#Replug
संगीतकार म्हणून माझ्या कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीला मंगेश पाडगांवकरांनी मला एक सल्ला दिला होता - "कवितांना तू चाली देतो आहेस हे ठीकच आहे, पण तू गाणं explore कर." तेव्हा ते नेमकं काय सांगत आहेत ते मला नीटसं समजलं नव्हतं पण घरी आल्यावर शांताबाई शेळके यांचा गीतसंग्रह -
‘कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती’ उघडला आणि शांताबाईंची गीतं पाहायला लागलो. गीत आणि कविता यात नेमका फरक काय आहे यावर अनेक चर्चा, वाद झडले आहेत आणि त्यात मला आत्ता पडायचं नाही. इतकंच सांगतो की शांता शेळकेंचा संग्रह वाचू लागलो आणि मंगेश पाडगांवकर काय सांगू पाहत होते ते माझ्या
हळूहळू ध्यानात येऊ लागलं होतं.
‘कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती’ हा शांताबाईंच्या अशा गीतांचा संग्रह आहे की ज्यातली बरीचशी गाणी संगीतबद्ध किंवा ध्वनिमुद्रित झाली होती; पण या गाण्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. काही गाणी चित्रपटांसाठी लिहिली होती पण ते चित्रपटच प्रदर्शित झाले
नाहीत किंवा काही गाणी एखाद दुसऱ्या वेळेला रेडिओवर लागली; पण नंतर लोकांसमोर आली नाहीत.
याच संग्रहातल्या ‘कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’ या गीतावर माझी नजर खिळली.
कळ्यांचे दिवस फुलांच्या राती
येती नि जाती!
असा त्याचा मुखडा होता. कविता म्हणून लिहिलेल्या पद्यामध्ये असा छंद सापडणं
अंमळ कठीणच आणि मला उमजू लागलं की पाडगांवकरांना मला काय सांगायचं असेल. गीतामध्ये केवळ अर्थ आपल्याशी संवाद साधत नाही; तर ध्वनी, लय, नाद आणि त्या गीतकाव्यातले निहीत सूरही आपल्याशी संवाद साधत असतात. संगीतकार खरं तर शब्द ‘संगीतबद्ध’ करत नसतो गोठलेल्या शब्दांना सुरांचं आकाश मोकळं करून
देत असतो.
पुरूष संगीतकार गाण्यातून ‘स्त्री’ची अभिव्यक्ती कशी साकार करतात याचं मला पहिल्यापासून कुतुहल राहिलेलं आहे. माझे गुरू कै. कमलाकर भागवत यांची रचना आहे - ‘घाल घाल पिंगा वाऱ्या’. शब्द आहेत कृ.ब. निकुंब यांचे. कुणाला सांगून खरं वाटणार नाही की हे गीत एका पुरूषाने लिहिलेलं आहे
आणि त्याची चालही एका पुरुषाने बांधलीए.
शांताबाईंचं हे गीत करताना माझ्या मनामध्ये हजार प्रश्न होते. एका स्त्रीचं अंतरंग खरेपणाने आपल्याला आपल्या रचनेत मांडता येईल? त्यासाठी काय करायची गरज आहे? खूप वेळ झाल्यानंतर हे सगळे प्रश्न मी बाजूला ठेवले आणि सरळ शब्द गुणगुणू लागलो. गातागाता
तंद्री लागली आणि एका ओघात या गाण्याची चाल मनातून ओठांपर्यंत वाहत आली. एक साक्षात्कार झाला – ‘स्त्रीसारखं’ असं काही नसतं. आतून स्त्रीच होता आलं पाहिजे. त्याची प्रक्रिया काय हे सांगणं फारच कठीण आहे कारण ते स्वाभाविकपणे, अतिशय सहजगत्या होतं. एवढंच सांगू शकतो की चाल करत असताना
मी कौशल इनामदार नव्हतो.
बाकी चाल तर शब्दातच होती. तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या एका स्वप्नवत क्षणाचं हे गीत आहे. पहिलं स्वरवाक्य झालं ते ‘येती नि जाती’. या ओळीनेच गाण्याचा ताल आणि लय ठरवली. ‘येती नि जाती’ मध्ये एका लंबकाची किंवा एका झोपाळ्याची लय आहे. तुम्ही पाहिलं असेल तर लंबक
किंवा झोपाळ्याचे तीन बिंदू आहेत जिथे एक आभासी ‘ठहराव’ आहे. दोन दिशांच्या दोन टोकांना - आणि एक मध्यभागी. म्हणून तीन मात्रांचा वॉल्ट्झ - १-२-३ - १-२-३ असा जाणारा ताल या गाण्यासाठी निवडला. अर्थात ‘निवडला’ म्हणजे तो त्या गाण्यातच निहीत आहे. आणि मग शब्द नेतील तसा मी ते गीत गात गेलो.
‘क्षणात उंच नेतसे मला’ या ओळीतल्या ‘उंच’ शब्दावर वरचा ‘सा’ गाठला तर ‘येते ती घटिका सुंदर आहे’ ही ओळ दोन वेळा घेऊन ‘घटिका’ शब्द दोन्ही वेळेला वेगवेगळ्या सुरांवर घेतला ज्यामुळे ‘येणारा प्रत्येक क्षण सुंदर आणि वेगळा आहे’ असं प्रतीत होईल.
ह्या गाण्याची आणखी एक आठवण अशी की
‘शुभ्र कळ्या मूठभर’ या माझ्या पहिल्या ध्वनिमुद्रिकेतलं हे पहिलं गायलेलं गीत आहे. माझी मैत्रीण भाग्यश्री मुळे हिने ते गायलं. तिने गायलेलं गीत तुम्हाला माझ्या संकेतस्थळावर विकत घेता येईल.
शांताबाईंचे शब्दच खरं तर या चालीसाठी प्रेरणा ठरले. माझा त्यावेळच्या वयाचा निरागसपणाही या
चालीत आहे. तुम्हाला हे आवडेल अशी आशा आहे!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
बाहेर अविरत पाऊस पडतोय. अविरत. Continuously. शाळेत असताना व्याकरणात आपण Present Continuous Tense – अपूर्ण वर्तमानकाळ – शिकलो आहोत. हा अपूर्ण वर्तमानकाळ आपल्याला वाक्यातही आणता येतो आणि काव्यातही! परंतु हा अविरतपणा, अपूर्ण वर्तमानकाळ संगीत रचनेत कसा आणता येईल याचा
मी अनेकदा विचार करत असे.
काही वर्षांपूर्वी प्रा. अशोक बागवेंनी मला एक ग़ज़ल चाल लावण्याकरता दिली होती.
पाऊस हा फुलांचा पाऊस पाकळ्यांचा
डोळे हळूच आता आतून झाकण्याचा
या शब्दांमध्ये Here & Nowचा एक फील होता. हे आत्ता सुरू आहे. कदाचित, ‘पाऊस हा फुलांचा’ असं म्हटल्यामुळे असेल.
हे शब्द माझ्या मनात अनेक दिवस दरवळत होते पण चाल काही सुचत नव्हती.
मग एक दिवस मी पं. सत्यशील देशपांडेंकडे वाळकेश्वरला त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा ते राग झिंझोटीचा रियाज करत बसले होते. मलाही त्यांनी गायला बसवलं. त्या झिंझोटी रागाच्या आलापीत ते ‘रे’ या स्वरावरून सुरू करत होते
I had a boy working for me who was a converted Christian. He was poor and when he came to me was in search of work. My son was in kg at the time and sometimes when I and my wife were away at work, we used to ask him to get our son home by rickshaw for which we paid him some
additional cash. One day my wife saw that despite taking money for rickshaw he got my son home by bus. She asked him why he didn’t come home in a rickshaw and he said he couldn’t get one. We let it be. One day I got a phone call from a colleague of mine to whom I had sent this
boy to pick up a cheque. My friend said, “Your boy was here and we got talking. He told me about your wife having caught him bringing your son by bus. He confessed to me that this was not the first time he had done this. He said he used to do it often to save up money. That
In the summer of 1993, when I was still a confused young man, undecided on what career to choose, I came across a cassette of songs by #Ilaiyaraja in a small shop in Coimbatore, while on a trip to the south with my parents. I was still far away from considering
music as a career; I was contemplating to be a writer at that time, having won the prize of best playwright twice in INT and Unmesh competitions. But music was a permanent resident in my mind and lips and I hummed constantly.
I had been introduced to Ilaiyaraja’s music
through Balu Mahendra’s #Sadma and since then was absolutely enamoured by his genius. So when I came across this cassette of Ilaiyaraja compositions sung by the great #SPBalasubramaniam, I was more than excited.
Of all the songs in that cassette, ‘Pachamala poovu’,
#Swatantryagaan
A music concert of songs from Indian cinema that contributed to the Indian freedom struggle and after.
It was great fun to conceive and curate this concert and work with such a talented team led by Kamlesh Bhadkamkar.
The musicians were some of the finest of our times - Archis Lele, Anil Karanjavkar, Datta Tawde, Hanumant Rawade, Amit Gothivrekar, Varad Kathapurkar, Rahul Deo and Kamlesh himself.
The singers did such a rocking job that
2 and a half hours of only patriotic songs from films from 1936 to 2021 and yet the audience was kept glued to the seats. A small clip from the concert will give you an idea how electrifying the atmosphere was.
If you notice, even the construction of her sentence in English is grammatically incorrect. This happens due to apathy towards language and not just apathy towards ‘a’ language. The tendency of ‘this much is enough to get the work done’ as against doing the work aesthetically is
what is at play here. I see the same attitude in Marathi too. What @Nawazuddin_S has said in the viral clip is a problem that I had highlighted in a Marathi thread a few days back. Pt. Satyadev Dube used to say, “If your language is unclear, your thoughts remain ambiguous too.”
In Marathi too, we see the pressure to make the language ‘simpler’ by giving up the rules of ‘shuddhalekhan’ for example. There is also a militant opposition towards standardised language in the name of casteism. On the contrary, I think that is a very dangerous policy to have
#मराठीदिन निमित्त एक मजेशीर गोष्ट. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातील काही मुलं मला भेटायला आली.
मला म्हणाली -“सर, झेवियर्स महाविद्यालयात खूप पूर्वीपासून मराठी वाङमय मंडळ आहे परंतु काही कारणाने ते अनेक वर्ष निष्क्रीय होतं.
आमचे सर आहेत - शिंदे सर - त्यांनी या मंडळाला पुनुरुज्जिवित करायचं ठरवलं आहे. या मंडळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून आपण यावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही याल का?”
तरूण मुलांशी संवाद साधायला मी कधीही नकार देत नाही. मी त्वरित होकार दिला.
तसा त्यातला एक मुलगा जरा ओशाळून म्हणाला - “एकच प्रॉब्लेम आहे सर. मंडळ नवीन आहे आणि तुम्हाला झेवियर्सची कल्पना आहे. आमच्याकडे बराचसा श्रोतृवर्ग अमराठी आहे. तर तुम्ही तुमचं भाषण इंग्रजीतून कराल का?” मला याची गंमत वाटली. कुणी म्हणेल हे कसलं मराठी मंडळ! पण मला यात एक संधी दिसली.