।। अभिषेकी ।। Profile picture
हवा थोडासा एकांत मला, जिथे कसली भ्रांत नसावी, निवांत असण्याचे मला वरदान आहे! #Dark #जर्जर
May 30, 2024 25 tweets 5 min read
काय भयंकर ऊन आहे रे... बरं झालं मी वेळीच कोल्हापूरला जाऊन स्थिरावलो.
मी माझ्या मित्राला, निष्पर्णला बोललो!
हो. मला जमलं नाही. मीही तिकडे आलो असतो तर बरं झालं असतं असं आता वाटत आहे. निष्पर्ण उत्तरला!

साल होतं 2050. मला आमच्या इंजिनिअरिंग कॉलेज मधून लेटर आलं होतं की Image तुमचा एक पेपर बॅक राहिला आहे त्याची परीक्षा देऊन जा नाहीतर तुमची डिग्री कॅन्सल होईल.
तसा मला डिग्रीचा, म्हणजे शैक्षणिक डिग्रीचा काही फायदा नव्हता पण तरीही मी परतलो होतो. शेवटी निष्ठा वगैरे काही असते का नाही हे वाक्य माझ्या मनात थैमान घालत असल्याने मी परीक्षा देण्यासाठी आलो होतो.
Oct 30, 2023 21 tweets 4 min read
लाईफ थ्रेड

आजकाल इन्शुरन्स अडव्हायजर (एजेंट) कस्टमर्सचा असा पाठलाग करतात की कस्टमरला स्वतःच्या घरात दरवाजे-खिडक्या लावून बसायची वेळ येत आहे. अर्थात सर्वच IA असे असतात असं म्हणत नाही, पण त्यांना ट्रेनिंग अशी दिली जाते की ते निबर होऊन फॉलो अप घेतात. दिवसातून सात-आठ वेळा फोन असेल किंवा डायरेक्ट घरी धाड टाकणे असेल, ही त्यांची नित्याची कामे झाली आहेत. लोकांमध्ये त्यांची इतकी दहशत झाली आहे के Agent येणार असा सुगावा लागताच घरातून बाहेर निघून जातात किंवा घरातच दडून बसतात.
Sep 30, 2023 24 tweets 4 min read
#डोळ्यांनी_बघितलेलं
संध्याकाळचे साडेसात वाजले असावेत. आलोक घरी आला. घरी कोणीही नव्हतं. त्याने जवळच्या किल्लीने दरवाजा उघडला. आत येऊन शूज काढले. शांतपणे दरवाजा ढकलला. तो तसाच आपल्या खोलीत गेला. लाईट लावली. हातातील ऑफिसची बॅग टेबलवर ठेवली. आकाशी रंगाचा शर्ट आणि काळी पॅन्ट असा फॉर्मल पेहराह अंगात असतानाही तो तसाच पलंगावर पाठ टेकवत पसरला. गरगर फिरणाऱ्या पंख्याकडे एकटक बघू लागला. मन विषण्ण होतं. एकाएकी कैक विचारांनी मेंदू व्यापून टाकला.
'घराच्या चार भिंतीत आल्यावर वेगळ्याच कृष्णविवरात आल्यासारखं वाटतं.'
Sep 5, 2023 5 tweets 1 min read
तुम्ही जर जॉब करत असाल तर तुमच्या बॉसला, मॅनेजमेंटला, सहकाऱ्यांना वगैरे असं वाटतं की तुम्ही कामासाठी जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे, वेळी-अवेळी फोन उचलला पाहिजे, प्रतिसाद दिला पाहिजे, उपलब्ध झाला पाहिजे.
व्यवसाय करत असतांनाही तुमच्या ग्राहकांना वगैरे वाटत असतं की तुम्ही त्यांच्यासाठी कायम उपलब्ध असावं, म्हणेल त्यावेळी काम करून द्यावं वगैरे.
बऱ्याचदा जबाबदारी म्हणून, प्रमोशन मिळेल म्हणून, पैसे मिळतील म्हणून तुम्हीही त्याप्रमाणे वागत असता. तुम्हालाही त्यातच स्वतःची प्रगती दिसत असते अन यश वाटत असतं. या अशा प्रकारच्या काळात,
Jul 4, 2023 11 tweets 4 min read
नेटफ्लिक्स वर Dark नावाची एक भयंकर किचकट सिरीज प्रदर्शित झाली होती. प्रेक्षकांच्या मेंदूचा भुगा होईल इथपर्यंत ती ताणली होती. त्या सिरीजमध्ये एक प्रश्न, एक संवाद होता, "Where is the origin?"
म्हणजे या सगळ्या गुंत्याची सुरुवात कुठे झाली? महाराष्ट्राच्या राजकारणात हा Dark प्रकार सुरू आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने याचा काहीतरी निष्कर्ष काढला आहे. साधारणपणे 2019 साली या गुंत्याची सुरुवात झाली असं बरेचजण म्हणतात, पण मला वाटतं याची सुरुवात त्यापूर्वी झाली आहे.
Jun 25, 2023 6 tweets 1 min read
आपल्याला कुठे 'थांबायचं' आहे याचं उत्तर वेळीच शोधलं पाहिजे. निरोप कधी घ्यायचा हेही समजलं पाहिजे. खूप खोल गुंतत जाणं हे मनासाठी हानिकारक असतं. आयुष्यभर टिकेल असं काहीच असू नये, असत नाही! मन रमेना झालं किंवा खूप काही मिळवलं आहे असं वाटत असेल तर लागलीच थांबावं. नवनवीन आयाम फिरायचे असतील तर जुने कुठेतरी थांबवलेच पाहिजेत. अनंत सुखाची ओढ प्रत्येक जीवाला असते. त्यासाठी जुन्या आठवणीत रमून कसं चालेल!
ज्यादिवशी वाटेल, आता खूप कमावलं त्यादिवशी काम थांबवावं.
ज्यादिवशी वाटेल की खूप जग फिरलो, मग स्थिरस्थावर व्हावं.
May 28, 2023 22 tweets 4 min read
बॅच थोडी उशिरा संपली. त्यात आज मेसवर जायचा जाम कंटाळा आला होता. म्हणून मग झोमॅटो ओपन केलं. चार पोळ्या अन हाफ भाजी निवडली. पेमेंट करताना कसलाच डिस्काउंट कोड लागू होत नव्हता. शिवाय डिलिव्हरी साठी 40 मिनिटे दाखवत होतं. मग तो बेत रद्दच केला. एकाएकी फारच निरस वाटू लागलं होतं. पण पोटावर कधी राग नाही काढायचा. मग चालत चालतच अमोलच्या मेसवर जावं म्हंटलं. चालल्याने थोडंसं फ्रेश वाटू लागलं होतं. मेसवर पोचलो तेंव्हा दहा वाजतच होते. मेसवरची गर्दी ओसरली होती अन अमोल टीम आवराआवरीच्या बेतात होता.
May 11, 2023 6 tweets 2 min read
बाळासाहेबांची शिवसेना कोणती हा विषय सुरू असताना सध्याची भाजपा अटलजींची भाजपा नाही हे सिद्ध झालं आहे. सत्तेला अन पदाला निर्लज्जपणे चिटकून राहण्यापेक्षा नैतिकतेला धरून राजीनामा देणारे अटलजी ज्या भाजपचे नेतृत्व करत होते ती भाजपा Image आज सत्तेसाठी वाट्टेल ते काळे धंदे करत आहे हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून सिद्ध झालं.
देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी अन अहंकारामुळे आज महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची राष्ट्रीय पातळीवर नाचक्की होत आहे. Image
Feb 26, 2023 9 tweets 2 min read
आर्थिक संकट कधीच सांगून येत नसतं. अलीकडेच 2-3 जणांचे फोन आले होते त्यावरून एक गोष्ट फार आग्रहपूर्वक सांगावी लागते की गुंतवणूक कराच पण ती आपल्या गरजेनुसार करा! आर्थिक नियोजन काळाची गरज आहे. या जगात पैशाशिवाय काही होत नाही. मला आलेले तीनही फोन वेगवेगळ्या वर्गातील व्यक्तींचे होते. 1. एक गृहिणी आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्या Mutual Fund SIP करतात. त्यांचं कुटुंब सर्वसामान्य कुटुंबासारखंच एक आहे. नवरा-बायको दोघेही थोडंसं कमावतात. काळाची गरज ओळखून त्यांनी SIP केली होती. अलीकडेच सरांना काहीतरी आजार झाला अन तो बळावत गेला. बऱ्यापैकी खर्च झाला.
Feb 22, 2023 11 tweets 2 min read
🚩 राणे, राज वगैरे बंड झाल्यावर शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरेंकडे होती आणि एवढं डॅमेज होऊनही 2007 साली मुंबई महापालिकेत शिवसेनेला (सोबत भाजप लाही) विजय मिळवून दिली.
1/n
🚩 2012 साली आव्हानात्मक परिस्थिती असताना परत मुंबई महापालिकेत शिवसेनेला विजय मिळवून दिला. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला.

2/n
Feb 18, 2023 5 tweets 1 min read
तसं तर तुम्ही उद्धव ठाकरेंकडून सत्ता, त्यांची माणसं, पक्ष, चिन्ह हिरावून घेतलं. कुटुंबातील सदस्यांनाही विरोधात उभं केलं पण उद्धव ठाकरे अजूनही माणसात आहेत, माणुसकीत आहेत. कुठेही आदळआपट नाही की थयथयाट नाही. सहा महिन्यांच्या प्रेमानंतर ती सोडून गेली की जीव सोडून रडणारे पोरं पण उद्धव ठाकरेंवर टीका करतात, पण सगळं काही गमावूनही हा माणूस कणखरपणे उभा आहे. कारण आत्मविश्वास! लोकांच्या मनात आपल्यासाठी खरं प्रेम आहे याची त्यांना शाश्वती आहे.
Feb 17, 2023 6 tweets 2 min read
रावण, कौरव, कंस असोत किंवा हिंदू पुराणांतील इतर खलनायक, त्यांना शेवटपर्यंत स्वतःच्या शक्तीचा अमर्याद अहंकार होता. त्या सर्वांना शेवटच्या श्वासापर्यंत एक घमेंड होता की मला कोणीच हरवू शकत नाही. पण आज त्यांचं नामोनिशाण नाही की त्यांचे कोणी समर्थक नाहीत. पण ती वृत्ती अजूनही या भूतलावर आहे. ती कधी हिटलरच्या स्वरूपात असेल किंवा अन्य कोणी... या सर्वामध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे अगदी अंतिम लढाईपर्यंत या खलनायक वृत्तीचं पारडं जड असतं आणि शेवटच्या एका क्षणी त्यांचा अहंकार तुटतो... आणि सत्याचा विजय होतो!!!
Oct 21, 2022 6 tweets 1 min read
आमचा एक मित्र होता ज्याचं एका मुलीवर खूप प्रेम होतं. तो सुरुवातीला तिच्या घरासमोर जाऊन राडा करायचा. बऱ्याचदा मुलीच्या वडिलांना तिचा हात मागितला. पण कर्तृत्व म्हणून त्याचं असं काहीच नव्हतं. त्याचं म्हणणं असं असायचं की आधी माझं लग्न लावून द्या मग मी तिला सुखी ठेवेन.
👇 पण कामधंदा काही नाही की जबाबदारीची जाणीव नाही. पण दिसायला एक नंबर होता. चौकात उभा राहिला की मुली त्याच्याकडे बघायला गर्दी करायच्या. पण फक्त चांगलं दिसतो या एका निकषावर मुलीचे वडील मुळीच ऐकणार नव्हते. मग त्याने सगळीकडून फिल्डिंग लावली पण फायदा झाला नाही.
👇
Sep 25, 2022 4 tweets 1 min read
कोऱ्या कागदावर पेनाने शब्द लिहीत असताना मी रिक्त होत जातो. निवडक शब्दांचं हे बंड म्हणजे माझं व्यक्त होणं असतं. अडतीस पावलांवर असलेलं तुझं घर अन कैक प्रकाशवर्षे दूर वाटू लागतं. मी घराबाहेर पडतो, खूप धीर एकवटून बरंका; धडधडत असलेलं काळीज, जड पडलेले पाय अन कापणाऱ्या हातांनी... केलेला तो प्रवास दिव्यत्वाची जाणीव करून देतो. मनातील वादळे, मेंदूतील गणिते सारं काही तुच्छ वाटू लागतं. तितक्यात वाऱ्याची एक झुळूक येते. माझ्या थरथरत्या हातातील पत्र उडून जातं. उंच उंच. मी बघतच राहतो! मला वाटतं ते तुझ्या बाल्कनीत जाऊन थेट तुला मिळेल, पण ते दुसरीकडे कुठेतरी जातं...
Sep 25, 2022 10 tweets 2 min read
#शोध
प्रत्येकजण आयुष्यभर काहीना काही शोधतच असतो. सुख, संपत्ती, प्रेम, स्वातंत्र्य, वासना, सत्ता, मैत्री, समाधान... काहीही म्हणजे अगदी काहीही शोध घेतला जात असतो. हरवलेल्या माणसांचा शोध घेण्यासाठी आयुष्य खर्ची घालणारी माणसंही असतात.
👇👇👇 जन्मापासून मृत्यूनंतर कशाचा ना कशाचा शोध सुरूच असतो. आपण ज्याचा आयुष्यभर शोध घेतोय ते ज्यादिवशी अवगत होतं तो क्षण आयुष्यातील सर्वात सुखाचा क्षण असतो. पण केवळ तुमचंच नाही तर तुमच्या कैक पिढ्या जर एका विशिष्ट शोधयात्रेचे प्रवासी असाल तर...?
👇👇👇
Jul 23, 2022 4 tweets 1 min read
या बंडात अनेक चांगले नेते-कार्यकर्ते दुरावले गेले आहेत हे खरंय. पण रामदास कदम त्यातील नाहीत. कदम, शिंदे किंवा अन्य काही म्हणतात आम्ही हयात घालवली शिवसेनेसाठी. पण असे कितीतरी कार्यकर्ते आहेत ज्यांना कधीही कसलंही पद मिळालं नाही तरीही ते कायम शिवसेनेसोबत राहिले. यांना सगळं स्वतःसाठी हवं असतं. बाळासाहेब किंवा उद्धव ठाकरे हे प्रचार करणार अन आमदार, खासदार इतर नेतेमंडळी होणार असंच वर्षानुवर्षे सुरू होतं. चंद्रकांत खैरे सुद्धा नाराज झाले होते. त्यांचा पक्षांतर्गतही वाद झाला अन मातोश्रीशीही, पण त्यांनी विषय तिथेच संपवला.
Jul 23, 2022 17 tweets 3 min read
✅तुम्ही गुंतवणूक करत नाही.?✅
माझं आत्ता वयच काय आहे. मी कशाला गुंतवणूक करू असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी...

माझा एक मित्र आहे. अंकित त्याचं नाव. परवा सहज बोलता बोलता गुंतवणूक हा विषय निघाला. मी त्याला विचारलं, 'तू गुंतवणूक का करत नाहीस.?'
👇👇👇 त्याने मला उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्न केला, 'मी गुंतवणूक का करावी.?'
मी गुंतवणूक क्षेत्रात काम करत असल्याने मी त्याला पटवून देऊ लागलो की आर्थिक नियोजन किती महत्वाचं असतं, भविष्याचा विचार केला पाहिजे, कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याचा विचार केला पाहिजे,
👇👇👇
Jul 21, 2022 9 tweets 2 min read
रात्रीचे दहा वाजले होते. रिमझिम पाऊस सुरू होता. काळ्याकुट्ट आभाळाला काळी छत्री दाखवत मी एखादी खानावळ दिसतेय का हे शोधत गावातले रस्ते भटकत होतो. काळ्याकुट्ट आभाळात पौर्णिमेच्या चंद्राचा पुसटसा पांढरा ठिपका दिसत होता तसंच...
👇👇👇 छत्रीच्या मधोमध पडलेल्या एका छिद्रातून पाणी माझ्या खांद्यावर पडत होतं. अलीकडेच सरकारने या गावाला तालुक्याचा दर्जा दिला होता. ती सरकारची चूक होती. कारण हे अजूनही एक मोठं गाव होतं. मी इथे तीन दिवसांपासून राहतोय. या भागात चांगलं हॉटेल वगैरे नव्हतंच. गावाचे दोन भाग होते.
👇👇👇
May 14, 2022 5 tweets 1 min read
#उधारी उसनवारी बंद. जोपासा आपले छंद, षेकी म्हणे!

लोकांना उधाऱ्या देऊन पैसे फुकट घालवण्यापेक्षा हे करा:

१. नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन प्राईम घ्या. कधी वेळ भेटला तर चांगले चित्रपट अन सिरीज बघता येतील. मनोरंजन होईल.
👇👇👇 २. देवळात धर्म करा. मनाला शांती भेटेल आणि धर्मकार्य केल्याचं पुण्य लाभेल.

३. वाचायची आवड असो किंवा नसो, चांगली पुस्तकं घेऊन ठेवा. कधीतरी वाचावं वाटेल अन ज्ञानात भर पडेल. शिवाय भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

४. विविध गरजू शाळांना, पूरग्रस्त, सेवाभावी संस्थाना मदत करा.
👇👇👇
Apr 17, 2022 10 tweets 2 min read
#लातूर
काल परवाच मुंबईच्या एका मित्राशी बोलताना लातूर या विषयावर चर्चा झाली होती. आज दिवसभर TL वर लातूर संबंधित ट्विट बघितले अन हे ट्विटावं वाटलं.

तुम्ही कुठल्याही शहरात जा, तिथे आवर्जून पाहण्यासारखं आणि अनुभवण्यासारखं बरंच काही असेल. त्या त्या शहरांची एक विशिष्ट ओळख असेल.
😱 जशी शनिवार वाडा वगैरे पुण्याची ओळख. कोल्हापूरला रंकाळा आहे. तशी लातूरची विशिष्ट अशी काही ओळख नाही. काहीजण ठिकाणांची यादी देतील. पण ती लातूरपासून तशी दूर आहेत. शहरात म्हंटलं तर गोलाईच्या पलीकडे खास असं काही नाही. गोलाई सुद्धा तासाभरात पाहून होते.
.
Nov 11, 2021 10 tweets 2 min read
व्यवस्था मोठी खराब आहे.? पण ही आजची तक्रार नाही! कालची, परवाही नाही. ही अनादी काळापासून सुरू असलेली तक्रार आहे आणि अनंत काळापर्यंत सुरू राहणार आहे. कारण दोष व्यवस्थेत नाही तर व्यवस्थेत असणाऱ्या अन ती चालवणाऱ्या लोकांमध्ये आहे.
👇👇👇 जगाच्या पाठीवर जिथंही व्यवस्था आहे तिथे तिथे कधीतरी व्यवस्थेविरोधात बंडही उभं राहिलं आहे. कारण प्रत्येक व्यवस्थेत शोषित आणि शोषक असतोच असतो. हा चांगल्या-वाईटांचा संघर्ष सदैव असणारच आहे!
"जय भीम" हा त्याच संघर्षाला ठळकपणे अधोरेखित करणाऱ्या एका सत्य घटनेची जाज्वल्य प्रतिकृती आहे.