मुंबई नगरी ही पहिल्यापासूनच बहुभाषी असली आणि तिच्या उभारणीत नि जडणघडणीत मराठ्यांसह सर्व प्रांतीयांचा वाटा असला, तरी तिचे अव्वल भौगोलिक स्थान आणि प्राचीनत्व हे निखळ मराठी आणि मराठीच आहे.
महाराष्ट्राला गुजरातशी सयामी जुळ्यासारखे जोडून द्वैभाषिक राज्य चालवण्याचा केंद्राचा हेका महाराष्ट्रीयांनी मोडून काढला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला. आणि गेली पन्नास वर्षे 'मुंबई कोणाची?' हा प्रश्न सतत ऐरणीवर येत राहिला.
मुंबई फक्त मराठ्यांचीच नव्हे तर सगळ्यांची, इथपासून ते 'मुंबई तुमची, भांडी घासा आमची' म्हणण्यापर्यंत कटुता ताणली जात असते. मुंबई हे दक्षिण आशियाचे इकॉनॉमिक हब होण्यापर्यंतची घोडदौड ही परप्रांतीयांच्या भांडवलामुळे झाली असे उदाहरणांसकट मांडले जाते.
पैसा, भांडवल हे शब्द नुसते ऐकले तरी मराठी माणसाला विनाकारण हुडहुडी भरते. किंबहुना पैसा आणि मराठी हे दोन विरुध्दार्थी शब्द असल्यागत आपली वाटचाल असते. त्यामुळे भांडवलवाल्या अमराठी माणसांसमोर मराठी माणसे कायम न्यूनगंड घेऊन वावरत असतात. रस्त्यावरच्या राड्यांमागेही हाच न्यूनगंड असतो.
पण याच महाराष्ट्राने मुंबईसह स्वतंत्र राज्य म्हणून जन्माला येण्यापोटी गुजरातला चक्क कोट्यवधी रुपये मोजले आहेत, हे फारच कमीजणांच्या गावी असेल. महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात येणार ही काळ्या दगडावरची रेघ ठरल्यानंतर राज्यघटनेच्या ७व्या व ८व्या परिशिष्टात...
...आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. कलम ४२(२), ४८(१) आणि ५१(५)अनुसार गुजरात राज्याची राजधानी विकसित करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या राज्याच्या कॅश बॅलन्स इन्व्हेस्टमेंट अकाऊंटमधून १० कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात यावी असे प्रस्तावित करण्यात आले.
त्यानंतर गुजरात राज्याची वाषिर्क तूट भरून काढण्यासाठी १९६० साली ६.०२ कोटी रुपयांपासून सुरुवात करून १९६९-७०पर्यंत १.१४ कोटी अशा क्रमाने रकमा द्याव्या, असे ठरले. याखेरीज १९६२-६३पासून १९६९-७०पर्यंत ८ आथिर्क वर्षांत गुजरातला २८.३९ कोटी रुपये लाभ व्हावा असाही निर्णय झाला.
बॉम्बे रिऑर्गनायझेशन अॅक्ट १९६०च्या कलम ५२खाली महाराष्ट्राने गुजरातला १९६२-६३ साली ६१२ लाख, ६३-६४ साली ५८५ लाख, ६४-६५ साली ५०१ लाख, ६५-६६ साली ५२६ लाख, ६६-६७ साली ४३३ लाख, ६७-६८ साली ३४० लाख, १९६८-६९ साली २०९ लाख असे ३२ कोटी ६६ लाख रुपये दिले.
यात नव्या तरतुदीनुसार दिलेले ३८ कोटी धरून एकूण ६० कोटी ६६ लाख रुपये महाराष्ट्राने गुजरातला दिल्याची नोंद 'द गॅझेट ऑफ इंडिया एक्स्ट्रा ऑडिर्नरी' मध्ये आहे.
याचा अर्थ, मुंबईवरील ताबा राखण्यासाठी महाराष्ट्राला ६० कोटींची किंमत चुकवावी लागली आहे. होय, एका परीने मुंबई आपण विकत घेतलीय.
भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या फाळणीत पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावे लागले, त्यावरून आजही एक वर्ग सतत विखारलेला असतो. इथे तर स्वतंत्र भारतातीलच एका राज्याने दुसऱ्याला ही किंमत मोजली आहे. या मुंबईत कामगार, चाकरमानी, कारकून, कष्टकरी आणि निर्धन बुद्धिवादी इतकीच ओळख...
असलेल्या मराठी माणसाला कोणताच न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आणण्यासाठी १०६ हुतात्म्यांचे रक्त तर आपण सांडले आहेच, पण ६० कोटी ६६ लाख रुपयेही मोजले आहेत.
हि महत्वाची माहिती जास्तीतजास्त पसरून आमची मुंबई म्हणणाऱ्यांचे तोंड बंद करा.
मुंबई आमची म्हणणाऱ्या गुजराती लोकांनी हा लेख वाचावा... कारण हा लेख मुंबईबाबत महाराष्ट्र आणि गुजरात मधल्या व्यवहाराचा आहे. 👆👆
दत्तकुमार खंडागळ - संपादक वज्रधारी, मो. 9561551006
शिवसेनेतील भाजप पुरस्कृत बंडाळीमुळे सध्या राज्यात राजकीय भुकंप झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आणि पक्षालाच मुळासकट उखाडून काढण्याचा प्रयत्न ...
शिवसेनेतील आमदारांना हाताशी धरून केला गेला आहे. शिवसेनेत या पुर्वी छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे अशा लोकांची बंडाळी झाली पण या वेळी एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड मोठे आणि धक्कादायक आहे. उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वालाच आव्हान देणारे आहे.
उध्दव ठाकरेंच्याकडे १७ आमदार उरलेत तर शिंदे तब्बल ३७ आमदार घेवून पळाले आहेत. आज उध्दव ठाकरेंची झालेली अवस्था बघून पुरंदरच्या तहाची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. ११ जून १६६५ साली पुरंदरच्या तहात छत्रपती शिवरायांचा मोठा पराभव झाला होता.
जगण्याची एक संधी मिळावी म्हणून त्या काकांनी माझा हात घट्ट पकडून ठेवलेला अजूनही आठवतोय... पण त्यांना ती संधी मिळालीच नाही!
कोविडमुळे ५ लाखांहून अधिक लोक या देशात आपल्या डोळ्यासमोर गेले, प्रत्येकाच्या घरातील, नात्यातील किमान एकजण ...
एका न दिसणाऱ्या विषाणूने मारुन टाकला. त्यावेळी आपल्या मनात काय विचार होते हे प्रत्येकाने स्वतःला एकदा विचारून पाहावे. सगळं पहिल्यापासून सुरुवात करू, पुन्हा उभं राहू... फक्त या आजाराच्या संकटातून बाहेर पडावं, आपल्याला एक संधी मिळावी हाच विचार प्रत्येकाच्या मनात होता ना?
आपल्याला ती संधी मिळालीही... आणि आपण काय करतोय?
जागतिक पातळीवरील रशिया-युक्रेन युद्ध असो की भारतातील दंगली असो... की महाराष्ट्रातील सध्याचं किळसवाणं राजकारण असो... माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे!
३६५ दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकांसाठी बेड उपलब्ध होत नव्हते...
ज्येष्ठ नागरिकांसाठी, खरे तर सर्वांसाठी!
लघवी केली की लगेच पाणी प्यायला हवे!
नॉक्टुरिया म्हणजे रात्री वारंवार लघवी होणे, हे हृदयाच्या विफलतेचे लक्षण आहे, मूत्राशयाचे नाही.
शिवपुरीचे प्रसिद्ध डॉक्टर डॉ. बन्सल स्पष्ट करतात की, नॉक्टुरिया हे खरेतर हृदय आणि मेंदूच्या रक्तप्रवाहात अडथळा येण्याचे लक्षण आहे. याचा प्रौढ आणि वृद्ध लोकांना सर्वात जास्त त्रास होतो कारण त्यांना लघवी करण्यासाठी रात्री वारंवार उठावे लागते.
झोप मोड होईल वा उठण्याचा कंटाळा, या भीतीने लोक रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्यास टाळाटाळ करतात. पाणी प्यायलं तर लघवी करण्यासाठी पुन्हा पुन्हा उठावं लागेल, असं त्यांना वाटतं. त्यांना माहित नाही की झोपण्यापूर्वी किंवा रात्री लघवी केल्यानंतर पाणी न पिणे ...
लोकांच्या मनावर एखादी गोष्ट कशी बिंबवायची याचे एक आधुनिक विज्ञान आहे आणि त्यामधील पीएचडी भाजपने संपादन केली आहे. मोदीजींनी फारसा विकास केला नसूनही, ते 'विकासपुरुष' असल्याची प्रतिमा या मंडळींनी निर्माण केली.
त्याचप्रमाणे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री सकाळी हातपायतोंड धुवून, मग लगेच पैसे खायला बसतात, अशाप्रकारचे समीकरण त्यांनी ठळक केले आहे. हे सरकार महावसुली सरकार आहे, असे भाजपमधील सर्व नेते जप केल्यासारखे म्हणत असतात.
जणू यांच्याबाबत मात्र 'गंगा मेरी माँ का नाम बाप का नाम हिमाला' अशीच स्थिती आहे... मविआ सरकारमधील काहीजण भ्रष्ट आहेतच, पण अवघे मंत्रिमंडळ अहोरात्र नोटा मोजत आहेत, असे कोणी म्हणू लागले, तर नाइलाजाने दुसरी बाजूही दाखवावी लागते.
सुपर मार्केटमध्ये वाइन विकायला ठेवली म्हणून काही प्रत्येक दारू न पिणारा माणूस वाइन प्यायला सुरू करणार नाही. हातभट्टी, देशी, फेनी, व्हिस्की, स्कॉच, रम, जिन, ब्रँडी, व्होडका, टकीला, श्यांपेन वगैरे वेगळ्या प्रकारची दारू पिणारे लोकही इतर सगळ्या दारू सोडून ...
फक्त वाइन प्यायला सुरू करणार नाहीयेत.
वाइन ही आजकाल उच्चभ्रू आणि रईस (जमिनी विकून श्रीमंत झालेल्या अडाणी लोकांना वगळून) लोकांमध्ये इज्जतीने पिली जाणारी गोष्ट आहे. २००० रुपयांची वाइन पिवून कुठल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराने बायकोला मारहाण केल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही.
ख्रिस्ती धर्मात वाइन हे सर्वमान्य आणि दैवी पेय आहे. येशू ख्रिस्ताने एका लग्नात वाइन कमी पडली म्हणून पाण्याला वाइनमध्ये बदलण्याचा चमत्कार केला. आजही जगभरातल्या चर्चमध्ये प्रार्थनासभेत प्रसादासारखी बुचभर वाइन प्यायला दिली जाते.
बराक ओबामांची अकरा मिनिटं आणि मोदींची वीस मिनिटं...
पंतप्रधान मोदींच्या पुलावरील वीस मिनिटाच्या जाममुळं गोदी मीडिया पिसाळला होता. अगदी राष्ट्रपती भवन ते सर्वोच्च न्यायालयही धुंडाळून झाले. २०१० मध्ये जगाचा महासत्तेचे प्रमुख तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा मुंबईत आले होते.
मुंबईच्या झेवियर महाविद्यालयात कृषी प्रदर्शन (USDA-ICAR) करार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद असा कार्यक्रम होता. कृषी पत्रकार या नात्याने अमेरिकन कॉन्सुलेटने हा कार्यक्रम कव्हर करण्याची संधी मिळाली. बराक ओबामा ताज हॉटेल थांबले होते. माझे कार्यालय फोर्ट विभागात होते.
अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी पूर्ण फोर्ट आणि नरिमन पॉईंट विभागाची नाकेबंदी केली होती. सोबतीला मुंबई पोलिसांची यंत्रणा होती.
सेंट झेवियर येथे ओबामा यांच्या भेटीच्या एक दिवस अगोदर अमेरिकन सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलीस यांच्यात खटका उडाला होता.