हजारो काश्मिरी पंडित आज परत आपलं घरदार, पोटापाण्याची सोय सोडून जीव वाचवायला खोऱ्यातून पळून जायला धडपडत आहेत. एका सरकारी कर्मचारी असलेल्या पंडिताची त्याच्या कार्यालयात घुसून हत्या झाली. त्यानंतर एका शिक्षिकेची शाळेबाहेर हत्या झाली. त्यानंतर एका बाहेरून नोकरीसाठी तिकडे गेलेल्या
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्याची बँकेत असताना हत्या झाली.
या सगळ्या हत्यांमध्ये बळी गेलेले लोक आपल्या पोटापाण्यासाठी काम करताना मारले गेले. यामुळे जर माणूस सरकारी कार्यालयात, शाळेत, बँकेत सुरक्षित नसेल तर त्याचं घर कसलं सुरक्षित उरणार ही अत्यंत रास्त भीती पंडितांना आणि तिथे
बाहेरून नोकरीसाठी गेलेल्या हिंदूंना वाटणे साहजिकच आहे. यामुळे तिथून शेकडो पंडित कुटुंब घर, बाहेरून नोकरीसाठी आलेले हिंदू आपली रोजीरोटी सोडून जीव वाचवायला धावत आहेत.
ज्या रंगा बिल्लाच्या गिधाड गँगने आणि त्यांच्या अग्निहोत्री नांवाच्या अकलेने दिवाळखोर असलेल्या दलालभडव्याने
काश्मिरी पंडितांच्या नांवाने आपल्या आर्थिक आणि राजकीय तुंबड्या भरल्या त्यांना आज त्यांच्याच हातात काश्मीरची (केंद्रशासित) सत्ता असताना हिंदू आणि काश्मिरी पंडितांच्या निर्मम हत्या थांबवता येत नाहीत. यांच्या निर्लज्ज थोबाडांची सोय म्हणून, काश्मिरी खोऱ्यातले दहशतवादी नवनव्या हत्या
करून अजून जास्त निर्लज्ज वागायला संधी देत आहेत!
एखाद्याचं घरदार, नोकरी म्हणजे त्याने त्याच्या आयुष्याची, पोराबाळांसाठी जमवलेली पुंजी असते. ते सगळं सोडून जेव्हा शेकडो कुटुंब, हजारो माणसं रस्त्यावर जीव वाचवायला धावू लागतात तेव्हा राज्यकर्ते जनतेला सुरक्षित आयुष्याची हमी द्यायला
नालायक ठरले असा त्याचा अर्थ होतो. गिधाड गॅंगच्या निर्लज्ज, नाकर्त्या आणि निर्दय भडवेपणाची किंमत आज त्या शेकडो कुटुंबाबरोबर जगायची फरपट होत असलेल्या लहान बाळांना भोगावी लागत आहे.
एखाद्या समाजाची यातना, दुःख, मरण यांचं मार्केटिंग करून आपल्या तुंबड्या भरणे आणि आपल्या हातात सत्ता
असताना समोर त्याच लोकांची, त्यांच्या पोराबाळांची जीवासाठी चाललेली फरपट निर्लज्जपणे बघत बसणे याहून नीच राजकीय वर्तन ते काय!
यांच्या मानलेल्या पप्पाच्या छप्पन इंची छातीत वीट टीचभर दम असता तरी आज काश्मिरी पंडितांवर हा प्रसंग ओढवला नसता! हे ज्याला चाणक्य म्हणून मिरवतात, त्याच्या
क्रूर कपटी आणि किडक्या डोक्यात लोकांसाठी काम करायची नियत शिल्लक असती तर आज खोऱ्यातले दहशतवादी असे हिंदूंच्या जीवाच्या नरडीचा घोट घेत फिरू शकले नसते! आणि यांच्या फिल्लमवाल्या भडव्याला थोडीफार लाजशरम असती तर तो आज तोंडवर करून फिरला नसता!!
असो... काश्मिरी पंडितांना आणि त्यांच्या
निष्पाप मुलाबाळांना सुरक्षित आसरा लाभावा यासाठी तुम्ही अजूनही देव वगैरे मानत असाल तर देवाकडे प्रार्थना करा! बाकी असले षंढ राज्यकर्ते डोक्यावर बसले असताना आपण दुसरं करूतरी काय शकतो!!
अक्षय कुमार हा अव्वल दर्जाचा हलकट माणूस आहे. हा लोकांना OMGवेळी सांगत फिरायचा की दूध अभिषेक करून काय मिळणार, दूध फुकट जातं वगैरे! आता पृथ्वीराज पिक्चरचं प्रमोशन म्हणून स्वतः अभिषेक करून आलाय!
वर म्हणे पृथ्वीराज हा या देशातला शेवटचा हिंदू राजा/सम्राट! काय म्हणून ब्वा? देवगिरी,
विजयनगर काय आफ्रिकेत होते काय? यानंतर मुघलांच्या आणि शाह्यांच्या छातीवर पाय देऊन मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले, ते मराठा साम्राज्य अक्षयकुमारला माहीत नाही काय?
वर इतका हास्यास्पद दावा करतो की हिंदू राजे आणि साम्राज्ये इतिहासात शिकवतच नाहीत! आम्हाला दहावीपर्यंत इतिहास होता
त्यात जवळपास सगळ्या भारताचा इतिहास पुरेसा कव्हर केलेला होता. त्यात अगदी चोल, चालुक्य, गुप्त, मौर्यपासून अगदी दुसऱ्या बाजीरावापर्यंत इतिहास शिकवला जातो. अजून काय अपेक्षित आहे? अक्षयकुमारच्या कोलांट्याउड्या, क्रीती सॅननच्या अदा, नोरा फतेहीचा डान्स आणि नकली घोड्यावर रायडिंग करणारी
भारतात जेव्हा पेट्रोल डिझेल, गॅस सिलेंडरच्या किंमती वाढतात तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय माणसाच्या सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत ही वाढ किती आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार आजच्या घडीला दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत विचार केल्यास आपल्याला खरेदी करावं लागणारं
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस हे जगातल्या सगळ्यात महाग दरांमध्ये येतात.
म्हणजे समजा एक अमेरिकन माणूस एक लिटर पेट्रोल भरतो तेव्हा त्याची किंमत ही त्याच्या दिवसाच्या दरडोई उत्पन्नाच्या ०.६ टक्के एवढी असते. हाच आकडा ब्रिटिशांच्या देशात १.५% इतका आहे. आपल्या शेजारी चीनमध्ये एक लिटर
पेट्रोलची किंमत ही दरडोई उत्पन्नाच्या ४.१% इतकी आहे.
आता भारताचे आकडे बघा. जेव्हा भारतातील माणूस गाडीत एक लिटर पेट्रोल भरतो तेव्हा तो त्याच्या दिवसाच्या दरडोई उत्पन्नाच्या तब्बल २३.५% इतकी किंमत मोजत असतो! डिझेल(२०.९%) आणि एलपीजी(१५.६%)चे आकडेही असेच चिंताजनक आहेत.
गेले जवळपास सहा महिने एसटी सेवा संपामुळे विस्कळीत झालेली आहे. याची किंमत कोणी मोजली? याची किंमत मोजली एसटीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांनी. गेले सहा महिने सरकार रोज यांना नवीन नवीन आवाहन करतं. रोज सदावर्ते वकील उठून आपल्या दिव्य शैलीत तारे तोडतात. एवढं झाल्यावर कोर्टाचा निकाल येईल,
मग बघू अशी सरकारी ढकलगाडी सुरू होती. आता कोर्टाने निकाल तर देऊन झाला. विलीनीकरणाची मागणी कोर्टाने मान्य केली का ? अजिबात नाही.
कोर्टाने फक्त सिंह-शेळी न्याय लावत सरकारने यांना परत सेवेवर रुजू व्हायची संधी द्यावी, अन्य काही भत्ते वगैरे द्यावेत असं सांगितलं. हा निकाल आल्यानंतरही
सदावर्ते वकील मान्यच करायला तयार नाही की कोर्टाने विलीनीकरण नाकारलं आहे. कोर्टाने विलीनीकरणविरोधात चॅलेंज करायला मुभा दिली असा अत्यंत फालतू शब्दच्छल करून सदावर्ते वकील लोकांची दिशाभूल करत आहेत. जर हायकोर्टाने दिलेला आदेश मान्य नसेल, तर सदावर्तेंनी सुप्रीम कोर्ट गाठावं! ती मुभा
आमदारांना फक्त मुंबईत घर देऊन भागेल असं वाटत नाही. महाराष्ट्रातले आमदार खूप काम करतात, त्यांना राज्यभर फिरावं लागतं. त्यामुळे प्रत्येक आमदाराला मुंबईत एक, पुण्यात एक, नागपुरात एक अशी तीन घरे द्यावीत आणि गोव्याच्या सीमेलगत, शिंदुर्गात एक बीच रिसॉर्ट द्यावं.
याचबरोबर कामांसाठी दिल्लीला जायला लागतं, त्यामुळे दिल्लीतहूं एक 2BHK सदनिका द्यावी. आमदारांना कामाचा शीण येतो, त्यामुळे त्यांना ताजतवानं ठेवण्याची जबाबदारी अर्थातच जनतेची आहे. त्यामुळे आमदारांना वर्षातून एकदा थायलंड ट्रिप, अडीच वर्षांतून एकदा लास वेगास ट्रिप
आणि पाच वर्षांतून एकदा पॅरिस ट्रिप घडवून आणावी. आमदारांना जनतेसाठी खूप चालावं लागतं त्यामुळे त्यांचे पाय दुखतात. त्यामुळे त्यांचे पाय चेपण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस, उर्वशी रौतेला आणि करणजीत कौर यांना एन्युअल मेंटेन्सन कॉन्ट्रॅक्टच्या धर्तीवर कंत्राट द्यावं.
राज्यसरकारमधला एक कॅबिनेट मंत्री राजीनामा देऊन तुरुंगात आहे, दुसरा कॅबिनेट मंत्री राजीनामा न देता कस्टडीत आहे, तिसरा कॅबिनेट मंत्री म्हणतो आता महाराष्ट्र माझं मुलांना राहायला सुरक्षित वाटत नाही विशेष म्हणजे हे तिन्ही मंत्री एकाच पक्षाचे आहेत!
या पक्षाकडे असलेली टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करायची पॉवर गंजली की काय ?
बाकी फडणवीस, सोमय्या आणि कंपनी रोज नवीन आरोप करते, मविआ सरकारशी संबंधित लोकांवर रोज कसल्या न कसल्या रेड मारल्या जातात, कोणीही कधीही अटकेत जाईल, कोणाचीही प्रॉपर्टी जप्त होईल असा माहौल बनवून ठेवला गेला आहे...
सगळं होत असताना, रोज उठून पत्रकारांना ही सगळी सूडाची कारवाई आहे असं सांगून सगळं निमूट सहन करायची स्ट्रॅटेजी नक्की कोणत्या चाणक्याने आखून दिलीय बरं? सूडाची कारवाई आहेच हे सगळ्या बाजूच्या लोकांना मान्यच आहे की! मुद्दा हा आहे की तुम्ही यावर इलाज काय करणार ?
'यंग शेल्डन'च्या 'पोकर,फेथ अँड एग्ज' या एपिसोडमधला संवाद-
Pastor Jeff : Sometimes people say to me, "Pastor Jeff, how do you know there's a God?" And I say "It's simple math. God either exists or he doesn't." So let's be cynical.
Worst-case scenario, there's a 50-50 chance, And I like those odds.
Sheldon : [raising his hand] That's wrong.
Mary : [sotto voce] Shelly, put your hand down.
[to Pastor Jeff]
Mary : Sorry, Please continue.
Pastor Jeff : That's okay, Mary. It's Sheldon, right?
Sheldon : Yes, sir.
Pastor Jeff : Well, Sheldon, why don't you come on up here and tell me why I'm wrong.