प्रविण कलंत्री 📚 Profile picture
जाती न पुछो साधू की, पुछ लिजीये ज्ञान,, मोल करो तलवार का, पडा रहे दो म्यान! पुस्तक प्रेमी!! #पुस्तकआणिबरचकाही
प्रविण कलंत्री 📚 Profile picture 2 subscribed
Mar 20, 2023 9 tweets 3 min read
#पुस्तकआणिबरचकाही
वसंत शंकर कानेटकर (२० मार्च १९२२ – ३० जानेवारी २००१) लोकप्रिय मराठी नाटककार, लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत.प्राध्यापक असतानाच त्यांनी लघुकथा लेखक आणि कादंबरीकार म्हणून आपली लेखन कारकीर्द सुरू केली. मनोहर आणि सत्यकथा यांसारख्या नियतकालिकांमधून लिहिलेल्या 👇 Image लघुकथा प्रसिद्ध झाल्या.  १९५० ते १९५७ याकाळात त्यांच्या घर, पंख आणि पोरका या तीन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. १९५७ मध्ये कानेटकरांनी आपले पहिले नाटक वेड्याचे घर उन्हात लिहिले. कालबाह्य रूढी-परंपरा आणि कर्तव्याच्या ओझ्याखाली दबलेल्या एका मनस्वी, कलासक्त, संपन्न व्यक्तिमत्त्वाची 👇 Image
Mar 19, 2023 4 tweets 2 min read
#पुस्तकआणिबरचकाही
एडगर राइज बरोज ( १ सप्टेंबर १८७५ - १९ मार्च १९५९ ) टारझन हे नाव न ऐकलेलं क्वचितच कोणीतरी असेल. एका इंग्लिश उमरावाचा मुलगा आई वडिलांचे छत्र हरवून आफ्रिकेच्या निबिड अरण्य एप्सच्या टोळी सोबत वाढतो. डोळ्याचं पातं लावताना लावतो तोच वेलींच्या आधारे  एका झाडावरून 👇 दुसऱ्या झाडावर तिथून तिसऱ्या झाडावर असा लिहिलया प्रवास करू शकतो. अंगावर फक्त एक व्याघ्राजीन, कमरेला लटकणारा धारदार सुरा, मानेवर रुळणारे केस आणि पिळदार शरीरयष्टी. एडगर राइज बरोज ने टारझन या पात्राची पहिली कथा लिहिली १९१२ मधे. बघता बघता टारझन इतका लोकप्रिय झाला की बरोजने 👇
Mar 19, 2023 8 tweets 3 min read
#पुस्तकआणिबरचकाही
रिचर्ड फ्रान्सिस बर्टन(१९ मार्च १८२१-२० ऑक्टोबर १८९०) प्रसिद्ध इंग्लिश समन्वेषक, चतुरस्त्र  विद्यावंत, बहुभाषाविद, अरेबियन नाइट्सचा श्रेष्ठ इंग्रजी भाषांतरकार तसेच बहुप्रसू लेखक. "माणसाला जे योग्य वाटते ते मनसोक्त करणे म्हणजे पुरुषार्थ" असे सांगणारा बर्टन. 👇 Image एकोणिसाव्या शतकात एवढं अद्भुत विलक्षण आणि नाट्यपूर्ण जीवन जगलेला दुसरा कुणी झालाच नाही. बाळ सामंत यांनी अनेक वर्ष प्रचंड अभ्यास तसेच देशा परदेशात ठिक ठिकाणी भेटी देऊन रिचर्ड बर्टन चे चरित्र या "शापित यक्ष" या पुस्तकात अतिशय ओघवत उत्तमरित्या रंजक शैलीत सादर केले आहे. 👇 Image
Mar 19, 2023 6 tweets 3 min read
#पुस्तकआणिबरचकाही
सई परांजपे ( १९ मार्च १९३८ ) मराठी लेखिका, नाटककार, बालनाट्ये लिहून रंगमंचावर सादर करणाऱ्या, पटकथाकार व चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्या आहेत. समांतर चित्रपट या वर्गवारीत येणारे अनेक चित्रपट त्यांनी प्रामुख्याने दिग्दर्शित केले आहेत.सई परांजपे हे नाव त्यांच्या 👇 बालवयापासूनच लोकांना परिचयाचे आहे. कारण, ज्या वयात मुले लंगडी, लपाछपी खेळतात त्या वयात म्हणजे वयाच्या ८व्या वर्षी, सई परांजपे यांचे पहिले पुस्तक -मुलांचा मेवा- केवळ लिहून नव्हे तर, छापून प्रकाशित झाले होते. त्यामुळे त्यांची सुरुवातच मुळात बाल वयातील लेखीका म्हणून झाली. 👇
Mar 18, 2023 7 tweets 3 min read
#पुस्तकआणिबरचकाही
मालती बेडेकर (१८ मार्च १९०५ - ७ मे २००१) विख्यात मराठी कांदबरीलेखिका. अलंकार मंजूषा (१९३१) आणि काशीनाथ नरसिंह केळकर यांच्याबरोबर लिहिलेला हिंदू व्यवहार धर्मशास्त्र (१९३२) ह्या ग्रंथांचा समावेश त्यांच्या आरंभीच्या लेखनात होतो. तथापि कळ्यांचे निःश्वास (१९३३) 👇 हा त्यांचा पहिला कथासंग्रह विभावरी शिरुरकर ह्या टोपण नावाने प्रसिद्ध होताच मराठी साहित्यविश्वात मोठीच खळबळ उडाली. पुरुषी अहंकाराचे स्त्रियांवर होणारे आघात, वाढत्या कौमार्यकाळामुळे त्यांचा होणारा भावनिक कोंडमारा ह्यांचे अत्यंत प्रत्ययकारी दर्शन त्यांनी ह्या संग्रहातील जिवंत 👇
Mar 17, 2023 7 tweets 3 min read
#पुस्तकआणिबरचकाही
विष्णुशास्त्री चिपळूणकर : (२० मे १८५०–१७ मार्च १८८२). ‘आधुनिक मराठी गद्याचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार.त्यांचे वडील कृष्णशास्त्र्यांनी चालविलेल्या शालापत्रक  ह्या मासिकातून विष्णुशास्त्र्यांच्या लेखनाचा आरंभ झाला पुढे ते या मासिकाचे संपादक👇 झाले. निबंधमाला हे विष्णुशास्त्र्यांचे प्रमुख जीवितकार्य. निबंधमालेच्या सात वर्षांच्या कारकीर्दीत निघालेल्या सर्वच्या सर्व म्हणजे ८४ अंकांतील लेखन विष्णुशास्त्र्यांनी जवळजवळ एकटाकी केले. निबंधमालेत विविध विषयांवर लिहिलेल्या त्यांच्या निबंधानी मराठी निबंधाला सामर्थ्य दिले आणि 👇
Mar 17, 2023 6 tweets 3 min read
#पुस्तकआणिबरचकाही
रा. ना. दांडेकर ( १७ मार्च १९०९ - ११ डिसेंबर २००१ ) मराठी, संस्कृत व इंग्लिश या भाषांमधून विपुल लेखन करून आपल्या विद्वत्तेची वारंवार प्रचिती आणून दिली आहे. या सर्वांत महत्त्वाचा ठरू शकेल, असा ग्रंथ म्हणजे त्यांनी केलेली वैदिक ग्रंथांची, लेखांची सूची (वैदिक 👇 बिब्लिओग्रफी - पाच भागांमध्ये) फ्रेंच विद्वान लुई रनू यांनी १९४५ पर्यंतच्या वैदिक अध्ययनाची एक सूची छापली होती. त्यानंतरच्या काळात संस्कृत, भारतविद्या यांच्यावर विपुल लेखन झाले.१९४५ पासून १९९० पर्यंतच्या पंचेचाळीस वर्षांच्या कालावधीत निरनिराळ्या कालखंडांसाठी बिब्लिओग्रफी-सूची 👇
Mar 16, 2023 6 tweets 2 min read
#पुस्तकआणिबरचकाही
कुमुदिनी रांगणेकर ( २५ मार्च १९०६ - १६ मार्च १९९९ ) कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्यप्रकार.
     ‘नवल’ मासिकातून अनेक इंग्रजी कादंबर्‍यांचे मराठी अनुवाद त्यांनी केले. 👇 त्यांची २३६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्यप्रकार.‘नवल’ मासिकातून अनेक इंग्रजी कादंबर्‍यांचे मराठी अनुवाद त्यांनी केले.
 ‘अनियमित जग’ ही त्यांची पहिली अनुवादित कादंबरी 👇
Mar 16, 2023 6 tweets 3 min read
#पुस्तकआणिबरचकाही
कुमुदिनी रांगणेकर ( २५ मार्च १९०६ - १६ मार्च १९९९ ) कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्यप्रकार. ‘नवल’ मासिकातून अनेक इंग्रजी कादंबर्‍यांचे मराठी अनुवाद त्यांनी केले. 👇 Image त्यांची २३६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्यप्रकार.‘अनियमित जग’ ही त्यांची पहिली अनुवादित कादंबरी. ‘प्रीतीचा शोध’, ‘फुललेली कळी’, ‘शकुनी मोहर’, ‘हरपलेलं गवसलं’, 👇 Image
Mar 15, 2023 4 tweets 2 min read
खाकी फाइल्स - नीरज कुमार अनुवाद रोहन टिल्लू

पोलिस आयुक्त म्हणून निवृत्त झालेल्या नीरज कुमार ह्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील नऊ प्रकरणाचा शोध कसा घेतला हे सविस्तरपणे सांगीतले आहे.
@LetsReadIndia @PABKTweets @booksnama @pustakaayan
#पुस्तकआणिबरचकाही 👇 योगायोग या पहिल्याच प्रकरणात लाॅटरी घोटाळा इतका अवाढव्य असू शकतो.. हे वाचतांना थक्क होतो. गोव्यातील एक आमदार उघड आव्हान देतो, माझ्या बंगल्यावर रेव्ह पार्टी करतोय, हिम्मत असेल तर धाड टाकून दाखवा..एक आमदार जो पोलिसांना वाॅन्टेड असतांना सत्तधिशांच्या आशिर्वादाने राजरोस वावरतो...👇
Mar 15, 2023 6 tweets 3 min read
#पुस्तकआणिबरचकाही
सुधीर मोघे ( ८ फेब्रुवारी १९३९ - १५ मार्च २०१४ ) कवितेची उत्तम जाण असणाऱ्या आणि कवितेलाच आपला प्राण मानणाऱ्या सुधीर मोघे यांचे शब्दमाध्यमावरचे प्रेम नितांत होते,
     ‘शब्दांना नसते दु:ख     शब्दांना सुखही नसते
     ते वाहतात जे ओझे      ते तुमचे माझे असते’ 👇 या शब्दांतून सहज त्याचा प्रत्यय येतो.
  कवी-गीतकार म्हणून सुधीर मोघे जेवढे आणि जसे श्रेष्ठ होते, तेवढे आणि तसेच ते संगीतकार म्हणूनही मोठे होते, त्यांनी संगीत दिलेल्या ‘कशासाठी प्रेमासाठी’ या मराठी चित्रपटाची गाणी जशी गाजली तशीच ‘सूत्रधार’ या हिंदी चित्रपटाचीही गाजली. 👇
Mar 14, 2023 5 tweets 3 min read
#पुस्तकआणिबरचकाही
अरुण कांबळे ( १४ मार्च १९५३ - २० डिसेंबर २००९ ) दलित साहित्य अखिल भारतीय स्तरावर तसेच जागतिक स्तरावर नेण्याचे काम करणे हीच जीवननिष्ठा, असे मानणारे ते धडाडीचे लेखक आणि कवी आहेत. मुंबई आणि हैद्राबाद या दोन्ही उच्च न्यायालयांनी संशोधन ग्रंथ म्हणून मान्यता 👇 दिलेल्या ‘रामायणातील संस्कृती संघर्ष’  (१९८२) या ग्रंथांच्या तीन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. या ग्रंथाचे भाषांतर गुजराती, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांत करण्यात आले. ‘जनता पत्रातील लेख’, ‘धर्मांतराची भीमगर्जना’, ‘चीवर’, ‘युगप्रवर्तक डॉ.आंबेडकर’, ' चळवळीचे दिवस' 👇
Mar 14, 2023 8 tweets 3 min read
#पुस्तकआणिबरचकाही
सुरेश भट ( १५ एप्रिल १९३२ - १४ मार्च २००३ ) मराठी गझल विश्वातील अजरामर नाव. या नावाशिवाय मराठी गझल हा विषय पूर्ण होऊ शकत नाही.बालपणी पोलिओने पाय अधू झाल्याने काहीसे दुर्लक्षित जगणे वाट्याला आले. आईला असलेली कवितेची आवड अनुवांशिकतेने त्यांच्यात आली आणि त्यांनी👇 लिहायला सुरुवात केली.काही वेळा नापास होत कसेतरी शिक्षण पूर्ण करुन ते नौकरीला लागले. ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते आणि १९६१ मध्ये ‘रुपगंधा’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. सुरेश भट यांनी उर्दू भाषेतील शेर, शायरी, गझल यांचा आयुष्यभर👇
Mar 14, 2023 8 tweets 3 min read
#पुस्तकआणिबरचकाही
विंदा करंदीकर (२३ ऑगस्ट १९१८ - १४ मार्च २०१०) हे मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, व समीक्षक होते. गोविंद विनायक करंदीकर हे विंदा करंदीकर या नावाने प्रसिद्ध झाले. विंदांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, 👇 गांभीर्य आणि मिस्किलपणा, आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते. अशावेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता-ऐकता क्षणीच आपले मन वेधून 👇
Mar 13, 2023 7 tweets 3 min read
#पुस्तकआणिबरचकाही
वासुदेव विष्णु मिराशी (१३ मार्च १८९३ – ३ एप्रिल १९८५) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक व भारतविद्यातज्ज्ञ. प्राचीन शिलालेख, नाणी आणि अभिजात प्राचीन संस्कृत साहित्य ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्रे. वाकाटकांच्या ताम्रपटांचा आणि शिलालेखांचा 👇 मागोवा घेऊन सध्याचे रामटेक म्हणजेच मेघदूतातील रामगिरी होय, असा सिद्धांत मांडला.हा सिद्धांत त्यांनी मेघदूतातील रामगिरी अर्थात रामटेक या नावाने प्रकाशित केला .अजिंठ्याच्या लेखातील ‘सुवीथिʼ या शब्दाचे योग्य वाचन करून अजिंठ्याच्या लेणी क्रमांक १६, १७, १९ व २१ मधील भित्तिचित्रे 👇
Mar 13, 2023 6 tweets 3 min read
#पुस्तकआणिबरचकाही
रविंद्र पिंगे ( १३ मार्च १९२६ - १७ ऑक्टोबर २००८ )   १९५५ मध्ये ‘मौज’ साप्ताहिकात युसुफ मेहेरअलींची व्यक्तिरेखा लिहून पिंग्यांनी लेखनाचा श्रीगणेशा गिरवला, आणि पुढे सतत पन्नास वर्षे पिंगे लिहीत होते. ४० ग्रंथांची निर्मिती त्यांच्या नावे जमा झाली आहे. 👇 चपखल लेखशीर्षके; अचूक व नेमकी शब्दयोजना ललित्यपूर्ण, एकात्म, एकसंध, बंदिस्त भाषाशैली हे खास वैशिष्ट्य होय. मौज, साधना, माणूस, वीणा, नवशक्ती, सकाळ, केसरी, महाराष्ट्र टाइम्स, सत्यकथा, ललित इत्यादींमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. ‘देवाघरचा पाऊस’ , ‘दिवे लक्ष्मण दिवे’, 👇
Mar 12, 2023 6 tweets 2 min read
महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड
भाग १ - १६३० - १७०७
भाग २ - १७०७ - १७१८
लेखक - डॉ. वि. गो. खोबरेकर
छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात महाराष्ट्रात हिदवी स्वराज्य स्थापन करून मराठी सत्तेचापाया घातला. @LetsReadIndia @PABKTweets #पुस्तकआणिबरचकाही 👇 आठराव्या शतकात हिंदूस्थानभर मराठी सत्तेचा विस्तार झाला. हिंदूस्थानच्या इतिहासात हा कालखंड सत्तेचा मराठा सुप्रीमसी कालखंड म्हणून इतिहासकारांनी गौरविला आहे. मराठ्यांची सत्ता एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस पेशवाईच्या रुपात अस्तंगत झाली. 👇
Mar 12, 2023 4 tweets 2 min read
#पुस्तकआणिबरचकाही
कविता विश्वनाथ नरवणे ( १२ मार्च १९३३ - २८ ऑगस्ट २०२० ) प्राध्यापिका म्हणून काम करीत असतांना लेखनाची सुरुवात केली. अनेक दिवाळी अंकात काय प्रसिद्ध झाल्या होत्या. विविध साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले. 👇 कथासंग्रह, कादंबरी, नाटके अशी त्यांची पस्तीसहुन अधिक पुस्तके प्रकाशित झाली. ओघवती भाषा व नेमके विश्लेषण ही त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते.त्यांच्या एका कथासंग्रहाचे जाने अन्जाने या नावाने हिंदीत भाषांतर झाले. सोळा भाषांतील म्हणी व वाक्प्रचार या 👇
Mar 11, 2023 5 tweets 2 min read
#पुस्तकआणिबरचकही
शंकर भाऊ साठे : (२६ ऑक्टोबर १९२५ – ११ मार्च १९९६). महाराष्ट्रातील शाहीर व साहित्यिक. अण्णाभाऊ साठे यांचे कनिष्ठ बंधू म्हणून शंकर भाऊ साठे हे संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. तसेच ते शाहीर व साहित्यिक म्हणूनही सुपरिचित आहेत. ' माझा भाऊ आण्णाभाऊ ' ( १९८० ) 👇 हे त्यांचे आत्मकथनात्मक चरित्र प्रसिध्द आहे. अण्णाभाऊंचे जीवन आणि कार्य समजून घ्यायला हे आत्मपर लेखन महत्त्चाचे आहे. एकच काडतूस (१९८४), सूड (१९८५), सगुणा (१९८६), घमांडी (१९८६), सावळा (१९८६),जग (१९८६),  लखू (१९८७), बायडी (१९९१), सुगंधा (१९९१), बाजी (१९९१), काळा ओढा इत्यादी 👇
Mar 10, 2023 7 tweets 2 min read
#पुस्तकआणिबरचकही
सावित्रीबाई फुले ( ३ जानेवारी १८३१ - १० मार्च १८९७ ) बालवयातच ज्योतिबांशी विवाह झाल्यावर पतीकडून त्यांनी शिक्षण घेतले. पुढे त्यांनी आपल्या पतीच्या सामाजिक कार्यातच सहभाग घेतला नाही तर अनेक वेळा मार्गदर्शन केले. अवहेलना व प्रतिकुल परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन👇 Image समाजसुधारणेच्या क्षेत्रात आगेकूच सुरूच राहिली. सावित्रीबाई फुले देशातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला मुक्ति चळवळीच्या पहिल्या नेत्या होत्या, ज्यांनी पती ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने देशातील महिलांच्या शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाई फुले या दलित कुटुंबात जन्मल्या👇 Image
Mar 10, 2023 9 tweets 4 min read
#पुस्तकआणिबरचकही
वि.वा.शिरवाडकर(२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९)मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व👇 ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. १९३० साली हं. प्रा. ठाकरसी विद्यालयात ते होते तेव्हा 'रत्नाकर' मासिकातुन त्यांच्या कविता प्रसिध्द होत. अस्पृश्य समजल्या जाणार्‍या लोकांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून १९३२ साली जो सत्याग्रह झाला त्यात त्यांनी सहभाग घेतल्यामुळे 👇