ज्या व्यक्तीने भारताच्या स्वातंत्र्य मध्ये प्रचंड मोठी भूमिका पार पाडली ती व्यक्ती काळाच्या ओघात प्रचंड दाबली गेली. ती व्यक्ती म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. कितीही वर्ष त्यांचा मृत्यू व त्याबाबतची गूढता दाबण्याचा प्रयत्न भारतामध्ये
व भारताच्या बाहेर कायम झालेला आहे तरीदेखील सत्तर वर्ष होऊन सुद्धा या महान माणसाबद्दल असलेली भारतीयांना आत्मीयता ही प्रचंड आहे. त्यांच्या मृत्यूच्या गुढते बाबत जे वलय आहे ते तसेच आहे.
मी ह्याचा गाढा अभ्यासक नाही परंतु अनुज धर @anujdhar व @chandrachurg यांसारख्या दिग्गज लोकांनी वीस वर्ष हा विषय पिंजून काढला व त्याबद्दल देशात आणि देशाबाहेर त्याचप्रमाणे आयआयटीसारख्या संस्थांमध्ये अनेक व्याख्याने दिली त्याचबरोबर प्रचंड मोठी पुस्तके लिहिली.
ती पुस्तके म्हणजे केवळ कथा नाहीत तर या लोकांनी प्रचंड परिश्रम करून अमेरिकेच्या सीआयए पासून इंग्लंडमधील गुप्तचर संघटनांना त्यांच्याकडून काही कागदपत्रे मिळवून त्याचप्रमाणे भारतामधील असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या काही फाईल declassified करायला लावले.
त्या सर्व कागदपत्रांना त्यांनी हजारो पानांच्या पुस्तकांमध्ये छापलेले आहे व नेताजी यांचे नक्की काय झाले याबद्दल प्रचंड शोध घेतलेला आहे. ही सर्व पुस्तके इंग्रजी भाषेमध्ये आहेत त्यामुळे मराठी भाषेत याबाबत फारसे काही वाचायला मिळत नाही. त्यामुळे मी गुमनामी बाबा या नावाने एक लेखमाला
चालू करण्याचा विचार करीत आहे. ज्यामध्ये एकंदरीतच सुभाष चंद्र बोस यांचे 1945 मध्ये नक्की काय झाले व त्यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत कोणकोणत्या प्रकारच्या संभावना स्पष्ट होत गेल्या, त्यातील किती फोल होत्या व किती खऱ्या या सर्वांच्या बाबतीत मी थोडेफार माझ्या कुवतीप्रमाणे लिहायचा
प्रयत्न करेन.
त्यासाठी आपल्याला थोडे इतिहासात जाऊन देखील डोकवावे लागेल. आपल्याला नक्की स्वातंत्र्य कशामुळे मिळाले याची कारणमीमांसा बघावे लागेल.
मुळातच मूठभर इंग्रज भारतात राज्य कोणाच्या जोरावर करत होते याचा विचार केला असता हे लक्षात येईल
की मूळ इंग्रजांचे पोलीस किंवा सैनिक हे फार कमी होते म्हणजे अगदी दहा हजार देखील असतील नसतील सांगता येत नाही. बाकी संपूर्ण भारत हा इंग्रजांनी आपल्या हाताखाली ठेवला होता तो भारतीय सैनिकांच्या आणि पोलिसांच्या जोरावर. महात्मा गांधी यांचे छोडो भारत हे आंदोलन 1942 साली झाले होते.
त्याचा फारसा परीणाम त्याकाळात झालेला दिसत नाही. हे आंदोलन प्रत्यक्षात प्रचंड मोठे होते तरीदेखील दुसरे महायुद्ध संपेपर्यंत स्वातंत्र्य मिळणार नाही हे सांगून इंग्रजांनी हे आंदोलन दडपले. त्यानंतर दुसरे कोणतेही आंदोलन देशांमध्ये झालेले नाही 1947 पर्यंत. मग असे नक्की काय घडले
ज्यामुळे इंग्रजांनी अचानक देश सोडण्याचा निर्णय घेतला? 1. दुसरे महायुद्ध इंग्लंड जिंकले होते तरीदेखील आर्थिक दृष्ट्या मात्र त्यांचा कणा मोडला होता. दुसऱ्या महायुद्धामुळे एकंदरीतच इंग्लंडची परिस्थिती अत्यंत खराब झालेली होती. हे एक महत्त्वाचे कारण आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतासारख्य
प्रचंड मोठ्या देशावर राज्य करण्याकरता त्यांचा कस लागला असता. 2. ज्या सैनिकांच्या जोरावर पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध इंग्लंड लढले ते भारतीय सैनिक 1945 आली एका वेगळ्याच गोष्टीमुळे भारावून गेले ती गोष्ट म्हणजे आय एन ए. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी स्थापन केलेले INA.
जी गोष्ट गेल्या दीडशे वर्षांत घडली नव्हती ते पहिल्यांदा घडले ते म्हणजे भारतीय सैनिक व पोलीस ज्यांच्या जोरावर ब्रिटिश भारतावर राज्य करत होते तेच सैनिक आता सशस्त्र आंदोलनाचे गोष्ट बोलू लागले होते त्याचे कारण पूर्वेकडून येणारी प्रचंड जोरात विजय मिळवणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची
Indian National Army (INA).अर्थात भारताला स्वातंत्र्य मिळणार करता हजारो देशभक्त मग ते कोणत्याही पक्षाचे असतील त्यांचा हातभार लागलेला आहे यात वाद नाही. परंतु सलग शंभर वर्ष प्रयत्न करत असूनही जे फळ हाताला लागत नव्हते त्याची सुरुवात झाली होते नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पासून.
भारताच्या घटनेचे शिल्पकार व अत्यंत महान व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील आपल्या बीबीसी या वाहिनीवरील मुलाखतीत हे सांगितलेले आहे की भारताला स्वातंत्र्य मिळण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस हे आहेत. त्या काळातील भारतामधील महान नेत्यांचे
संपूर्ण स्वराज्य किंवा संपूर्ण स्वातंत्र्य हे ध्येय कधीच नव्हते. इंग्रजांच्याच वर्चस्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आपल्या लोकांनी आपल्या देशावर राज्य करावे अशी धारणा त्या काळातील प्रमुख लोकांमध्ये आढळून येते. ही गोष्ट नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कधीही मान्य नव्हती.
स्वतंत्र भारताचे पहिले चलन काढले होते ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या INA ने.
जर का सुभाषबाबू विमान अपघातात गेले नसते ( सर्वात मोठे गूढ हेच आहे ज्यासाठी ही लेख माला मी चालू केली आहे.) तर कदाचित भारताचे पहिले पंतप्रधान नेताजी झाले असते.
कारण तत्कालिन भारतामध्ये नेताजींची लोकप्रियता अत्यंत तुफान होती.
मी जे काही लिहीत आहे त्या गोष्टी मी अनुज धर यांच्या पुस्तकांमध्ये वाचलेल्या आहेत व त्याच प्रमाणे मला त्या लॉजिकली पटतात. त्यामुळे पुढच्या भागापासून मी सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूच्या गुढतेबाबत ज्या काही शक्यता
आहेत त्याबद्दल व व त्यातील किती शंका खऱ्या व खोट्या याबाबत बोलायचा प्रयत्न करेन. त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे व प्रूफ अनुज धर यांच्या पुस्तकातून येथे जोडण्याचा प्रयत्न करेन. बऱ्यापैकी डिटेल मध्ये हे लेख लिहिणार असल्यामुळे त्यांची लांबी जास्त असू शकेल.
आपला खरा महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत वाचायला आपण सर्व जण उत्सुक असाल अशी मी आशा बाळगतो. आज इथेच थांबतो.
गेल्या काही महिन्यांमध्ये ध्यानाविषयी काहीतरी लिही असे बऱ्याच जणांनी सांगितले परंतु मी अशा विषयावर लिहिण्यास पात्र आहे का हे मला माहीत नव्हते. आणि अर्थातच अजूनही मी त्याला पात्र नाही हे मला ठाऊक आहे. मी स्वतः हल्ली काहीच करत नाही त्यामुळे मला या विषयावर लिहिण्याचा
किंवा बोलण्याचा काय हक्क. तरीदेखील अनुभवी संत आणि आत्मसाक्षात्कार लोकांनी जे काही सांगितले आहे ते केवळ एक पोपटपंची करणारा या नात्याने लिहिण्याचा प्रयत्न करतो. खरेतर ज्या पद्धतीने शरीर कसे कमवावे हे केवळ एखाद्या मल्लाने किंवा पैलवानाने लिहिले पाहिजे व त्या गोष्टीला मी पूर्णपणे
छेद देत आहे त्याबद्दल क्षमस्व. या लिखाणामध्ये माझी स्वतःची कणभर देखील पात्रता नाहीये हे लक्षात सुरुवातीलाच घ्यावे.
असो तर,
आपण बऱ्याच वेळेला ध्यानाला बसणे किंवा ध्यान लावणे किंवा मेडिटेशन करणे या गोष्टी ऐकत असतो
गुमनामी बाबा-२ #netaji #नेताजी
1985 साल:
उत्तर प्रदेशमधील गुफ्तार घाट येथे फक्त मोजक्या माणसांच्या उपस्थिती मध्ये एक अंतिम संस्कार चालू होता. हा घाट भगवान श्रीराम यांच्या समाधी साठी देखील प्रसिद्ध आहे. भगवान श्रीराम यांनी या घाटाला जवळच जलसमाधी घेतली असे मानले जाते, त्यामुळे या
प्रभु श्रीराम यांचे मंदिर आहे व या जागेला धार्मिक दृष्ट्या एक महत्त्वदेखील आहे.
तो एरिया मिलिटरीच्या अंडर असल्यामुळे कोणत्याही परमिशन शिवाय पटापट हे अंतिम संस्कार उरकले गेले. कोणालाही याबद्दल माहित नव्हते व हे अचानक झालेले अंतिम संस्कारां नंतर
व्यक्तीची खोली उघडण्यात आली. आणि त्यानंतर जो काही गजहब आणि गोंधळ उडाला.
सात हजार पेक्षा जास्त गोष्टी त्या बंद खोली मधून घेण्यात आल्या. त्याचे एक छोटेसे सॅम्पल मी खाली फोटो मध्ये देणार आहे. त्यामध्ये हजारो पत्र व कागदपत्रे, मिलिट्री मध्ये वापरल्या जाणाऱ्या दुर्बिणी, गोल भिंगाचे
त्या संध्याकाळी तो एकटाच नदीच्या किनारी जाऊन झाडाला टेकून बसला होता. नेहमी मित्रांच्यात प्रचंड खेळणारा व दिवसभर दंगा करणारा तो शांतपणे कसलातरी गहन विचार करत होता. प्रचंड मोठ्या घडामोडी होणार होत्या त्याच्या केवळ एका निर्णयामुळे.
गेल्या काही दिवसातील घडलेल्या प्रसंगामुळे व एकूणच लहानपणापासून घडत आलेल्या गोष्टी यामुळे आपण नक्कीच वेगळे आहोत याची जाणीव त्याला होती. परंतु त्यावर त्याने कधी विचार केलेला नव्हता. आपले सवंगडी आपल्या गावातील लोक यांच्या प्रचंड प्रेमामुळे त्याला बहुदा हा विचार करण्यासाठी वेळच
मिळाला नव्हता. आपण केवळ त्यांच्यासाठी आहोत हेच भावना त्याच्या मनामध्ये होती.
परंतु आज वेळच अशी आलेली होती. त्याच्या एका निर्णयामुळे त्याचे स्वतःचे व आजुबाजू ला असणाऱ्या लोकांचे आयुष्य बदलणार होते कायमचे.
प्रसंग 1:
भोपाळमध्ये गॅस दुर्घटना झाली. प्रचंड लोक मृत्युमुखी पडले. अनेक घरे उद्ध्वस्त झाली. पण काही घरे अशी होती ज्यांच्या आजूबाजूला प्रचंड मनुष्यहानी झालेली होती पण त्या घरांना धक्का देखील लागलेला नव्हता. ना त्या घरातील लोकांना त्रास झाला.
या घटनेनंतर लवकरच
प्रणग 2:
रशियामधील चरनोबिल येथे अनुभट्टी चा स्फोट झाला व त्याचे रेडिएशन अगदी पोलांड पर्यंत येऊन पोहोचले. परंतु पोलंडमध्ये काही अत्यंत छोटी गावे अशी सापडली ज्यामध्ये आश्चर्यकारकरीत्या कोणत्याही किरणोत्सर्गाचा टच देखील झालेला नव्हता. ना तेथील गवतामध्ये
किरणोत्सर्ग आढळून आले शेतामध्ये ना पशूंमध्ये.
वरील दोन्ही घटनांमध्ये जी घरे नित्यनेमाने अग्निहोत्र करीत होते त्यांची घरे या हल्ल्यापासून वाचलेली होती. हो, पोलंडमध्ये देखील त्या गावांमध्ये काही घरांमध्ये नियमित अग्निहोत्र चालू होते.
2014 मध्ये नागझिरा येथे पहिल्यांदा गेलो. सोलो (एकटा) गेलो होतो. माझे सगळ्यात आवडते जंगल असेल तर ते म्हणजे नागझिरा. इतर जंगलां सारखा येथे बाजार भरलेला नाही. कमर्शियल गोष्टी अत्यंत कमी जवळपास नाहीतच. तेथे पिटेझरी नावाचे कोर जंगलाचे एकच गेट आहे.
हे जंगल त्या मानाने अत्यंत लहान आहे परंतु या जंगलाला नैसर्गिक देणगी अफाट आहे. येथे असलेली गर्द झाडी हे जंगलाचे वैभव. डिसेंबर महिना होता ज्या वेळेला मी या जंगलात आलो. 25 डिसेंबर. तरीदेखील अजिबात गर्दी नव्हती. लोकांना वाघ बघण्याचा आकर्षण जास्त असते तो येथे हमखास दिसेलच असे नाही.
डिसेंबर मधील विदर्भामधील थंडी आणि त्यामध्ये जंगलात असल्यामुळे ती थंडी अधिकच बोचरी होती. पितेझरी गेट जवळच म्हणजे तसे म्हटले तर या गेटच्या आत मध्ये तेथील गावकऱ्यांनी राहण्यासाठी तंबू ची व्यवस्था केलेली होती. पाच ते सहा तंबू व त्याच्या आजूबाजूला एक कुंपण टाकलेले होते.