लहानपणापासून शिवसेनेचे बाळकडू आम्हाला पाजले गेले. मुंबईतील जन्म आणि पुढचे सगळेच आयुष्य मुंबईत घालवल्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आणि समान विचारांची कास धरलेलली भारतीय जनता पक्षावर कायमच प्रेम राहिले आहे. (Thread)
एक कट्टर मुंबईकर आणि सातारकर म्हणून मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे (भाई) यांची निवड केल्याबद्दल माननीय देवेंद्रजी फडणवीस खूप आभार आणि एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन.
माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांचे शेवटचे भाषण पाहून थोडं वाईट नक्कीच वाटले मात्र त्यांना ही जाणीव करून देण्याची गरज होती हे ही तितकचं महत्त्वाचं होते. . कारण जी व्यक्ती आपले मूळ कुळ विसरते ते ऱ्हासाच्या मार्गी लागतात.
कुटील, भ्रष्टाचारी काँग्रेसी वृत्तीमधून बाहेर पडून शिवसेनेच्या ४० आमदारांनी बाळासाहेबांची खरी शिवसेना पुन्हा जागी केल्यामुळे एक सामान्य मुंबईकर म्हणून अतिशय आनंद आहे. बाळासाहेब असते तर कधीही असे घडू दिले नसते.
रोज सकाळी उठून अतिशय अर्वाच्य भाषेत जनतेसमोर येऊन घाण ओकणाऱ्या संजय राऊत सारख्या घमेंडखोरी वृत्तीचा नायनाट झाला तर अतीव आनंद सर्वप्रथम शिवसैनिकांनाच होईल हे उद्धवजींनी लवकर लक्षात घेतले तर फार बरे होईल.
“अकेला क्या करेगा देवेंद्र” 😂 म्हणणाऱ्या आणि महाराष्ट्र भ्रष्टाचाराने पोखरत चाललेल्या काही कुटुंबाना देवेंद्रजींनी चांगलीच चपराक ठेवून दिल्याचा मनस्वी आनंद आहे. घाणेरड्या राजकारणातून महाराष्ट्राची आज सुटका होऊन आज आपला महाराष्ट्र श्वास घेऊ लागला असल्याचा आनंद आहे.
अतिशय प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्राची दैना उडवून दिलेल्या काँग्रेसी वृत्तीला निरोप देऊन पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या नैसर्गिक युतीकडे उद्धवजींनी परतावे अशी सामान्य शिवसैनिकांची देखील नक्कीच इच्छा असेल मात्र घाण ओकणाऱ्यांना मागे ठेवून आलात तरी अतिऊत्तम.
देवेंद फडणवीस यांसारख्या हुषार आणि हिंदुराष्ट्राची इच्छा बाळगणऱ्या साथ नव्या सरकारला लाभत आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आणि प्रगतीपथावर येईल असा विश्वास आहे.
२५ वर्ष युतीमध्ये सडली नाहीत तर ही अडीच वर्ष महायुतीमध्ये, जातीय राजकारणामध्ये महाराष्ट्र सडला आणि या महाविकासाआघाडीच्या राजकारणात सामान्य हिंदुराष्ट्राची मागणी करणारे मतदार , शिवसैनिक आणि भाजप मतदार भरडला गेला.
मतदारांचा कौल युतीला असताना केलेले राजकारण कधीच वर्ष टिकणारं नव्हतं कारण मतदार हा राजा असतो. शेवटी माननीय राज ठाकरेंचे वाक्य आठवतं आहे सहनशीलतेचा अंत पाहू नका, सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी येत नाही, उद्धवजी तुम्हीही नाही. #uddhavThackeray#EknathShinde#DevendraFadnavis#BJP
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh