रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही इंग्रजांनी बांधली, टिळकांनी फक्त “श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ निधी" नावाने आयुष्यभर निधी गोळा केला. आणि आपल्या उभ्या हयातीत त्यांनी रायगडावर एक खडा देखील बसविला नाही(1/n) #RajThackeray#raigad#shivsamarak
रायगडावरील छ. शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक व समाधी जीर्णोद्धार व्हावा हि छ.शाहू महाराजांचे वडील आबासाहेब घाडगे यांची ईच्छा होती, त्यांनी तसे जाहीर केल्यानंतर टिळकांनी लगेच हिंदू महासभेची सभा बोलवून आम्ही लोकवर्गणीतून शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार करू जाहीर केले(1/n)
त्यानंतर स्वतः छ.शाहू महाराजांनी त्याकाळी स्वतः कडून 5000रुपये टिळकांकडे सुपूर्त केले, त्यानंतर म्हणजे टिळकांचा शेवटपर्यंत म्हणजे 1920 पर्यंत एक दगड देखील बसविला नाही, ते आजारी असताना त्यांनी जाहीर केले कि मी हे पैसे एका संस्थेत टाकले आणि ती संस्था बुडाली... (1/n)
3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावरच छ. शिवाजी महाराजांचे निधन झाले, अंतिम संस्कारानंतर तिथेच त्यांची समाधी बांधण्यात आली होती, पुढे छ. संभाजी महाराजांचे राजवट आली, संभाजी महाराजांनंतर 1690 ला रायगड किल्ला मोघलांनी जिंकला आणि त्यांनी त्याचे नाव इस्लामगड केले (1/n)
पुढे 1690-1733 हा किल्ला मोघलांच्या ताब्यात होता, 1733 ला मराठ्यांनी तो वापस जिंकला,
1733-1818 पर्यंत समाधीचा उल्लेख सापडत नाही,
1818 मध्ये इंग्रज कर्नल फ्रॉथरने तो ताब्यात घेतला आणि 1819मध्ये कोलाबा गॅजेटमध्ये शिवसमाधीचा पहिल्यांदा उल्लेख आला(1/n)
पुढे राजयगडाचा पूर्ण नकाशा आणि अंदाज घेऊन इंग्रजांनी पुन्हा मराठे साम्राज्य उभारतील या दृष्टीने सर्व किल्ले निर्मनुष्य केले, त्यानंतर अनेक वर्षे तो किल्ला ओस पडला, त्यांनतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाधी शोधली आणि त्यावर पोवाडा लिहिला (1/n)
पुढे जेम्स डग्लस यांनी तिथे भेट दिली त्याचा उल्लेख दीनबंधू मध्ये देखील आहे, टिळकांकडून हयातीत काही जीर्णोद्धार होऊ शकला नाही. (1/n)
1926 ला इंग्रजांच्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी टिळकांच्या स्मारक समितीला पत्र देऊन स्मारकाबाबत विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या उत्तरात बँक बुडलेले उघड झाले, हे किर्लोस्कर गुरुजींच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्याचा उल्लेख आहे. मग इंग्रजांनीच छ.शिवाजी समाधीचे काम हाती घेतले (1/n)
मूळ अष्टकोनी चौथरा मग त्यावर छोटा अष्टकोनी चौथरा आणि त्यावरच राजपूत पद्धतीचे छत्र हे इंग्रजांनी बांधले ते 1926-27 दरम्यान. मग याशी टिळकांचा संबंध एवढाच कि त्यांनी केवळ पैसे गोळा केले आणि ते दुसरीकडे वळवले, याचे सर्व पुरावे आणि उल्लेख आहेत.
कृष्णराव अर्जुन केळुसकर लिखित "छत्रपती शिवाजी महाराज" चरित्राच्या प्रस्तावनेत केसरीकारांकडे(बाळ गंगाधर टिळकांकडे)1895 पासून जमा होत असलेला निधी पडून असल्याचा व त्याचा कुठलाही विनियोग करत नसल्याचा उल्लेख आहे, त्यासाटगी सादर प्रस्तावनेतील काही भाग..
वरील केळुसकर गुरुजींची प्रस्तावना एक पुरावा झाला तत्कालीन अनेक माध्यमात टिळकांनी समाधीसाठी 1रु चा देखील विनियोग केला नसल्याचे अनेक पुरावे सापडतील
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची खरी देखभाल हि तत्कालीन इंग्रज अधिकारी जेम्स डग्लस, रिचर्ड टेम्पल, कॅम्पबेल यांनी केली, त्यांनी वेळोवेळी रायगडाला दिलेल्या भेटींची वर्णने तत्कालीन नियतकालिके आणि एवढेच नव्हे तर खुद्द टिळकांच्या केसरीमध्ये उपलब्ध आहेत.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh