सगळ्याच खिडक्यांना मिळत नाय दान पुस्तकांचं
पानकळ्यात त्यांना मिळतो ट्रंकेचा कोपरा
चहाचा निवेद खिडक्यांना मकबूल नसतोच काही
घासलेट च्या चिमणीन काही खिडक्या उजळतात पावसात(१)
पावसाचा गनिमी कावा दिसत नसतोय खिडकीतून
कधी तो तात्पर्य देतो माळाच्या झाडावर
सगळ्याच खिडक्या नाय दाखवत पान फुल
काही दाखवतात पावसाने तुंबलेली गटार संसाराने वाहिलेले नाले(२)
सगळ्याच खिडक्यातून दिसत नसतोय पाऊस
काही बंद कराव्या लागतात निळ्या ताडपत्रीन
चौकातून चोरून आणलेल्या बॅनरने
त्या खिडक्या गेट होतात गोमांचं झुरळांच
जित्याच ठिबक गोळा करणारी बादली
मग खाली करावी लागते वेळोवेळी मोरीत(३)
खिडक्यातून दिसणारा पाऊस कधीच नसतो खरा
कोणाचं आयुष्य फुलवल कोणाचं घुरकट
पावसाचं भूत भविष्य कळत नाय खिडकीतून
ते कळत चिखलात, स्टेशन च्या चौकात रानातल्या वावरात(४) @arvindgj@mauliwrites@MarathiRT@rt_marathi
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
म्हणजे कस तर कधीही आनंद देण्याच्या काळात क्रिकेट ही आहेच, सध्याच्या काळात रोहित बघणे डोळ्याला सुख देते. पण काळाने मागे गेले पाहिजे त्याशिवाय आनंद हा सुखात जात नाही. आनंद वेगळा सुख वेगळं. सुख. रात्रीची वेगळी, सकाळची वेगळी. उगा शुजात खा च नाव घेण्यात काही अर्थ नाही.(१)
पण अनेक वेळा रात्री जागून काढल्यात. मग मॅच कोणाचीही असू त्याला काही फरक पडत नाही. मी वेस्ट इंडिज च्या मॅच बद्दल बोलतो. जुन्या काळातली दादागिरी नाही बघितली तर मला अँबरोज, वॉलश, लारा, चांदरपाउल, हुपर, जिमी अडम्स, किथ आथरटन, सरवान हेही आवडलेत. बघितलेत.(२)
म्हणजे त्यांची मॅच बघताना क्रिकेट बघायचे नुसते. तर प्रेक्षक ही बघायचे असते. ते जे आनंद घेतात तो आपण घ्यायचा असतो. ते नाचत असतात आपण मनात नाचायचे असते, मग कुठे चान्स मिळाला झलक मारायची असते. मग उगाच बॉब मार्ले आठवायचा असतो ,नो वूमन नो क्राय.अस वाटायचं बॉब त्या सगळ्यांच्यात आहे,(३)
थोडा पूर आला की एक सुलभीकरण असते की 'हे सगळं वातावरण बदलाचे परिणाम आहेत' म्हणजे थोडं काही झालं की हे र्हेटोरिक मांडलं की मुक्ती मिळते अस काहीसे.
वातावरण बदल होतोय का ? तर नक्की होतोय. होणार आहे का ? होत राहणार आहे. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.(१)
तापमान वाढ होतेय का तर होतेय. मुद्दा एवढा आहे की तापमान वाढीचा वेग जास्त आहे. यापूर्वी कोल्ड एज येऊन गेलंय. आणि असे अनेक नैसर्गिक घटक आहेत त्यांनी वातावरण बदल वा तापमान वाढ होत असते. ज्वालामुखी उद्रेक त्यातून निघणारा धूर मोठ्या प्रदेशावर वातावरण बदल घडवून आणू शकतो.(२)
निसर्ग वादळ आले , कशामुळे तर वातावरण बदलामुळे का ह्याच्या आधी अशा वादळं ची एकही नोंद नाही का? मध्ये मुंबईत खूप पाऊस झाला का ? दुसरं काय वातावरण बदल. का मुंबईत यापूर्वी एवढा पाऊस कधीच झाला नव्हता का. सांगली कोल्हापूर ला पूर आला , वा इतर ठिकाणी पूर येतात लगेच सुलभीकरण.(३)