मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांच्या प्रदर्शनास भेट दिली. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडणाऱ्या छायाचित्रांमधून त्यांच्या आठवणींना उजाळा देता आला.
विद्यार्थीदशेच्या काळानंतर अनेक वर्षानंतर मला या वास्तूत यायची संधी मिळाली. मुंबईतील काही वास्तू जगप्रसिद्ध आहेत. त्या जगप्रसिद्ध वास्तूंमध्ये मुंबई विद्यापीठाची ही वास्तू अत्यंत महत्त्वाची आहे. इथल्या वास्तूमध्ये हा आगळावेगळा कार्यक्रम आज इथे घेतला जात आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन तसेच त्यांच्या नावाने काही अभ्यासक्रमही इथे सुरू करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे हे एक अलौकिक व्यक्तिमत्व होतं. आमचे त्यांच्याशी अतिशय घनिष्ट संबंध होते, तसेच आमच्यात संघर्षही होता.
मला आठवतंय, मी पूर्वी खेडगल्ली, दादर येथे राहायला होतो. त्याच काळात नुकतीच शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली होती. ज्यावेळेस राजकारणात माझ्या खांद्यावर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आल्या आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली, त्याचवेळेस शिवसेनेचा महाराष्ट्रभर प्रसार होत होता.
आम्ही दोघांनीही भाषणांमधून एकमेकांवर खूप टीका केली. त्याकाळात आम्ही दिवसभर कुठेही असलो तरी संध्याकाळी एकत्र असायचो. मीनाताई आमच्या आवडीचं जेवण बनवायच्या, तासन् तास आमच्या गप्पा चालायच्या, काही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा व्हायची.
बाळासाहेबांचं एक वैशिष्ट्य होतं. त्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात एक नवनेतृत्व तयार केलं. या नेतृत्वातील बहुसंख्य नेते हे सामान्य घरातील होते. ज्यांना आयुष्यात कधीही विधानसभा आणि संसद माहीत नव्हती त्या लोकांना बाळासाहेबांनी मोठमोठ्या पदांवर बसवलं.
त्यामुळे अशा या मोठ्या व्यक्तीचं आज या ठिकाणी छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. अत्यंत देखणं असं हे प्रदर्शन आहे. बाळासाहेब स्वत:ही एक कलाकार आणि व्यंगचित्रकार होते.
त्यांच्या व्यंगचित्रांना एक प्रकारची धार असायची. त्या धारेचा विरोधकांवर जो काही परिणाम व्हायचा त्याची किंमत मलासुद्धा कधीकधी मोजावी लागली.
आज या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करून फोटोग्राफी असोसिएशनने अतिशय उत्तम काम केलं आहे. माझी खात्री आहे की मुंबईकरांसमवेत बाळासाहेबांविषयी आस्था असणाऱ्या लोकांना हे प्रदर्शन पाहून एक वेगळेच समाधान मिळेल.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. गेली अनेक वर्षे नेत्रचिकित्सा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. तात्याराव लहानेंमार्फत आता हे नवीन नेत्रालय उभे राहत आहे.
ही आपल्या राज्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या नवीन नेत्रालयामार्फतही गरजूंना दृष्टिदान करण्याचे काम डॉ. लहाने अखंडपणे करत राहतील, असा माझा ठाम विश्वास आहे.
डॉ. लहानेंची एक इच्छा होती की, मुंबईमध्ये एक उत्तम नेत्रालय असावे. त्यांची ती इच्छा आज पूर्ण झाली. या नेत्रालयाचे नाव त्यांनी रघुनाथ नेत्रालय ठेवले आहे. रघुनाथराव हे माझे सहकारी होते. सध्या ते हयात नाहीत.
नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने व राजकीय हेतूने कारवाई केली गेली आहे. त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना यातना देण्याचा प्रयत्न जाणूनबुजून केला जात आहे. गेली २० वर्षे महाराष्ट्राच्या विधानसभेत नवाब मलिक आहेत. या काळात नवाब मलिक यांच्यावर आरोप झाले नाहीत.
एखादा मुस्लिम कार्यकर्ता दिसला की त्याला दाऊदचा जोडीदार बोलायचं. कारण नसताना हे आरोप केले जात आहेत.
कधीकाळी माझ्यावरही असेच आरोप झाले होते. हे लोक या पद्धतीने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात. त्याची चिंता करण्याचे कारण नाही.
नवाब मलिक यांना अटक झाली म्हणून मंत्रिमंडळातून काढा, अशी मागणी केली जात आहे. मलिक यांना अटक झाली हे खरं. परंतु सिंधुदुर्गातील आमचे जुने सहकारी नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांना अटक झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे पाहण्यात आले नाही.
आज पुणे येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलो असता पत्रकारांशी संवाद साधला. युक्रेन-रशिया संघर्ष आणि इतर अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका यावेळी व्यक्त केली.
युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना देशात आणण्यासाठी भारत सरकार व दुतावासाने काही प्रयत्न केले आहेत. काल रशियाच्या सीमेपासून पाच तासांवर असलेल्या विद्यार्थ्यांनी माझ्याशी फोनवरून संवाद साधला. परराष्ट्र मंत्र्यांशीही माझे बोलणे झाले आहे.
केंद्र सरकार या मुलांना परत आणण्यासाठी जे जे करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही अजून विद्यार्थी तेथे आहेत. भारतीय दुतावासाने त्यांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर युक्रेनच्या सीमेबाहेर येता येईल असा प्रयत्न करा.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ सुवर्ण महोत्सव अधिवेशन कार्यक्रमास आज उपस्थित होतो. या कार्यक्रमानिमित्त राज्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या संस्था चालकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
स्व. वसंतदादा पाटील यांच्या विचारांमधून हे दालन उभे राहिले. महाराष्ट्र हे शैक्षणिक संस्थेचे प्रमुख द्वार असलेले राज्य आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये शिक्षणाचा विस्तार झाला, मात्र याची प्रामुख्याने जबाबदारी त्या त्या राज्यातील राज्य सरकारने उचलली आहे.
केरळसारख्या राज्यात गेलात तर खासगी शिक्षण संस्था ही संकल्पानाच कोणाला माहिती नाही. याउलट महाराष्ट्राचा अनेक वर्षांचा इतिहास पाहिला तर ज्ञानदानाच्या कामाशी संबंधित जबाबदारी ही प्रामुख्याने एका बदलानंतर खासगी शिक्षणसंस्थांनी स्वीकारली आहे.
परिवहन मंत्र्यांनी मला सांगितले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत. त्यातील एक मागणी वगळता इतर सर्व प्रश्नांवर वाटाघाटी झालेल्या आहेत. मात्र विलीनीकरणाच्या प्रश्नावर एकमत झालेले नाही.
ज्या संस्थेत आपण कामाला लागलो, त्या संस्थेतून इतर ठिकाणी आपली नोकरी वर्ग करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, याबद्दल कुणाचेही दुमत नाही. पण विलीनीकरणाचा मुद्दा आज प्रथमदर्शनी तरी योग्य आहे, असे मला वाटत नाही.
एसटीचा इतके दिवस संप सुरू आहे. त्यात न्यायालयाचाही निकाल येत आहे. तरीही संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेणे म्हणजे एकप्रकारे कामगारांचे नुकसान करण्याला मदतच करण्यासारखे आहे. म्हणून राज्य सरकार आणि एसटीच्या प्रातिनिधिक आणि अन्य संघटनांनी एकत्र बसून यातून मार्ग काढला पाहिजे.
त्रिपुरा येथे समजा काही घडले असे आपण मान्य केले तरी महाराष्ट्रात यामुळे तसे घडण्याचे काही कारण नाही. इथे कोणी काही घडवण्याचा प्रयत्न केला नाही.
पण दुर्दैवाने अशा काही संघटना आहेत की या प्रकारचे वृत्त समजले की टोकाची भूमिका घेऊन रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करतात. राज्यात मालेगाव, अमरावती, नांदेड या भागात काही घटना घडण्याचे कारण नव्हते. त्यामुळे अशा प्रवृत्तींना किती महत्त्व द्यायचं याचा लोकांनी विचार करायला हवा.
राज्य शांततेच्या मार्गाने वाटचाल करत असताना या ना त्या निमित्ताने अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काल अमरावती ग्रामीण भागात बंद पुकारण्यात आला होता. तो शांततेच्या मार्गाने पार पडला. मात्र आता एका राजकीय पक्षाने पुन्हा सबंध जिल्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.