#फोटोग्राफी_टीप #photography_tip #thelonewolfotos
कॅमेरा पेक्षा खरा फोटोग्राफर फ्रेमींग बघतो. म्हणजे फोटो च्या आत कोणती वस्तू कशी आहे कोणत्या जागी आहे. याचा अभ्यास आयुष्यभर केला तरी संपत नाही असे मोठे फोटोग्राफर सांगत असतात.
त्यामुळे कंपोजीशन किंवा फ्रेमिंग सगळ्यात महत्त्वाचे.
हल्ली प्रत्येकाकडे मोबाईल असतो त्यामुळे ही प्रॅक्टीस प्रचंड सोपी आहे. 2008 पासून मला सवय लागली आहे मी माझ्या बाईकच्या आरशाचा उपयोग फ्रेम म्हणून करतो. कुठेही थांबलो असेल तर त्या आरशातून मागे बघायची मला सवय लागली आहे. मग आरसा हलवत बसायचा व त्याचे चौकोनी आरशात, मागील दिसणारे जग
जास्त कोणत्या अँगलने चांगले दिसेल हे बघत बसायचे ...hehe. तुम्ही म्हणाल काय वेड्याचे चाळे आहेत. पण खरच सांगतो या गोष्टीमुळे चौकोनी प्रेम मध्ये गोष्टी कशा चांगल्या बसवाव्यात हे थोडेफार समजू लागले व ती सवय लागली. हल्ली मोबाईल असल्यामुळे सरळ मोबाईलचा कॅमेरा ऑन करावा व मोबाईलमध्ये
समोर दिसणारी गोष्ट नक्की कशी चांगली दिसेल, हे बघायचा अभ्यास करावा. असे विविध फोटो काढून त्यात फरक समजावून घ्यावा. आता माझ्या समोर चहा च ग्लास आहे. समोर असलेल्या चहाच्या ग्लास चे 3 फोटो काढले. असे अनेक काढता येतील. बंजारा गावावरून
जागेवरून उठून पूर्णपणे दुसऱ्या बाजूने तो फोटो कसा दिसेल. अशोक पद्धतीने कितीतरी प्रकार प्रॅक्टिस करता येतात परंतु या प्रॅक्टिस मुळेच डोळ्यांना व मेंदूला सवय लागते. त्यामुळे सुरुवातीला आपण दहा फोटो काढले की त्यातील एक फोटो चांगला येतो. त्यात angle, जागा, मागील लाईट
म्हणजेच बॅक लाईट, फॉर ग्राउंड मधील वास्तू म्हणजे समोर असणाऱ्या वस्तू किंवा जागा या बरोबर आलेल्या असतील. या गोष्टीची प्रॅक्टिस झाली की पुढे जाऊन पाच फोटोमधील एक फोटो चांगला येईल व त्यानंतर तुम्हाला पक्के माहीत असेल की मी कोणत्या जागेवरून फोटो काय काढला तर मला जे अपेक्षित आहे ते
मिळणार आहे.
ज्याला खरोखर उत्साह आहे त्यांच्यासाठी मी एक छोटासा एक्झरसाइज देतो.
एक रुपयाचे नाणे घ्या. जमिनीवर ठेवा. व त्याचे विविध चार फोटो काढून या पोस्ट खाली पोस्ट करा. मग येथे असलेल्या अनेक फोटोग्राफरच्या सहाय्याने आपण त्यातील बरोबर आणि चुकलेल्या गोष्टी शोधून काढू.
आपल्याला आपली फोटोग्राफी सुधारायची आहे तर अशा पद्धतीने अभ्यास करत गेलो तर तीन ते चार महिन्यांमध्ये तुम्हाला स्वतःच्या फोटो काढण्याच्या विचारसरणीत परत झालेला दिसून येईल. त्यामुळे कोणाकोणाला हा अभ्यास करायला आवडेल त्यांनी यात सहभागी व्हा.
या पोस्टखालीच किंवा या पोस्टला #RT करून त्यामध्ये एक रुपयाच्या नाण्याचे जमिनीवर ठेवलेले वेगवेगळ्या प्रकारे चार वेगळे फोटो कसे दिसतील हे टाकायचे प्रयत्न करा म्हणजेच फोटोंचा आनंद घेता आपण सगळेच एकत्र शिकूया. #thelonewolfotos#wolf_photo_lessons#फोटोग्राफी_टीप हे hashtag use करू.
@omkarthatte@AjayApte1@wildontheright व अजून फोटोग्राफी मधील एक्सपर्टलोक येथील सगळे फोटो बघतील, त्यावर सुधारणा सांगतील अशी छोटी अपेक्षा करतो. जेणे करून सगळ्यांचा खूप फायदा होईल. @omkarthatte please i request u to add the name of photography experts so that PPL will benifit🙏🙂
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
ओम
या शब्दाला आपल्याकडे प्रचंड महत्त्व आहे. याचा अर्थ विविध प्रकारे सांगण्यात येतो. परंतु एक उपनिषद खास या शब्दासाठी तयार केले गेले आहे ते म्हणजे मांडक्योपनिषद.
अ ऊ म या तीन अक्षरांचा व त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा अर्थ या उपनिषदात सांगण्यात आला आहे.
तर हे उपनिषद काय सांगते? केवळ 12 श्लोक असलेले हे उपनिषद्. यामध्ये कोणत्याही दैवतांची चर्चा नाही, आपण रोज जे काही अनुभवतो त्या गोष्टींचा आधार घेऊन ब्रह्म म्हणजेच परमेश्वर काय आहे तो सांगण्याचा प्रयत्न यात आहे. अद्वैत वेदांत किंवा उपनिषदांची खासियत हीच.
रोजच्या रोज आपण जे काही अनुभवतो त्याचा आधार घेऊन बुद्धीच्या द्वारे त्याच्या खोलात शिरून त्याचा नक्की अर्थ काय हे समजून घेणे.
तर मांडक्योपनिषद हे सांगते आपल्या तीन अवस्था ज्या आपण रोज अनुभवतो 1. जागृतावस्था: आपण रोज दिवसभरात जे काही करत असतो ते म्हणजे जागृत अवस्था 2. स्वप्नावस्था:
बरेच लोक मला विचारतात कि कोणता कॅमेरा घेऊन डीएस्एल्आर मध्ये कोणता चांगला कॅमेरा आहे?
परंतु माझे उत्तर थोडे वेगळे असतात कारण मी ज्या पद्धतीने माझ्या आयुष्यात शिकत गेलो त्या पद्धतीने मी सांगतो.
पहिल्यांदी कधीच डीएस्एल्आर घेऊ नका असेच मी सांगेन.
अर्थात हल्ली डीएस्एल्आर तीस हजार मध्ये देखील येतो. त्याबरोबर एखादी लेन्स येते शक्यतोवर १८-५५ mm. परंतु खरोखर फोटोग्राफी मध्ये इंटरेस्ट असेल तर त्यामध्ये कोणत्याच प्रकारचे एक्सपिरिमेंट करता येत नाहीत. मग नवीन लेन्स घेणे भाग. तिची कमीत कमी किंमत बारा ते पंधरा हजार पासून असणार
आणि हे सर्व करीत असताना आपल्याला नेमके कोणत्या प्रकारची फोटोग्राफी आवडते याचा स्वतःलाच अंदाज येत नाही. त्यापेक्षा मी तरी असे सुचवतो की सर्वात पहिले हाय एंड डिजिटल कॅमेरा घ्या. त्यामध्ये तुम्हाला प्रचंड झूम मिळतो. हल्ली अक्षरशहा चंद्रावरील खड्डे बघता येतील अशा पद्धतीने झूम मिळतो.
आजच साईबाबा याविषयी बऱ्याच पोस्ट बघितल्या व लोकांच्या कमेंट बघितल्या. परंतु खालील गोष्टीची कल्पना त्यांना असते की नसते हे माहीत नाही. 1. लोकांना वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे महाराज माहिती असतील तर स्वतः टेंबे महाराज यांनी साईबाबा यांना नारळ पाठवल्याचे लिखित रूपात आढळले आहे.
2. लोकमान्य टिळक यांनी ज्याप्रमाणे शेगावचे गजानन महाराज व गोंदवलेकर महाराज यांचे आशीर्वाद आपल्या स्वराज्यस्थापनेच्या कार्यासाठी घेतले होते तसेच ते शिर्डी येथे जाऊन साईबाबांना भेटल्याचे देखील आढळते.
3. नाशिकचे अत्यंत महान नाथपंथी योगी श्री ब्रह्मभूत गजानन महाराज गुप्ते यांनी
स्वतःच्या आत्मचरित्रात " आत्मसाक्षात्कार मार्ग प्रदीप" यामध्ये लहानपणी साधनेच्या कालखंडात ते शेगाव येथे गजानन महाराज त्याचप्रमाणे मारुती महाराज शिर्डी येथील साईनाथ महाराज यांच्या सहवासात राहिल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे.
माझ्या आयुष्यात पहिला काढलेला फोटो.
माझ्या आईचा. तिसरीत असताना.
ती चिडली होती काही कारणाने माझ्यावर. आणि मी माकड उड्या मारत बसलेलो
तेव्हा बाबांनी हळूच आमचा कॅमेरा दिला माझ्या हातात. आणि हा फोटो क्लिक झाला. #MothersDay#MotherDay2022#photo#PhotoOfTheDay
त्यानंतर राजधानी एक्स्प्रेस मध्ये 1999 मध्ये हा काढलेला
बरेच लोक स्थळ जुळवणे, लग्नामध्ये मध्यस्थी करणे वगैरे वगैरे काम करत बघितलेले आहे. बसल्या बसल्या कुंडल्या जुळवत बसणे. व आपण दोघांचे लग्न जुळवून किती मोठे काम केले आहे असे अत्यंत मानभावीपणाने समजतात आणि सांगतात.
त्यांच्याकडूनच इन्स्पिरेशन घेऊन एकटे, single, bachelor राहण्याची इच्छा असणाऱ्या मुलामुलींसाठी सल्ला *केंद्र किंवा *कोर्स उघडले पाहिजे असे वाटायला लागले आहे 😒😒😒🤣🤣
या कोर्समध्ये खालील गोष्टींचा समावेश करावा असे वाटते.
श्रींच्या कृपेने.. 1. एकटे राहणे फायद्याचे कसे आहे हे त्या इच्छुक मुलाला आणि मुलीला किती समजले आहे हे बघून ते पूर्णपणे मनावर बिंबवणे.😁
2.आजूबाजूच्या लोकांना व्यवस्थित उत्तरे देऊन त्यांची तोंडे बंद कशी करावी याचे प्रशिक्षण.