कोकणात साधारणतः 7 जून पर्यंत मान्सूनचं आगमन होतं. चार चार दिवस आकाश उघडत नाही. हा खूप वेगळा अनुभव आहे. गेले काही पावसाळे बाहेर काढल्यावर आता त्याची प्रकर्षाने जाणीव होते आहे.
आता आता हे मिडीयावाले पावसाचा पाठलाग करत रिपोर्ट्स ब्राॅडकास्ट करीत असतात.
केरळमध्ये मान्सून दाखल अशा फूटनोट्स किंवा मग ती सॅटेलाईट पिक्चर्स पावसाची चाहूल सांगत असतात. अगोदर कुठे होते टीव्ही नि हे इंटरनेट. कोकणात खूप आधीपासून बर्याच पद्धती आहेत पाऊस साधारण कधी येईल हे ओळखण्याच्या.
सकाळी परसात देवपूजेची फूलं काढायला बाहेर पडलं की हवा गार असते, पायात अगदी छोट्या आकाराचे लाल किडे दिसायला लागतात. हे एका रात्रीत कुठून उत्पन्न होत असतील याचं मला आजही कुतूहल वाटतं. त्यानंतर भिंगरी नावाचे उडणारे जीव खूप खाली खाली येऊ लागतात.
. माझा काका सांगायचा, हे बाकीच्या काळात खूप उंचीवर असतात. पाऊस जसजसा जवळ येऊ लागतो तसतसे हे खाली खाली येतात. काळे लाल डोंगळे प्रचंड प्रमाणात वारूळ सोडून कशात तरी व्यस्त असलेले दिसतात. यावेळी मान्सून साधारण पंधरा दिवस अंतरावर असतो.
मग आमच्या घरी गड्यांना बोलवून अंगणातला पेंढ्याचा मांडव काढून टाकायचे.
अगदी दोन चार दिवस अंतरावर पाऊस आला की प्रचंड भरून येत राहतं. आर्द्रता इतकी की अंगान नुसत्या घामाच्या धारा. एकाजागी बसवत नाही. दिवस दिवस घराघरातले झोपाळे डोलत असतात.
पुरूष मंडळी ओटी, मोठ्ठाले माचे किंवा खाटली सोडून अंगणासमोरच्या पडवीत झोपायला लागतात.
मजा असायची ही सगळी. सारवलेल्या अंगणातात धो धो ओतायचा पाऊस तेव्हा चार महिने या अंगण्यात बॅट बाॅल घेऊन दिवस दिवस खेळलेली आम्ही भावंडं केविलवाणी होऊन ते बघत राहायचो.
पार खडे व्हायचे दोन दिवसात सारवलेल्या अंगणाचे. रात्री अपरात्री लाईट नसणे ही फार काॅमन गोष्ट होती. कारण पाऊस रिपरिप किंवा रिमझिम असा कधी नसतोच कोकणात. धो धो हे एकच योग्य वर्णन. मग कुठेतरी एखादी झाऊळ, साग, वाकड्या फणसाची फांदी तारेवर पडली की दोन दोन दिवस अंधार.
पण त्याचा कधी त्रास वाटला नाही.
राॅकेलवरचा टेंभा कोनाड्यात ठेवून किंवा बत्ती वाशाला टांगून सगळे जेवायला बसायचे. अचानक आलेला प्रचंड गारवा, सकाळची असेल ती भाजी, गरम पोळ्या, नुकतंच मुरायला लागलेलं लोणचं, आज्जीच्या हातची ताकाची कढी, चुलीवरून उतरवून मोकळा करून वाढलेला गरम
भात आणि नात्यांची ऊब हे सगळं आठवलं की आता दर शनिवारी जातो त्या क्लब किंवा पबचा झगमगाट फिका वाटतो. समोर लॅपटॉपवर नेटफ्लिक्स किंवा टीव्हीवर स्टार वर्ल्ड किंवा मूव्हीज असल्याशिवाय आता घशाखाली घास जात नाही. पण ते दिवस खरंच सोन्याचे होते.
कौलं गळायची. काका, बाबा, आजोबा सगळे संध्याकाळपासनं त्याचा बंदोबस्त करण्यात गुंग. नेमका पावसाआधीच गोठ्यात नवीन पाडा यायचा. त्याच्या काळजीनं खालीवर होणारा जीव आई कसाबसा समजावून झोपवायची. रेज्यातनं बाहेर बघावं तर वीज चमकताक्षणी दारातला प्राजक्त, काकाची टूव्हीलर, बेडं लख्ख दिसायचं.
भितीनं पाचावर धारण बसायची पण डोळे बंद केले की काही होणार नाही हा खुळा विश्वास असायचा.
हे सगळं अजून तसंच आहे फक्त आम्ही पोरंबाळं मोठी झालो, नोकरीच्या शोधात स्वप्नांच्या मागे शहरात आलो. आता गावचं घर ओस आहे. नेमकं रात्री ऑफिस खालच्या हाॅटेलात जेवताना हे सगळं आठवतं आणि घास
तोंडात घोळत राहतो. डोळ्यात कधी मळभ भरतं नि कधी कोसळायला लागतं हे काही अजून आधी ओळखता येत नाही. कधी कधी वाटतं उगीच मोठे झालो. त्या ओटीवरच्या कोपर्यात ठेवलेला कंदील पुरेसा होता अंधारात आधाराला.
पण आज... आता इतके पुढे निघून आलो की परत जाणं शक्य नाही आणि कुठे कंदील पण दिसत नाही... 🙏🙏🙏🙏
सदगुरु कशासाठी हवा?
महाभारतातलीच एक कथा आहे.
द्रौपदी स्वयंवरात सर्व राजे, युवराज आपापलं कौशल्य पणाला लावून मत्स्यभेद करण्याची पराकाष्ठा करीत होते.
पणही विलक्षणच होता!
उंच छताला एक चक्र फिरत राहणार. त्याच्या एका आरीवर लाकडी मासा बांधलेला.
ते चक्र फिरत असतांना नेम साधून त्या माशाच्या डोळ्याचा भेद करायचा.
उ:! एवढंच?
नाही! ते तर कुणीही करेल! इथे तर एकाहून एक निष्णात धनुर्धर उपस्थित होते!
अन् स्वयंवर साक्षात याज्ञसेनीचं! सर्वच प्रतिस्पर्धी इरेस पेटलेले!
पऱंतु खरी मेख पुढेच होती!!
नेम सरळ माशाकडे बघून धरायचा नव्हता. खाली भलंमोठं तसराळं पाणी भरून ठेवलं होतं. वर मासा लावलेलं चक्र फिरत असतांना खाली तसराळ्यात बघून नेम धरायचा होता अन् माशाच्या डोळ्याचा वेध घ्यायचा होता!
"मी तुमच्या संभाजीला कैद केल्यावर लगेच त्यांचं शीर धडावेगळं करता आलं असतं पण मी तसं केलं नाही. मी त्याची अक्षरशः धिंड काढत त्यांना शक्य तितकी अपमानास्पद वागणूक देत माझ्या छावणीत आणवलं. "इस्लाम स्वीकार,तुला जिवंत सोडतो,अशी लालूच दिली, पण,
तो थुकला माझ्या खैरातीवर. तेव्हाच त्याचं मरण अटळ होत. पण , मी ते सहजासहजी दिलं नाही, पुढे कित्येक दिवस संभाजीवर अनन्वित अत्याचार केले. त्याची चामडी सोलली,डोळे काढले,नख उपटून काढली,पण तो बधला नाही.. आणि शेवटी त्याची मुंडी मारली. मेल्यावर वैर तुमच्यात संपत असेल,आमच्यात नाही.
मेल्यावर त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून भीमा नदीच्या काठी अक्षरशः फेकले.
का ?
मला वाटलं," ह्या क्रौर्यानं मराठे दहशत खातील. राजा नाही,राजधानी नाही,सिंहासन नाही,खजिना नाही म्हणून शरण येतील." पण नाही,संभाजी नंतर राजाराम,त्यानंतर ती ताराबाई मग कधी संताजी कधी
मी खूप चिंतेत आहे, देशाची स्थिती वाईट आहे, अतिशय नाजूक परिस्थितीतून जात आहे......
वाहनांच्या शोरूममध्ये जा, नवीन मॉडेल्सची प्रतीक्षा सुरू आहे, ग्राहकांना सहा महिने वाहनांची प्रतीक्षा करावी लागेल.... 😎
रेस्टॉरंट्समध्ये एकही टेबल रिकामे नाही, अनेक रेस्टॉरंट्सवर रांग! 😎
दारुच्या दुकानांवर लाईन तुटत नाही, जेवणात चिकन लेगपेक्षा कमी मागणी नाही.
शॉपिंग मॉल पार्किंगसाठी जागा नाही, इतकी गर्दी.......😎
अनेक मोबाईल कंपन्यांचे मॉडेल्स आऊट ऑफ स्टॉक आहेत,
ऍपल लॉन्च होताच स्टॉक संपत आहे......😎
ऑनलाइन शॉपिंगच्या काळात कामाच्या दिवसातही संध्याकाळी बाजारात पाय ठेवायला जागा नसल्याने ठप्प अशी परिस्थिती रोजच निर्माण होते! 😎
ऑनलाइन शॉपिंग उद्योग तेजीत आहे....😎
मात्र पेट्रोलचे दर वाढवून त्यांचे कंबरडे मोडल्याचे लोक सांगत आहेत
"हिंदू' शब्द 'सिंधु' शब्दाVचा अरबी अपभ्रंश आहे.असे आपल्याला आता
पर्यंत सांगितले गेले आहे.पण खालील लेखामध्ये ते कसे असत्य आणि दिशा
भूल करणारे आहे,हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे.
ते वाचून आपल्या सर्व समूहात
शुद्ध मराठीत अग्रेशित(forward)करा.
सामायिक(share)करा
"हिन्दू' हा शब्द- "हीनं दुष्यति इति
हिन्दूः।"
म्हणजे-
'जो अज्ञान आणि हीनतेचा त्याग करतो,'
त्याला हिन्दू म्हणतात'.
'हिन्दू' हा शब्द अनन्त वर्षांचा प्राचीन असलेला मूळ संस्कृत शब्द आहे.
या संस्कृत शब्दाचा सन्धीविग्रह केल्यास तो हीन+दू=हीन भावना+पासून दूर असलेला,मुक्त असलेला तो हिन्दू होय
आणि आपल्याला हे वारंवार खोटे सांगून फसविले जात होते की,'सिन्धूचे अपभ्रंशित रूप म्हणजे हिन्दू' हा शब्द आपल्याला मोगलांनी दिला.