निवृत्तीनाथ रावजी पाटील उर्फ पी. सावळाराम ( ४ जुलै १९१३ - २२ डिसेंबर १९९७) हे एक मराठी भावकवी होते. भावगीते मराठीत रुजवण्यात ग. दि. माडगूळकर, शांता शेळके यांच्यासह सावळाराम यांचेही नाव घेतले जाते. मराठी गीतांना सुवर्णकाळ आणण्यात @LetsReadIndia @PABKTweets@DrVidyaDeshmukh 👇
त्यांचाही मोठा वाटा होता.सावळाराम यांचे 'गंगा जमुना डोळ्यात उभ्या का' हे गाणे विशेष गाजले. इतक्या वर्षांनंतरही हे गाणे प्रत्येक विवाह सोहळ्याचा अविभाज्य भाग आहे. हे गाणे सावळाराम यांनी पुणे स्टेशनवर एका नवविवाहित मुलीला सासरी जाताना निरोप देण्याऱ्या आईच्या तोंडचे ’दिल्याघरी 👇
तू सुखी रहा’ हे वाक्य ऐकून लिहिले होते. पी. सावळाराम यांच्या कवितांच्या साध्या सोप्या रचनांमुळे कुसुमाग्रजांनी त्यांना 'जनकवी' ही उपाधी बहाल केली होती. गोड गोजीरी लाज लाजीरी, गंध फुलांचा गेला सांगुन, मानसीचा चित्रकार तो, जिथे सागरा धरणी मिळते अशी जवळपास आठशे गाणी लिहिली. 👇
आकाशवाणी च्या कामगार सभेसाठी संहिता लेखन केले, सारे प्रवासी घडीचे, कन्यादान, सलामी या चित्रपटाच्या कथा लिहिल्या.
व्यंकटेश दिगंबर माडगूळकर: (६ जुलै १९२७ - २८ ऑगस्ट २००१). श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार.विख्यात साहित्यिक ग. दि. माडगूळकर ह्यांचे व्यंकटेश हे धाकटे बंधू. आपल्या वडील बंधूंच्या पाठोपाठ तेही साहित्यसृष्टीत आले आणि आपल्या प्रतिभेचा @LetsReadIndia@PABKTweets@DrVidyaDeshmukh 👇
एक स्वतंत्र ठसा त्यांनी उमटविला.तत्पूर्वी माणदेशी माणसे हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी साहित्याला अनोखे होते. अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या पकडीतून 👇
सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला.ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. बनगरवाडी, वावटळ, पुढचं पाऊल, कोवळ दिवस , करुणाष्टक आणि सत्तांतर ह्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत.👇
रामकृष्ण गोपाळ भांडारकर : (६ जुलै १८३७-२४ आँगस्ट १९२५). थोर प्राच्यविद्यासंशोधक संस्कृतचे प्रकांड पडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक व कर्ते धर्मसुधारक तथा समाजसुधारक.त्यांची विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या विद्वत्तेची साक्ष @LetsReadIndia@PABKTweets@DrVidyaDeshmukh 👇
देते. एवढेच नव्हे, तर प्राचीन भारताचा सुसंगत पुराव्यांच्या आधारे इतिहास कसा शोधून काढावा, ऐतिहासिक घटनांचा प्रमाणशुद्ध अर्थ कसा लावावा, याचा उत्कृष्ट नमुना त्यांच्या ऐतिहासिक लेखनात सापडतो. त्यामुळे त्यांचे ग्रंथ हे भारताच्या प्राचीन इतिहासाचे आधारभूत ग्रंथ म्हणून स्वीकारले 👇
जातात. मालती-माधव ह्या संस्कृत ग्रंथाचे त्यांनी उत्कृष्टपणे संपादन केले.प्राचीन भारतातील विविध धार्मिक संप्रदायांचा आणि विविध धार्मिक तत्त्वज्ञानांचा संगतवार इतिहास दाखविण्याचे महत्वाचे कार्य भांडारकरांनी लिहिलेल्या संशोधनपर ग्रंथांनी केलेले आहे ते धार्मिक आणि सामाजिक सुधारणेचे👇
चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ़ बाबुराव अर्नाळकर ( ९ जुन १९०६ - ५ जुलै १९९६ ). गिनीज बुक मध्ये नोंद झालेले बाबुराव अर्नाळकर हे मराठीमधील पहिले लेखक म्हणावे लागतील.बाबुराव अर्नाळकरांनी मराठी साहित्य जगतात आणलेल्या रहस्याच्या गारुडात 👇 @LetsReadIndia@PABKTweets@DrVidyaDeshmukh
अजूनही वाचक गुंतून आहेत. अर्नाळकरांच्या झुंझार, धनंजय, काळा पहाड, गोलंदाज, भीमसेन, सुदर्शन यांनी जो धुमाकूळ घातला त्याला तोड नाही. रहस्यकथा या साहित्यप्रकाराला एक प्रकारची प्रतिष्ठा अर्नाळकरांमुळे लाभली.खर्या अर्थाने त्यांनी तळागाळातल्या माणसांना मराठी वाचनाची गोडी लावली. 👇
त्यांचे नायक झुंजार, धनंजय-छोटू, मेजर सुदर्शन, इन्स्पेक्टर दिलीप, दर्यासारंग हे मराठी घरांघरांतून फिरले. तत्कालीन लोकप्रिय कादंबरीकार ना. सी. फडके यांच्या कादंबर्यांपेक्षा जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांनी बाबूराव अर्नाळकरांच्या कादंबर्या चोरून वाचल्या गेल्या होत्या.
आनंद साधले - ( ५ जुलै १९२० - ४ एप्रिल १९९६ )मूळ नाव आत्माराम नीलकंठ साधले, हे मराठीतील एक विद्वान लेखक होते. हा जय नावाचा इतिहास या युधिष्ठीराला महाभारताचा खलनायक ठरविणाऱ्या कादंबरीमुळे आनंद साधले यांना सुरुवातीची खूप कुप्रसिद्धी व @LetsReadIndia@PABKTweets@DrVidyaDeshmukh 👇
नंतर अमाप प्रसिद्धी मिळाली. या कादंबरीचे क्रमश: प्रकाशन करणे मराठीतील अनेक मासिकांनी नाकारले शेवटी दिपावली ने त्यांच्या अंकात प्रसिद्ध करायला सुरुवात केली. महाभारताच्या अनेक अभ्यासकांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली. सामान्य वाचकांनी मात्र डोक्यावर घेतलेली कादंबरी जसजशी पुढे सरकत 👇
तसतसे त्याचे विरोधक थंडावले. दमयंती सरपटवार या टोपण नावाने काहीसे वात्रट वाटणारे लेखनही केले आहे आनंदध्वजाच्या कथा, इसापनीती भाग एक व दोन (बालसाहित्य) लिहिले.आकराव्या शतकात रचलेल्या रुक्मिणी स्वयंवर या काव्याचा रसाळ भावानुवाद केला
( ४ जुलै १९२६ - १७ एप्रिल २०११)वि.आ.बुवा यांचे लेखन सुरू झाले ते प्रभाकर पाध्ये यांच्या प्रेरणेने! ‘सोबत’ साप्ताहिकातून त्यांचा लेखनप्रवास सुरू झाला. ‘अकलेचे तारे’ हे त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. महाराष्ट्र ग्रंथ भांडारच्या @LetsReadIndia@PABKTweets@DrVidyaDeshmukh 👇
शं.वा.कुलकर्णी यांनी काढलेला वि.आ.बुवा यांचेच साहित्य असलेला ‘बुवा’ हा दिवाळी अंक तुफान लोकप्रिय झाला.विपुल प्रमाणात लिहिलेले त्यांचे लेखन प्रामुख्याने सामान्य वाचकांसाठी आहे त्यामुळे सामान्य माणसाचे दैनंदिन जीवन, त्याच्या आशाआकांक्षा, त्याची सुखदुःखे, त्याच्या जीवनातील विसंगती👇
यांचेच दर्शन त्यांच्या साहित्यातून होते. त्यांच्या साहित्याला अफाट लोकप्रियता लाभली. कित्येक दिवाळी अंक त्यांच्या लेखनाशिवाय वाचकांच्या पसंतीला उतरत नाहीत. ‘आवाज’ दिवाळी अंकाशी त्यांचे जवळचे नाते जुळले होते. वि.आ.बुवा आणि विनोदी साहित्य असे समीकरणच मराठी वाचकांच्या मनात तयार 👇
रघुनाथ वामन दिघे ( २४ एप्रिल १८९६ - ४ जुलै १९८०)यांनी आपल्या साहित्यातून ग्रामीण जीवन व त्यातील प्रश्न हाताळताना चित्तथरारक प्रसंगांना ग्रामीण निसर्गाच्या प्रत्ययकारी चित्रणाची जोड दिली. पकड घेणारा संघर्ष व रसरशीत शरीरप्रणय यामुळे @LetsReadIndia@PABKTweets@DrVidyaDeshmukh 👇
त्यांच्या कादंबर्या आकर्षक ठरल्या. त्यांच्या साहित्यातील सर्वच व्यक्तिरेखांना कृषिसंस्कृतीचा अस्सल स्पर्श आहे. डोंगरदर्या, पहाड, वनराई, शेती यांच्यात मनाने व शरीराने गुंतून असणारी गावरान माणसे त्यांच्या कादंबर्यांत जिवंत होतात. कोरडवाहू जमिनीतील शेती, खेड्यातील अस्पृश्यतेचा 👇
प्रश्न, कूळकायद्यानंतर जमीनदार व कुळे यांच्यातील बिघडलेले संबंध, हे विषय दिघ्यांनी मनःपूर्वक, समरसून हाताळले आहेत.ग्रामीण कादंबरीच्या इतिहासात दिघ्यांचे स्थान निर्विवादपणे महत्त्वाचे आहे. दिघे यांच्या कादंबर्यांवर मराठी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये चित्रपट निर्माण झाले आहेत.👇