Sharvari A. Joshi Profile picture
Independent journalist, loves books, music, philosophy, art. Political observer. 3 Book titles EMail- sharvarijoshi10@gmail.com RTs not endorsement
May 13, 2023 4 tweets 1 min read
कर्नाटकचं गांधी परिवाराशी एक विशेष नातं आहे. ज्या ज्या वेळी परिवार संकटात होता तेंव्हा या राज्याने आधार दिला आहे.
वर्ष होते १९७७! लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी रायबरेली आणि पुत्र संजय गांधी अमेठी च्या निवडणुकीत पराभूत झाले. १९७८ मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी कर्नाटकातील चिकमंगळूरमधून पोटनिवडणूक लढवली, जिंकली आणि आणिबाणीमुळेबिघडलेले ‘नरेटिव्ह’ पुनः काँग्रेसच्या बाजूने वळवले. या वेळची इंदिराजींच्या प्रचारात
घोषणा होती -
“एक शेरनी, सौ लंगूर- चिकमंगलूर चिकमंगलूर!”
Nov 18, 2022 5 tweets 1 min read
सावरकरांना दैवत मानणारा एक विशिष्ट वर्ग महाराष्ट्रात आहे. इथे येऊन सावरकरांविषयीच्या कटू सत्याला उघडपणे जनतेसमोर मांडण्याची हिंमत एकाही राजकीय नेत्यांत नाही.
@RahulGandhi यांनी खरं तर बैलाची शिंगेच धरली आहेत. स्वतंत्र भारताच्या मतपेढीवर आधारित राजकारणाच्या इतिहासात इतर कोणत्याही नेत्याने बहुसंख्यकवादाच्या शिखरावर असलेल्या विचारसरणीला थेट आव्हान देण्याचे धाडस केले असेल असे दिसत नाही.
Jul 2, 2022 8 tweets 2 min read
आपल्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच देश पातळीवर दोन घटना अशा घडल्या ज्याचा मिडियाने कसा वापर केला ते पहा.
भाजप प्रवक्ता नुपुर शर्मा यांच्या एका वादग्रस्त विधानानचे पडसाद जागतिक पातळीवर उमटले. व पक्षाची पर्यायाने भारत सरकारची) नाचक्की झाली. हे प्रकरण आपल्या अंगाशी येत आहे असे दिसताच पार्टीने अंग झटकले. नेहमीप्रमाणे त्या प्रवक्ताला फ्रिंज म्हणजे पार्टीशी संबंधित नसलेले म्हणून घोषित करून टाकले व ही बाई सध्या लापता आहे असे कळते. कालच सांप्रदायिक सद्भावाला बिघडवण्यासाठी नुपूर शर्माला सुप्रिम कोर्टानेही जबाबदार धरले आहे.
May 25, 2022 5 tweets 2 min read
श्रुती कपिला यांनी @RahulGandhi राहुल गांधींची घेतलेली मुलाखत व्हायरल झाली आहे. श्रुती कपिला या केंब्रिज विद्यापीठातील इतिहास विद्याशाखेत सहयोगी प्राध्यापक आणि कॉर्पस क्रिस्टी कॉलेजच्या फेलो आहेत. या मुलाखतीतील एका क्लिप चा हा भावानुवाद- केंब्रिज विद्यापिठात पार पडलेल्या या कार्यक्रमात श्रुती यांनी @RahulGandhi यांना प्रश्न विचारला, "१९७० नंतर
जन्मलेल्या आपल्या पिढीने आपल्या आयुष्यात हिंसेची मोठी भूमिका पाहिली आहे आणि तुमच्या बाबतीत तर ती वैयक्तिकही आहे.
May 12, 2022 5 tweets 2 min read
गौरव त्रिपाठी ⁦@gaathiwrites⁩ ताजमहालाबाबतचे ऐतिहासिक तथ्य पुराव्यानिशी मांडले आहेत. ताजमहाल ज्या जमिनीवर बांधला गेला ती जमीन पूर्वी आमेरचे राजा जयसिंह यांच्या मालकीची होती हे लपून राहिलेले नाही. त्या जमिनीवर पूर्वी राजा जयसिंह यांचा वाडा होता. मुमताज बेगमच्या मृत्यूनंतर राजा जयसिंग यांनी हवेलीसह ही जमीन शाहजहानला दिली.

त्या बदल्यात शाहजहानने जयसिंगाला अकबराबादमध्ये चार राजवाडे दिले.
एवढेच नाही तर ताजमहालच्या बांधकामात वापरण्यात आलेला मकराना दगडही राजा जय सिंह यांच्या खाणीतून येत असे.