Mayur.joshi.photography Profile picture
Everything is an illusion. only the Conciousness exists. Wild life l Nature l Macro l l landscape photographer 📸 🙏Advait Vedanta lover 🇮🇳 Proud Bhartiya
Sep 18, 2023 24 tweets 4 min read
माझे नायजेरियामधील गणपती विसर्जन:

आठ वर्षांपूर्वी मी गणपतीच्या सुमारास नायजेरियामध्ये होतो.

सर्वप्रथम थोडी नायजेरिया बद्दल माहिती देतो.

आता नायजेरिया हा आफ्रिका खंडातील एक बर्‍यापैकी मोठा देश आहे. तेथील आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. Image प्रचंड लाचखोरी आणि भ्रष्टाचार हा तुम्हाला नायजेरियात शिरल्याशिरल्या दिसतो.
जेव्हा तुम्ही एअरपोर्टवर उतरता त्याचवेळेला तेथील सेक्युरिटी चेक आणि इमिग्रेशनचे ऑफिसर तुमच्याकडे बघून नमस्ते म्हणतात.
मी इम्मिग्रेशन ऑफिसरसमोर गेलो. माझा पासपोर्ट त्याच्या हातात दिला. मला तो म्हणाला नमस्ते
Mar 19, 2023 7 tweets 2 min read
मुली च नेहमी अपेक्षा का सांगणार मुलांबद्दल..आज मी पण लिस्ट मांडणारच.🤓😒🙄
1. मुलीचे नाव भारतीय संस्कृतीला शोभेल असे असावे.
2. सोनेरी कुरळे लांबसडक केस (नैसर्गिक जन्मतः असलेले)
3. डोळे निळे असावेत. (जन्मतः)
4. तिच्या आई-वडिलांची काळजी तिने घ्यावी माझ्या आई-वडिलांची काळजी मी घेईन. 5. ती तिच्या घरी राहील मी माझ्या घरी राहीन.
6. आठवड्यात विकेंड सोडून दोन तीन वेळा ब्रेकफास्ट व डिनरला भेटण्यास हरकत नाही.
7. बाबू बिबू असे बाराखडी वाले शब्द न वापरता नावाने हाक मारणारी असावी.
8. रंग अत्यंत गोरा व त्वचा अत्यंत नितळ व सुंदर असावी.
9. दिसायला कमीत कमी जेनिफर connely
Mar 18, 2023 14 tweets 11 min read
स्त्रियांनी बाहेर पुरुषांप्रमाणे काम करू नये या मताचा मी अजिबात नाही उलट स्त्रियांनी आजच्या जमान्यामध्ये स्वावलंबीच असावे हे माझे आग्रही मत असते. परंतु हे मत बनण्यामागे समाज कारणीभूत आहे. समाजाने सगळ्यांच्याच अपेक्षा बदलवून ठेवलेले आहेत. काही दशकांपूर्वी जवळपास सर्व घरांमध्ये पुरुष काम करायचे व स्त्रिया घर सांभाळायच्या. त्यावेळेला मोठे घर किंवा फॉरेन ट्रिप या अपेक्षा देखील नव्हत्या. आता सामाजिक बदलानुसार स्त्रिया नोकरी करायला लागल्या व त्यानंतर नवरा व बायको दोन्ही कमवायला लागले त्यामुळे आपसूक सुरुवातीला काही
Mar 18, 2023 6 tweets 1 min read
स्त्री पुरुष सामाजिक गोंधळ.

अगदी सुरुवातीपासूनच सुरुवात करतो 😁🤪

नर आणि मादी या निसर्गाने तयार केलेल्या मुख्य जाती आहेत. त्यांच्यामध्ये काही नैसर्गिक गुण किंवा basic instincts निसर्गानेच टाकून ठेवलेले आहेत. जवळपास प्रत्येक प्राणी व पक्षी यांच्यामध्ये नर आपली टेरिटेरी, ग्रुप जपतो किंवा राहण्याची जागा तयार करतो, घरटे बांधतो, आपल्या सुंदर केसांचा पिसारा फुलवून दाखवतो किंवा नृत्य करतो किंवा विविध आवाज व आकर्षक रंग दाखवतो.
Mar 17, 2023 6 tweets 2 min read
इथे बऱ्याच मुली स्त्रिया या @sonalikulkarni काही वक्तव्यावरून तिच्यावर बराच काही भडिमार करत आहेत.
1. त्यापैकी किती मुली ज्यांचे लग्न झालेले नसेल, त्या नोकरी न करणारा व घरी बसून असलेल्या मुलाशी लग्न करायला तयार होतील? किंवा यापैकी लग्न झालेल्या किती मुलींनी असे इमॅजिन केले असेल लग्नाच्या आधी की आपला होणारा नवरा घर सांभाळेल व घरातच बसलेला असेल.
2. किती मुली लग्नाच्या आधी स्वतःचा फ्लॅट घेऊन (गुंतवणूक म्हणून नाही) त्या फ्लॅटमध्ये लग्न झाल्यावर आपण राहू याबद्दल खरंच विचार करतात?
Mar 17, 2023 4 tweets 1 min read
आळशी हा शब्द चुकला असेल.
परंतु मला सांग अशा किती मुली आहेत ज्या इमॅजिनेशन मध्ये देखील विचार करू शकत असतील की आपला होणारा नवरा काहीच कमवत नाही घरी बसलेला आहे व आपण सर्व घर चालवत आहोत.
समाजाने पाडून दिलेली पद्धत म्हण किंवा काहीही कारण असू देत.घरदार, भरपूर पगार, settle असलेला मुलगाच मुलींना लागतो.
किती मुली अशा विचार करतात की आपण स्वतःचे घर घेऊया व लग्न झाल्यावर आपला नवरा आणि आपण तिथे एकत्र राहू?
हातावर मोजण्या इतक्या देखील नसतील.
जास्तीत जास्त मुली या कमवत असल्या तरी देखील स्वतःच्या पैशाने घर शक्यतो घेत नाहीत.
Feb 3, 2023 4 tweets 10 min read
Do we have Free Will?

आपल्याला स्वतःची इच्छा/मर्जी असे काही आहे का? के आपल्याला वाटते की आपण काहीतरी स्वतःच्या मर्जीने करीत आहोत परंतु ती मर्जी देखील कोणीतरी आधीच ठरवलेली असते??

Very interesting topic..
Please do join..

twitter.com/i/spaces/1mnxe… @__aninda @omkarthatte @JK_Verse @MumukshuSavitri @AdvBHarshada @BrahmandSundari @AditiMumma @PankaajChitnis @AAvdhootdn @ajaypkale @KaduManus @gajanan137 @Rofl_Annu @PreetiSK1103 @ashwiniashwinee @krushnanuragini @Motabhaigujratw @saukhya22 @priyamvada22s @gogribeena
Feb 3, 2023 17 tweets 12 min read
कॉम्प्युटर किंवा मोबाईल आणि आपण यात बरेच साम्य आहे.
आपल्या शरीर म्हणजेच एका प्रकारे कम्प्युटरचे हार्डवेअर.
आपला मेंदू व त्याचे विविध भाग म्हणजे एका प्रकारे कम्प्युटरचा प्रोसेसर व मेमरी.
योगशास्त्रानुसार आपले चार देह आहेत. स्थूल
सूक्ष्म
कारण
आणि महाकारण
यामध्ये स्थूल देह व कम्प्युटरचे हार्डवेअर या गोष्टी अगदी सहजपणे समजून येऊ शकतात.
सूक्ष्म देह म्हणजे आपल्या मनाच्या जाणीवेवर चाललेल्या गोष्टी. मग ते स्वप्न असो किंवा कोणत्याही भावना.
कॉम्प्युटर मध्ये आपण याला ऑपरेटिंग सिस्टीम म्हणू शकतो.
Feb 2, 2023 9 tweets 2 min read
माझे एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे. हे कितीही कळकळीने सांगितले तरी पूर्ण असत्य किंवा भासमय वाक्य आहे. (मी पार्टनर बद्दल जे प्रेम सांगितले जाते त्याबद्दल बोलतोय)

का?

कारण
1. प्रेम हे पूर्णपणे अपेक्षा नसलेली भावना आहे अशीच प्रेमाची व्याख्या केली जाते. जेथे अपेक्षा आहे तिथे प्रेम असणे शक्य नाही
2. पार्टनर म्हणून ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात समोर येते त्यानंतर काही काळ गेल्यावर आपले त्या व्यक्तीवर प्रेम आहे असे आपण म्हणू लागतो
3.परंतु आता येथे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पार्टनर म्हणून माझ्या काही कंडिशन असतात त्या पूर्ण होणे गरजेचे आहे
Dec 24, 2022 38 tweets 15 min read
रिलेशन/ लग्नामध्ये होणाऱ्या सर्वसामान्य अडचणी:

एकमेकावर प्रेम करणारे लोक काही वर्षातच त्रासलेले असतात. त्रासलेले दिसतात. लोक एकमेकावर प्रेम करतात परंतु त्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या गोष्टीबाबत कधी विचार करत नाही. त्याचा कधीही अभ्यास देखील करत नाहीत. माझ्या बायकोला किंवा नवऱ्याला मी चांगलाच ओळखतो अगदी पाच वर्षापासून वगैरे असे वाटत असते लोकांना. परंतु पूर्णपणे चुकीची समजूत आहे ती.

मुळातच स्त्रिया आणि पुरुष हे पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या.
Dec 3, 2022 26 tweets 15 min read
त्रिकाळ
(ही निव्वळ काल्पनिक भयकथा आहे. कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीचा आणि घटनांचा याच्याशी कोठेही संबंध नाही)
भाग 1
कोकणा मधील एक गाव. तसे तुरळक वस्तीचे. भर पावसाळ्याचे दिवस होते. आधीच पुर येऊन गेलेला. यावेळचा पूर तसा भयानक होता. आजूबाजूच्या वस्त्यांमधील लोक वाहून गेले होते बाजूच्या गावांमध्ये प्रचंड मोठी दरड कोसळली होती. भर रात्री. अख्खीच्या अख्खी कुटुंब पूर्ण डोंगराखाली गाडली गेली. आजूबाजूचे सर्व गावे व त्यामधील लोक निसर्गाच्या अशा प्रकारच्या रूपाला भेदरून गेले होते.
एकंदरीतच स्मशान शांतता होती. एकप्रकारची काळी विकृत सावली पडली होती.
Dec 3, 2022 24 tweets 13 min read
तुला कल्पना नाहीये की मी तुला भेटवस्तू देण्यासाठी काय काय नाही शोधले
कोणतीच गोष्ट बरोबर वाटत नव्हती भेटवस्तू म्हणून.
कारण
सोन्याच्या खाणीला सोन्याचा कण देऊन काय उपयोग?
आणि समुद्राला पाण्याचा थेंब देऊन काय उपयोग? मी असेही म्हणू शकत नाही की माझं हृदय आणि आत्मा मी तुला देईन
कारण ते आधीच तुझं झालेल आहे
म्हणून मी तुझ्यासाठी आरसा आणलेला आहे.
त्यामध्ये स्वतःला बघ, मीच दिसेन.

रुमी....
Dec 3, 2022 12 tweets 11 min read
प्रसंग 1:
तुम्ही एका पर्वतावरील कड्यावर उभे आहात. पुढे अत्यंत कठीण असा रस्ता आहे. जेथे तुमच्या उजव्या बाजूला दरी आहे , डावीकडे दगडाची प्रचंड मोठी भिंत आणि रस्ता जेमतेम अर्ध्या फुटाचा.
आणि तुम्ही पुढे जायचा निर्णय घेता. प्रसंग 2:
तुम्ही जंगलात उभे आहात. तुमच्या समोर वाघ आला. तुम्ही पळून न जाता वाघावर हल्ला करून स्वतःचा बचाव करण्याचा निर्णय घेता.
प्रसंग 3:
तुमचे तुमच्या मित्राबरोबर प्रचंड भांडण झाले. मारामारी झाली. आणि तुम्ही त्या मित्राची कधीही न बोलण्याचा निर्णय घेतला
Dec 2, 2022 40 tweets 20 min read
Nandu's sanctuary:

दरवर्षीप्रमाणे 2020 मध्ये देखील देखील जंगलात जाण्याचे ठरवले. जंगलातला अनुभव हा वेगळाच असतो. परंतु त्या वर्षी जे काही बघितले ते मात्र अफाट आणि कल्पनेच्या बाहेर होते. लिहायचे म्हटले तर किती मोठे लिहावे लागेल याची कल्पना नाही. बाकी जंगलांमध्ये आपल्याला गाड्या फिरवतात व ठराविक जागां पाशी जाऊन आपल्याला प्राणी दिसतात किंवा पक्षी दिसतात व त्याचा आनंद आपण घेत असतो व फोटो काढत असतो. परंतु चिपळूण जवळ कोकणातील ही जागा मात्र बाकी जंगल सफारी या कल्पनेच्या पूर्णपणे वेगळी व अत्यंत जबरदस्त आहे.
Nov 30, 2022 4 tweets 11 min read
Nov 22, 2022 23 tweets 13 min read
अमावस्येची भुताटकी
2010 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला मी अलिबाग मध्ये आरसीएफ थळ या कंपनीच्या एका कामासाठी अलिबागला राहत होतो. आरसीएफ कंपनीचेच गेस्ट हाऊस किहीम ला होते.  तेथे मी आणि समिरन दत्ता म्हणून माझा ऑफिस मधील मित्र 3 महिने कामासाठी होतो. शनिवार-रविवारच्या एका सुट्टीसाठी जुलै महिन्यात मी महाड ला आलो होतो. तेथून परत अलिबागला जाण्याकरता संध्याकाळची गाडी पकडली. जुलै महिन्यातला दिवस होते प्रचंड पाऊस होता. त्यामध्ये अमावस्येचा दिवस त्यामुळे पावसाचा जोर थोडा जास्तच होता.
Nov 20, 2022 4 tweets 10 min read
एकाला स्वप्न पडले. त्याने ते मित्राला सांगितले. त्यावर मित्र म्हणाला "कायपण, असे स्वप्न पडूच शकत नाही, काहीही.. Prove कर तुझे स्वप्न."
आता तो काही स्वप्न मित्राला दाखवू शकत नाही. It's subjective experience.

देव नाहीच्चे आणि आहे तर दाखव म्हणणारे हे त्या मित्रासारखेच😂
#11pmWords @__aninda @omkarthatte @JK_Verse @MumukshuSavitri @AdvBHarshada @BrahmandSundari @AditiMumma @PankaajChitnis @AAvdhootdn @ajaypkale @KaduManus @gajanan137 @Rofl_Annu @PreetiSK1103 @ashwiniashwinee @krushnanuragini @Motabhaigujratw @saukhya22 @priyamvada22s @GogriBeena
Nov 20, 2022 4 tweets 11 min read
वक्रतुंड महाकाय... या श्लोकाचा अर्थ सांगणारा व्हिडिओ. बहिणीने बनवलेला आहे. तो जरूर बघावा. आणि शेअर करावा.
#learning
#संस्कृत
@__aninda @omkarthatte @JK_Verse @MumukshuSavitri @AdvBHarshada @BrahmandSundari @AditiMumma @PankaajChitnis @AAvdhootdn @ajaypkale @KaduManus @gajanan137 @Rofl_Annu @PreetiSK1103 @ashwiniashwinee @krushnanuragini @Motabhaigujratw @saukhya22 @priyamvada22s @gogribeena
Nov 19, 2022 7 tweets 11 min read
सांख्य शास्त्रात पुरुष आणि प्रकृती आहे.
पुरुष हा शांत, फारसे काही न करणारा घरच्या प्रमुखासारखा.
प्रकृती म्हणजे लग्न घरात घरातील स्त्री कशी सगळीकडे फिरून सगळे बघत असते तशी. पण कोणतेही महत्वाचा निर्णय असेल की ती मुख्य पुरुषाकडे जाऊन फक्त समत्ती मागते. तो देतो. मग पुढचे काम तींसुरू करते.

जग तसेच चालू असते असे सांख्य शास्त्राचे दृष्टिकोन.
परमेश्वर म्हणजे निराकार अनादी असा पुरुष. जो स्वतःहून कुठेच हस्तक्षेप करीत नाही.
माया म्हणजेच प्रकृती. जिच्यामुळे जग चालते.
Jun 16, 2022 27 tweets 12 min read
डिप्रेशन वरील अत्यंत जालीम व पूर्ण प्रभावी उपाय: अद्वैत वेदांत...

ज्याच्या बुद्धीला अद्वैत वेदांत थोडा जरी कळला असेल त्याच्या मनात कधी डिप्रेशन किंवा असले निगेटिव्ह विचार येणे शक्य नाही. आले तरीदेखील स्वतःहूनच त्यांना पळवून लावायची ताकद स्वतःच्या आत आपोआप आलेली असते. आजपर्यंत मी अनेक पोस्ट टाकल्या अद्वैत वेदांत यावर. परंतु असले कसले तत्वज्ञान किंवा उगाचच जड जड विषयांवर काय हा माणूस लिहित असतो असेदेखील बऱ्याच लोकांना वाटत असते. उगीचच डोक्याच्या वर चे विषय आणि अद्वैत वेदांत सारखे जड नावे बघून नव्वद टक्के लोक या गोष्टी वाचत नाहीत.
May 19, 2022 19 tweets 7 min read
आपल्या सध्याच्या सनातन धर्मात दुफळी का आहे याचे कारण शोधायचा प्रयत्न करत होतो.
खरे तर सनातन धर्म म्हणजे सर्वव्यापी.
याच ठिकाणी एकमेकाच्या मतांना आव्हान देणारी दर्शनांची निर्मिती झाली. प्रत्यक्षात कोणी किती दर्शने वाचली आहेत हे मला माहीत नाही. परंतु मुल सनातन धर्मात किती पद्धती आणि प्रकार आहेत हे देखील लोकांना माहीत आहे की नाही याबद्दल मला कल्पना नाही. परंतु केवळ आपल्या बायो मध्ये सनातनी असे नाव लावले की काम झाले असे प्रत्येकाला वाटते. सनातन धर्म याचे प्रमुख साहित्य मानले जाते ते म्हणजे वेद.
या वेदांना धरूनच अनेक दर्शनाची निर्मिती झाली.