६ तारखेला आमच्या लग्नाच्या वाढदिनी रायगडावर माथा टेकवून आलो
सदर पहिल्या फोटोतल्या शिवरायांच्या पुतळ्याजवळ एक गाईड जिवाच्या आकांतानं आलेल्या शिवभक्त कुटुंबाला सांगत होता -
1
"या पुतळ्याला संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत रोज सकाळी हार घातला जातो"
राज्य तसेच देशभरातून असंख्य कुटुंबं, लोक रायगडाला भेटी देतात, त्यांच्या कानावर मनोहर भिडेंच्या शिवछत्रपतींवरील हाराचे "उपकार" पोटतिडकीनं घालून
2
लाखो शिवभक्त शिवरायांच्या पुतळ्याला हार, फुले अर्पण करत असतात, त्यामागे असते ते त्याचे शिवरायांप्रती निर्व्याज्ज प्रेम, शिवरायांपासून मिळालेल्या प्रचंड प्रेरणा आणि ऊर्जेबद्दलची नम्र कृतज्ञता
4
लाखो निष्पाप मनांना दूषित करून शिवरायांच्या नावावर घडवल्या गेलेल्या असंख्य दंगलींची सुरुवात या निरागस लोकांना विषारी मनोहर भिडेंसारख्या अनेक संघोट्यांच्या जाळ्यात अलगद ओढूनच केली जाते
5
अनवाणी चालणे, सायकल प्रवास, बदललेले "संभाजी" नाव, राष्ट्र-धर्म प्रेमाच्या, (खोट्या) त्यागाच्या अलंकारिक गप्पांचा भावनात्मक मुलामा या सर्वांतून लाखो निरागस व निष्पाप बहुजन मनांना आपल्या विषारी जाळ्यात अलगद ओढले जाते, गडकोट मोहिमांवर नेऊन शिव-शंभूंच्या नावावर आणाभाका दिल्या जातात
6
आणि सर्वप्रथम "मनोहर भिडे" यांची "महान-त्यागी" प्रतिमा बेमालूमपणे त्या सर्व निरागस मनांवर कोरली जाते
एकदा का ही प्रतिमा कोरली गेली की
7
गुरुजींनी सांगितलेला शब्द न शब्द या बहुजन नवभक्तांद्वारे सश्रद्ध ग्रहण केला जातो आणि मग अत्यंत हळुवार व सफाईदारपणे नकळत या असंख्य मनांवर मुस्लिमद्वेषाचा एकेक विषारी डंख गुरुजींच्या व शिष्योत्तमांच्या "विषाळ" वाणीतून "पेनलेस" इंजेक्शन प्रमाणे मारला जातो,
8
ही प्रक्रिया तिथपर्यंत चालते जोपर्यंत त्या "नवभक्ताचे" रूपांतर "विषकन्येत" होत नाही
आता जरा पॉज घ्या मित्रहो
ही विषवल्ली फक्त मुस्लिमद्वेषपुरते मर्यादित नसते दोस्तांनो
मुस्लिमद्वेषानंतर चालू होते "दलित द्वेषाचे" काळेकुट्ट पारायण
तुमच्यावर (मराठा) होत असलेला (काल्पनिक) अन्याय,
9
शिव-शंभू दोहोंची "मराठाधारीत" मांडणी, जातीअभिमानाची कडवट झालर अशा अनेक मार्गांनी या मुस्लिमद्वेषाने "समृद्ध झालेल्या" मनांचा थोडाफार शिल्लक राहिलेला निरागस कोपरा दलितद्वेषाने बरबटून टाकला जातो
10
गुरुजींद्वारे मुस्लिम आणि दलित द्वेषाने तयार केली गेलेली ही "परिपूर्ण मराठा मने" कधी निवडणुकांआधी हिंदू-मुस्लिम (मिरज) दंगली घडवायला, वारीत "धारकरी" घुसवायला, मराठा-दलित (भीमा-कोरेगाव) दंगली घडवायला अगदी सहजपणे वापरली जातात
11
पश्चिम महाराष्ट्रातली असंख्य (उच्चशिक्षित, शिक्षित, अशिक्षित) बहुजन मने नासवणारी ही विकृती म्हणजे एकटे "मनोहर भिडे" नाहीत बरं !
संघाचे असे असंख्य "डिप असेट्स" देशभर कार्यरत आहेत
12
सांगली-सातारा-कोल्हापूरच्या हजारो तरुणांना नासवणाऱ्या गुरुजींप्रमाणे आता पाटण-सातारच्या भागात "महिन्द गुरुजी" नावाची विषवल्लीही जोमानं फोफावतेय
ही यादी प्रचंड मोठी आहे, त्यांचे मार्गही अनेक आहेत
अगदी भिडे-महिन्द-एकबोटे यांपासून मोदी मंत्रिमंडळातील प्रताप सारंगींपर्यंत
13
हे सगळं इतकं सायलेन्टली चालू असतं की "विषारी पांडेने" शरद पवारांनी वाचलेली जवाहर राठोड यांची कविता कशी हिंदू द्वेष्टी आहे हे सांगताना राठोडांच्या कवितेपेक्षा तिखट असणारी त्याच अर्थाची संत गाडगेबाबांची कविता नजरेआड कशी राहील याची पुरेपूर काळजी घेतो !
15
शिवरायांबद्दलचा पराकोटीचा द्वेष जेम्स लेनकरवी वारंवार जाहीर करणारा "गुरुजी" फॉर्मुला आपल्या पोरांना त्यांच्या ध्यानीमनीही न येऊ देता त्याच शिवशंभूंचं नाव घेऊन भुलवतो, नासवतो ही परिस्थिती बदलायलाच हवी
16
काल प्रवीण व प्रतीक यांच्या पोस्ट खाली मी आपल्या समविचारी मित्रांच्या "महागाई व इतर गोष्टींपासून डायव्हर्ट करण्यासाठी या चर्चा चालू आहेत" या आशयाच्या अनेक कमेंट्स वाचल्या
17
तर दोस्तहो, इतिहासाचे विकृतीकरण करून, याच #Silent_Poison च्या जोरावरच ही लोकं आज इथपर्यंत पोचलीयेत !
या विषावर वेळीच, तिथल्या तिथं उतारा देणं अत्यंत गरजेचं असतं, "अन्यथा" द्वेषाची ही विषवल्ली येणाऱ्या पिढ्यांचेही मेंदू असेच सडवत राहील !!
18/18
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मी देवळात जातो का?
- तर जातो !
मी हिंदू सणवार साजरे करतो का?
- तर करतो !
मग तुम्ही माझ्या कशावर नाराज आहात?
माझ्या,
धर्मचिकित्सेवर?
धर्मातील अनिष्ठ रूढी, चालीरीतींवर बोलण्यावर?
की, २०१४ पासून वाढत चाललेल्या कट्टर धर्मांधतेवरच्या बोलण्यावर?
1
काय म्हणता तुम्ही?
- आपल्या धर्माला नावं ठेऊ नका, धर्माभिमान बाळगा !
संत ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना मारणारे तत्कालीन सनातनी, तुकोबांचे तुकडे करून ठार मारणारा मंबाजी, ज्योतिबांवर मारेकरी धाडणारे मनुवादी, महात्मा गांधीजींवर गोळ्या झाडणारा गोडसे ते
2
दाभोळकर-पानसरे-कलबुर्गी-गौरी लंकेश यांची हत्या करणारी सनातन संस्था हे सर्व मुस्लिम होते का?
- तर नव्हते !
काय म्हणतात ते?
- आपल्या धर्माला नावं ठेऊ नका, धर्माभिमान बाळगा !
हे प्रत्येकाने ऐका विशेषतः द्वेषाचा डोस घेऊन हिंदुत्ववादाच्या अंधाऱ्या गर्तेत बुडालेल्या प्रत्येक "शिक्षित" बहुजन अंधभक्ताने तर जरूर ऐकावे
या नीच माणसानं परवा शिवरायांवर गरळ ओकली
आज तो ज्योतिबा-सावित्रीबाई फुलेंवर घसरला
1
मध्ये एकाने "द्वेषधुंद" अवस्थेत इंग्रजीमध्ये संभाजी महाराजांवर अनैतिहासिक मुक्ताफळे उधळली होती
आरएसएस / भाजप च्या "खास" तालमीत तयार झालेली ही विषारी विचारवल्ली कशाप्रकारे महामानव, समाजक्रांतिकारकांबद्दल मनात खोलवर प्रचंड घृणा आणि पराकोटीचा मत्सर व हीनतेची भावना बाळगत असतात
2
याचं नमुणादाखल उदाहरण म्हणजे "विषारी भाज्यपाल कोश्यारी" !
जिजाऊ-शिवरायांपासून, ज्योती-सावित्री ते गांधी-दाभोळकरांपर्यंत सर्वांना हीन लेखणाऱ्यांच्या मेंदूने आपण अजून किती दिवस चालणार याचा आज झोपताना नक्की विचार करा मित्रांनो..
3
भिमराया घे तुझ्या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!
- सुरेश भट
दुमदुमे जयभिमची गर्जना चोहीकडे!
सारखा जावे तिथे हा तुझा डंका जडे!
घे आता घे राहिलेल्या संघरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!
1/7
कोणते आकाश हे तु आम्हा नेले कुठे!
तु दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे?
या भराऱ्या आमुच्या ही पाखरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!!
2/7
कालची सारे मुके आज बोलु लागले!
अन तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले!
घे वसंता घे मनाच्या मोहरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!!
एक आम्ही जाणतो आमुची तु माऊली!
3/7
...बळीराजा...
बळी !
सात काळजाच्या आत जपून ठेवावा,असा निरागस ‘माणूस’ !
आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता !!
भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर !!!
1/10
बळी–हिराण्याकशिपुचा पणतू,प्रल्हादाचा नातू,विरोचानाचा पुत्र,कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता.भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्त्व!सुमारे साडे तीन ते पाच हजार वर्षांपूर्वी होवून गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महासम्राट,एक महातत्त्ववेत्ता!
2/10
या बळीचा वंश तो बळीवंश. या बळीवंशातील माणसे - आपली माणसे, आपल्या रक्तामांसाची माणसे आणि मुख्य म्हणजे आपल्या विचारांची माणसे ! ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावणे पत्करले, पण तत्त्वांशी द्रोह केला नाही, आपल्या श्वासोच्छवासावर दडपणे लादून घेणे मान्य केले नाही,अशी माणसे.
3/10
आधुनिक नटसम्राटाची कैफियत
--------------------------------------------
बोसांना आपलं म्हणावं की पटेलांना आपलं म्हणावं,
शास्त्रींना जवळ करावं की भगतसिंग आपला म्हणावा,
हा एकच सवाल आहे.
1/6
ह्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात
कोणाचं अपहरण करून जगावं बेशरम लाचार आनंदानं?
की घुसडून टाकावं हेडगेवार गोळवलकरांना या दिव्य लढ्यात ?
आणि करावा सर्वांचा समावेश एकाच अभ्यासक्रमात?
गांधींचा हेडगेवारांचा आणि बाबासाहेबांचाही.
2/6
ज्ञानाच्या यज्ञकुंडात अशी पाचर मारावी की उद्याच्या विद्यार्थ्याला
कधीही लाभू नये जागृतीचा किनारा
पण
पण मग त्या
विद्यार्थ्यालाही सत्य कळू लागलं तर?
तर ...
तर ....
इथेच खरी मेख आहे.
3/6
वैचारिक क्रांतीच्या समृद्ध वारशाला लागू पाहणारी कीड - तुषार भोसले @AcharyaBhosale
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक क्रांतीचं, विज्ञान आणि मानवतेचं प्रतीक !
३५० वर्षांपूर्वी तुकोबारायांनी या वारीला आपल्या कृतीतून प्रचंड जनप्रवाह मिळवून दिला
1/10
वारीच्या अनेकविध क्रांतिकारी वैशिष्ठ्यांमुळेच हे शक्य झाले
भारतातल्या लाखो मंदिरांमध्ये दान-दक्षिणा, उच-नीचता, शिवाशिव असे प्रकार सर्रास आढळतात
पण पंढरीच्या वारीत ही थोतांडं उन्मळून पडतात..
2/10
तिथं प्रत्येक जण एकमेकांच्या पाया पडतो, लहान बाळ असो, तरुण असो, महिला असो, पुरुष असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, ना दक्षिणा ना व्हीआयपी वर्दळ, मुख्य पूजेचा मानही अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत एका वारकरी कुटुंबास दिला जातो,
3/10