आपल्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच देश पातळीवर दोन घटना अशा घडल्या ज्याचा मिडियाने कसा वापर केला ते पहा.
भाजप प्रवक्ता नुपुर शर्मा यांच्या एका वादग्रस्त विधानानचे पडसाद जागतिक पातळीवर उमटले. व पक्षाची पर्यायाने भारत सरकारची) नाचक्की झाली.
हे प्रकरण आपल्या अंगाशी येत आहे असे दिसताच पार्टीने अंग झटकले. नेहमीप्रमाणे त्या प्रवक्ताला फ्रिंज म्हणजे पार्टीशी संबंधित नसलेले म्हणून घोषित करून टाकले व ही बाई सध्या लापता आहे असे कळते. कालच सांप्रदायिक सद्भावाला बिघडवण्यासाठी नुपूर शर्माला सुप्रिम कोर्टानेही जबाबदार धरले आहे.
नुपूर च्या विधानाचे कोणा एका टेलरने (जो हिंदू होता) समर्थन केले म्हणून त्याची हत्या दोन मुस्लिम युवकांनी अत्यंत क्रूरपणे केली व या घटनेचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. या घटनेचा करावा तेवढा निषेध व या दोन क्रूरक्रम्यांना कठोरतम शिक्षा व्हायलाच हवी.
देशात यामुळे पुनः एकदा हिंदू मुस्लिम दंगे भडकवण्याचा उद्देश लपून राहिला नाही. तसेच या दोघांचे राजकीय लागे बांधेही चर्चेत आले आहेत. त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे राजस्थानातील गेहलोत सरकारने या दोन्ही हैवानांना त्वरित जेरबंद करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
सुदैवाने कुठल्याही रॅल्या यांच्या समर्थनात निघाल्या नाहित अथवा यांचा कोणी ‘फूलमालासे सत्कार’ वगैरे केला नाही. दुसरी घटना म्हणजे राहुल गांधी यांच्या वायनाड (केरला) येथिल कार्यालयावर हल्ला झाला होता.
काल राहुल गांधींनी वायनाड मधील दौऱ्यात पत्रकारांशी बोलतांना ज्यांनी माझ्या कार्यालयावर हल्ला केला ते बच्चे आहेत त्यांना माफ करू अशा अर्थाचे विधान केले. आता मिडियाचा हरामीपणा बघा! #ZeeNews
राहुल गांधींनी उदयपूरच्या मारेकऱ्यांना बच्चे आहेत त्यांना माफ करू अशी बातमी झी न्यूजच्या ‘डीएनए’ या कार्यक्रमादरम्यान चालवली. या क्लिप्स पार्टीच्या मोठमोठ्या नेत्यांनीही शेअर केल्या व व्हायरल केल्या. कांग्रेसने यावर कायदेशीर कारवाईचे संकेत दिल्यावर झी ने माफी मागितली.#GodiMedia
सतत दंगे पसरवण्यास अनुकुल वातावरण तयार करणाऱ्या ‘डीएनए’ च्या सुधीर चौधरीची झी मधून हकालपट्टी झाली. अँकर बदलला, पण डीएनएचा डीएनए मात्र तोच आहे. केवळ सत्तेची चाटुकारिता करण्याचा!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
श्रुती कपिला यांनी @RahulGandhi राहुल गांधींची घेतलेली मुलाखत व्हायरल झाली आहे. श्रुती कपिला या केंब्रिज विद्यापीठातील इतिहास विद्याशाखेत सहयोगी प्राध्यापक आणि कॉर्पस क्रिस्टी कॉलेजच्या फेलो आहेत. या मुलाखतीतील एका क्लिप चा हा भावानुवाद-
केंब्रिज विद्यापिठात पार पडलेल्या या कार्यक्रमात श्रुती यांनी @RahulGandhi यांना प्रश्न विचारला, "१९७० नंतर
जन्मलेल्या आपल्या पिढीने आपल्या आयुष्यात हिंसेची मोठी भूमिका पाहिली आहे आणि तुमच्या बाबतीत तर ती वैयक्तिकही आहे.
तुमचे वडील (राजीव गांधी) यांची हत्या झाली. नुकतीच त्यांची पुण्यतिथी झाली. माझा प्रश्न थोडा गांधीवादी आहे, तो आहे हिंसेचा आणि त्यासोबत जगण्याचा…आणि तुमच्या बाबतीत ही खूपच वैयक्तिक बाब आहे.
हिंसेतून (विशेषतः कुटुंबियांच्या) येणार्या दबावांना तोंड देण्याच्या वैयक्तिक
गौरव त्रिपाठी @gaathiwrites ताजमहालाबाबतचे ऐतिहासिक तथ्य पुराव्यानिशी मांडले आहेत. ताजमहाल ज्या जमिनीवर बांधला गेला ती जमीन पूर्वी आमेरचे राजा जयसिंह यांच्या मालकीची होती हे लपून राहिलेले नाही. त्या जमिनीवर पूर्वी राजा जयसिंह यांचा वाडा होता.
मुमताज बेगमच्या मृत्यूनंतर राजा जयसिंग यांनी हवेलीसह ही जमीन शाहजहानला दिली.
त्या बदल्यात शाहजहानने जयसिंगाला अकबराबादमध्ये चार राजवाडे दिले.
एवढेच नाही तर ताजमहालच्या बांधकामात वापरण्यात आलेला मकराना दगडही राजा जय सिंह यांच्या खाणीतून येत असे.
ताजमहाल बांधण्यापूर्वी त्या भूमीवर एकही शिवमंदिर नव्हते याची खात्री पटण्यासाठी ही वस्तुस्थिती पुरेशी आहे.
मुळात तो राजा जयसिंहचा वाडा होता. मात्र या वस्तुस्थितीचाही राजकीय डावपेचांमुळे विपर्यास केला जात आहे.