नकुल Profile picture
May 9 27 tweets 7 min read
ज्ञानव्यापी मस्जिद:
पृथ्वीवरील मुक्तीधाम म्हणून ज्याचा उल्लेख पुराणात आढळतो ती भगवान श्रीशिवशंकरांची भूमी, त्रिशूळाच्या टोकावर जी नगरी वसली आहे ती पुण्यभूमी म्हणजे #काशी #बनारस .....
काशीमध्ये एकूण सहा कूप होते,ज्याचा उल्लेख वेद, पुराणांमध्ये आढळतो.त्यातील तीन #कूप किंवा तलाव हे काळाच्या ओघात नष्ट झाले.त्यातीलच एक कूप किंवा तलाव म्हणजे #ज्ञानव्यापी......
इतिहासकार अनंत सदाशिव आळतेकर यांनी १९३७ साली लिहिलेल्या #Historys_Of_Banaras या पुस्तकात त्यांनी मांडलेल्या एकूण तर्काचा विचार केला तर ते पुस्तकच त्याठिकाणी ऐतिहासिक पुरावा म्हणून सिद्ध होते, म्हणूनच सध्या चालू असलेल्या ज्ञानव्यापी मशिदीच्या केसमध्ये हिंदू पक्षकारांनी या
पुस्तकाचा दाखलाच न्यायालयात सादर केला आहे.
मशिदीवरील चबुतरा आणि त्यामध्ये स्तंभ यावरील नक्षीकाम पाहता ते कोणत्याही परिस्थितीत एका मशिदीचा अंश असू शकत नाही आणि ते स्तंभ हे चौदाव्या किंवा पंधराव्या शतकातील आहेत हे सहज स्पष्ट होते.
त्या पुस्तकामध्ये त्यांचा दावा आहे की सध्याच्या ज्ञानव्यापी मशिदीच्या परिसरातील त्याकाळी म्हणजे पंधराव्या शतकात असणाऱ्या शिवमंदिरात शंभर फूट उंचीचे शिवलिंग होते आणि लोक त्यावर त्यावेळी गंगेचे पाणी आणून त्यावर जल अर्पण करत असत.
त्या मंदिराचे गर्भगृह देखील शंभर फूट परिघाचे इतके विशाल होते. आता ते शिवलिंग दगडाने बंदिस्त करण्यात आले असून त्या ठिकाणी असणाऱ्या #श्रृंगार_गौरीची त्या काळात रोज पूजा-अर्चना होत असे. त्या खाली असणारे तळघर हे आजही चांगल्या स्थितीत असून आणि त्या ठिकाणी खुदाई झाली तर सरळ स्पष्ट
होईल हे सर्व त्यांनी या पुस्तकात नमूद करून ठेवण्यात आलेले आहे.
जगात कोठेही शिव मंदिरासमोर असणारा नंदी हा कधी मंदिराच्या दिशेने असतो पण तो नंदी आता सध्याच्या मंदिराच्या विरुद्ध दिशेला आपल्या देवाच्या दर्शनासाठी आजही तिष्ठत बसला आहे.
काशी विश्वनाथ मंदिराचा एकूण इतिहास पाहता जीर्णोद्धाराचा पहिला उल्लेख राजा हरिश्चंद्र यांच्या काळात झाला, आणि त्यानंतर दुसऱ्यांदा राजा विक्रमादित्य यांनी पुन्हा जीर्णोद्धार केला होता असा दावा केला जातो. बाराव्या शतकात दिल्लीचा सुलतान कुतुबुद्दीन ऐबक याने राजा विक्रमादित्य यांनी
बांधलेले मंदिर तोडले आणि त्या ठिकाणी असणारी सर्व संपत्ती लुटून नेली त्यावेळी त्याने या ठिकाणी असणारी एकूण हजारभर मंदिरे पूर्णपणे उध्वस्त केली होती पण त्यानंतर तेराव्या शतकात काशी विश्वनाथ मंदिर परत बांधण्यात आले चौदाव्या शतकात खिल्जी आणि तुघलकाने परत मंदिरावर आक्रमण करून परत
मंदिर ध्वस्त केले कारण मंदिरात होणारी मूर्तिपूजा आई एक प्रकारची #बुतपरस्ती असल्याचे इस्लाम मध्ये सांगितले आहे आणि त्याला इस्लाम मध्ये स्थान नाही या एकाच आधारावर परत मंदिर पाडण्यात आले. चौदाव्या शतकात मंदिर परत बांधण्यात आल्यानंतर जौनपूर या ठिकाणी राज्य करणारा शर्की
सुलतान याने परत मंदिर उद्ध्वस्त केले. त्यानंतर उभारलेले मंदिर पंधराव्या शतकात परत सिकंदर लोदीने या मंदिराबरोबरच काशीतील सर्व मंदिरे उध्वस्त केली. पण परत सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला परत मंदिर मोठ्या दिमाखात उभे राहिले. इतक्या वेळा मंदिर उध्वस्त केले तरी लोकांच्या मनातील
मंदिराविषयी असणारी श्रद्धा भक्ती आणि त्यासाठी असणारे समर्पण कोणीही तोडू शकले नाही. काशी येथील विश्वनाथ मंदिर वारंवार तोडल्याचा उल्लेख त्याकाळचे लेखक विद्वान #नारायण_भट यांनी संस्कृतमध्ये लिहिलेल्या #त्रिस्थली_सेतू या पुस्तकात नमूद केले आहे की त्याकाळात उध्वस्त करण्यात
आलेल्या काशी विश्वनाथ मंदिरचा १५८५ मध्ये त्यांच्या सांगण्यावरून राजा तोडरमल यांनी जीर्णोद्धार केला. त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे की जरी मंदिर पूर्णपणे नष्ट केले गेले तरी त्या स्थानाचे पावित्र्य हे अबाधितच राहते, त्यामुळे त्या स्थानाची पूजा ही केली जाऊ शकते.
विसाव्या शतकामध्ये इतिहासकार मोतिचंद यांनी लिहिलेल्या #काशी_का_इतिहास या पुस्तकात लिहिले आहे की विद्वान नारायण भट यांच्या काळात म्हणजे १५१४ ते १५९५ या दरम्यान तेथे कोणत्याही प्रकारची मशिद नव्हती.
ज्ञानव्यापीच्या एकूण क्षेत्रफळापैकी १२५×१८ फूट लांबीचा पूर्वेकडील भाग हा चौदाव्या शतकातील असणाऱ्या विश्वनाथ मंदिराचाच एक भाग आहे. मोतिचंद यांनी लिहिलेल्या या पुस्तकाला प्रस्तावना किंवा फक्त दोनच ओळी या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या आहेत.
अकबराच्या नंतर शहाजहान याच्याही काळात मंदिर तोडण्यासाठी फर्मान देण्यात आले होते. बादशहानामा या आपल्या पुस्तकात शहाजहान १६३२ मध्ये फर्मान देताना बुतपरस्ती त्या ठिकाणी चालत असल्याने आणि मूर्तीपूजक लोकांचा एक मुख्य अड्डा बनला असल्याने त्यावेळी ज्या ठिकाणी मंदिराचे बांधकाम चालू
आहे ती सर्व बांधकामे पाडून टाकण्यात यावीत असे सांगितले आहे. त्यावेळी #बनारस मध्ये चालू असलेली शहात्तर मंदिरांची बांधकामे पाडून टाकण्यात आली.
शहाजहान याच्या काळात इंग्रज इतिहासकार पीटर मुंडी हा आग्रा येथे आला होता.त्याने लिहिलेल्या आपले पुस्तक #The_Travels_Of_Peter_Mundi
या पुस्तकात आग्र्याहून मुगलसरायला जाताना वाटेत बनारसमध्ये एका माणसाला झाडाला फासावर लटकवण्यात आल्याचे दिसले तिथे त्याने चौकशी केली असता समजले की
शहाजहानच्या फर्मानानुसार इलाहबादचा सुभेदार हैदर बेग याने आपला चुलत भावाला मंदिर तोडण्यासाठी पाठवले होते फासावर लटकवण्यात आलेली व्यक्ती मंदिर पाडण्यास मनाई करत होती त्यामुळे त्याचा छळ करून मारून त्याला झाडावर लटकवण्यात आले होते.
बनारस मध्ये खत्री ब्राह्मण आणि बनिया या लोकांची वस्ती असून त्या ठिकाणी दूरवरून लोक देवाची पूजा करण्यासाठी येतात त्यामध्ये काशी विश्वनाथ मंदिर हे सर्वात प्रसिद्ध आहे,त्या मंदिरात मध्यभागी एक उंच मोठा घडीव दगड असून त्यावर नदीचे पाणी, फुलं, अक्षता,दूध,दही असे पदार्थ वाहतात.
त्या पुस्तकात कुठेही मशिदीचा उल्लेख केलेला नाही. १६६६ मध्ये औरंगजेबाच्या काळात जीवन शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन तेथून निसटले त्यामुळे औरंगजेबाला खूप राग आला. #मासिरे_आलमगिरी यामध्ये १७ जिलकिद हिजरी १०७९ म्हणजे १८ एप्रिल १६६९ त्यादिवशी औरंगजेबाला कळाले की
ठट्टा आणि मुलतान या सुबह मध्ये आणि खास करून बनारस मध्ये काही मूर्ख ब्राह्मण आपल्या रद्दी पुस्तकातून ज्ञानार्जन करून गुरुकुल चालवतात त्यामध्ये दूरवरून हिंदू विद्यार्थी आणि काही मुस्लीम विद्यार्थी शिकण्यासाठी येतात हे ऐकल्यावर बादशाहाने मध्ये फर्मान काढले की
सुभेदारांनी आपल्या इच्छेने त्वरितन #काफर लोकांची सर्व मंदिरे आणि गुरुकुल नष्ट करावीत औरंगजेबाने सर्व प्रकारच्या मूर्तीपूजा यासंबंधीचे शास्त्रांचे पठन आणि मूर्तीपूजा बंद करून त्यास पायबंद घालण्यात यावा. १५ रब्बूल आखिर हिजरी १०७९ म्हणजे २ सप्टेंबर १६६९ मध्ये औरंगजेबला खबर मिळाली की
त्याच्या आज्ञेने आमदाराने बनारस येथील विश्वनाथ मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त करून त्यावर मशिद बांधण्यात आलेली आहे. मोतीचंद यांच्या पुस्तकात लिहून ठेवले आहे की त्या ठिकाणी मंदिर पडल्यानंतर मशिद उभारण्यात आली. मंदिर पाडल्यानंतर मशीद उभी करताना पश्चिम भिंत पाडली आणि छोटे सर्व मंदिरे नष्ट
करण्यात आली. पश्चिमी उत्तरी आणि दक्षिणी मुख्यद्वार देखील बंद करण्यात आले द्वारावर असणाऱ्या शिखर पाडण्यात आले आणि त्या ठिकाणी गुंबज उभारण्यात आले. त्यामुळे मुख्य गर्भगृहाचे मशिदीत रूपांतर झाले आणि मुख्य दालनात नंदी मात्र तसाच ठेवण्यात आला. या मशिदीत काही भागात आजही मंदिराचे स्तंभ
आहेत. मंदिराचा जो भाग १२५×३५ त्याचे रूपांतर एका चौकात करण्यात आले. आज शिकवली जाणारी गंगाजमुनी तहजीब किंवा सर्व धर्म समभावाची व्याख्या काय आहे हे पाहिली तर आमची मंदिरे मुस्लिम आक्रांतानी पाडली आणि आज तरीही आम्हाला ती तीर्थक्षेत्रे मिळवण्यासाठी कोर्टाचा आधार घ्यावा लागतो.
पण नऊ मिनिटात स्थगिती देणारं न्यायालय याठिकाणी कानाडोळा तर करतच पण निकालासाठी देखील खूप वेळकाढूपणा करतं.....
जर हे सगळंच खोटं आहे तर खरं काय आहे ते तरी कुणी सांगावं....
🚩🚩🚩हर हर महादेव 🚩🚩🚩

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with नकुल

नकुल Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @theIVth1

May 2
काल राज ठाकरे ह्यांनी त्यांच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या सामाधीचा चा उल्लेख केला त्याविषयीचा प्रस्तुत धागा:

३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर शिवरायांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर रायगडावर महाराजांची समाधी बांधण्यात आली.
संभाजी महाराजांच्या निधनानंतर ३ नोव्हेंबर १६८९ रोजी रायगड मोगलांच्या ताब्यात गेला व मोगलांकडून सिद्दीच्या ताब्यात आला.
५ जून १७३३ रोजी रायगड परत मराठ्यांच्या ताब्यात आला . रायगड ४३ वर्षे परकीय राजवटीत होता. परंतु समाधीच्या बांधकामाविषयी किंवा तिच्या
देखभालीविषयीचे कोणतेही उल्लेख तत्कालीन कागदपत्रे किंवा बखरीमध्ये आढळून येत नाहीत . शिवरायांच्या समाधीचा प्रथम उल्लेख येतो तो १८८३ साली. सन १८१८ साली रायगड इंग्रजयांच्या ताब्यात गेल्यानंतर रायगड किल्ला आणि शिवसमाधी हि इंग्रज सरकारच्या जंगल खात्याच्या ताब्यात आली.
Read 30 tweets
Apr 18
अश्या अनेक मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपनी आहेत ज्यांच्या मोहात अनेक तरुणांनी आपली नोकरी आणि कामे सोडून नाडी लागलेत आणि कर्जबाजारी झालेत. ह्या कंपन्यांची modus operandi आहे. ते आधी समाजातील प्रतिष्ठित लोकांना हेरतात त्यानंतर त्यांना मेम्बर बनवतात
त्यामुळे साहजिकच ते लोक आपल्या ग्रुप सर्कल मधल्या लोकांना त्यात खेचतात आणि ते लोकं कॉलेज चे विद्यार्थी, फ्रेशर्स, आणि हाऊस वाईफ ह्यांना टार्गेट करतात. सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे आणि खूप पैसे हे लगेच दिसत असल्यामुळे हे सगळे त्या जाळ्यात अडकतात.
ह्यामध्ये अजून एक गोम अशी आहे की,
ह्यांचे मिटिंग पॉईंट्स हे एकतर कुठले हॉटेल किंवा मॅक्डोनल्डस किंवा कुठले कॉफी हौस अश्या ठिकाणी असतात जिथे तरुणांची चांगलीच रेलचेल असते. मुद्देसूद प्रेझेंटेशन आणि भुरळ पाडेल असे कम्युनिकेशन असल्यामुळे आजूबाजूचे लगेच आकर्षित होतात आणि त्यांच्या जाळ्यात अडकतात.
Read 5 tweets
Apr 18
औरंगजेबाचा पुनर्जन्म

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरुषार्थापुढे गलितगात्र झालेला औरंगजेब १७०७ मध्ये अल्लाला प्यारा झाला.
अल्लापुढे आपल्या कर्तृत्वाचा लेखाजोखा मांडताना तो प्रचंड बेचैन झाला होता आणि हुंदके देऊन वारंवार रडू लागला. अल्लाने त्याला त्याच्या बेचैनीचे कारण विचारले.
शिवाजीराजांमुळे हिंदूंचा संपूर्ण निःपात करता न आल्याचे आत्यंतिक दुःख औरंगजेबाला झाले होते.अल्लाला औरंगजेबाच्या खुनशी स्वभावाची आणि त्याने केलेल्या पापांची प्रचंड चीड आली होती पण औरंगजेबाचे स्फुंदून स्फुंदन रडणे पाहून अखेल अल्लाला त्याची दया आली आणि त्याने त्याला धीर देत शांत केले
'बोल तुझी काय इच्छा आहे आता?
अल्ला.
' मला पुन्हा शिवाजीराजांच्या राज्यात जन्म घ्यायचा आहे आणि हिंदूंना पूर्णपणे नामशेष करायचे आहे' डोळे पुसत औरंगजेब म्हणाला.
मानवतेला हरताळ फासण्याची ही इच्छा ऐकून अल्ला आणखीनच संतापला आणि त्याने संतापाने औरंगजेबाला सैतानाचा स्वाधीन केले.
Read 17 tweets
Mar 16
#TheKashmirFiles च्या निमित्ताने एक फेसबुक वरच्या पोस्ट चा मराठी अनुवाद, अनेक लोक जेव्हा म्हणत आहेत की जेव्हा Genocide झाला तेव्हा BJP आणि संघ काय करत होते?
प्रस्तुत लेख त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी.
चित्रपटात दाखवलेल्या अनेक घटना असत्य असून असं काही घडलंच नाही म्हणणारे अफीमखोर इथपासून ते तेव्हा तर भाजपचं सरकार होतं मग आता कशाला उर बडवतात विचारणारे शेणके यांच्यासाठी...
"Geeta Bhawan "the RSS office in JAMMU became the control room for facilitating rented a
ccommodation and camps in Jammu for Kashmiri Pandits who were forced to leave the Valley.
14 सप्टेंबर 1989 हा काश्मीरी पंडित आणि रा. स्व. संघ/भाजप च्या आयुष्यातील एक काळाकुट्ट दिवस. याच दिवशी दहशतवाद्यांकडून टिकालाल टपलू यांची हत्या झाली.
Read 26 tweets
Mar 14
काश्मीर फाईल्सचं IMDB रेटींग काल (१२ मार्च) पर्यंत १०/१० होतं, आज (१३ मार्च) ला ८.३ पर्यंत खाली आले आहे. दुसऱ्या बाजूने जोरदार निगेटीव्ह रेटींग देणं सुरु झालं आहे.

IMDB रेटींग हे जगभरातील सिनेमाच्या प्रसिद्धीचे प्रमाण मानले जाते.
जितके जास्त हे रेटींग तितकी जास्त जगभर त्या चित्रपटाची दखल घेतली जाते आणि त्यावर चर्चा होते. आजपर्यंत काश्मीरची एकच बाजू जगासमोर आली आहे. काश्मीर आणि काश्मीरी हिंदूंचे भयाण वास्तव जगासमोर येण्यासाठी या चित्रपटाची ओळख जगाला होणे गरजेचे आहे.
यासाठी मोठ्या संख्येने या चित्रपटाला १०/१० रेटींग द्या.
यासाठी फक्त खालील लिंकवर जाऊन आपल्या गुगल किंवा फेसबुक अकांऊटमधून लॅागीन करा आणि या चित्रपटाला १०/१० रेटींग द्या. 🙏
m.imdb.com/title/tt108111…
@hypernationalst @patilji_speaks @ThePawanUpdates @akku_kohale @Mooon_Shinee
Read 4 tweets
Feb 2
लाईन मारणे - आपल्या काळातली अभूतपूर्व कला*

आता ही कला हळूहळू पडद्याआड गेली आहे . फक्त बघून ओळख नसताना सुद्धा एखाद्या आवडत्या मुलीला आपल्या प्रेमात पाडायचे हीच ती कला म्हणजे 'लाईन मारणे !' लाईन मारणे' ही एक शास्त्रीय संकल्पना होती .
वर्गातली किंवा एरियातली एखादी सुंदर मुलगी आवडली की मग ही प्रोसेस सुरू व्हायची .
ती आवडलेली मुलगी कितीतरी जणीत भन्नाट वगैरे असायची . तिचे एकूणच वर्णन करताना शब्द की काय म्हणतात ते अपुरे पडायचे . मग प्रोसेसची पुढली पायरी , जर ती आपल्या एरियात राहणारी असेल तर तिचे पूर्ण नाव ,
राहते कुठल्या चाळीत , शाळेत आहे की कॉलेजला , रोज किती वाजता घरातून बाहेर पडते , कशी जाते , बरोबर कुणी असते की एकटीच जाते , हा सगळा अभ्यास केला जायचा . मग तिच्या येण्याजाण्याच्या वाटेवर ती व्यवस्थित दिसेल असे उभे राहून नुसतेच रोज तिला डोळे भरून पाहणे आणि उसासे टाकणे सुरू व्हायचे .
Read 19 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(