंवा नाशकात मिसळ आहे. तसं पाहिलं तर अनेक वेगवेगळे पदार्थ घराच्या जेवणाच्या ताटात मिळतील पण बाहेर कुठला फेमस पदार्थ नाही.
.
लातूर हे सामान्य किंवा अतिसामान्य आहे. हे मी सांस्कृतिक दृष्ट्या म्हणू शकतो. आर्थिक बाबतीत मात्र लातूर बरंच पुढे आहे.
तसं लातूरला विशिष्ट असं culture नाही... ते खूप चौकटबद्ध आहे... आणि ते बऱ्यापैकी आताच कमी होत आहे कारण नव्या पिढीची अर्ध्याधिक पोरं पुण्या मुंबईत जॉब करतात...
.
लातूरमध्ये नव्याने येणारा समूह आजूबाजूच्या परिसरातील आहे.
माणसाच्या मूलभूत गरजा भागल्या की पुढे सांस्कृतिक, अध्यात्मिक, कला, मनोरंजन, क्रीडा याबाबतीत विकास होत असतो. तसा तो इथे होताना दिसत नाही. लातूरची स्वतंत्र ओळख नाही, इथल्या शहराची ओळख हे अवलंबन आहे.
.
तरीही लातूर इतर अनेक शहरांच्या पेक्षा अधिक समृद्ध आणि संपन्न आहे. Happiness Index मध्ये लातूर देशातील अनेकांना मागे टाकेल.
लातुरात एक आहे जे या मोठ्या शहरात नाही. ते म्हणजे इथलं सुसह्य जीवन. तुम्ही जगाची चिंता सोडून, बिना गर्दीचं, आहेत त्या समस्येला स्वीकारूनही या शहरात...
.
अतिशय समाधानाने जगू शकतात. हे म्हणजे लातूर आहे! हे म्हणजे आमचं जीवन आहे! आमची संस्कृती अन आमची लाइफस्टाइल!
जे जे नवं ते लातूरला हवं म्हणत PVR, KFC, Dmart वगैरे मोठ्या शहरातील जीवनशैली जगण्याची साधनं इथं आहेत आणि दुसऱ्या बाजूला जुनी आपली रांगडी संस्कृती...
.
मनात जपून त्यानुसार जगणं सुरू ठेवणारा माणूस आहे. कालच्या आणि उद्याच्या मध्ये येणारा वर्तमान या शहरात आहे. ना उद्याची चिंता ना कालचं कसलं ओझं.
शहरं तिथल्या भौगोलिक परिस्थिती आणि प्रसिद्ध ठिकाणांमुळे ओळखली जातात पण त्याच्या पुढे असते संस्कृती अन त्याच्या पुढे असतो...
.
तिथल्या मानवी समाजाचा दृष्टिकोन! मुंबईकर माणसाच्या स्पिरिट बद्दल नेहमी बोललं जातं पण लातूरचं culture जगणं सुसह्य करण्याची सोपी आकडेमोड आहे.
Odin त्याच्या पोराला म्हणजे Thor ला म्हणतो, बेंबट्या आपलं Asgard म्हणजे आपलं राज्य नाही तर आपली माणसं जिथे असतील ते आपलं राज्य!
.
ते लातूरय भेंडी!
~°~
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
व्यवस्था मोठी खराब आहे.? पण ही आजची तक्रार नाही! कालची, परवाही नाही. ही अनादी काळापासून सुरू असलेली तक्रार आहे आणि अनंत काळापर्यंत सुरू राहणार आहे. कारण दोष व्यवस्थेत नाही तर व्यवस्थेत असणाऱ्या अन ती चालवणाऱ्या लोकांमध्ये आहे.
👇👇👇
जगाच्या पाठीवर जिथंही व्यवस्था आहे तिथे तिथे कधीतरी व्यवस्थेविरोधात बंडही उभं राहिलं आहे. कारण प्रत्येक व्यवस्थेत शोषित आणि शोषक असतोच असतो. हा चांगल्या-वाईटांचा संघर्ष सदैव असणारच आहे!
"जय भीम" हा त्याच संघर्षाला ठळकपणे अधोरेखित करणाऱ्या एका सत्य घटनेची जाज्वल्य प्रतिकृती आहे.
दाक्षिणात्य चित्रपट फार बटबटीत, उग्र आणि बऱ्याचदा अवास्तव पद्धतीने उभे केलेले वाटतात. पण जय भीम हा चित्रपट त्याला अपवाद आहे. व्यवस्थेच्या चौकटीत राहून अन्यायाच्या विरुद्ध उभ्या राहणाऱ्या एका योध्याची ही कथा आहे. व्यवस्था ही तीच आहे.
👇👇👇
आज तो एका अनोळखी, परक्या गावात एका झाडाखाली झोपला होता. मुक्कामासाठी दुसरीकडे जाणे शक्य नव्हतं. त्याला काहीतरी आठवलं... जवळपास वीसेक वर्षांपूर्वी, म्हणजे वयाच्या बावीशीत असताना तो याच गावात, याच झाडाखाली दुपारच्या वेळी झोपला होता. तेंव्हाच्या अन आजच्या परिस्थितीत खूप फरक होता.
👇
तुम्हीच सांगा, तुमची मनोवस्था काय असते अशा वेळी.? एखाद्या ठिकाणी तुम्ही खूप वर्षांनी आला आहात तेंव्हा काय वाटतं? कधी एखाद्या मंदिरात, गावात वगैरे गेल्यावर मनात पहिल्यांदा भूतकाळातील प्रतिमा जाग्या होतात. तेंव्हा आणि आज यातील भेद करू लागतो. माणसांच्या बाबतीतही हे लागू होतंच की!
👇
त्याचंही तसंच झालं होतं. त्याचं म्हणजे कुमारचं. शरीर, मेंदू थकलं असतानाही तो उठून बसला. जुन्या स्मृती जाग्या झाल्या. तो काळ म्हणजे मध्यमवर्गीय ही संकल्पना अजून उदयास आली नव्हती तो काळ.
कुमारचे वडील बोहरणपूरला मास्तर म्हणून कामाला होते. मोठं कुटुंब होतं. घरात कलह सुरू होते.
👇👇
◆सृष्टी का चक्र◆
बाजारात दोन कपड्यांची दुकानं होती। एक बरंच मोठं आणि जुनं। म्हणजे त्यांच्या तीन पिढ्यांपासून ते दुकान चालवलं जातं। दुसरं दुकान हे दोन वर्षांपूर्वी सुरू केलेलं। नवीन असल्याने स्पर्धा म्हणून त्या दुकानदाराने मोठ्या प्रमाणात ऑफर्स दिल्या व त्यासाठी कर्ज काढलं।
👇👇
नवीन दुकानदार जुन्या दुकानाला चांगली स्पर्धा देत होता। पण अचानक मंदी आली!!! इम्पोर्ट-एक्स्पोर्ट, टॅक्स अशाने आधीच त्रस्त असताना कोरोना आला... आधीचे सहा महिने कसेबसे ना नफा, ना तोटा या तत्वावर काढले होते। केवळ तग धरून रहावं म्हणून! पण आता पुढचे दोन तीन महिने काही चालणार नव्हतं!👇
बँकेचे हफ्ते चुकत होते... जागेचं भाडं देणं होतं... दुकानातील कामगार कमी करावे लागले... एकंदरीत, व्यवसाय डबघाईला आला!!!
पण दुसऱ्या बाजूला जो जुना दुकानदार होता त्याला नुकसान होतं पण तो त्याही परिस्थितीत तगून राहू शकत होता। कारण व्यवसाय जुना असल्याने त्यावर फार कसलं कर्ज नव्हतं।
👇