#आधुनिक_दुर्योधन
मोदींनी देशाला उपयुक्त होईल अशी एकही महायोजना आणली का..? काँग्रेसच्या 23 योजना जशाच्या तशा चालु ठेवल्या त्यात 19 योजनांची नावे बदलली. आणि अपूर्ण अभ्यास करत, ज्या नवीन योजना आणतात त्यात असंख्य त्रुटी असतात. मोदी हे अत्यंत एकाधिकारशाहीने वागणारे प्रशासक आहेत.
२) असा व्यक्ती प्रचंड हेकेखोर स्वभावाचा असतो, त्याला मनाला आवडेल असे सल्ले देणारे लोक आसपास आणि स्वतःच्या राजदरबारी असलेली आवडतात, जे अधिकारी
खरच चांगल्या हेतूने काम करत, त्यांची तात्काळ बदली करण्यात आली. राक्षसी बहुमताच्या जोरावर विविध जनहिताच्या कायद्यात अनावश्यक बदल केले..
३) शेतकरी आंदोलन असो वा CAA NRC, अशा बऱ्याच निर्णयाला समाजाच्या विविध स्तरावरून एकजूट विरोध झाला, पण तो विरोध इतर ठिकाणी दिसू नये, जेणेकरून इतरांनाही त्याची जाणीव होईल, या हेतूने प्रसारमाध्यम आपल्या चोरखिश्यात ठेवली.
त्याचा उपयोग, योजनेला विरोधच होत नाही हे दाखवायला झाला.
४) सत्ता चालविण्यासाठी जे अंगीं उत्कृष्ट प्रशासकाचे गुण असतात त्यात एकही गुण PM मोदी यांच्याकडे नाही. बरेच लोक त्यांच इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसलेल कारण घेऊन टीका करतात. पण ते योग्य नाही, सुप्रशासनासाठी भाषा आडवी येत नाही, त्यासाठी मनात उदात्त जनहिताची भावना लागते..
५) भारत, जगभरात एक मोठ्या विस्तृत शेळ्या-मेंढ्यारूपी कळपा'गत दिसून येत आहे.
अन त्याच्या म्होरक्या हा बेफिकीर, अकार्यक्षम, अविचारी, कर्तृत्वहीन आहे, जो फक्त
प्रासंगिक कार्यक्रमात बोलक्या भाटाप्रमाणे कर्णमधुर व्याखान देतो, असे हे प्रधानसेवक फक्त अहंकारी दुर्योधनासमान भासतात.
६) त्यांच्या भाषणात स्वकर्तृत्वाबद्दल सांगण्यासारख काहीच नसल्याने, जनेतला भुलवण्यासाठी,( मी तर म्हणेल भरकटविण्यासाठीच.)
जर्मनीच्या हुकूमशहाप्रमाणे किंवा स्वार्थी व्यापाऱ्याप्रमाणे गोडबोल्या शैलीत भारतात घडलेल्या भूतकाळातील ऐतिहासिक घटना, थोर व्यक्तींच्या कार्याची महती सांगतात
७ ) याने जनता,काही काळ आपले कान, शेकून भूतकाळातील घटनांवर आनंदी होते, व आपल्या वर्तमानाच मातेरं करते. त्यात त्यांचा फारसा दोष अजिबात नसून, त्याला फोडणी देणाऱ्या त्या वक्त्याचा आहे. मोदींच्या वंगाळ कारभाराची गुरुकिल्ली हीच की जनेतला भ्रमित करणे. त्यावरच त्यांच्या सत्तेचा मनोरा..!
८) आता जनताजनार्दनाने यातून बोध घेऊन, येणाऱ्या पिढ्यांच्या कल्याणा साठी जागरूक होणे फार गरजेचे नाहीतर, खायचे वांदे झाल्याशिवाय राहणार नाही. ही काय माझी भविष्यवाणी नाही, येणाऱ्या काळाची चाहूल आहे. जी आपल्याला विनाशापासून वाचण्याचा हितोपयोगी संकेत देत आहे.
समाप्त.
जय हिंद.🇮🇳
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
Happy birthday Rahul gandhi..🎂
१) राहुल गांधी म्हणजे कोण ? जेव्हा तुम्हाला कुणी अस विचारेल तेव्हा त्याला हे सांगा -
आपल्या विचारावर, तत्वावर, निर्णयांवर ठाम राहणारा माणूस. कितीही संकट, अपयश आली तरी हार मानली नाही. झुकला नाही, अनेक जवळच्यानीं साथ सोडली.
( पुढे वाचा. )👇
२) कुटूंबाची व स्वतःची घाणेरडी बदनामी केली तरीही डगमगला नाही. सोशल मीडियाद्वारे त्यांचं भ्रामक व खोटं चित्र तयार केलं.
ज्यात राहुल म्हणजे मोठ्या घरचा अय्याश पोरगा, जो कधी माणसात गेला नाही, ज्याला लोकनेतृत्व कळत नाही. आणि इतर व्यक्तीगत आरोप, चरित्रावर किळसवाणी चिखलफेक, 👇
३) असे सर्व हल्ले परतवुन 'राहुल राजीव गांधी' धीरोदात्त महानायकाप्रमाणे पाय रोवून उभा आहे, तेही रणभेरी वातावरणात न घाबरता.
ताणतणाव समोर असताना, पार्टी खोल दरीत असताना सुद्धा हा माणूस संयमी मुद्रेत, आपल्या मुखावर हलकंस स्मितहास्य करतो. ते बेजबाबदार किंवा अजाण म्हणून नाही.👇
#Thread - अफजलखान वध
दगाबाज विरुद्ध दगलबाज..⚔️
१) अफजलवध म्हणजे आदिलशाहीचा पालापाचोळा करून टाकणारी ऐतिहासिक घटना. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचा सर्वश्रेष्ठ दाखला महाराजांनी सबंध जगाला दाखवून दिला व स्वराज्याची पेटती मशाल आणखी बुलंद केली. स्वराज्याचा मार्गही सुकर केला.
२) अफजलखान वध आपण चित्रपट-नाटक पोवाडा, पुस्तकाच्या किंवा आपल्या थोरां मोठ्यांच्यां वाणीने ऐकला असेल. पण इतिहासातील काही बारकावे बघत अफजलखान वधाचा हा व्यापक आढावा.
हा थ्रेड मोठा जरी होणार असला तरी छत्रपतींच्या शौर्यकीर्तिपूढे तो केवळ सुक्ष्मंच असेल.
३) छत्रपती महाराजांचे पराक्रम सारखे वाचावे वाटतात, त्यातील प्रत्येक चित्र, चलचित्र डोळ्यापुढे येतात. अशा सर्व शिवइतिहास वाचकप्रेमीनी जरूर वाचावे. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ, दगलबाजी म्हणजेच मुत्सद्दीपणाची प्रेरणा आपल्या जीवनात घ्यावी. अशी विनंती.
#Thread भाग -१ पेशवे-सर्वश्रेष्ठ कपटपटु
पेशवे म्हटले की सामन्यात: आपल्याला अटकेपार झेंडे, पानिपत, बाजीराव मस्तानी, चिमाजी अप्पा, बारभाई कारस्थान, ध चा म,
काका मला वाचवा अशा खुप गोष्टी आठवतात.
पण यापलीकडेही पेशव्यांची लुप्त ओळख ही सर्वश्रेष्ठ कपटपटु उर्फ कटकारस्थानी पेशवे होय.
२) सध्या पेशव्यांच्या वैचारिक वारसदारीचं बांडगुळ फोफावत चाललं आहे. कारण उत्तर पेशवाईमधे जेवढे हाफ डझनभर बाजीरावांचे असले नसलेले पराक्रम आपल्या सोयीनुसार लिहण्याचा जो सपाटा चालला त्याने सामन्य रयत किंवा इतिहासात रुची ठेवणारे,
३) असे सर्वजन भ्रमित झाले. या पेशवाई हितसंबंधी कलम कसाईंनी पेशव्यांचे असे काही पराक्रम लिहुन ठेवले की त्यांच्या पराक्रमाच्या तेजापुढे, कुंतीपुत्र भीम अर्जुन, राम लक्ष्मण, अंगद, मारुती, अशा सर्व थोर वीरांच्या तेजस्वी तलवारीच-धनुष्याच, गदेचं पाणी पाणी झाल्याशिवाय राहीलं नसणार..
परशुराम नाव ऐकलं की, आपल्याला कोण आठवत ? कुऱ्हाड आणि धनुष्य घेतलेला एक दाढी वाढलेला साधु, जो क्षत्रिय वेशात आहे.
यांची ख्याती हिंदु धर्मात आईच मुंडक उडवणे
व तब्बल २१ वेळ क्षत्रियांना खल्लास करणे.
यांच्या हातून कधीही समाजसेवा घडली नाही.
२)वर्णवर्चस्वावादी कलम कसाईंनी रक्त'दौतीत कुऱ्हाड बुडवून लिहलली भिक्षुक दशावतारी माहात्म्यकथा वाचा - परशुराम एवढा का पिसाळला की त्याने राष्ट्रातील सबंध क्षत्रीयक्षय केला.- सहस्रार्जुन नावाचा एक सर्वगुणसंपन्न त्रिलोकमान्य राजा होता, अस स्वतः मी म्हणत नाही हे उल्लेख पुराणात आहे.
३)सहस्त्रार्जुनाची निंदा करणार एकही अक्षर पुराणात नाही, एवढा तो महान राजदंडधारी
भुपती होता, त्याच्या तोडीला जर कुणाला उभं करायच असेल तर खुद्द बळीराजाच पात्र आहे.
अशा त्रिभुवनप्रिय नृपतीला ठार करायला ईश्वर अवतार घेतो, हे तर अवतारभानगडीच्या थोबाडीत मारणार तर्क आहे, म्हणजे काहीही.
#Thread_१ - भट्ट सांगे अन मठ्ठ ऐके.
१) पोथी पुराणात भटांचे माहात्म्य प्रचंड गुळपाक घालुन तयार केले आहे की कल्पना केलेली बरी. आता भटी टाळक्यातुन निघालेली कथा वाचा > सरस्वती नदीवर सगळे गंजड गोसावडे ऋषी मुनी बसले होते ब्रम्ह, तप, ज्ञान, योग,कर्म या वादविवादाच्या सनाळ्या ठोकत..
२) त्यांच्यात चर्चा सुरू झाली त्रिदेवांपैकी
नक्की कोण श्रेष्ठ ? ब्रम्हा, विष्णु की महेश.
मग त्यांच्यात एक अतिमहान तपस्वी होते, त्यांच नाव भृगू हे एक अतिप्राचीन महर्षी व वैदिक सूक्तद्रष्टा, कृत्रिम रीत्या अग्नी निर्माण करण्याचा शोध प्रथम यानीच लावला. एवढे ते थोर शास्त्रज्ञ होते.
३) पहिला मनुने तयार केलेल्या कोणीतरी प्रजापतीचं वीर्य म्हणे अग्नीत पडलं आणि हे लगेच चमत्कारिकरित्या जन्मले, ( असा याचा जन्म ) भृगू साहेब हे स्वायंभुव मनुचे जावई, शिवशंकराचे साक्षात साडु व दक्षाच्या दोन कन्यांचे पतीराज असल्याचे, महाउल्लेखनीय उल्लेख आहे ग्रंथ गाठोड्यात.
#अवतार
हिंदुस्थानात ईश्वर-अवतारा विषयी एवढा गाढव-गोंधळ आहे की नुसती कल्पना केलेली बरी. तस पाहिले तर महान चरित्र आपल्याकडे अनेक वर्षांनी जन्म घेतात, आणि त्यातली सर्वोच्च व्यक्तिमत्व असलेल्या महान विभुतींना आपण मनाच्या देव्हाऱ्यात बसवुन त्यांच्यावर अमर्याद प्रेमाचा वर्षाव करतो.
एखादा थोर सदाचारी पुरुष दिसला की, लगेच त्याला कंठ कोरडाठाक पडेपर्यंत धजन्या-भजन्यात धन्यता मानली जाते. नंतर अतिशयोक्तीचा मिष्टक्रुर कहर करून त्याना आपल्या 'प्राणप्रिय त्रिदेवा पैकी कोणत्याही देवाच्या समतुल्य मानून, हे मत सरळसोटपणे ठोकून दिले जातं. हा बलिशपणा इथवर थांबत नाही.
पुढे मग त्या महाविभुतीला त्याच्या मोक्षकार्या नंतर ग्रांथिक स्वरूपात प्रस्तुत केलं जातं,आणि मग इथुन सुरू होते अवताराची विचका वाटणारी शिमगा-धुळवड, मग अवताराला आलय दिलं जातं, सध्या त्याला देवालय म्हणतो आपण. चिकित्सक वृत्तीचा संन्यास हा नैतिकरित्या मनुष्याला खिळखिळा करतो.