Avinash Usha Vasant Profile picture
Poet | Writer | Street photographer। कादंबरी : पटेली । कविता : कविता ह्या हिणवलेल्या ।
Dec 6, 2023 7 tweets 2 min read
संपत देसाईंची कविता -

तू भेटला नसतास तर
कदाचित मीही झालो असतो धर्मवीर
‘गर्व से कहो हम’चा नारा देत
सामील झालो असतो झुंडीत.
बनलो असतो हिंसक
आणि रंगले असते माझेही हात
निष्पापांच्या रक्तात.
जेंव्हा माझ्या रक्तात
भिनवले जात होते भेदाचे जहरी विष
(१) तेंव्हा तू भेटलास रखरखीत उन्हात
थंडगार झाडाच्या सावलीसारखा
आणि नेमकं दाखवलेस बोट मला
बुद्धाच्या दिशेने.

मी जिथं जन्मलो ज्या गावकुसात
तिथं तर जात, धर्म आणि लिंगाच्या
मजबूत भिंती
कधीच्याच बांधलेल्या,
कांहीना गावकुसाबाहेर ढकलून
कायमचे अस्पर्श ठरवलेले
तू म्हणतोस तसं
(२)
Nov 19, 2023 10 tweets 2 min read
रोहित शर्मा हा आवडीचा प्लेयर. म्हणजे मुंबईची पोर आपण फॅालो डोमेस्टिक पासूनच करतो.तर २००७ ची मुस्ताक अली ट्रॅाफी ची गुजरात बरोबरची मॅच,पहिल्याच बॅाल वर रहाणे आऊट झाल्यावर ४३ बॅाल मध्ये रोहितने सेंच्युरी ठोकली. भारतातली पहिली टी२० मधली. मी याची डोळा याची देहा पाहिली.ब्रेब्रॅानवर(१) Image तो कसा त्याचा किस्सा नंतर कधीतरी.

पण अशी फिलिंगय की तो आता इथून पुढे तो खेळेल की नाही याची शास्वती नाही.
आज याच दुख जास्त नाही झाल की भारताने वर्ल्ड कप जिंकला नाही. जास्त याचय की तो भविष्यात किती खेळेल. कोणत्याही खेळात वर्ल्ड कप जिंकणे, ॲालंपिक जिंकणे हे भारी असत.(२)
May 18, 2023 8 tweets 2 min read
#thread
तीन वर्षापूर्वी रतन खत्रीवर लेख लिहला होता.

त्या दिवशी अनेकांचे कॅाल आलेले लेख वाचून

पहिलाच कॉल एका स्त्री चा आलेला, तिने ज्या दिवशी तिला रतन खत्री गेल्याचे कळले त्यादिवशी उपवास केला होता.
दोन भाईंनी मला मटका शिकवण्याची गळ घातली.
(१)
divyamarathi.bhaskar.com/amp/news/avina… एक तर मागेच लागले होते , तुम्ही 'प्रोफेसर' आहात तुम्ही मला ह्या आठवड्यातले आकडे सांगायलाच पाहिजे. तुम्हाला चांगलं गणित जमत असणार.
एक जण म्हणाले तुम्ही लेख अर्धवट लिहलाय, तुम्ही मटका कसा खेळतात हे सांगितलेच नाही, खूप कर्ज आहे. मटक्यातूनच काहीतरी मार्ग निघेल. (२)
May 16, 2023 5 tweets 1 min read
‘कर्नन’ आला त्यावेळी लिहलेले.

मारी भारी का माहितेय, कर्नन मध्ये 'येमन' च्या पात्राला दिलेला न्याय. येमन हाच खरा मुख्य केंद्र आहे ह्या फिल्मचा.
येमन हा ह्या देशात घडलेल्या प्रत्येक जातीय हत्याकांडाचे प्रतिनिधित्व करतो. (१) त्या जातीय हत्याकांडांतील त्यांचा संघर्ष, त्याग आणि सांडलेल्या रक्ताला न्याय देतोय. पोचिराम कांबळे, विलास घोगरे, भोतमांगे परिवार, रमाबाई हत्याकांडातील शहीद, नांमातर लढ्यातील शहीद आणि इतर सगळ्यांना मानवी 'चेहरा' देण्याचे कार्य येमन च्या पात्रातून मारीने केलय.
(२)
May 16, 2023 5 tweets 2 min read
तारिख आणि पुस्तक आजच बुक करून ठेवा...

राहुल बनसोडे... निवडक लेखसंग्रह

प्रकाशन समारंभ - शनिवार, ३ जून २०२३
वेळ - सायंकाळी ५.०० वाजता
स्थळ - कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक

मूल्य - ३०० रु.
Phone Pay / Google Pay - 7020045653 (Ashay Yedge)

(१) राहुल बनसोडेच्या निधनानंतर ब्लॅक इंक मीडिया आणि राहुलच्या मित्र परिवाराने त्याच्या निवडक लेखांचा संग्रह प्रसिद्ध करण्याचे ठरवले आहे. या निवडक लेखसंग्रहाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
(२)
May 16, 2023 5 tweets 2 min read
#थ्रेड

दादासाहेब गायकवाड हे ‘जमीनी’च्या लढ्यांना आंबेडकरवादी विचार देणार खूप महत्वाच नाव.
मराठवाड्यातील गायरानांचा प्रश्न असूदे वा शहरांतील झोपडपट्टीचा प्रश्न असूदे दादासाहेबांनी तो हिरारीने मांडला.
पण ह्याच मुळे काहींनी त्यांना डावे ठरवायचा डाव ही रचला. (१) त्यांच्या नंतर जमीनींच्या प्रश्नांवर व्यापक सर्वसमावेशक असे काम केले गेले नाही. जे आहेत छोटे छोटे लढे होते, त्यांना आंबेडकरी विचारांची बैठक नव्हती.
आजही जमीनींच्या प्रश्नाबद्दलचा बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका एकदम पक्की आहे. त्यामुळे कोणत्याही जमीनींच्या लढ्यात ते पुढे असतात,(२)
Jan 26, 2023 15 tweets 3 min read
#नायगाव #thread

गिरणगावचा विचार केला की साधारण लालबाग परळ हा भागच डोळ्यासमोर तराळतो. कारण त्यामागे केलेले डॉक्युमेंटेशन आहे. बर्यापैकी याभागावर साहित्यिक मुल्यांतून वा सामाजिक आशयातून लिहलेले आहे. मागे मी बोलल्या प्रमाणे गिरणगावचे तीन सांस्कृतिक भागात विभागणी होते.(१) शहरांना कधीच संस्कृती नसते वा सभ्यता नसते. बाहेरून आलेले लोक शहरांना ओळख देत असतात. गिरणगावात देखिल तसेच होते. कोकणी बहूल लालबाग-परळ, कोल्हापूर मिश्र वरळी, पारशी प. महाराष्ट्र बहूल नायगाव दादर असे भाग केले जातील. गावांकडून आलेल्या चाकरमाण्यांनी आपल शेत सर्व काही आणले.(२)
Dec 11, 2022 10 tweets 3 min read
Long thread
#चुनाभट्टी
मुंबईतल्यांना चुनाभट्टी हे नाव सहज माहीतेय. हार्बर ला रेल्वे स्टेशन ही आहे त्या नावाचे.
मुंबईतली ब्रिटिशकालीन जी काय बांधकामे झालीत, आणि आजही ही मजबूत आहेत याचे संपूर्ण श्रेय चुनाभट्टी भागाचे आहे. चुन्याच्या खूप मोठ्या भट्ट्या त्याभागात होत्या. (१) चुन्याच काम हे सिमेंटच्या कामापेक्षा कितीतरी मजबूत.जुन्या गड किल्ल्यांची पण साक्षय याला.
मुंबईत आता चुनाभट्टी नाहीत,मला चुनाभट्टी बघायला मिळाली रत्नागिरी मधल्या जुवे गावात.जुवे म्हणजे खाडीतले बेट.खाडीत मिळणारे शिंपले गोळा करून भट्टीत भाजून मग चोपले की बारीक शुभ्र चुना मिळतो(२)
Nov 27, 2022 8 tweets 2 min read
Long thread

हे आहे साखरी नाटे.
४००० वा थोडी कमी जास्ती लोकसंख्या. साखरी नाट्यात साधारण ५०० मोठ्या तर २०० च्या वर छोट्या बोटी आहेत.मोठ्या बोटीवर ४० च्या आसपास काम करतात. तर छोट्या बोटावर १० जण काम करतात. हे बघता एकूण २२ हजार लोकांना काम यातून मिळत. हे फक्त मासेमारी शी निगडित(१) मासे विकणे , त्याचे परिवहन , प्रक्रिया याचा यात उल्लेख नाही. ते धरले तर ४० हजार हून अधिकचा रोजगार केवळ साखरी नाटे हे बंदर देते. एक मोठी बोट व त्यावरचे इतर सामान यांची किंमत साधारण ७० लाखांच्याही वर जात असते. म्हणजे ३५० कोटी हे बोटींसाठी लागलेत.(२)
Aug 19, 2022 11 tweets 3 min read
गोविंदा -भंडारी - सेना

दहिहंडी जुनी असेल खूप , काला म्हणत असतील जुन्या काळी. पण ही मुंबईतली थरांची दहिहंडी ही इथून सुरू झालीय.
ही दहिहंडी का सुरू झाली असेल, किर्तनात तर काठीनेच हंडी फोडतात थर लावत नाही. कोणी सुरवात केली हे थर लावायला, तर मुंबईतल्या भंडारी समाजाने.(१) कसे ते नंतर सांगतो. भंडारी हे भांडार रखवालदार म्हणून नाव पडले असावे असेही म्हणतात. संस्कृतच्या ‘मनधारक’ वरून भंडारी झाले असे बोलले जाते पण मला काही पटत नाही. माहिम हे भंडारी राज्य होते. बिंब राजे हे भंडारी होते असे बोलले जाते. पहिल्यापासून लढवय्ये.(२)
Aug 16, 2022 8 tweets 2 min read
यश नेहमीच खर नसत ,अस कोणीतरी बोललंय.खरच बरोबर वाटत जेव्हा साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड च्या क्रिकेट टीम बघतो.त्यांच्या कडे यश मिळवून देऊ शकणारे खेळाडू होतेच,पण टीम पण होती. पण नाही शक्य झालं.यश शक्य होणे याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात.पण यश नाही म्हणून कोणी कच्चा असतो असे नाही.(१) खेळाच्या परिपक्वतेवरून खेळाडू चा दर्जा ठरवला जातो बहुतेक. पण समीक्षा करणारे लोकच ह्या जगात तुन बाद झालेत. त्यांना समीक्षा करायची असते का गांड खाजवायची असते. लोकांच्या समीक्षेवर आता बोलणंच बंद केलं पाहिजे, समीक्षेचा उद्देश त्यांच्यासाठी आत्मप्रौढी मिरवण असाही असू शकतो.(२)
Jul 9, 2022 5 tweets 2 min read
रात्री आपल्याला जे कळत नसत त्यावर बोलावं.
टिकटोक बंदी नंतर थेट फायदा इंस्टा फेसबुक ला झाला, मागेच अंबानी च्या जिओत पैसे टाकले झुक्याने. व्हाट्सप् पण त्याचच आहे.
अशा काळात बीजेपी चे सरकार सत्तेत आहे. काँग्रेस ने काय केले असते, वाटून वाटून दिले असते.(१) लोकशाही अबाधित ठेवल्याचा फील आला असता.
आयरणी ही हे फेसबुक वर टाकतोय मी. अंबानी माझा डेटा घेऊन झोप विकत देईल का? सरकारला माझ्या झोपेची काळजी आहे म्हणून चीन चे लफडे केले. खरतर लॉकडाऊन हे देशात झोपेची कमी होती म्हणून केलेला. सर्व जनतेला पुरेशी झोप मिळावी. पण जनता ऐकणार तर ना ,(२)
Jul 4, 2022 4 tweets 2 min read
#कविता #माझाक्लिक

सगळ्याच खिडक्यांना मिळत नाय दान पुस्तकांचं
पानकळ्यात त्यांना मिळतो ट्रंकेचा कोपरा
चहाचा निवेद खिडक्यांना मकबूल नसतोच काही
घासलेट च्या चिमणीन काही खिडक्या उजळतात पावसात(१) पावसाचा गनिमी कावा दिसत नसतोय खिडकीतून
कधी तो तात्पर्य देतो माळाच्या झाडावर
सगळ्याच खिडक्या नाय दाखवत पान फुल
काही दाखवतात पावसाने तुंबलेली गटार संसाराने वाहिलेले नाले(२)
Jul 2, 2022 8 tweets 3 min read
म्हणजे कस तर कधीही आनंद देण्याच्या काळात क्रिकेट ही आहेच, सध्याच्या काळात रोहित बघणे डोळ्याला सुख देते. पण काळाने मागे गेले पाहिजे त्याशिवाय आनंद हा सुखात जात नाही. आनंद वेगळा सुख वेगळं. सुख. रात्रीची वेगळी, सकाळची वेगळी. उगा शुजात खा च नाव घेण्यात काही अर्थ नाही.(१) पण अनेक वेळा रात्री जागून काढल्यात. मग मॅच कोणाचीही असू त्याला काही फरक पडत नाही. मी वेस्ट इंडिज च्या मॅच बद्दल बोलतो. जुन्या काळातली दादागिरी नाही बघितली तर मला अँबरोज, वॉलश, लारा, चांदरपाउल, हुपर, जिमी अडम्स, किथ आथरटन, सरवान हेही आवडलेत. बघितलेत.(२)
Sep 2, 2020 16 tweets 5 min read
थोडा पूर आला की एक सुलभीकरण असते की 'हे सगळं वातावरण बदलाचे परिणाम आहेत' म्हणजे थोडं काही झालं की हे र्हेटोरिक मांडलं की मुक्ती मिळते अस काहीसे.
वातावरण बदल होतोय का ? तर नक्की होतोय. होणार आहे का ? होत राहणार आहे. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.(१) तापमान वाढ होतेय का तर होतेय. मुद्दा एवढा आहे की तापमान वाढीचा वेग जास्त आहे. यापूर्वी कोल्ड एज येऊन गेलंय. आणि असे अनेक नैसर्गिक घटक आहेत त्यांनी वातावरण बदल वा तापमान वाढ होत असते. ज्वालामुखी उद्रेक त्यातून निघणारा धूर मोठ्या प्रदेशावर वातावरण बदल घडवून आणू शकतो.(२)