महाराष्ट्रात 2 लाखाहून जास्त मंदिरं आहेत आणि 3-4 हजार मस्जिद, भोंग्यांचा परिणाम बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक बाबींवर, सणांवर होणार हे लक्षात घ्या.
आता तुम्हाला फक्त आणि फक्त मशिदीवरचे भोंगे दाखवले जातायत परंतु कायद्याप्रमाणे भोंगे बंद झाले तर ते सर्वधर्मीयांच्या 👇
प्रार्थनास्थळांवरील भोंगे बंद होणार मग त्यात सगळी मंदिरे देखील आली. पहाटेच्या काकड आरत्या, रात्रभर हरिनाम सप्ताहात चालणारी मधुर भजनं, प्रत्येक सण उत्सवात चालणारे आवाज, हे सगळं काही बंद होईल. जर हे सगळं बंद झालं तर आयुष्य जगण्याची मजा राहिल असं वाटतं का ?? 👇
किती लोकाना या गोष्टींच्या आवाजाचा रोज त्रास होतो ते खरं सांगा बरं. माझं विचाराल तर काकडआरत्या,भजन,किर्तन,सणवारातले भोंगे आणि मशिदींवरील भोंगे या सगळ्याची बालपणापासून सवय झालेली असल्याने मला तरी हा मुद्दा आजच्या घडीला इतर सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांपेक्षा मोठा आहे असं वाटत नाही👇
हां एक गोष्ट मात्र मान्य आहे की आपल्या देवाची प्रार्थना म्हणजे एक भाव असतो, ती म्हणताना एक मधुर आवाज असावा जेणेकरून ती ऐकायला ही चांगली वाटते. कानाला अतिशय कर्णकर्कश वाटेल अशा आवाजात कुठल्याच धर्माचे भोंगे नसावेत हे मान्य आहे. 👇
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आवाजाच्या मर्यादेत राहून जर या गोष्टी केल्या तर सगळं काही व्यवस्थित होईल. त्यासाठी कुठल्या प्रार्थना स्थळांवरचे भोंगे हटवायची काही गरज आहे असं निदान मला तरी वाटत नाही.
सर्वच प्रार्थना स्थळांवरील भोंगे बंद झाले तर पुढे बघा मग काही दिवसांनी हा मुद्दा 👇
चर्चेतून बाहेर गेल्यावर आपलेच हिंदू निर्बंध उगाच घातले म्हणून बोलतील आणि त्यावेळी हेच आज भोंग्यावरून राजकारण करणारे पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते तुम्हाला असं सांगून भडकवतील की बघा आपल्या राज्यात मोगलाई आली आहे, आपल्या महाराष्ट्रात काकड आरत्या, भजन किर्तन यांवर बंदी आली आहे.
हे सरकार हिंदू विरोधी सरकार आहे, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं वगैरे वगैरे गोष्टी तुमच्या डोक्यात भरवतील.
आतापर्यंत गेल्या अडीच वर्षांत शेकडो गोष्टी करून झाल्या, कित्येक प्रकरणात राज्य सरकारची विनाकारण बदनामी देखील केली गेली तरी देखील महाराष्ट्र सरकार पडत नाहीए 👇
म्हणून आता हे जाती धर्माच्या मुद्द्याचं हत्यार उपसले आहे. याच्या मागचा मास्टर माईंड कोण आहे हे ओळखा. सगळं काही लक्षात येईल.
अजुनही वेळ गेलेली नाही या गोष्टींना बळी पडू नका. आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीचा विचार करून मुद्द्यांना महत्व द्या. जग कुठं चाललं आहे आणि आपण 👇
कुठं आहोत याचा विचार नक्की करा. सुख समृद्धी, गुण्यागोविंदाने राहत असलेला हा महाराष्ट्र असले मुद्दे पेटवून जातीय दंगलींच्या विळख्यात सापडू देऊ नका. महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो असं नेहमी म्हणलं जातं ते पुन्हा एकदा दाखवून देण्याची वेळ आली आहे.