बाळ कोल्हटकर (२५ सप्टेंबर १९२६ - ३० जुन १९९४ ) त्यांनी लिहिलेली नाटके भावनाप्रधान व कौटुंबिक असत. त्यांची बरेच नाटके अतिशय लोकप्रिय झाली. व्यवसायीक रंगभूमीसाठी त्यांनी नाटके लिहिली होती तरीही मुल्ये जपली होती. दुरीतांचे तिमीर जावो, @LetsReadIndia@PABKTweets@DrVidyaDeshmukh 👇
वाहतो ही दुर्वाची जुडी, मुंबईची माणसं, एखाद्याचं नशीब अशा अनेक नाटकांचे हजारो प्रयोग झाले. त्यांनी तीसहून अधिक नाटके लिहिली. शहरी मध्यमवर्गीय नाटकांबरोबरच काही पौराणिक, ऐतिहासिक विषयही हाताळले. उत्तम कवी असल्याने त्यांच्या नाटकात पदेही असायची जातात.ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या👇
गाठी,या गीतांमधून त्यांनी रसिकांच्या बरोबर ऋणानुबंध कायम प्रस्थापित केले. 'आई तुझी आठवण येते' हे हृदयस्पर्शी गीत त्यांनी रचले. हे गीत बालाजी पेंढारकरांनी स्वतः संगीतबद्ध करून मंचावर साभिनय गायले. 'मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला' हे गीत ऐकताना आपण जणू गोकुळात असल्याचा भास👇
होतो, आली दिवाळी दिवाळी', 'उठी उठी गोपाला', 'गजाननाला वंदन करूनी', 'तू जपून टाक पाऊल जरा' ही गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत.नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नट ही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. हेच एका 👇
रामचंद्र चिंतामण ढेरे : (२१ जुलै १९३० – १ जुलै २०१६). महाराष्ट्रातील धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृती, लोकसंस्कृती, लोकसाहित्य, संतसाहित्य आणि काव्यशास्त्र याविषयी संशोधन करणारे व्रतस्थ संशोधक, अभ्यासक, लेखक आणि संपादक. ढेरे यांच्या ग्रंथनिर्मितीचा प्रवास १९५० पासून सुरू होतो; 👇
१९५२-५३ साली त्यांनी भोर संस्थानच्या शंकराजी नारायण पारितोषिकासाठी नाथ संप्रदायावरती लघुप्रबंध लिहिला. त्याला पुरस्कारही मिळाला आणि येथूनच त्यांच्या शोधकार्यास आणि संशोधनात्मक लेखनाला प्रारंभ झाला, तो शेवटच्या श्वासापर्यंत चालूच राहिला. त्यांची वाङ्मयसूची लोकसंस्कृतीचे 👇
प्रातिभ दर्शन या त्यांच्या गौरवग्रंथात सविस्तर आहे. त्यांच्या ग्रंथांची संख्या जवळजवळ एकशे दहा आहे. यात स्वतंत्र, अनुवादित, आधारित व संपादनेही आहेत. अनेक महत्त्वाच्या ग्रंथांना ढेरे यांनी प्रस्तावना वा पुरस्कार लिहिले आहेत. शरीर व्याधींनी ग्रासलेले, आर्थिक स्वास्थ्य नाही अशा 👇
एकनाथ पांडुरंग रेंदाळकर, मराठी कवी. आपल्या आरंभीच्या कविता रेंदाळकरांनी ‘मंदार’ ह्या टोपण नावाने लिहिल्या. मंदारमञ्जरी ह्या काव्यसंग्रहात समाविष्ट आहेत. मोहिनी (खंडकाव्य) अन्योक्तिमुक्तांजंलि (दोन भाग), विरहिणी राधा @LetsReadIndia@PABKTweets@DrVidyaDeshmukh@marathitwit 👇
आणि बुध्दीनीति ह्या त्यांच्या अन्य काही काव्यकृती "रेंदाळकरांची कविता" (दोन भाग) ह्या नावाने त्यांची कविता संकलित करण्यात आली आहे रेंदाळकरांची स्फुट काव्यरचना तीनशेवर असून त्याशिवाय ‘यमुना गीत’, ‘मोहिनी’, ‘सारजा’ सारखी त्यांची दीर्घ काव्यरचनाही पुष्कळच आहे
रेंदाळकरांनी स्वतःला 👇
केशवसुतांचे निष्ठांवत अनुयायी मानले. संस्कृतप्रचुर, प्रौढ, प्रसादपूर्ण आणि सहज अशी त्यांची काव्यरचना आहे. तथापि ह्या काव्यरचनेपैकी फारच थोडी वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येईल. अशरीर (प्लेटॉनिक) प्रेमाचा आपल्या काव्यातून त्यांनी पुरस्कार केला आणि हे त्यांचे आशयदृष्ट्या वैशिष्ट्ये होते.👇
कृ.ब.निकुम्ब यांना साहित्याबरोबरच चित्रकला, आणि संगीत ह्या कलामध्ये रुची होती. केशवसुतांपासून बदललेल्या मराठी कवितेच्या परंपरेत निकुम्बांची कविता अवतरली. भावगीत रचनेचे, काव्यरचनेचे विविध प्रकार कणिका, सुनीते, गझल या @LetsReadIndia@PABKTweets@DrVidyaDeshmukh@marathitwit 👇
या सार्यांचा समावेश त्यांच्या रचनांमध्ये होता. अपुर्या आकांक्षा आणि भग्न ध्येये हे त्यांच्या कवितेचे विषय झाले. सौम्य आणि शांत प्रकृती हे त्यांच्या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य होते. जीवनात जे जे उदात्त आणि कोमल आहे त्याचे वर्णन त्यांनी आपल्या कवितेतून केले. निसर्गाची अनेक मधुर
रूपे त्यांच्या कवितेतून साकारली. तसेच मानवी भावभावनांचा तरल आविष्कार त्यांच्या कवितेतून झाला. उत्तरोत्तर त्यांची कविता अधिकाधिक सूक्ष्म चिंतनशील होत गेली. तसेच वैयक्तिक अनुभूतींचे कलात्मक आविष्करण त्यांच्या कवितेतून होत गेले.
‘घाल घाल पिंगा वार्या’ हे त्यांचे गीत अजूनही आवडीने👇
शिवाजीराव अनंतराव भोसले : (१५ जुलै १९२७‒२९ जून २०१०). महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत, व्यासंगी लेखक व सुप्रसिद्ध वक्ते.त्यांनी दैनिक सकाळ व दैनिक लोकसत्ता यांमधून दीर्घकाळ सदर लेखन केले. त्यांची दीपस्तंभ, यक्षप्रश्न, मुक्तिगाथा @LetsReadIndia@PABKTweets@DrVidyaDeshmukh 👇
महामानवाची, कथा वक्तृत्वाची, जागर : खंड १ व २, हितगोष्टी, प्रेरणा, देशोदेशीचे दार्शनिक, जीवनवेध हे ग्रंथ मान्यता पावलेले आहेत.त्यांच्या तत्त्वज्ञानात समन्वयाला महत्त्व होते. मतामतांच्या गलबल्यात हरवलेले सत्य शोधून काढणे आणि लोकांपुढे मांडणे हे त्यांचे कार्य होते. सॉक्रेटिस, 👇
प्लेटो, ॲरिस्टॉटल, कांट या तत्त्वचिंतकांप्रमाणेच त्यांनी आपल्या विचारात आणि आचरणात नीतीला केंद्रबिंदू मानले.पंढरपूरला वारीतून जाताना वारकर्याने शरीराची काळजी म्हणून विज्ञानाचा आधार घ्यावा, तर मनाच्या पोषणासाठी विठ्ठलाचे स्मरण करावे. दोन्हींची माणसाला गरज आहे, असे ते सांगत. अशा👇
कोल्हटकरांचे नाव घेतले जाते ते मुख्यत: नाटककार, विनोदकार आणि वाङ्मयसमीक्षक म्हणून. त्यांच्या पदरचनेने ज्याप्रमाणे रंगभूमीवरील संगीताला वेगळे आकर्षक वळण लावले त्याचप्रमाणे त्यांच्या संवादलेखनाने मराठी नाटकांतील संवादांमध्ये खटकेबाजपणा @LetsReadIndia@PABKTweets@DrVidyaDeshmukh👇
आणि कोटित्व आणले. त्यांचे सुदाम्याचे पोहे… हे पुस्तक हा मराठीचा बहुमोल वाङ्मय ठेवा आहे. असामान्य कल्पनाविलास व कोटित्व यांच्याबरोबच समाजचिंतनातून जन्माला आलेल्या सामाजिक सुधारणांविषयीच्या पुरोगामी भूमिकेतून स्फुरलेले असल्यामुळे ते जितके रंजक तितकेच विचारप्रवर्तक ठरले. 👇
सुदाम्याचे पोहे… मध्ये संगृहीत झालेल्या लेखांची संख्या बत्तीसच असली, तरी त्यांतून प्रकट होणाऱ्या उपहासविषयांची व्याप्ती फार मोठी आहे. त्यांच्या असाधारण कल्पकतेला व्यासंगाची, शास्त्रीय दृष्टीची, शिस्तप्रियतेची व परिश्रमशीलतेची सतत जोड मिळाल्यामुळे त्यांचे लेखन अत्यंत भारदस्त व 👇
दि बा मोकाशी, ख्यातनाम मराठी कथा-कादंबरीकार. संपूर्ण नाव दिगंबर बाळकृष्ण मोकाशी.विविध अनुभूतींतून माणूस शोधण्याचा, व्यक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न हे त्यांच्या कथालेखनाचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. रहस्यकथा, @LetsReadIndia@PABKTweets@DrVidyaDeshmukh@marathitwit 👇
पिशाच्चकथा असे कथाप्रकारही त्यांनी हाताळले आहेत. लामणदिवा या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहात त्यांची प्रयोगशीलता दिसून येते. पण कथामोहिनीपासून त्यांच्या कथेने खूपच पुढचा टप्पा गाठला आहे. व्यक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेण्याचे त्यांचे सामर्थ्य ‘गोष्टीची मोहिनी’, रहस्यकथेचा एक दिवस 👇
यांसारख्या कथांतून दिसून येते. पण आता ‘आमोद सुनासि आले’ यासारख्या कथेत मात्र ते कथालेखनाचा एकदम वरचा पल्ला गाठतात. भावचित्रणातील हळुवारपणा व नाजुकपणा आणि घटनेतील नाट्य यांचा संगम या आणि त्यांच्या अनेक कथांतून आढळून येतो. अनेक जीवनानुभवाच्या वेगवेगळ्या पातळींवरून अनुभव घेऊन, 👇