लोकांना उधाऱ्या देऊन पैसे फुकट घालवण्यापेक्षा हे करा:
१. नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन प्राईम घ्या. कधी वेळ भेटला तर चांगले चित्रपट अन सिरीज बघता येतील. मनोरंजन होईल.
👇👇👇
२. देवळात धर्म करा. मनाला शांती भेटेल आणि धर्मकार्य केल्याचं पुण्य लाभेल.
३. वाचायची आवड असो किंवा नसो, चांगली पुस्तकं घेऊन ठेवा. कधीतरी वाचावं वाटेल अन ज्ञानात भर पडेल. शिवाय भेटवस्तू म्हणून देऊ शकता.
४. विविध गरजू शाळांना, पूरग्रस्त, सेवाभावी संस्थाना मदत करा.
👇👇👇
५. पैशाचं नियोजन इतकं कडक करा की खात्यावर रक्कम शिल्लक राहू नये. त्यापेक्षा गुंतवणूक करा. म्हणजे उधारी देण्यासाठी पैसाच शिल्लक राहणार नाही.
६. आपली आवड जोपासा. एखादं वाद्य घ्या आणि शिका. चांगले कपडे घ्या, नवीन हॉटेल मध्ये जा, फिरून या. स्वतःला खुश करा, स्वतःवर खर्च करा.
👇👇👇
७. कुटुंबातील सदस्यांना निमित्त नसतांनाही गिफ्ट द्या. त्यांच्यासाठी चांगल्या वस्तू, खाद्यपदार्थ न्या!
उधारी देऊन पैसा जाणारच आहे आणि ज्याला दिले आहेत त्याच्याशी संबंधही खराब होणारच आहेत. शिवाय, अवहेलना, अपमान आणि मनस्ताप निश्चित आहे.
👇👇👇
उधाऱ्या हा व्यवहारातील सर्वात मोठा अडसर आहे आणि चांगले असलेले संबंधही खराब करतो. त्यापेक्षा सुरुवातीला कटुपणा घेऊन नाही म्हणावं अन भविष्यातील प्रश्न टाळावेत.
भोळ्या भाबड्या माणसा जागा हो. उधारी बंद चा धागा हो!
~|~
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#लातूर
काल परवाच मुंबईच्या एका मित्राशी बोलताना लातूर या विषयावर चर्चा झाली होती. आज दिवसभर TL वर लातूर संबंधित ट्विट बघितले अन हे ट्विटावं वाटलं.
∆
तुम्ही कुठल्याही शहरात जा, तिथे आवर्जून पाहण्यासारखं आणि अनुभवण्यासारखं बरंच काही असेल. त्या त्या शहरांची एक विशिष्ट ओळख असेल.
😱
जशी शनिवार वाडा वगैरे पुण्याची ओळख. कोल्हापूरला रंकाळा आहे. तशी लातूरची विशिष्ट अशी काही ओळख नाही. काहीजण ठिकाणांची यादी देतील. पण ती लातूरपासून तशी दूर आहेत. शहरात म्हंटलं तर गोलाईच्या पलीकडे खास असं काही नाही. गोलाई सुद्धा तासाभरात पाहून होते.
.
कोणी पाहुणे आले की त्यांना फिरायला कुठे घेऊन जावं हा प्रश्न असतो. लातूरची विशिष्ट अशी खाद्यसंस्कृती नाही जशी कोल्हापूर मध्ये तांबडा रस्सा किंवा नाशकात मिसळ आहे. तसं पाहिलं तर अनेक वेगवेगळे पदार्थ घराच्या जेवणाच्या ताटात मिळतील पण बाहेर कुठला फेमस पदार्थ नाही.
.
व्यवस्था मोठी खराब आहे.? पण ही आजची तक्रार नाही! कालची, परवाही नाही. ही अनादी काळापासून सुरू असलेली तक्रार आहे आणि अनंत काळापर्यंत सुरू राहणार आहे. कारण दोष व्यवस्थेत नाही तर व्यवस्थेत असणाऱ्या अन ती चालवणाऱ्या लोकांमध्ये आहे.
👇👇👇
जगाच्या पाठीवर जिथंही व्यवस्था आहे तिथे तिथे कधीतरी व्यवस्थेविरोधात बंडही उभं राहिलं आहे. कारण प्रत्येक व्यवस्थेत शोषित आणि शोषक असतोच असतो. हा चांगल्या-वाईटांचा संघर्ष सदैव असणारच आहे!
"जय भीम" हा त्याच संघर्षाला ठळकपणे अधोरेखित करणाऱ्या एका सत्य घटनेची जाज्वल्य प्रतिकृती आहे.
दाक्षिणात्य चित्रपट फार बटबटीत, उग्र आणि बऱ्याचदा अवास्तव पद्धतीने उभे केलेले वाटतात. पण जय भीम हा चित्रपट त्याला अपवाद आहे. व्यवस्थेच्या चौकटीत राहून अन्यायाच्या विरुद्ध उभ्या राहणाऱ्या एका योध्याची ही कथा आहे. व्यवस्था ही तीच आहे.
👇👇👇
आज तो एका अनोळखी, परक्या गावात एका झाडाखाली झोपला होता. मुक्कामासाठी दुसरीकडे जाणे शक्य नव्हतं. त्याला काहीतरी आठवलं... जवळपास वीसेक वर्षांपूर्वी, म्हणजे वयाच्या बावीशीत असताना तो याच गावात, याच झाडाखाली दुपारच्या वेळी झोपला होता. तेंव्हाच्या अन आजच्या परिस्थितीत खूप फरक होता.
👇
तुम्हीच सांगा, तुमची मनोवस्था काय असते अशा वेळी.? एखाद्या ठिकाणी तुम्ही खूप वर्षांनी आला आहात तेंव्हा काय वाटतं? कधी एखाद्या मंदिरात, गावात वगैरे गेल्यावर मनात पहिल्यांदा भूतकाळातील प्रतिमा जाग्या होतात. तेंव्हा आणि आज यातील भेद करू लागतो. माणसांच्या बाबतीतही हे लागू होतंच की!
👇
त्याचंही तसंच झालं होतं. त्याचं म्हणजे कुमारचं. शरीर, मेंदू थकलं असतानाही तो उठून बसला. जुन्या स्मृती जाग्या झाल्या. तो काळ म्हणजे मध्यमवर्गीय ही संकल्पना अजून उदयास आली नव्हती तो काळ.
कुमारचे वडील बोहरणपूरला मास्तर म्हणून कामाला होते. मोठं कुटुंब होतं. घरात कलह सुरू होते.
👇👇
◆सृष्टी का चक्र◆
बाजारात दोन कपड्यांची दुकानं होती। एक बरंच मोठं आणि जुनं। म्हणजे त्यांच्या तीन पिढ्यांपासून ते दुकान चालवलं जातं। दुसरं दुकान हे दोन वर्षांपूर्वी सुरू केलेलं। नवीन असल्याने स्पर्धा म्हणून त्या दुकानदाराने मोठ्या प्रमाणात ऑफर्स दिल्या व त्यासाठी कर्ज काढलं।
👇👇
नवीन दुकानदार जुन्या दुकानाला चांगली स्पर्धा देत होता। पण अचानक मंदी आली!!! इम्पोर्ट-एक्स्पोर्ट, टॅक्स अशाने आधीच त्रस्त असताना कोरोना आला... आधीचे सहा महिने कसेबसे ना नफा, ना तोटा या तत्वावर काढले होते। केवळ तग धरून रहावं म्हणून! पण आता पुढचे दोन तीन महिने काही चालणार नव्हतं!👇
बँकेचे हफ्ते चुकत होते... जागेचं भाडं देणं होतं... दुकानातील कामगार कमी करावे लागले... एकंदरीत, व्यवसाय डबघाईला आला!!!
पण दुसऱ्या बाजूला जो जुना दुकानदार होता त्याला नुकसान होतं पण तो त्याही परिस्थितीत तगून राहू शकत होता। कारण व्यवसाय जुना असल्याने त्यावर फार कसलं कर्ज नव्हतं।
👇